Saturday 23 July 2011

पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती दि.२3/७/२०११



क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  र्षी  आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
321.76 मि.मी.

12.75 मि.मी.
3
शासनाचे मदत कार्य
निरंक
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान(सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा  -242.2 (8.8) मि.मी.
2)सेलू - 375(15) मि.मी.
3)देवळी -313.68(9) मि.मी.
4)हिंगणघाट -225.2(7) मि.मी.
5)आर्वी -401(15) मि.मी.
6)आष्टी -259.20(15.2) मि.मी. 7)समुद्रपूर -375 (5.2) मि.मी
8)कारंजा-286.2(21.4) मि.मी.

Friday 22 July 2011

DIO WARDHA WRITES: विजय नाहटा यांची मराठी भाषा व माहिती जनसंपर्क विभागाच्या सचिवपदी नियुक्ती

DIO WARDHA WRITES: विजय नाहटा यांची मराठी भाषा व माहिती जनसंपर्क विभागाच्या सचिवपदी नियुक्ती

विजय नाहटा यांची मराठी भाषा व माहिती जनसंपर्क विभागाच्या सचिवपदी नियुक्ती

शुक्रवार, २२ जुलै, २०११
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक विजय नाहटा यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती मराठी भाषा विभागाच्या सचिव पदी करण्यात आली आहे. त्यांच्याकडे सध्याच्या महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय या पदाचा तसेच या विभागाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आला आहे.

विजय नाहटा यांना प्रशासकीय सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या हस्ते दिनांक २१ एप्रिल, २०११ रोजी सिव्हिल सर्व्हिस दिनानिमित्त नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

श्री. नाहटा हे १९९५ च्या भारतीय प्रशासकीय सेवतील अधिकारी असून त्यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. मुख्यमंत्र्यांचे उपसचिव व कोकण विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. तत्पूर्वी त्यांनी चंद्रपूर, नांदेड, सातारा, पुणे, मुंबई इत्यादी ठिकाणी विविध पदांवर काम करुन आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. 

राष्ट्रीय पुरस्कारासाठी अपंग व्यक्तीकडून प्रस्ताव आमंत्रित


प्रसिध्दी पत्रक                जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा     दि. 22 जुलै 2011 

     वर्धा,दि.22- अपंग व्यक्तींना सन 2011 चे राष्ट्रीय पुरस्कार देणेबाबत केंद्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, दिल्ली यांनी पुरस्कारासाठी अर्ज मागविलेले आहे.
     केंद्र शासनाकडुन देण्यात येणा-या पुरस्कार योजनेचा तपशिल व त्यासाठी करावयाचा अर्जाचा नमुना केंद्र शासनाच्या  सामाजिक न्याय विभागाच्या  www.socialjustice.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर अर्ज भरुन परिपूर्ण प्रस्ताव या कार्यालयास 28 जुलै 2011 पुर्वी सादर करावा. सदर राष्ट्रीय पुरस्कारासाठी पुढील प्रमाणे पात्र व्यक्ती अर्ज सादर करु शकतात. यामध्ये सर्वोत्कृष्ठ अपंग कर्मचारी (स्वयंरोजगारासह), अपंग व्यक्तीचे सर्वोत्कृष्ठ नियुक्त अधिकारी, अपंग व्यक्तीच्या नियुक्तीसाठी कार्य करणा-या यंत्रणेचे (सेवायोजन कार्यालयाची) अधिकारी व यंत्रणा यांचा समावेश आहे आहे समाज कलयाण अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा कळवितात.
                              00000

अपंगाच्या स्वयं उद्योगासाठी कर्ज प्रस्ताव आमंत्रित


  महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी पत्रक       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा       दि.22 जूलै  2011
-------------------------------------------------------------------------
      वर्धा, दि. 22- सन 2011-12 या आर्थिक वर्षात वर्धा जिल्ह्यातील अंध, कर्णबधिर अस्थिविकलांग व्यक्तिंना स्वयं उद्योगासाठी राज्य शासनाचया बीज भांडवल योजने अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत रुपये 2 लाख रुपये  कर्ज देण्याच्या योजना कार्यान्वीत आहे.त्यासाठी कर्ज प्रस्ताव आमंत्रित आहे.
     अपंगत्वाच्या  प्रकारात मोडणा-या अपंग व्यक्तीनी या कार्यालयातुन मंजुर रक्कमेच्या 20 टक्के सुट सवलतीसाठी विहित नमुन्यातील अर्ज दि. 31 जुलै 2011 पर्यंत विनामुल्य वितरणासाठी उपलब्ध आहेत. हे अर्ज समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा यांचेकडे दि. 31 ऑगस्ट 2011 पर्यंत संपूर्ण कागदपत्रासह पूर्णत: भरुन पाठवावे . या योजनेच्या अटी व नियम पुढील प्रमाणे आहेत.
     अर्जदार पूर्ण अंध, अंशत: अंध, कर्णबधिर, अस्थि विकलांग ज्यांचे अपंगत्वाची  40 टक्केवारी व त्यापेक्षा जास्त असणे अनिवार्य आहे. अर्जदार वर्धा जिल्ह्यात 15 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा रहिवासी असावा.अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा  कमी नसावे व 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्जदाराचे सर्व मार्गानी मिळून वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाखा पेक्षा जास्त नसावे. अर्जदारास बँकेने रुपये 1,50,000 मंजुर केले त्याच व्यक्तींना मंजुर रक्कमेच्या 20 टक्के सुट सवलतीची रक्कम बँकेकडे जमा केली जाईल. अर्ज मंजुर करणे वा नामंजुर करणे हे बँकेच्या अधिकारातील बाब आहे. अर्जदार वा त्याच्या कुटूंबातील व्यक्ती थकित अर्जदार नसावा. व्यवसायाचे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केलेला असावा.
     उपरोक्त अटीची पुर्तता करणा-या अपंगानी मुदतीत अर्ज नेणे व मुदतीत सर्व कागदपत्रासह अर्ज या कार्यालयास जमा करावे. मुदतीत व परिपूर्ण अर्ज असणे अनिवार्य आहे. अपुर्ण व मुदतीनंतर अर्ज या कार्यालयास सादर केल्यास तो अर्ज विचारात घेतल्या जाणार नाही. असे समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा कळवितात.
                           00000

वर्धा जिल्ह्याचे पर्जण्यमान



महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी पत्रक       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा       दि.22 जूलै  2011
-------------------------------------------------------------------------
       वर्धा, दि. 22- वर्धा जिल्ह्यात आतापावेतो 309.70 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, तालुकानिहाय कंसातील आकडे हे एकूण पावसाचे असून कंसाबाहेरील आकडे हे आज पडलेलया पावसाचे आहे.
      वर्धा 2.20 (242.20) मि.मी., सेलू 3 (375) मि.मी., देवळी 2.02 (313.68) मि.मी., हिंगणघाट 3.10 (225.20) मि.मी., समुद्रपूर 3 (375) मि.मी., आर्वी  1 (401) मि.मी., आष्टी 2.80 (259.3) मि.मी., कारंजा 3 (286.20) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
          आज जिल्ह्यात एकूण 20.12 मि.मी. पाऊस पडला असून आतापावेतो एकूण 2477.63 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज सरासरी पडलेला पाऊस 2.51 मि.मी. असून, आतापर्यंत 309.70 मि.मी. एकूण सरासरी एवढा पाऊस पडला आहे.
                                                       000000

नवीन बृहत आराखडयानुसार वर्धा जिल्हयातील शाळांची निश्चिती जाहीर


महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी पत्रक       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.22 जूलै  2011
-------------------------------------------------------------------------
       वर्धा, दि. 22- दि. 16 जून 2009 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भविष्यात मराठी माध्यमांच्या शाळांची आवश्यकता आहे अशी ठिकाणे निश्चित करुन त्या ठिकाणी आवश्यक असल्यास नवीन शाळांना परवानगी देण्यासाठी बृहत आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार वर्धा जिल्हयातील शाळांची निश्चिती जाहीर करण्यात आली आहे.
      वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक शाळांकरीता वर्धा पंचायत समिती अंतर्गत मांडवा पौड व सेलू पंचायत समिती अंतर्गत नवरगांव अशा एकूण 2 प्राथमिक शाळा तर उच्च प्राथमिक शाळांकरिता कारंजा पंचायत समिती अंतर्गत बांगडापूर तर वर्धा पंचायत समिती अंतर्गत नेरी व एकूर्ली अशा एकूण 3 उच्च प्राथमिक शाळांची निश्चिती करण्यात आलेली आहे.
     सदर बृहत आराखडयातील शाळा संदर्भात काही हरकती, आक्षेप, सूचना असल्यास संबधितांनी आठ दिवसाच्या आत शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद, वर्धा यांचेकडे लेखी स्वरुपात सादर कराव्यात व त्याची प्रत विभागीय उपसंचालक कार्यालयात सादर करावी. असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथ)जि.प.वर्धा यांनी केले आहे.
                           000000

राष्ट्रीय कृषि पिक विमा योजने अंतर्गत शेतक-यांना विशेष सवलत


   महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी पत्रक       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.22 जूलै  2011
-------------------------------------------------------------------------
       वर्धा, दि. 22- वर्धा जिल्ह्यात खरीप ज्वारी, सोयाबीन, तुर व कपाशी पिका करीता संपुर्ण तालुके, खरीप भुईमुंग पिका करीता आर्वी ,आष्टी व कारंजा ही तीन तालुके व ऊस पूर्व हंगामी व ऊस खोडवा पिका करीता राश्ट्रीय कृषि पिक विमा योजने अंतर्गत शेतक-यांना विशेष सवलत देण्यात येत आहे.
आर्वी, वर्धा, सेलु, देवळी व ऊस सुरु करीता आर्वी, वर्धा, सेलू, समुद्रपुर या चार तालुक्याची निवड करण्यात आलेली आहे. पिक विमा योजनेसाठी वर्धा जिल्ह्याला विमा हप्ता दरात अल्प व अत्यल्प शेतक-यांना 50 टक्के, सर्व पिके व कापूस पिकासाठी अल्प अत्यल्प शेतकरी 75 टक्के व इतर शेतकरी यांना 50 टक्के विशेष सुट देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अधिसुचित तालुके, अधिसुचित पिके व अधिसुचित मंडळे यांची यादी संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे. शेतक-यांनी खरीप हंगामात या योजनेत सहभागी होण्याची अंतीम तारीख पेरणी पासून 1 महिना किंवा 31 जुलै 2011 यापैकी जी लवकर असेल त्या तारखेच्या आत सहभागी व्हायचे आहे. ऊस पिकासाठी लावनीपासुन 1 महिना किंवा 31 डिसेंबर 2011 तसेच ऊस खोडवा करीता 31 मे 2012 व सुरु ऊसा करीता 31 मार्च 2012 पर्यंत सहभागी व्हायचे आहे.
राष्ट्रीय कृषि पिक विमा योजने अंतर्गत चालू वर्षासाठी ज्वारी या पिकासाठी जोखीम स्तर  60 टक्के असून, विमा संरक्षीत रक्कम 6 हजार 600 आहे. विमा हप्त्याचा सर्वसाधारण दर अडीच टक्के असून, वर्धा जिल्हयातील अल्प व अत्यल्प सवलतीचा हप्ता रु. 83 व इतर    शेतक-यांना रु. 165, तुर पिकासाठी जोखीम स्तर 60 टक्के असून, विमा संरक्षीत रक्कम 13 हजार 400 आहे. विमा हप्त्याचा सर्वसाधारण दर अडीच टक्के असून, अल्प व अत्यल्प भुधारक शेतक-यांना 168 व इतरशेतक-यांना 335 रुपये , भुईमुंग पिकासाठी जोखीम स्तर 60 टक्के असून विमा संरक्षित रक्कम 12 हजार 200 असून, विमा हप्त्याचा सर्वसाधारण दर साडे तीन टक्के असून,अल्प व अत्यल्प भुधारक शेतक-यांसाठी रु. 214 इतरांसाठी 427 रुपये आहे. सोयाबिन पिकासाठी जोखीम स्तर 60 टक्के असून, विमा संरक्षित रक्कम 8 हजार 500 रुपये व विमा हप्त्याचा सर्वसाधारण दर साडे तीन टक्के आहे. अल्प अत्यल्प भुधारक शेतक-यांसाठी 149 रुपये व इतरांसाठी 298 रुपये आहे. कापूस पिकासाठी जोखीम स्तर 80 टक्के असून, विमा संरक्षीत रक्कम 16 हजार 600 रुपये, विमा हप्त्याचा सर्वसाधारण दर 7.60 टक्के असून अल्प व अत्यल्प भुधारक शेतक-यांसाठी 316 रुपये व व इतरांसाठी 631 रुपये आहे. ऊस व पूर्व हंगामी पिकासाठी जोखीम स्तर 80 टक्के  असून, विमा संरक्षित रक्कम 93 हजार 400 रुपये विमा हप्त्याचा सर्वसाधारण दर 4.70 टक्के आहे. अल्प व अत्यल्प भुधारकासाठी 2 हजार 195 व इतरांसाठी 4 हजार 390 रुपये आहे. ऊस सुरु पिकासाठी जोखमी स्तर 80 टक्के असून,विमा संरक्षित रक्कम 86 हजार 500 रुपये व विमा हप्त्याचा सर्वसाधारण दर 5.70 टक्के आहे. अल्प व अत्यल्प भुधारक शेतक-यांना रु. 2466 व इतरांसाठी 4 हजार 931 रुपये आहे. ऊस खोडवा पिकासाठी जोखीम स्तर 80 टक्के असुन विमा संरखित रक्कम 74 हजार 700 रुपये आहे. विमा हप्त्याचा सर्वसाधारण दर 6.75 टक्के असून, अल्प व अत्यल्प भुधारक शेतक-यासाठी 2 हजार 521 व इतरांसाठी 5 हजार 049 रुपये सवलतीच्या दराने हप्ता आहे.
सदर योजना पिक कापणी प्रयोगाच्या उत्पन्नावर आधारीत असुन हवामान आधारीत पिक विमा योजनेचा या योजनेशी संबंध नाही. कर्जदार व बिगर कर्जदार दोन्ही शेतकरी सदर योजनेत सहभागी होवु शकतात. सदर योजना शेतक-यांच्या हिताची असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतक-यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब    ब-हाटे यांनी केले आहे.
                     00000

Thursday 21 July 2011

पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती दि.२२/७/२०११



क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  वर्षी आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
३०९.७० मि.मी.

.५१ मि.मी.
3
शासनाचे मदत कार्य
निरंक
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान(सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा  -२४२.२ (२.२) मि.मी.
2)सेलू - ३७५(३) मि.मी.
3)देवळी -३१३.६८(२.०२) मि.मी.
4)हिंगणघाट -२२५.२(३.१) मि.मी.
5)आर्वी -४०१() मि.मी.
6)आष्टी -२५९.३(२.८) मि.मी. 7)समुद्रपूर -३७५ (३) मि.मी
8)कारंजा-२८६.२() मि.मी.