Tuesday 7 February 2012

सेलू येथे शेतक-यांना सोयाबीनचे प्रशिक्षण


     वर्धा,दि.7- माहेर मंगल कार्यालय सेलु येथे सोयाबीन पिकविणा-या शेतकरी गटाच्‍या  प्रशिक्षणाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्‍वती पुजन करुन करण्‍यात आले. मुख्‍य कार्यक्रमामध्‍ये उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी गट शेतीचे महत्‍व, शासनाच्‍या कृषि विभागाच्‍या विविध योजना, कृषि यांत्रीकीकरण, महात्‍मा गांधी नरेगा इत्‍यादी विषयावर शेतक-यांना मार्गदर्शन केले.
      डॉ.पेशकर यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान,सोयाबीनवर येणारे किड व रोग,एकात्‍मीक किड व्‍यवस्‍थापन इत्‍यादी बाबीवर सखोल मार्गदर्शन केले. जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी शेतक-याच्‍या अडिअडचणी समजावून त्‍यावर काय उपाय योजना करता येतील तसेच ग्राम बिजोत्‍पादन यावर शासनाच्‍या विविध योजना व्‍दारे उपाय सुचविले तसेच गट शेतीचे महत्‍व विषद केले. डॉ. नेमाडे कार्यक्रम समन्‍वय कृषि विज्ञान केंद्र सेलसुरायांनी सोयाबिनच्‍या सुधारीत जाती, तन नाशक व किटक नाशक फवारतांना घ्‍यावयाची काळजी यासंदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले.
      कृषि विज्ञान केंद्राच्‍या श्रीमती ठाकरे यांनी सोयाबिनचे आहारातील महत्‍व,सोयोबिन पासुन प्रक्रियायुक्‍त पदार्थ कसे तयार करावे.उदा. सोयामिल्‍क,सोयाआटा,सोयाफटाणे,सोयापनीर इत्‍यादी बाबीवर मार्गदर्शन केले. व योजनेचा लाभ घेण्‍याकरीता सर्व शेतकरी बंधुना आवाहन केले.
     डॉ.पंजाबराव देशमुख विद्यापिठाचे माजी प्राध्‍यापक डॉ. पेशकर, तालुका कृषि अधिकारी  पाटील, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक व सेलु तालुक्‍यातील सोयाबीन गट प्रमुख व सदस्‍य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन हनुवते यांनी केले.
                             0000000   

विदर्भ विकास योजने अंतर्गत शेतकरी गटांचे प्रशिक्षण


       वर्धा, दि.7- विदर्भ विकास योजने अंतर्गत शेतकरी गटांचे प्रशिक्षण नुकतेच (दि.12 जानेवारी 2012 रोजी) तालुक्‍यातील सोनामाता देवस्‍थान, एकुर्ली येथील प्रगतीशील शेतकरी सरपंच पुंडलिक चुटे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली त्‍यांचे घरासमोरील प्रांगणात  झाले.
     प्रशिक्षणास जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी शेतक-यांच्‍या शेतीबाबत येणा-या अडचणी संदर्भात व कृषि विभागाच्‍या योजनाबाबत सविस्‍तर माहिती दिली. डायरे, जिल्‍हा नियोजन अधिकारी यांनी शेतीचे नियोजना करीता येणा-या समस्‍या  व त्‍यांची सोडवणूक कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. मिलिंद भेंडे यांनी गांव निहाय शेती समस्‍या जाणून घेऊन त्‍या प्रमाणे नियेाजन करुन समस्‍या सोडवावी असे प्रतिपादन केले. उपविभागीय कृषि अधिकारी डांबरे यांनी गट स्‍थापना कशी करावी व गटांचे निर्मितीमुळे होणारे फायदे याबाबत सविस्‍तर माहिती दिली.
     यावेळी शेतक-यांना कापूस वेचणी यंत्राचे प्रात्‍यक्षिक दाखविण्‍यात आले. तालुका कृषि अधिकारी येवले यांनी गहु पिकाचे उत्‍पन्‍न वाढीसाठी करावयाच्‍या उपाययोजना बाबत सविस्‍तर माहिती दिली. पुंडलिकराव चुटे यांचे शेतात कापूस पिकावर ठिंबक सिंचन संच लावल्‍यामुळे आलेल्‍या पिकाचे उत्‍पन्‍नात वाढ कशी होते याबाबत पाहणी केली. कापसाचे चार एकर क्षेत्रात 70 क्विंटल  कापूस निघाला असून, अजून झाडांवरील शिल्‍लक बोंडाची संख्‍या लक्षात घेता तेवढाच कापूस अजून निघेल. अशी आशा व्‍यक्‍त केली. तसेच गहु पिकाची पाहणी करुन समाधान व्‍यक्‍त केले.
    कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन तिमांडे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्‍येने शेतकरी उपस्थित होते.
                            000000

स्‍थानिक सुट्या जाहीर


       वर्धा,दि.7– जिल्‍हाधिकारी वर्धा यांना प्रदान केलेल्‍या अधिकारान्‍वये संपूर्ण वर्धा जिल्‍ह्यासाठी सन 2012 या वर्षाकरीता तीन स्‍थानिक सुट्या जाहीर झाल्‍या आहेत. यामध्‍ये मंगळवार दि. 4 एप्रिल 2012 रोजी अक्षय तृतीया, सोमवार दि. 23 जुलै 2012 रोजी नागपंचमी व सोमवार दि. 15 ऑक्‍टोंबर 2012 रोजी पितृमोक्ष अमावस्याचा समावेश आहे.                  

Monday 6 February 2012

पोलीस ताफ्यासह निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना मतदान यंत्रे ठेवण्‍यात येणा-या संरक्षित कक्षाची पर्यवेक्षकाकडून पाहणी


         वर्धा,दि.6-स्‍थानिक जिल्‍हा परिषद व पंचायत समित्‍यांची निवडणूक दिनांक
7 फेब्रुवारी 2012 रोजी होणार असून या निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने नियुक्‍त केलेले पर्यवेक्षक महात्‍मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक अविनाश झाडे यांचे कालच वर्धेत आगमन झाले. त्‍यांनी यावेळी संपूर्ण निवडणूक कामाचा तपशिलाने आढावा घेतला.
    आज दिनांक 6 फेब्रुवारी 2012 रोजी आर्वी, आष्‍टी व कारंजा येथील निवडणूक कामाचा आढावा घेण्‍यासाठी वर्धा जिल्‍ह्याचे निवडणूक पर्यवेक्षक अविनाश झाडे यांनी तसेच जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी निवडणूक कामकाजाच्‍या ठिकाणी प्रत्‍यक्ष भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक कामासाठी नियुक्‍त केलेले कर्मचारी पोलीस ताफ्यासह त्‍यांच्‍या संबधित मतदान केंद्रावर रवाना झाले. मतदान यंत्र ठेवण्‍यात येणा-या जागेची त्‍यांनी प्रत्‍यक्ष पाहणी करुन संबधित निवडणूक निर्णय अधिका-यांना आवश्‍यक त्‍या सुचना दिल्‍या.
     यावेळी उपप्रादेशिक वाहतूक अधिकारी विजय चवहान, पेालीस उपअधिक्षक (गृह) तथा अप्‍पर पोलीस अधिक्षक मुरलीधर नळे त्‍यांच्‍या समवेत होते.
                               000000

जिल्‍ह्यातील न्‍यायालयांना ७ फेब्रुवारीला सार्वजनिक सुटी जाहीर


    वर्धा,दि.6- वर्धा जिल्‍ह्यामधील  जिल्‍हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2012 चे अनुषंगाने वर्धा न्‍यायीक जिल्‍ह्यातील सर्व न्‍यायालये व त्‍यांच्‍या कार्यालयाकरिता मंगळवार दि. ७ फेब्रुवारी 2012 रेाजी सार्वजनिक सुटी प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश वर्धा यांनी जाहीर केली आहे.
    तसेच दि. ७ फेब्रुवारी 2012 रेाजीची सुटी जाहीर केल्‍याने या सुट्टीच्‍या ऐवजी शनिवार दिनांक 10 मार्च 2012 रेाजी कार्यालय आणि न्‍यायालयीन कामकाजाचा दिवस म्‍हणून जाहीर करण्‍यात आला आहे.
    वरील आदेशाचे वर्धा न्‍यायीक जिल्‍ह्यातील सर्व न्‍यायालय आणि आस्‍थापना यांनी काटेकोरपणे पालन करावे व त्‍याबाबतचा अहवाल  कार्यालयास सादर करावा. असे, प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश, अ.श्रा. शिवणकर वर्धा यांनी एका आदेशाव्‍दारे कळविले आहे.
                                      000000

Sunday 5 February 2012

12 फेब्रुवारीला अधिस्वीकृती धारक पत्रकारांचे सानगडीत शिबीर


       भंडारा दि.6: आदित्य अंजली लॉन सानगडी आणि विदर्भ ग्रामीण व शहरी पत्रकार संघ    नागपूर यांच्या संयुक्त वतीने नागपूर विभागातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांचे एक दिवसीय शिबीर आदित्य अंजली लॉन सानगडी ता. साकोली जि.भंडारा येथे आयोजित करण्यात आले आहे.
          या शिबीराचे उदघाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर- अमरावती विभागाचे संचालक भि.म.कौसल यांच्या हस्ते 12 फेब्रुवारी 2012 रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. या शिबीराला मार्गदर्शक म्हणून दै. तरुण भारत चे माजी संपादक तथा जेष्ठ पत्रकार  सुधीर पाठक, दै. लोकसत्ताचे माजी निवासी संपादक प्रविण बर्दापूरकर, भंडारा व गोंदिया जिल्हयाचे जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, दै. युवाराष्ट्र दर्शनचे मुख्य संपादक प्रकाशजी तागडे आणि सानगडी येथील जेष्ठ पत्रकार मनोहरजी लोथे यांची उपस्थिती राहणार आहे.
          तरी नागपूर विभागातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनी या शिबीराला आवर्जुन उपस्थित राहण्याचे आवाहन जेष्ठ पत्रकार व निमंत्रक भागवत लांडगे आणि विदर्भ ग्रामीण व शहरी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण खोब्रागडे यांनी केले आहे.
                                                          0000000