Saturday 3 December 2011

मतदानाच्‍या दिवशी स्‍थानिक सुट्टी रद्द


वर्धा, दि.3- राज्‍य निवडणूक आयोग, मुंबई यांचे दि. 2 डिसेंबर 2011 रोजीचे आदेशान्‍वये सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार नगर परिषद मतदान रविवार दि. 11 डिसेंबर 2011 ला होणार असल्‍यामुळे गुरुवार दिनांक 8 डिसेंबर 2011 रोजी नगर परिषद क्षेत्राकरीता दिलेली स्‍थानिक सुट्टी रद्द करण्‍यात येत आहे. याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्‍यावी. असे जिल्‍हाधिकारी वर्धा कळवितात.
                             00000

कृषि मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांचा दौरा



      वर्धा, दि.3- कृषी व पणन मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांचे बल्‍लारपूर येथून हेलीकॅप्‍टरने सायंकाळी 4.10 वाजता वर्धा हॅलीपॅडवर आगमन व त्‍यानंतर सायंकाळी 4.15 वाजता वर्धा सभा स्‍थळ येथे आगमन व प्रचार सभेस उपस्थिती. सायंकाळी 5.15 वाजता वर्धा येथून मोटारीने कामठी जि. नागपूरकडे प्रयाण करतील.

                             0000




नगर परिषदेच्‍या निवडणुकीसाठी संपर्क अधिकारी नियुक्‍ती


               
      वर्धा,दि.3-राज्‍य निवडणुक आयोग यांचे आदेशान्‍वये जिल्‍ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी व सिंदी रेल्‍वे या नगर परिषदांचया सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी संपर्क अधिकारी नियुक्‍त केलेले आहे.
     संपर्क अधिका-यामध्‍ये  अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांच्‍याकडे नगर परिषद वर्धा व नगर परिषद हिंगणघाट, उपजिल्‍हाधिकारी जे.बी.संगीतराव यांच्‍याकडे नगर परिषद सिंदी (रे) व नगर परिषद आर्वी व उपजिल्‍हाधिकारी आर.बी.खजांची यांच्‍याकडे नगर परिषद देवळी व नगर परिषद पुलगाव या निवडणूक क्षेत्राचा समावेश असून, त्‍यांना नेमून दिलेल्‍या नगर परिषदेच्‍या निवडणुक विषयी वेळोवेळी सर्व कामाचा आढावा घेऊन अहवाल जिल्‍हाधिकारी यांना सादर करावा. असे आदेशात नमूद आहे.
                        000000

फिरते नांव नोंदणी पथकाचा दौरा



   वर्धा,दि.3- जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, वर्धा या कार्यालयाचे फिरते नांव नोंदणी पथक माहे डिसेंबर 2011 मध्‍ये खालील नमुद ठिकाणी दिलेल्‍या तारखांना भेटी देऊन नांव नोंदणीचे काम करतील. खालील उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेच्‍या मुळ प्रती, जातीचे मुळ प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्‍यक आहे. करीता इच्‍छूक उमेदवारांनी आपल्‍या नावाची नोंदणी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हजर राहून नोंदणी करुन घ्‍यावी.
     दि. 6 डिसेंबर 2011 रोजी पंचायत समिती, आष्‍टी, दि. 7 डिसेंबर 2011 रोजी पंचायत समिती, कारंजा, दि. 10 डिसेंबर 2011 रोजी पंचायत समिती, आर्वी, दि. 12 डिसेंबर 2011 रोजी पंचायत समिती, सेलु, दि.15 डिसेंबर 2011 रोजी पंचायत समिती, समुद्रपुर, दि.16 डिसेंबर 2011 रोजी पंचायत समिती, हिंगणघाट, दि. 18 डिसेंबर 2011 रेाजी नगर परिषद, पुलगांव आणि दि. 19 डिसेंबर 2011 रोजी पंचायत समिती, देवळी येथे उमेदवा-यांच्‍या नावाची नोंदणी करण्‍यात येईल.असे जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, वर्धा यांनी  कळविले आहे.

ध्‍वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ 7 डिसेंबर रोजी



    वर्धा,दि.3-सशस्‍त्र सेना ध्‍वजदिन निधी 2011 संकलन शुभारंभ कार्यक्रम जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांचे अध्‍यक्षतेखाली विकास भवन, वर्धा येथे बुधवार दि.7 डिसेंबर 2011 रोजी दुपारी 12 वाजता आयोजित केलेला आहे.
   या कार्यक्रमाला मोठ्या संख्‍येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी,वर्धा यांनी केले आहे.

सहाय्यक आयुक्‍त समाज कल्‍याण हे सुधारित पदनाम



     वर्धा,दि.3- सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत विशेष जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी या विद्यमान नावाने असलेल्‍या पदनामामध्‍ये शासनाने निर्गमीत केलेल्‍या आदेशान्‍वये सुधारणा केलेली असून आता सुधारित पदनाम सहाय्यक आयुक्‍त, समाज कल्‍याण असे करण्‍यात आले आहे. संबधितांनी यासुधारित पदनामाची नोंद घ्‍यावी. असे सहाय्यक आयुक्‍त , समाज कल्‍याण ,वर्धा कळवितात.

मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांचा दौरा कार्यक्रम



   वर्धा,दि.3- महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांचे दिनांक
4 डिसेंबर 2011 रेाजी दुपारी 4.10 वाजता बल्‍लारपूरहून हेलिकॅप्‍टरनी वर्धा हेलीपॅड येथे आगमन, दुपारी 4.15 वाजता सभास्‍थळ येथे आगमन व निवडणूक प्रचार सभेस उपस्थिती. सायंकाळी 5.15 वाजता वर्धा येथून मोटारने कामठी जि. नागपूरकडे प्रयाण करतील.

Friday 2 December 2011

एचआयव्‍ही व एड्स जनजागृतीची संदेश रॅली



वर्धा, दि.2- सामान्‍य रुग्‍णालय, वर्धा यांच्‍या वतीने नुकतेच दि.1 डिसेंबर 2011 रोजी सकाळी 8-30 वाजता सामान्‍य रुग्‍णालय वर्धा येथून जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी एचआयव्‍ही व एड्स जनजागृती संदेश रॅलीला हिरवी झेंडी दाखवुन रॅलीला सामान्‍य रुग्‍णालयांतून प्रारंभ करण्‍यात आला.
रॅलीची सुरुवात करण्‍यापुर्वी विद्यार्थ्‍यांना एचआयव्‍ही व एड्सबाबत शपथ देण्‍यात आली. तसेच या वर्षाचे घोषवाक्‍य`` शुन्‍य गाठायचा आहे.``याची संकल्‍पना विद्यार्थ्‍यांना  जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, डॉ. आर.डी.रावखंडे मॅडम यांनी समजावुन सांगितली.
 एचआयव्‍ही व एड्स संदेश रूली ही सामान्‍य रुग्‍णालय, वर्धा येथून निघुन बस स्‍टॉप, बजाज चौक, इंगोले चौक, महोदवपुरा या मुख्‍य मार्गाने फिरविण्‍यात आली.रॅलीमध्‍ये शहरातील विविध शैक्षणिक संस्‍था, स्‍वंयसेवी संस्‍था, प्राध्‍यापक वर्ग तसेच रुग्‍णालयीन अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
                            0000000 

शेतीपुरक व्‍यवसायासाठी कौशल्‍य विकास प्रशिक्षण


  
     वर्धा,दि.2-विदर्भ विकास कार्यक्रमा अंतर्गत या वर्षात  मध्‍ये जिल्‍ह्यातील शेतक-यांसाठी शेतीपुरक व्‍यवसाय करण्‍याकरीता कौशल्‍य वृध्‍दी संदर्भात प्रशिक्षण देवून शेतातील उत्‍पादकता वाढविण्‍याचे उद्दिष्‍ट विचारात घेवुन कौशल्‍य विकास प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे.
     जिल्‍ह्यात राबविण्‍यात येणा-या 75 शेतीशाळेच्‍या माध्‍यमातुन प्रत्‍यक्ष शेतक-यांचे शेतावर प्रशिक्षण देण्‍यात येणार असून त्‍यातुन शेतक-यांना शेतीपुरक व्‍यवसायाचे कौशल्‍य शिकावयाचे आहे. सदर कार्यक्रम राबविण्‍याचे अनुषंगाने दिनांक 30 नोव्‍हेंबर 2011 रोजी विकास भवन वर्धा येथील कृषि विभाग, पशुसंवर्धन विभाग, दुग्‍ध  व्‍यवसाय, मत्‍स्‍य व्‍यवसाय,रेशीम विकास, कृषि समृध्‍दी, रोजगार व स्‍वयंरोजगार विभाग, सामाजिक वनीकरण इत्‍यादी संलग्‍न विभागात क्षेत्रीय स्‍तरावर काम करणारे अधिकारी व कर्मचा-यांची कार्यशाळा आयोजीत करण्‍यात आली होती. कार्यशाळेला कृषि व संलग्‍न  विभागाचे 235 अधिकारी व कर्मचारी तथा विविध कृषि पुरक व्‍यवसायात तज्ञ असणारे 22 शेतकरी उपस्थित होते.
कार्यशाळेचे उदघाटन अप्‍पर जिल्‍हाधिकारी भागवत यांनी दिप प्रज्‍वलन  व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्‍या प्रतिमेचे पुजन करुन केले. प्रास्ताविक जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी केले.
योजनेबाबत व आयोजित करावयाच्‍या शेती शाळेबाबत सादरीकरण केले. त्‍यांनतर भागवत यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले. यावेळी सर्व संलग्‍न  विभागाने कौशल्‍य विकास व शेतीशाळा बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
      दुपारच्‍या सत्रात उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी प्रत्‍यक्ष कोशल्‍य आधारीत शेतीशाळा कशा आयोजीत करावयाच्‍या याबाबत मार्गदर्शन केले. त्‍यानंतर प्रत्‍येक विभागानी शेतीशाळा आयोजनाचे नियेाजन करुन कार्यक्रम सादर केला. त्‍याप्रमाणे 2011-12 मध्‍ये जिल्‍ह्यात कृषि विभागा मार्फत 40, पशुसंवर्धन विभागाच्‍या 12, दुग्‍धव्‍यवसाय 10, रेशीम उद्योग 2, सामाजिक वनीकरण 2, शेतीशाळा घेण्‍याचे निश्चित करण्‍यात आले. उर्वरीत 9 शेतीशाळेत मत्‍स्‍य  उत्‍पादन, मधुमक्षीका पालन, ठिंबक सिंचन संच देखभाल दुरुस्‍ती, कृषि अवजारे देखभाल दुरुस्‍ती घेण्‍याचे नियेाजन संबंधीत विभागाकडून करण्‍याचे ठरले. कार्यक्रमाचे संचालन व आभार संतोश डाबरे यांनी केले.
                             00000