Wednesday 19 October 2016

मराठा मोर्चा शांततेत पार पडण्‍यासाठी प्रशासन अलर्ट
 
वर्धा दि. 19- मराठा-कुणबी समाजाच्‍या वतीने येत्‍या 23 ऑक्‍टोबर रोजी वर्धा शहरात मुक मोर्चाचे आयोजन करण्‍यात येत आहे. इतर जिल्‍ह्यांमध्‍ये मराठा मोर्चाला मिळालेला प्रतिसाद बघता वर्धा जिल्‍ह्यातही 1 ते दीड लाख लोकांची उपस्थिती राहण्‍याची शक्‍यता पोलीसांनी वर्तवली असुन त्‍यादृष्‍टीने कायदा व सुव्‍यवस्‍था राखण्‍यासाठी तसेच इतर अत्‍यावश्‍यक सोई-सुविधांचे नियोजन करण्‍याच्‍या सूचना जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज सर्व अधिका-यांना दिल्‍या आहेत. मराठा मुक मोर्चा आणि आचारसंहितेच्‍या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाला सतर्क राहण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी दिलयात.
सदर मोर्चा जुने आर टी. ओ च्‍या मौदानांत जमणार असुन आर्वी नाका चौक-शिवाजी चौक-बजाज चौक – आंबेडकर चौक मार्गे जिल्‍हाधिका-यांना निवेदन देण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयात येणार आहे. मोठ्या प्रमाणात लोकांचा जमाव शहरात असणार आहे. त्‍यामुळे क्षुल्‍लक कारणावरुन कोणतीही अनूचित घटना घडू नये म्‍हणून काळजी घेण्‍यात यावी. तसेच गर्दी बघता रस्‍ते मोकळे करण्‍यात यावे. रस्‍त्‍यावरील जनावरे उचलावीत. अग्‍नीशमन दलाच्‍या वाहनांना 3 ते 4 ठिकाणी तैनात करण्‍यात यावे. तसेच महत्‍वाच्‍या ठिकाणी शुल्‍क आकारुन पार्कींगची व्‍यवस्‍था करण्‍यात यावी. रस्‍त्‍यावर लोंबणा-या विद्युत तारा विज वितरण विभागाने दूर कराव्‍यात, अशा सुचना त्‍यांनी यावेळी दिला.  
शहरात घाण होवू नये यासाठी सार्वजनिक शौचालये स्‍वच्‍छ करुन घ्‍यावीत, तसेच दर तीन तासांनी ती स्‍वच्‍छ करण्‍यासाठी स्‍वच्‍छक नेमावेत. तसेच अतिरिक्‍त तात्‍पुरते शौचालय उभारावेत.  मोर्चाच्‍या  ठिकाणी पाण्‍याची व्‍यवस्‍था, रुगणवाहिका, डॉक्‍टरांची चमू तैनात करावी अशा सूचना जिल्‍हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांनी संबंधित अधिका-यांना दिल्‍यात.

जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या या बैठकीला पोलिस अधिक्षक अंकीत गोयल, मुख्‍य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, निवासी उपजिल्‍हाधिकारी मंगेश जोशी, उपविभागीय अधिकारी जी. एच भुगावकर, मुख्‍याधिकारी अश्‍विनी वाघनळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जीचकार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment