Saturday 12 January 2013

अण्‍णासाहेब भिसीकर यांच्‍या निरामय जीवनाची शतकपूर्ती


       वर्धा दि.12- पूर्वीच्‍या प्रसिध्‍दी व आताच्‍या माहिती व जनसंपर्क विभागात उपसंचालक पदावरुन निवृत्‍त झाल्‍यानंतरही कॅन्‍सर रिलिफ सोसायटी,ग्राहक संरक्षण मंच आणि मुकबधीर विद्यार्थ्‍यांच्‍या शिक्षणासह सामाजिक कार्यात समरस झालेल्‍या मुकूंद प.ऊर्फ अण्‍णासाहेब भिसीकर यांनी निरामय जीवनाची शतकपूर्ती पूर्ण केली आहे. आज त्‍यांचा 101 वा वाढदिवस साजरा होत आहे.
तेव्‍हाच्‍या मध्‍य प्रांताच्‍या प्रशासनामध्‍ये व त्‍यानंतर महाराष्‍ट्राच्‍या प्रसिध्‍दी संचालनालयात  एक आदर्श प्रसिध्‍दी अधिकारी म्‍हणून आपल्‍या कर्तव्‍याने एक वेगळी ओळख निर्माण केली होती. प्रसिध्‍दी विभाग हा पूर्वी महसुल विभागात सौलग्‍न होता आणि वृत्‍तपत्रात प्रसिध्‍द झालेल्‍या बातम्‍या इंग्रजीमध्‍ये अनुवादित करुण देण्‍याचे काम होते. 1937 मध्‍ये अनुवादक त्‍यानंतर सहाय्यक प्रसिध्‍दी अधिकारी म्‍हणून अण्‍णासाहेब भिसीकर यांनी प्रसिध्‍दी विभागात आपल्‍या कामाची सुरुवात केली. कुटूंबकल्‍याण,आदिवासी विकास व लॉटरी सारखा विषय विशेष प्रसिध्‍दी मोहिमेच्‍या माध्‍यमातून जनतेच्‍या मनांवर बिंबवण्‍याचं त्‍यांनी या विभागात कार्यरत असतांना यशस्‍वीपणे पूर्ण केले. प्रसिध्‍दी मोहिम कशी राबवावी याचा आदर्श जनसंपर्क क्षेत्रात काम करणा-यासाठी मार्गदर्शकच आहे. अण्‍णासाहेब जानेवारी 1971 मध्‍ये प्रसिध्‍दी उपसंचालक म्‍हणून मुंबई मंत्रालयातून सेवानिवृत्‍त झाले.
अणासाहेब सेवानिवृत्‍तीनंतर विदर्भ कॅन्‍सर रिलिफ सोसायटीचे सलग पाच वर्ष सदस्‍य म्‍हणून तसेच ग्राहक संरक्षण समितीचे अध्‍यक्ष व त्‍यानंतर शंकर नगर मुकबधीर विद्यालयाचे उपाध्‍यक्ष म्‍हणूनही आपल्‍या कामातील वेगळी छाप निर्माण केली आहे.
          वयाची शंभरीपूर्ण केल्‍यानंतरही  सामाजिक कार्यासोबत आरोग्‍य विषयक मार्गदर्शनाचे काम अव्‍याहतपणे सुरु आहे. आज 13 जानेवारी रोजी त्‍यांच्‍या वयाला शंभर वर्ष पूर्ण होऊन 101 व्‍या वर्षात पर्दापण करीत आहे. निरामय जीवनाची शतकपूर्ती ही वृत्‍तपत्र क्षेत्रातील सर्वांसाठी महत्‍वपूर्ण घटना आहे.
00000

Wednesday 9 January 2013

सिंदी मेघे व पिंपळगांव येथे म्‍हाडाची योजना सूरु करणार




                                                              - सचिन अहिर
        वर्धा दि. 9 – भविष्‍यातील घरांची परिस्थिती बिकट होणार असून या परिस्थितीवर मात करण्‍यासाठी वर्धा मालुक्‍यातील सिंदी मेघे व हिंगणघाट तालुक्‍यातील पिंपळगांव येथे नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून लवकरच दोन ठिकाणी गृहनिर्माण योजना सूरु करण्‍यात येतील अशी माहिती गृहनिर्माण, उद्योग, सामाजिक न्‍याय व पर्यावरण राज्‍यमंत्री सचिन अहिर यांनी दिली.
     जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात आज उद्योग, सामाजिक न्‍याय पर्यावरण व गृह निमार्ण विभागाच्‍या कामकाजाबाबत आढावा घेण्‍यात आला त्‍या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्‍हाधिकारी एन नवीन सोना, निवासी उपजिल्‍हाधिकारी सुनिल गाडे, उपजिल्‍हाधिकारी मेश्राम, अप्‍पर पोलीस अधिक्षक टी.एस.गेडाम, प्रकल्‍प अधिकारी बी.एम.मोहन, उपविभागीय अधिकारी उमेश काळे, हरीष धार्मीक, समाजकल्‍याण  अधिकारी, जया राऊत, तहसिलदार सुधांशु बन्‍सोड, नगर पालिका मुख्‍याधिकारी आदी मान्‍यवर उपस्थितीत होते.
            शहराच्‍या वाढत्‍या विस्‍तारीकरणामुळे तसेच लोकसख्‍यावाढीमूळे शहरा लगत असलेल्‍या ग्रामीण क्षेत्रामध्‍ये म्‍हाडाची योजना सुरू करण्‍याचा प्रस्‍ताव असल्‍याचे नमूद करून सामाजिक न्‍याय मंत्री सचित अहिर म्‍हणाले की, वर्धा तालूक्‍यातील मौजा सिंदीमेघे येथे सर्व्‍हे कमांक 159 व 160 मधील 8.40 हेक्‍टर आर जमीन व हिंगणघाट तालूक्‍यातील मौजा पिंपळगांव येथील सर्व्‍हे क्र.157/ , 165 ते 168 ,190 ते 192 मधील भुखंड म्‍हाडा योजने अंतर्गत घरकुल बांधकामासाठी मिळणार आहे. हया बाबतची प्रक्रीया सुरू झाली असून लवकरच या योजनेला मंजूरी प्रदान करण्‍यात येईल.
            सिंदीमेघे येथील जमिन मंजूरीसाठीच्‍या प्रस्‍तावावर कार्यवाही सूरु आहे. पिंपळगांव येथील प्रस्‍ताव 2008 मध्‍ये म्‍हाडाला सादर करण्‍यात आला होता.तथापी आता मात्र नव्‍याने सिध्र गणक मुल्‍यानूसार म्‍हाडाने महसूल खात्‍याकडे तातडीने रक्‍कम जमा करावी असे आदेश यावेळी त्‍यांनी दिले.
           यावेळी त्‍यांनी शिष्‍यवृत्‍ती व उद्योग विभागाचा आढावा घेतला. पर्यावरण विभागाचे प्रमाणपत्र गौणखनन  रेती घाटासाठी आवश्‍यक असल्‍याचे सागून रेती घाट व गौण खणणाना बाबत असलेल्‍या आक्षेपाचे निराकरण मंत्रालय सतरावरून करण्‍यात येईल असेही ते म्‍हणाले.
यावेळी जिल्‍हाधिकारी सोना यांनी जिल्‍हयातील आधार कार्ड बाबतची माहिती देवून शाळा व महाविद्यालयातील शिष्‍यवृत्‍ती धारकाचे आधार कार्ड काढण्‍यासाठी कसोशीचे प्रयत्‍न सुरू असल्‍याचे सागून ते म्‍हणाले की, वर्धा जिल्‍हा हा आधार कार्डसाठी पायलट जिल्‍हा  घोषीत झाला आहे. शिष्‍यवृत्‍ती व जननी सुरक्षा योजना हया प्रामूख्‍याने राबवायचे असून जिल्‍हा समाज कल्‍याण विभागात  अपूरा कर्मचारी वर्ग असल्‍यामुळे शिष्‍यवृत्‍ती धारकाचे आधार कार्ड काढण्‍याचे कामे सुरळीत होण्‍यासाठी इतर जिल्‍हयायातून कर्मचारी वर्ग प्रतिनियुक्‍तीवर पाठविण्‍याची विनंती त्‍यांनी केली.
                             0000

ध्‍वजदिन निधी संकलन शुभारंभ 10 जानेवारी रोजी



वर्धाः- देशाचे स्‍वातंत्र्य अबाधित ठेवणा-या आजी, माजी सैनिक तसेच त्‍यांचे कुटूंबीयांच्‍या व अपंग सैनिकांच्‍या पुनर्वसनासाठी निधीची आवश्‍यकता असेते. त्‍यासाठी सशस्‍त्र सेना ध्‍वजदिन दरवर्षी साजरा करण्‍यात येत असतो. यावर्षी गुरुवार दिनांक.10 जानेवारी 2013 रोजी सकाळी 11 वाजता विकास भवन येथे जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना यांचे अध्‍यक्षतेखाली सशस्‍त्र सेना ध्‍वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ होत आहे.
            यावेळी जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार, जि.प.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने यांची प्रमुख उपस्थिती राहील. सदर कार्यक्रमासोबतच माजी सैनिकांच्‍या मेळाव्‍याचे  देखील आयोजन करण्‍यात आले आहे. तरी सदर कार्यक्रमास जिल्‍हयातील आजी व माजी  सैनिक, त्‍यांचे अवलंबित व नागरिकांनी उपस्थित राहुन हा कार्यक्रम यशस्‍वी करावा,असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी वर्धा यांनी केले आहे.
000

Sunday 6 January 2013

समाजातील दुरावस्‍तेवर आघात करण्‍यासाठी माघ्‍यमांची गरज - डॉ.वेदप्रकाश मिश्रा


                                              वर्धा जिल्‍हा श्रमिक पत्रकार संघाच्‍या
                           चौथा स्‍तंभ पुरस्‍काराचे वितरण 
           वर्धा दि.6-पत्रकार क्षेत्रात काम करीत असतांना अध्‍ययन,आकलन आणि निराकरण या गोष्‍टी महत्‍वाच्‍या असून समाजातील दुराव्‍यवस्‍थेवर आघात करण्‍यासाठी माध्‍यमांची महत्‍वाची भूमिका असल्‍याचे प्रतिपादन दत्‍ता मेघे आयुविज्ञान संस्‍थेचे प्र.कुलगुरु डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.  
         विकासभवन येथे मराठी पत्रकार दिन तसेच बाळशास्‍त्री जांभेकर व्दिजन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍त वर्धा श्रमिक पत्रकार संघातर्फे दिल्‍या जाणारा चौथा स्‍तंभ पुरस्‍कार समारंभ प्रमुख वक्‍ते म्‍हणून डॉ.मिश्रा बोलत होते.
          चौथा स्‍तंभ पुरस्‍कार हिंगणघाट  येथील समाजसेवक नामदेवराव  कठाणे यांना यावेळी प्रदान करण्‍यात आला. पुरस्‍कारामध्‍ये शाल,श्रीफळ,स्‍मृतिचिन्‍ह व पाच हजार रोख रुपयाचा समावेश आहे.
अध्‍यक्षस्‍थानी सेवाग्राम आश्रमचे अध्‍यक्ष अॅड मा.म.गडकरी होते तर प्रमुख पाहुणेम्‍हणून  शेतकरी नेते विजय जावंधीया, जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, पत्रकार संघाचे अध्‍यक्ष प्रविण धोपटे उपस्थित होते.  
यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्‍हणाले की, समाजात प्रगल्‍पता निर्माण करण्‍याचे कार्य महत्‍वाचे आहे. श्रमिक पत्रकार संघाच्‍या वतीने करण्‍यात आलेला सत्‍कार हा उदारतेचा आणि मानवतेचा सत्‍कार आहे. विद्यमान परिस्थितीत चेतना निर्मितीचा बोध आज चिंतनाचा विषय झाला आहे. समाजातील दुरावस्‍तेवर आघात करण्‍यासाठी चौथ्‍या स्‍तंभाची गरज आहे
पत्रकार क्षेत्रात काम करीत असतांना अध्‍ययन आकलन आणि निराकरण या गोष्‍टी महत्‍वाच्‍या असतात हे त्‍यांनी पटवून दिले. समाज सतप्रवृत्‍तीवर टिकूण आहे असे त्‍यांनी सांगितले समाज स्‍वार्थावर जगू शकत नाही त्‍याला परमार्थाची जोडही असावी लागते असे ते म्‍हणाले स्‍वतःला भुक लागली त्‍यासाठी अन्‍न मिळविणे ही प्रकृती आहे. दुस-याचे अन्‍न हिसकावणे ही विकृती तर स्‍वतःहा भुके राहून दुस-याला अन्‍न देणे ही संस्‍कृती असल्‍याचे ते म्‍हणाले.
 आपण वैद्यकीय शास्‍त्राचे अध्‍यापक असल्‍याने दुस-याचे दुःख आपण  घेवू शकत नाही ते आपल्‍याला चांगल्‍या प्रकारे ठावूक आहे. परंतु भावनेनी त्‍या गोष्‍टी समजून घ्‍याव्‍या लागतात. पत्रकार संघाने या गोष्‍टी समजून घेवून नामदेवराव कठाणे यांनी केलेल्‍या कामाच्‍या भावना समजून त्‍यांचा जो सत्‍कार केला ही बाब गौरवाची आहे असे सांगून नामदेवराव कठाणे यांच्‍या कार्यास शुभेच्‍छा दिल्‍या.
 जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी पत्रकारासाठी   स्‍वर्गीय  शंकरराव चव्‍हाण पत्रकार कल्‍याण निधीची स्‍थापना करण्‍यात आली असून यामधून पत्राकारांना सहाय्य करण्‍याचे काम केल्‍या जाते या योजनेचा लाभ पत्रकारांनी घ्‍यावा असे आवाहन केले. वर्धेतील पत्रकार सकारात्‍मक बाजू मांडणारे असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगून त्‍यांनी पत्रकार दिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.
          कार्यक्रमाचे अध्‍यक्ष मा.म.गडकरी यांनी महात्‍मा गांधी यांचे विचार समाजापर्यंत पोहचविण्‍याचे काम पत्रकारांनी करावे असे आवाहन केले. तसेच हिंगणघाट येथील समाजसेवक नामदेवराव कठाणे यांचा केलेला सत्‍कार अभिमानाची बाब असल्‍याचे सांगितले. प्रास्‍ताविकातून प्रविण धोपटे यांनी चौथा स्‍तंभ पुरस्‍कारा मागील भूमिका विषद केली. संचालन आनंद इंगोले यांनी तर आभार चेतन कोवळे यांनी मानले.
कार्यक्रमाला संजय इंगळे तिगावकर,पंकज भोयर, बुध्‍ददास मिरगे, प्रमोद गिरडकर,गुणवंत ठाकरे, आदिंची उपस्थिती होती.
00000