Wednesday 19 October 2016

अपंग व्‍यक्‍तींकडून पुरस्‍कारासाठी अर्ज आमंत्रीत
वर्धा दि. 19- महाराष्‍ट्र शासनाच्‍या सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग मार्फत देण्‍यात येणारे राज्‍य पुरस्‍कारासाठी उत्‍कृष्‍ठ अपंग कर्मचारी, उद्योजक आणि संस्‍था यासाठी देण्‍यात येणा-या पुरस्‍कारासाठी 21 ऑक्‍टोबर पर्यंत अर्ज मागविण्‍यात येत आहे. पुरस्‍कारासाठी विहीत नमुनातील अर्ज परीपुर्ण भरुन तिन प्रतिमध्‍ये जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी, जिल्‍हा परिषद यांच्‍या कडे सादर करण्‍यात यावा. अर्जाच्‍या नमुना आणि अधिक माहितीसाठी जिल्‍हा समाज कल्‍याण्‍य अधिकारी कार्यालय तसेच www.DISABILITYAFFAIRS.GOV.IN या संकेतस्‍थाळवर उपलब्‍ध आहे.        
00000
प्र.प.क्र.724                                                             दिनांक – 19  ऑक्‍टोबर, 2016
प्रलंबीत लेखा प्रकरणाच्‍या आढावा घेण्‍यासाठी
दक्षता पथक 21 ऑक्‍टोबर रोजी येणार

वर्धा दि. 19- प्रलंबीत लेखा प्रकरणाच्‍या आढावा घेणे आणि मार्गदर्शन करण्‍यासाठी सह संचालक लेखा व कोषागार कार्यालयातील दक्षता पथक 21 ऑक्‍टोबर रोजी वर्धा जिल्‍हा कोषागार कार्यालयात येत आहे. जिल्‍ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील प्रलंबीत उपयोगिता प्रमाणपत्रे शासकिय पैशाची अफरातफर, चोरी, हानी, नुकसानी, प्रलंबीत लेखा आक्षेप (तपशिलवार देयके), प्रलंबीत निरिक्षण अहवाल, परिच्‍छेद, प्रलंबीत कार्यालयीन खर्च मेळ, महसुली जमा ताळमेळ इत्‍यादीबाबत प्रलंबीत प्रकल्‍पाच्‍या आढावा घेण्‍यात येणार आहे. त्‍यासाठी सर्व शासकीय कार्यालय प्रमुख्‍यांनी सद्यः स्थिती माहिती देण्‍यासाठी जवाबदार प्रतिनिधी पर्यवेक्षीक अधिकारी मार्फत विवरण पत्रात माहिती दक्षता पथकात सादर करावी, असे आवाहन जिल्‍हा कोषागार अधिकारी यांनी केले आहे.
000000




प्र.प.क्र.725                                                             दिनांक – 19  ऑक्‍टोबर, 2016
जलयुक्‍त शिवार अभियान लोगो निर्मितीसाठी स्‍पर्धेचे आयोजन
Ø 24 ऑक्‍टोबर रोजी लोगोची निवड
Ø निवड झालेल्‍या लोगोला मिळणार 11 हजार रुपयाचे बक्षीस

वर्धा दि. 19- जलयुक्‍त शिवार अभियानाचा लोगो तयार करण्‍यासाठी स्‍पर्धा घेण्‍यात येणार असून तज्ञ व्‍यक्‍ती व विद्यार्थी यांनी योजनेच्‍या अनुषगाने कल्‍पकता वापरुन लोगो तयार करुन स्‍पधेत सहभागी व्‍हावे, असे आवाहन जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
सर्वांसाठी पाणी-टंचाई मुक्‍त महाराष्‍ट्र 2019 हा महत्‍वकांक्षी कार्यक्रम राज्‍य शासन राबवित आहे. जिल्‍ह्यातील सर्वच गावांची टप्‍पा टप्‍पाने निवड करुन, कृषि विभाग, जलसंधारण, लघुसिंचन विभाग, वन विभाग, सामाजिक वनिकरण, ग्रामीण पाणी पुरवठा, वरिष्‍ठ भूवैज्ञानिक भूजल सवेर्क्षण विकास यंत्रणा या विभागांमार्फत मृद व जलसंधारणाची कामे करण्‍यात येत आहेत. या अभियाना अंतर्गत ज्‍या गावांची निवड झाली आहे त्‍यांची माहिती सर्वसामान्‍य जनतेपर्यंत पोहचविण्‍यासाठी योजनेचा माहितीफलक तयार करुन ठिकठिकाणी लावण्‍यात येणार आहे. त्‍यासाठी जलयुक्‍त शिवार अभियानाचा लोगो  डिझाईन करण्‍यासाठी स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली आहे. 24 ऑक्‍टोबर, 2016 रोजी सकाळी 11 वाजता इच्‍छुक स्‍पर्धकांनी लोगोचे डिझाईन हार्ड व सॉफ्ट कॉफीसह जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात प्रत्‍यक्ष उपस्थित रहावे. जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखालील जिल्‍हास्‍तरीय समिती मार्फत एका लोगोची निवड करण्‍यात येवून निवड झालेल्‍य स्‍पर्धकाला किवा संस्‍थेला शासनामार्फत 11 हजार रुपये रोख बक्षीस देण्‍यात येईल. एक व्‍यक्‍ती किंवा संस्‍थेकडून एकच लोगो स्‍वीकारण्‍यात येईल याची स्‍पर्धकांनी नोंद घ्‍यावी.
000000












प्र.प.क्र.726                                                             दिनांक – 19  ऑक्‍टोबर, 2016
अवैध गावठी दारु निर्मिती विक्री केंद्रावर धाडी
1 लाख 13 हजाराचा मुद्देमाल जप्‍त

वर्धा दि. 19- सेलू तालुक्‍यातील गोयदा धामणगांव शिवारात अवैधरिता सुरु असलेल्‍या गावठी दारु निर्मिती आणि विक्री केद्रावर धाड टाकून 150 लिटर गावठी दारु, एक ऑटोरिक्षा तसेच दुचाकी मोटारसायकल जप्‍त करण्‍यात आली असून तीन व्‍यक्‍तीवर गुन्‍हा दाखल करुन अटक करण्‍यात आली आहे.
महाराष्‍ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 अ, ई, 83 नुसार कार्यवाही करण्‍यात आली असून अवैध दारुची वाहतुक करणा-या गणेश नेमाडे, सुनिल ठाकरे, हरिष कुकेकार या तीन व्‍यक्‍तीना अटक करण्‍यात आली असून त्‍यांच्‍या कडून 1 लाख 13 हजार रुपयाच्‍या मुदेमाल जप्‍त करण्‍यात आला. या कारवाईत प्रभारी निरिक्षक डि.बी. कोळी, सहाय्यक दुय्यम निरिक्षक दिलीप वलके तसेच जवान एच.एस. सुरजुसे, अमीत नागमोते वाहन चालक बंन्‍डु घाटुरले, राजेन्‍द्र महेस्‍कर यांनी सहभाग घेतला.  
0000000्‍डु  सुरजुसे, अमीत नागमोते,


मराठा मोर्चा शांततेत पार पडण्‍यासाठी प्रशासन अलर्ट
 
वर्धा दि. 19- मराठा-कुणबी समाजाच्‍या वतीने येत्‍या 23 ऑक्‍टोबर रोजी वर्धा शहरात मुक मोर्चाचे आयोजन करण्‍यात येत आहे. इतर जिल्‍ह्यांमध्‍ये मराठा मोर्चाला मिळालेला प्रतिसाद बघता वर्धा जिल्‍ह्यातही 1 ते दीड लाख लोकांची उपस्थिती राहण्‍याची शक्‍यता पोलीसांनी वर्तवली असुन त्‍यादृष्‍टीने कायदा व सुव्‍यवस्‍था राखण्‍यासाठी तसेच इतर अत्‍यावश्‍यक सोई-सुविधांचे नियोजन करण्‍याच्‍या सूचना जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज सर्व अधिका-यांना दिल्‍या आहेत. मराठा मुक मोर्चा आणि आचारसंहितेच्‍या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाला सतर्क राहण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी दिलयात.
सदर मोर्चा जुने आर टी. ओ च्‍या मौदानांत जमणार असुन आर्वी नाका चौक-शिवाजी चौक-बजाज चौक – आंबेडकर चौक मार्गे जिल्‍हाधिका-यांना निवेदन देण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयात येणार आहे. मोठ्या प्रमाणात लोकांचा जमाव शहरात असणार आहे. त्‍यामुळे क्षुल्‍लक कारणावरुन कोणतीही अनूचित घटना घडू नये म्‍हणून काळजी घेण्‍यात यावी. तसेच गर्दी बघता रस्‍ते मोकळे करण्‍यात यावे. रस्‍त्‍यावरील जनावरे उचलावीत. अग्‍नीशमन दलाच्‍या वाहनांना 3 ते 4 ठिकाणी तैनात करण्‍यात यावे. तसेच महत्‍वाच्‍या ठिकाणी शुल्‍क आकारुन पार्कींगची व्‍यवस्‍था करण्‍यात यावी. रस्‍त्‍यावर लोंबणा-या विद्युत तारा विज वितरण विभागाने दूर कराव्‍यात, अशा सुचना त्‍यांनी यावेळी दिला.  
शहरात घाण होवू नये यासाठी सार्वजनिक शौचालये स्‍वच्‍छ करुन घ्‍यावीत, तसेच दर तीन तासांनी ती स्‍वच्‍छ करण्‍यासाठी स्‍वच्‍छक नेमावेत. तसेच अतिरिक्‍त तात्‍पुरते शौचालय उभारावेत.  मोर्चाच्‍या  ठिकाणी पाण्‍याची व्‍यवस्‍था, रुगणवाहिका, डॉक्‍टरांची चमू तैनात करावी अशा सूचना जिल्‍हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांनी संबंधित अधिका-यांना दिल्‍यात.

जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या या बैठकीला पोलिस अधिक्षक अंकीत गोयल, मुख्‍य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, निवासी उपजिल्‍हाधिकारी मंगेश जोशी, उपविभागीय अधिकारी जी. एच भुगावकर, मुख्‍याधिकारी अश्‍विनी वाघनळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जीचकार उपस्थित होते.

Monday 17 October 2016

उज्‍वला योजनेत जिल्‍ह्यांचा लक्षांक वाढवणार
-          खा. रामदास तडस
Ø जिल्‍ह्यात 10 हजार लाभार्थ्‍यांना वाटप
Ø जिल्‍हा धूरमुक्‍त करणार
Ø जिल्‍ह्यात 8 हजार लोकांनी गॅस सबसीडी सोडली
वर्धा, दि.17- स्‍वयंपाकासाठी लाकडे गोळा करताना गरीब महिलांना अतिशय कष्‍ट  तर पडतातच पण त्‍यापासुन होणा-या धुरामुळे महिला व त्‍यांच्‍या कुंटुंबाचे शारिरिक स्‍वास्‍थ बिघडते. महिलांची अशा कष्‍टदायी कामातुन मुक्‍ती करण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या चांगल्‍या आरोग्‍यासाठी जिल्‍ह्याचा उज्‍वला योजनेतील लक्षांक 5 हजाराने वाढवण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याची ग्‍वाही खासदार रामदास तडस यांनी आज दिली.
विकास भवन येथे पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस मंत्रालयाच्‍या प्रधानमंत्री उज्‍वला योजनेतील लाभार्थ्‍यांना एल.पी.जी कनेक्‍शन देण्‍याच शुभारंभ आज करण्‍यात आला. याप्रसंगी श्री. तडस बोलत होते. यावेळी जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, जिल्‍हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, उज्‍वला योजनेचे नोडल  अधिकारी आदित्‍य टांक, विनोद साळुंके, विश्‍वास कमाने उपस्थित होते.
     पुढे बोलताना श्री. तडस म्‍हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना महिलांच्‍या कष्‍टांची जाणीव आहे. त्‍यामुळे महिलांची या सर्व कष्‍टातुन सुटका करुन त्‍यांना सन्‍मान देण्‍यासाठी त्‍यांनी उज्‍वला योजना सुरु केली. त्‍याचबरोबर सधन कुटुंबांनी गॅसचे अनुदान सोडण्‍यासाठी मोठ्या प्रमाणात अभियान राबविले. जिल्‍ह्यातही 8 हजार लोकांनी गॅसचे अनुदान सोडले आहे.  त्‍याचा फायदा गरीब कुटुंबाना उज्‍वला योजनेत समाविष्‍ट करण्‍यासाठी झाला आहे.
यावेळी बोलताना जिल्‍हाधिकारी म्‍हणाले, चुलीच्‍या धुरामुळे संपूर्ण कुटुंबाला आरोग्‍याच्‍या समस्‍या भेडसावतात. उज्‍वला योजनेमुळे महिलांचे कष्‍ट व वेळ वाचेल आणि त्‍यांना मुलांकडे जास्‍त लक्ष देता येईल. संपूर्ण जिल्‍हा धूरमुक्‍त करण्‍यासाठी प्रयत्‍न करावे लागतील. उज्‍वला योजनेचा लाभ घेतलेल्‍या महिलांनी याचा कायम उपयोग करावा असे आवाहन त्‍यांनी केले.
यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते 150 लाभार्थ्‍यांना एल.पी.जी जोडण्‍यांचे वाटप करण्‍यात आले. हिंदुस्‍थान पेट्रोलियमचे विनोद साळुंके यांनी गॅस वापरताना घ्‍यावयाची काळजी यासंबंधी माहिती दिली. तसेच प्रास्‍ताविक करताना आदित्‍य टांक यांनी देशभरात 3 वर्षात 5 कोटी लाभार्थ्‍यांना या योजनेचा लाभ देण्‍याचे उदिष्‍ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. यासाठी 1600 रुपये अनुदान केंद्र शासन देत आहे. 1 मे, 2016 रोजी उत्‍तरप्रदेशमधील बलिया या गावात या योजनेचा प्रधानमंत्र्यांनी शुभारंभ केला. आता पर्यंत 80 लाख जोडण्‍या देण्‍यात आल्‍या आहेत. वर्धा जिल्‍ह्यात 10 हजाराचे लक्षांक देण्‍यात आले आहे. त्‍याचा आजपासुन प्रारंभ होत असुन 1 महिन्‍यात सर्व 10 हजार बी.पी.एल कुटुंबांकडे उज्‍वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्‍शन देण्‍यात येणार आहे अशी माहिती त्‍यांनी दिली. या कार्यक्रमाचे संचालन आतिफ इब्राहिम यांनी केले तर आभार आदित्‍य टांक यांनी मानले. यावेळी उज्‍वला योजनेतील लाभार्थी उपस्थित होते.
0000000




शहरांच्या शाश्वत विकासाला प्राधान्य
                                                                    - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Ø 10 शहरातील अमृत अभियानातील पाणी पुरवठा योजनांचे ई भूमिपूजन 
Ø अमृत योजनेत वर्धा शहराचा समावेश

वर्धा,  दि 16: - राज्याच्या सकल उत्पन्नात शहरांचा मोठा वाटा आहे. शहरे ही ग्रोथ इंजिन असल्याने विविध योजनांच्या माध्यमातून शहरांच्या शाश्वत विकासाला प्राधन्य देण्यात येत आहे. या योजनांच्या माध्यमातून पुढील 3-4  वर्षामध्ये शहरे निश्चितपणे बदललेली दिसतील असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 
        
            मुंबई येथील  वर्षा निवासस्थानी अमृत अभियानातील सन 2015-16 या वर्षात मंजूर करण्यात आलेल्या वर्धा ,वसई विरार, अमरावती, मालेगाव, सोलापूर, उस्मानाबाद, पनवेल, लातूर,  अचलपूर, सातारा या 10 शहरांच्या रू.632 कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पांचे  ई - भूमिपूजन  मुख्यमंत्री  यांचे हस्ते  करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  या  कार्यक्रमात दहा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि जनता  वीडियो कॉन्फेरेंसिंग द्वारे सहभागी झाली होती. 
           
           तर वर्षा निवासस्थानी पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्री यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव संतोष कुमार, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे  आयुक्त वीरेंद्र सिंह आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात मोठया प्रमाणात नागरीकरण झाले आहे. राज्यातील 50 टक्के लोकसंख्या शहरांमध्ये राहते. शहरांकडे लोकांचा ओढा वाढत राहिल्यामुळे आणि शहरांचे विकासाचे नियोजन नसल्यामुळे शहरे बकाल झाली आहे. या शहरांचा नियोजनबध्द विकास करतांना पाणीपुरवठयाच्या योजना, मलनिस्सारण, घनकचऱ्याचे व्यवस्थापन यालाही प्राधान्य दिले पाहिजे. शहरीकरण ही संधी आहे असे समजून या संधीचे रुपांतर विकासात केले पाहिजे. शहरांमध्ये रोजगाराच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. 
            
          यासाठी प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी देशात स्वच्छ भारत अभियान, स्मार्ट सिटी, अमृत (अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अन्ड अर्बन ट्रान्सफारमेशन) या योजना राबविण्याचे ठरविले आहे. या विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातील शहरांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. राज्याच्या अमृत योजनेचा 7500 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केला असून केंद्र शासनाकडून राज्याला मोठया प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे.  दोन वर्षात अमृत योजनेच्या माध्यमातून राज्यात 2500 कोटींची कामे सुरु आहे.
पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा थेंब न थेंब जपला पाहिजे. पाण्याचे योग्य नियोजन करुन त्याचे वाटप व वापर होणे आवश्यक असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शहरीकरणामुळे शहरातील नद्या, नाले, ओढे यांचे प्रदूषण वाढत आहे. या प्रदूषणामुळे जमिनीचा पोत कमी होत आहे. यासाठी भूयारी गटार  योजनांना प्राधान्य देण्यात येत आहे. शहरांतील घनकचऱ्याचे व्यवस्थापन, सांडपाण्यावरील प्रक्रिया, कचऱ्याचे विघटन व्यवस्थित झाले पाहिजे. यासाठी प्रयत्न सुरु असून स्वच्छ भारत अभियानातंर्गत निवडण्यात आलेल्या देशातील 118 हगणदारीमुक्त शहरांपैकी 52 शहरे राज्यातील आहे.  हे या योजनांचे यश असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. केंद्र शासन शहरांच्या विकासासाठी राबवित असलेल्या विविध विकास योजनांच्या माध्यमातून पुढील 3-4 वर्षात शहरांचे रुप निश्चितपणे बदलले दिसेल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

          याप्रंसगी मुख्यमंत्र्यांनी या शहरांच्या लोकप्रतिनिधींशी व्हीडीओ कॉन्सरसिंगद्वारे संवाद साधला. आमदार पंकज भोयर यांनी  वर्धा शहराचा या योजनेत समावेश  केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी  शैलेश नवाल, नागराध्यक्षा श्रीमती कुत्तरमारे, मुख्याधिकारी तसेच नगरसेवक  उपस्थित होते. 
             कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी देशातील 500 अमृत शहरांपैकी 44 शहरे राज्यातील असल्याचे सांगितले. तर राज्यातील 7 शहरांचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत झाला आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानात राज्यातील 100 शहरे हगणदारी मुक्त झाली असून अनेक शहरांमध्ये या योजनांच्या माध्यमातून घनकचऱ्याचे व्यवस्थापन, पाणीपुरवठा, सांडपाणी, मलनिस्सारण प्रक्रियेची कामे सुरु आहे. त्याचबरोबर या पाणी पुरवठा योजनेतील दुरूस्ती व देखभालीचा खर्च कमी करण्यासाठी सौर ऊर्जा चा वापर करण्यासाठी राज्याची नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात येत आहे. अमृत योजनेंतर्गत सन 2015-16 वर्षात पाणी पुरवठा प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले असल्यामुळे या शहरात शाश्वत व कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. 
000000






जिल्‍हा परिषदमध्‍ये सॅनिटरी नॅपकीन व्‍हेन्‍डींग मशीन सुरु
वर्धा , दि. 17  (जिमाका) :  जिल्‍ह्याच्‍या महत्‍वाच्‍या पदावर जेव्‍हा महिला अधिकारी विराजमान होते, तेव्‍हा महिलांचे विषय किती संवेदनशीपणे हाताळले जातात. याचा अनुभव सध्‍या जिल्‍हा परिषदमध्‍ये काम करणा-या महिला कर्मचा-यांना येत आहे. महिलांना मासिक पाळीच्‍या काळात लागणारी सॅनिटरी नॅपकीन ही अत्‍यंत निकडीची वस्‍तु आहे. याची जाणीव ठेवून जिल्‍हा परिषद मुख्‍य कार्यकारी अधिकारी म्‍हणुन रुजु होताच नयना गुंडे यांनी तीन महिन्‍याच्‍या आत सॅनिटरी नॅपकीन उपलब्‍ध करुन देणारी आणि त्‍याची विल्‍हेवाट लावणारी व्‍हेण्‍डींग मशीन बसवून नोकरी करणा-या महिलांची मासिक पाळीच्‍या वेळी होणारी कुचंबना थांबली आहे.
          जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष चित्रा रणनवरे यांच्‍या हस्‍ते या सॅनिटरी नॅपकीन व्‍हेन्‍डींग मशीनचे उद् घाटन करण्‍यात आले. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे उपस्थित होत्‍या.
          नोकरी करणा-या महिलांना कामावर असताना अचानक सुरु होणा-या मासिक पाळीमुळे अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकदा सोबत सॅनिटरी नॅपकीन नसल्‍यामुळे त्‍यांची स्थिती अवघडल्‍यासारखी होते. महिलांच्‍या या अतिशय संवेदनशील आणि निकडीच्‍या विषयाला मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी हात घातला. या मशिनमध्‍ये पाच रुपयांचे नाणे टाकल्‍यास एक सॅनिटरी नॅपकीन बाहेर येते. त्‍यामुळे ऐनवेळी महिलांची होणारी तारांबळ यामुळे थांबेल. तसेच वापरलेले नॅपकिनची विल्‍हेवाट लावण्‍यासाठी सुध्‍दा मशीन आहे. त्‍यामुळे जिल्‍हा परिषद महिला कर्म-यांमध्‍ये आनंद व्‍यक्‍त होतोय.
          वास्‍तविक हा विषय स्‍वच्‍छ भारत अभियानाच्‍या दृष्‍टीने अतिशय महत्‍वाचा आहे. रेल्‍वेस्‍थानक, बसस्‍थानक, शासकीय कार्यालये, महाविद्यालये, शाळा तसेच खाजगी आस्‍थापना येथील महिलांची प्रसाधनगृहे बघितल्‍यास तेथे वापरलेले सॅनिटरी नॅपकीन कोंबलेले, इतरततः पडलेले दिसतात. कारण त्‍याची विल्‍हेवाट लावण्‍यासाठी कोणतीच व्‍यवस्‍था अद्याप या ठिकाणी उभी झाली नाही. त्‍यामुळे नाईलाजाने महिलांना ती अशी इतरत्र फेकावी लागतात. या सर्व ठिकाणी सॅनिटरी नॅपकीनची विल्‍हेवाट लावणारी आणि उपलब्‍ध करुन देणारी व्‍हेण्‍डींग मशीन लावल्‍यास स्‍वच्‍छ भारत अभियानास तर हातभार लागेलच पण महिलांची कुचंबनाही थांबेल.
000000
         



वर्धा , दि. 17  (जिमाका) :  जिल्‍ह्याच्‍या महत्‍वाच्‍या पदावर जेव्‍हा महिला अधिकारी विराजमान होते, तेव्‍हा महिलांचे विषय किती संवेदनशीपणे हाताळले जातात. याचा अनुभव सध्‍या जिल्‍हा परिषदमध्‍ये काम करणा-या महिला कर्मचा-यांना येत आहे. महिलांना मासिक पाळीच्‍या काळात लागणारी सॅनिटरी नॅपकीन ही अत्‍यंत निकडीची वस्‍तु आहे. याची जाणीव ठेवून जिल्‍हा परिषद मुख्‍य कार्यकारी अधिकारी म्‍हणुन रुजु होताच नयना गुंडे यांनी तीन महिन्‍याच्‍या आत सॅनिटरी नॅपकीन उपलब्‍ध करुन देणारी आणि त्‍याची विल्‍हेवाट लावणारी व्‍हेण्‍डींग मशीन बसवून नोकरी करणा-या महिलांची मासिक पाळीच्‍या वेळी होणारी कुचंबना थांबली आहे.
          जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष चित्रा रणनवरे यांच्‍या हस्‍ते या सॅनिटरी नॅपकीन व्‍हेन्‍डींग मशीनचे उद् घाटन करण्‍यात आले. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे उपस्थित होत्‍या.
          नोकरी करणा-या महिलांना कामावर असताना अचानक सुरु होणा-या मासिक पाळीमुळे अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकदा सोबत सॅनिटरी नॅपकीन नसल्‍यामुळे त्‍यांची स्थिती अवघडल्‍यासारखी होते. महिलांच्‍या या अतिशय संवेदनशील आणि निकडीच्‍या विषयाला मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी हात घातला. या मशिनमध्‍ये पाच रुपयांचे नाणे टाकल्‍यास एक सॅनिटरी नॅपकीन बाहेर येते. त्‍यामुळे ऐनवेळी महिलांची होणारी तारांबळ यामुळे थांबेल. तसेच वापरलेले नॅपकिनची विल्‍हेवाट लावण्‍यासाठी सुध्‍दा मशीन आहे. त्‍यामुळे जिल्‍हा परिषद महिला कर्म-यांमध्‍ये आनंद व्‍यक्‍त होतोय.
          वास्‍तविक हा विषय स्‍वच्‍छ भारत अभियानाच्‍या दृष्‍टीने अतिशय महत्‍वाचा आहे. रेल्‍वेस्‍थानक, बसस्‍थानक, शासकीय कार्यालये, महाविद्यालये, शाळा तसेच खाजगी आस्‍थापना येथील महिलांची प्रसाधनगृहे बघितल्‍यास तेथे वापरलेले सॅनिटरी नॅपकीन कोंबलेले, इतरततः पडलेले दिसतात. कारण त्‍याची विल्‍हेवाट लावण्‍यासाठी कोणतीच व्‍यवस्‍था अद्याप या ठिकाणी उभी झाली नाही. त्‍यामुळे नाईलाजाने महिलांना ती अशी इतरत्र फेकावी लागतात. या सर्व ठिकाणी सॅनिटरी नॅपकीनची विल्‍हेवाट लावणारी आणि उपलब्‍ध करुन देणारी व्‍हेण्‍डींग मशीन लावल्‍यास स्‍वच्‍छ भारत अभियानास तर हातभार लागेलच पण महिलांची कुचंबनाही थांबेल.
000000