Saturday 4 February 2012

७ फेब्रुवारीला मतदानाचे दिवशी सुट्टी जाहीर


    वर्धा,दि.4- वर्धा जिल्‍ह्यात जिल्‍हा परिषद व पंचायत समित्‍यांच्‍या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदान दिनांक फेब्रुवारी 2012 रोजी होणार आहे. सदर क्षेत्रातील मतदारांना मतदान करणे शक्‍य व सुलभ व्‍हावे याकरीता राज्‍य निवडणूक आयोग, मुंबई यांनी दिनांक 3 फेब्रुवारी 2012 चे पत्रान्‍वये  वर्धा जिल्‍ह्यात जिल्‍हा परिषद व पंचायत समित्‍यांच्‍या सार्वत्रिक निवडणूका होणा-या क्षेत्रामध्‍ये दिनांक फेब्रुवारी 2012 रोजी स्‍थानिक सार्वजनीक सुट्टी जाहीर करण्‍यात येत आहे. असे जिल्‍हाधिकारी, वर्धा कळवितात.
                                   000000

Friday 3 February 2012

सोमवार 6 (सहा) फेब्रुवारी रोजीचा लोकशाही दिन होणार नाही


        वर्धा, दि.3 – राज्‍यात जिल्‍हा परिषदा व त्‍या अंतर्गत असलेल्‍या  पंचायत समित्‍यांच्‍या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, राज्‍यात दिनांक 3 जानेवारी 2012 पासून आचार संहिता लागू करण्‍यात आली आहे.
      त्‍यामुळे सोमवार  दि. 6 (सहा)फेब्रुवारी 2012 रोजी होणारा लोकशाही दिन आयोजित करण्‍यात येणार नाही. याबाबत  जिल्‍ह्यातील नागरीकांनी नोंद घ्‍यावी. असे जिल्‍हाधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.
          0000

पुलफैल येथे पोषण आहार कार्यक्रम


     वर्धा,दि.2-राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियान नागरी प्रजनन व बाल आरोग्‍य कार्यक्रमांतर्गत नागरी भागातील मागास व झोपडपट्टी परिसरातील लोकांचे आरोग्‍यमान उंचावण्‍यासाठी नगर पालिका क्षेत्रामध्‍ये सामान्‍य रुग्‍णालयाचे जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. रत्‍ना रावखंडे यांच्‍या मार्गदर्शनामध्‍ये नागरी आरोग्‍य केंद्र क्र. 2 पुलफैल वर्धा येथे नुकतेच (20 जानेवारी 2012) पोषण आहार कार्यक्रम घेण्‍यात आला.
     कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी मुख्‍याध्‍यापिका शोभा सेलकर तसेच प्रमुख अतिथी नगरसेविका रिना सहारे,वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्‍वला कांबळे,अंगणवाडी पर्यवेक्षीका किन्‍हेकर व परिसरातील माता उपस्थित होत्‍या.
     यावेळी बोलताना उपस्थित मान्‍यवर मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, आहारविषयी प्रत्‍येक मातेने घ्‍यावयाची काळजी, पोषक आहाराचे महत्‍व व फायदे, गरोदर माता व बालक यांच्‍याकरीता असलेल्‍या विविध आरोग्‍य विषयक शासकिय योजना तसेच 0 ते 5 वयोगटातील मुलांचे आरोग्‍य सुदृढ राहण्‍याकरीता पोषण आहाराचे महत्‍व, समाजावून सांगीतले. मुलांच्‍या वाढीसाठी ज्‍या पोषण आहाराची आवश्‍यकता आहे ते योग्‍य वेळेत मिळाले नाही तर मुलं कुपोषणाकडे वळतात. त्‍याकरीता पोषण आहारामध्‍ये काय पदार्थ व किती प्रमाणात घ्‍यायला पाहिजे असेही त्‍यांनी सांगितले.
    कार्यक्रमाचे संचालन अंजली थुल तर आभार प्रदर्शन डॉ.उज्‍वला कांबळे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्‍येने परिसरातील माता उपस्थित होत्‍या.
                        000000

Thursday 2 February 2012

वाहन धारकाच्‍या सोयीसाठी तालुका निहाय शिबीर


     वर्धा,दि.2- मोटार वाहन धारकांच्‍या सोयीसाठी जिल्‍ह्यातील हिंगणघाट,आर्वी, पुलगांव व कारंजा येथे तालुकानिहाय शिबीरोच नियोजन करण्‍यात आले असून, शिबीराची तारीख व महिना खालील प्रमाणे असून, शिबीराच्‍या ठिकाणी प्रादेशिक परिवहन कार्यालया संबधित कामे केल्‍या जातील. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्‍हाण यांनी दिली आहे.
      हिंगणघाट या तालुक्‍याच्‍या ठिकाणी जानेवारी महिन्‍यात दि. 10 व 20 , फेब्रुवारी महिण्‍यात दि. 10 व 21 , मार्च महिण्‍यात 9 व 20 , एप्रिल महिण्‍यांत दि. 10 व 20, मे महिण्‍यांत दि. 10 व 21 , जून महिण्‍यात दि. 11 व 20,  जूलै महिण्‍यांत दि. 10 व 20 , ऑगस्‍ट महिण्‍यात दि. 10 व 21 , सप्‍टेंबर  महिण्‍यात दि. 10 व 20 ,ऑक्‍टोंबर महिण्‍यात दि. 10 व 20 नोव्‍हेंबर महिण्‍यात 9 व 20 व डिसेंबर महिण्‍यात दि. 10 व 20 या तारखाच्‍या दिवसाला भरविण्‍यात येतील. आर्वी तालुक्‍यातील महिण्‍यानुसार जानेवारीमधे दि. 19 , फेब्रुवारीत दि. 18 रोजी,  मार्च , एप्रिल, मे,जून, जुलै, ऑक्‍टोंबर, नोव्‍हेंबर व डिसेंबर च्‍या प्रत्‍येक महिण्‍याच्‍या 19 तारखेला ऑगस्‍ट महिण्‍यात दि. 17 व सप्‍टेंबर महिण्‍यात दिनांक 18 ला शिबीराचे आयेाजन होईल. पुलगाव येथे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च एप्रिल, जुलै, ऑगस्‍ट, सप्‍टेंबर, नोव्‍हेंबर व डिसेंबर महिण्‍याच्‍या प्रत्‍येकी 27 तारखेला, मे व जून महिण्‍याच्‍या 28 तारखांना व  ऑक्‍टोंबर मधे 25 तारखेला शिबीर आयोजित करण्‍यात येईल.कारंजा तालुक्‍यात जानेवारी व एप्रिल, जुलै महिण्‍याच्‍या प्रत्‍येक 30 तारखांना,मार्च महिण्‍यांच्‍या 29 तारखांना जून, ऑगस्‍ट,सप्‍टेंबर,ऑक्‍टोंबर, नोव्‍हेंबर व डिसेंबर मधे प्रत्‍येक महिण्‍याच्‍या 29 तारखेला शिबीराचे आयेाजन होईल.
   याठिकाणी सर्व प्रकारचे शिकाऊ / पक्‍की अनुज्ञप्‍ती दिल्‍या जाईल.सर्व प्रकारचे वाहन चालविण्‍याची चाचणी होईल. सर्व प्रकारचे पक्‍के, अनुज्ञप्‍ती / नुतणीकरण स्‍मार्ट कार्ड देण्‍यात येतील. वाहन (कन्‍डक्‍टर) अनुज्ञप्‍ती देणे व त्‍यांचे नुतणीकरण करणे, नविन वाहन नोंदणी बाहेर प्रांतातून येणा-या वाहनाचे बाबतीत फेर नोंदणी केल्‍या जाणार नाही. मोटार वाहन कर स्विकारल्‍या जाईल.रिक्षा,टॅक्‍सी तसेच शेती कामासाठी वापरली जाणारी ट्रॅक्‍टर व ट्रेलर या संवर्गातील वाहनाची नियतकालीन यांत्रिक तपासणी दौ-याच्‍या ठिकाणी करण्‍यात येईल. शिबीरात तालुक्‍यातील कामे करण्‍यात येतील. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कळवितात.
                                  000000

जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्‍या निवडणूकीमध्‍ये दाखल झालेले उमेदवार अर्ज


       वर्धा,दि.2- वर्धा जिल्‍हा परिषद व पंचायत समित्‍यांची निवडणूक येत्‍या 7 फेब्रुवारी 2012 रोजी होणार आहे. या निवडणूकीसाठी नागरिकांनी आपले उमेदवारी अर्ज 30 जानेवारी 2012 रोजी मागे घेतल्‍यानंतर रिंगणात असलेले उमेदवार पुढील प्रमाणे आहे. तालुकानिहाय जिल्‍हा परिषदेचे उमेदवारांची संख्‍या कंसाबाहेरील दिलेले असून, कंसातील उमेदवार हे पंचायत समितीचे उमेदवर असतील.
     जिल्‍हा परिषद व पंचायत समितीचे तालुकानिहाय उमेदवार वर्धा 68(121), प्रत्‍येकी एक उमेदवार अपील मध्‍ये आहे. सेलू 23(58), जि.प.3 अपीलमध्‍ये आहे. देवळी 32 (48), आर्वी 35 (61) आष्‍टी 18(38), कारंजा 26(43), जि.प. एक उमेदवार  अपीलमध्‍ये आहे. हिंगणघाट 31 (84) जि.प.एक उमेदवार  अपीलमध्‍ये आहे. समुद्रपूर 35 (74) असे एकूण जिल्‍हा परिषदेचे 268 व पंचायत समितीच्‍या निवडणूकीत 527 उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात आहेत.

जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्‍या निवडणूकीसाठी प्रशासन सज्‍ज - जिल्‍हाधिकारी


    वर्धा, दि.2- जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्‍या सार्वत्रिक निवडणूका होऊ घातलेल्‍या असून, या निवडणूकांसाठी जिल्‍हा प्रशासन सज्‍ज झाले असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली आहे.
     वर्धा जिल्‍ह्यासाठी जिल्‍हा परिषदेकरीता 51 सदस्‍य निवडून द्यावयाचे असून,  8 पंचायत समितीसाठी 102 सदस्‍य निवडून द्यावयाचे आहे. जिल्‍हा परिषद व पंचायत समिती करीता गट व गण निहाय प्रभाग रचनेचे नकाशे तयार करुन संकेतस्‍थळावर टाकण्‍यात आले आहे. प्रारुप मतदार यादी गट व गननिहाय आक्षेपानंतर दिनांक 17 जानेवारी 2012 रोजी अंतीम मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे.
     जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्‍या निवडणूकीत 7 लक्ष 23 हजार 592 मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार असून, त्‍यामध्‍ये 3 लक्ष 80 हजार 098 पुरुष व  3 लक्ष 43 हजार 494 स्त्रियांचा समावेश आहे. निवडणूकीसाठी वापरण्‍यात येणा-या मतदान केंद्राची संख्‍या 1 हजार 186 एवढी आहे.
    जिल्‍हा परिषदेमध्‍ये निवडून द्यावयाच्‍या 51 सदस्‍य संख्‍येत आष्‍टी 4, कारंजा 5, आर्वी,सेलू, समुद्रपूर व देवळी येथून प्रत्‍येकी 6 , वर्धा येथून 11 व हिंगणघाट येथून 7 सदस्‍य असतील. तर पंचायत समितीमध्‍ये 102 सदस्‍य निवडून द्यावयाचे असून, त्‍यामध्‍ये आष्‍टी येथून 8, कारंजा 10, आर्वी, सेलू, समुद्रपूर, देवळी येथून प्रत्‍येकी 12 , वर्धा येथून 22 व हिंगणघाट येथून 14 सदस्‍यांचा समावेश आहे.
     आष्‍टी तालुक्‍यातील मतदारांची एकूण संख्‍या 58,524 असून, त्‍यामध्‍ये     30 हजार263 पुरुष व 28 हजार 261 स्त्रियांचा समावेश आहे. यासाठी 97 मतदान केंद्र उघडण्‍यात येणार आहे. कारंजा तालुक्‍यातील मतदारांची एकूण संख्‍या 66 हजार 791 असून त्‍यामध्‍ये 34 हजार 378 पुरुष  व 32 हजार 413 स्त्रि मतदारांचा समावेश आहे. यामध्‍ये 119 मतदान केंद्र उघडण्‍यात येणार आहे. आर्वी तालुक्‍यात  एकूण मतदारांची संख्‍या 77 हजार 732 असून त्‍यामध्‍ये 40 हजार 622 पुरुष व 37 हजार 110 स्त्रि मतदारांचा समावेश आहे. यासाठी 126 मतदान केंद्र उघडण्‍यात येणार आहे. सेलू तालुक्‍यात 86 हजार 786 मतदार असून, यामध्‍ये 45 हजार 573 पुरुष व 41 हजार 213 स्त्रि मतदारांचा समावेश आहे. वर्धा तालुक्‍यात एकूण मतदारांची संख्‍या 1 लक्ष 72 हजार 863 असून, त्‍यामध्‍ये 91 हजार 174 पुरुष व 81 हजार 688 स्त्रि मतदारांचा समावेश आहे. समुद्रपूर तालुक्‍यात एकूण मतदारांची संख्‍या 88 हजार 190 असून त्‍यामध्‍ये 46 हजार 634 पुरुष 41 हजार 556 स्त्रि मतदारांचा समावेश आहे. यासाठी 146 मतदान केंद्र उघडण्‍यात येणार आहे. देवळी तालुक्‍यात एकूण मतदारांची संख्‍या  81 हजार 551 असून, त्‍यामध्‍ये 43 हजार 173 पुरुष व 38 हजार 378 स्त्रि मतदाराचा समावेश आहे. हिंगणघाट तालुक्‍यात 91 हजार 156 मतदारांची संख्‍या असून त्‍यामध्‍ये 48 हजार 281 पुरुष व 42 हजार 875 स्त्रि मतदारांचा समावेश आहे. यासाठी 154 मतदान केंद्र उघडण्‍यात येणार आहे.
     जिल्‍ह्यात संवेदनशिल व अतिसंवेदनशिल मतदान केंद्र तालुका निहाय दिलेले असून, संवेदनशिल मतदान केंद्र कंसाबाहेर दर्शविण्‍यात आले आहे. आष्‍टी  4(3) , कारंजा 16, आर्वी 26, सेलू 49, वर्धा 46, समुद्रपूर 62(15), देवळी 7 व हिंगणघाट येथे 30 मतदान केंद्र असतील.
     जिल्‍ह्यात मतदान शांतपणे व निर्भय वातावरणात होण्‍यासाठी पुरेशी खबरदारी घेण्‍यात आलेली आहे. कायदा व सुवस्‍था लक्षात घेता मतदान केंद्रावर पेट्रोलींग व स्‍ट्रायकिंग फोर्स करीता चार उपविभागीय पोलीस अधिकारी, 12 पोलीस निरीक्षक, 40 उपपोलीस निरिक्षक आणि 1380 पोलीस कर्मचा-यांचा बंदोबस्‍त  ठेवण्‍यात येणार आहे. तसेच निवडणूकीच्‍या कामासाठी बाहेरुन आवश्‍यक मणूष्‍यबळ लागणार असून, त्‍यामध्‍ये एक अप्‍पर पोलीस अधिक्षक, दोन उप विभागीय पोलीस अधिकारी, प्रत्‍येकी 5 पोलीस निरीक्षक व 5 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 350 पेालीस , 50 महिला पेालीस कर्मचारी, 800 पुरुष गृहरक्षक, 100 महिला गृहरक्षक, राज्‍य  राखीव पोलीसाची एक कंपनी व 60 वनरक्षक कर्मचारी व अधिकारी वर्ग  निवडणूकीच्‍या कामासाठी उपलब्‍ध  होणार आहेत.
     जिल्‍ह्यातील आठ तालुक्‍यांमध्‍ये आठ निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्‍यात आलेले आहेत. तालुक्‍यातील गणाप्रमाणे 102 क्षेत्रीय अधिकारी व 15 राखीव क्षेत्रीय अधिकारी निवडणूकीसाठी उपलब्‍ध असतील तसेच 3 हजार 558 मतदान अधिका-यांची नियुक्‍ती करण्‍यात येणार आहे.
     या निवडणूकीच्‍या कामासाठी 192 जीप/कार लागणार आहे. मतदानासाठी पथक पोहचविण्‍यासाठी 95 बसेसची व्‍यवस्‍था राज्‍य परिवहन महामंडळाकडून करण्‍यात आली आहे.
     जिल्‍ह्यात निवडणूक मतदान यंत्रणेसाठी 1500 बॅलेट युनीट व 1500 कंट्रोल युनिटची गरज भासेल मात्र उमेदवारांची संख्‍या अधिक असल्‍यास अतिरीक्‍त बॅलेट युनिटची मागणी करण्‍यात येईल. भारत निवडणूक आयोगाकडील निवडणूक मतदान यंत्र वापरल्‍यास प्रत्‍येकी 2900 कंट्रोल युनिट व बॅलेट युनिटची मागणी करण्‍यात येईल.
     निवडणूकीसाठी सर्व तहसिलमध्‍ये हेल्‍पलाईन व नियंत्रण कक्ष उघडण्‍यात आले आहे.
     सदर निवडणूकीमध्‍ये अधिकाधिक मतदान होण्‍यासाठी जनजागृती अभियान राबविण्‍यात येत असून, मतदान दिवस साजरा करण्‍यात आलेला आहे अशी माहिती नमुद करण्‍यात आली आहे.
                             000000  

वर्धा जिल्‍ह्यात 37(1) 3 कलम जारी


     वर्धा,दि.2- जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी जयश्री भोज यांना प्रदान केलेल्‍या अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) 3 जारी केले आहे.
      या कलमाचा अंमल दि.15 फेब्रुवारी 2012 च्‍या रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल असे आदेशात नमुद आहे.

वाहन धारकाच्‍या सोयीसाठी तालुका निहाय शिबीर


       वर्धा,दि.2- मोटार वाहन धारकांच्‍या सोयीसाठी जिल्‍ह्यातील हिंगणघाट,आर्वी, पुलगांव व कारंजा येथे तालुकानिहाय शिबीरोच नियेाजन करण्‍यात आले असून, शिबीराची तारीख व महिना खालील प्रमाणे असून, शिबीराच्‍या ठिकाणी प्रादेशिक परिवहन कार्यालया संबधित कामे केल्‍या जातील. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्‍हाण यांनी दिली आहे.
      हिंगणघाट या तालुक्‍याच्‍या ठिकाणी जानेवारी महिन्‍यात दि. 10 व 20 , फेब्रुवारी महिण्‍यात दि. 10 व 21 , मार्च महिण्‍यात 9 व 20 , एप्रिल महिण्‍यांत दि. 10 व 20, मे महिण्‍यांत दि. 10 व 21 , जून महिण्‍यात दि. 11 व 20,  जूलै महिण्‍यांत दि. 10 व 20 , ऑगस्‍ट महिण्‍यात दि. 10 व 21 , सप्‍टेंबर  महिण्‍यात दि. 10 व 20 ,ऑक्‍टोंबर महिण्‍यात दि. 10 व 20 नोव्‍हेंबर महिण्‍यात 9 व 20 व डिसेंबर महिण्‍यात दि. 10 व 20 या तारखाच्‍या दिवसाला भरविण्‍यात येतील. आर्वी तालुक्‍यातील महिण्‍यानुसार जानेवारीमधे दि. 19 , फेब्रुवारीत दि. 18 रोजी,  मार्च , एप्रिल, मे,जून, जुलै, ऑक्‍टोंबर, नोव्‍हेंबर व डिसेंबर च्‍या प्रत्‍येक महिण्‍याच्‍या 19 तारखेला ऑगस्‍ट महिण्‍यात दि. 17 व सप्‍टेंबर महिण्‍यात दिनांक 18 ला शिबीराचे आयेाजन होईल. पुलगाव येथे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च एप्रिल, जुलै, ऑगस्‍ट, सप्‍टेंबर, नोव्‍हेंबर व डिसेंबर महिण्‍याच्‍या प्रत्‍येकी 27 तारखेला, मे व जून महिण्‍याच्‍या 28 तारखांना व  ऑक्‍टोंबर मधे 25 तारखेला शिबीर आयोजित करण्‍यात येईल.कारंजा तालुक्‍यात जानेवारी व एप्रिल, जुलै महिण्‍याच्‍या प्रत्‍येक 30 तारखांना,मार्च महिण्‍यांच्‍या 29 तारखांना जून, ऑगस्‍ट,सप्‍टेंबर,ऑक्‍टोंबर, नोव्‍हेंबर व डिसेंबर मधे प्रत्‍येक महिण्‍याच्‍या 29 तारखेला शिबीराचे आयोजन होईल.
     याठिकाणी सर्व प्रकारचे शिकाऊ / पक्‍की अनुज्ञप्‍ती दिल्‍या जाईल.सर्व प्रकारचे वाहन चालविण्‍याची चाचणी होईल. सर्व प्रकारचे पक्‍के, अनुज्ञप्‍ती / नुतणीकरण स्‍मार्ट कार्ड देण्‍यात येतील. वाहन (कन्‍डक्‍टर) अनुज्ञप्‍ती देणे व त्‍यांचे नुतणीकरण करणे, नविन वाहन नोंदणी बाहेर प्रांतातून येणा-या वाहनाचे बाबतीत फेर नोंदणी केल्‍या जाणार नाही. मोटार वाहन कर स्विकारल्‍या जाईल.रिक्षा,टॅक्‍सी तसेच शेती कामासाठी वापरली जाणारी ट्रॅक्‍टर व ट्रेलर या संवर्गातील वाहनाची नियतकालीन यांत्रिक तपासणी दौ-याच्‍या ठिकाणी करण्‍यात येईल. शिबीरात तालुक्‍यातील कामे करण्‍यात येतील. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कळवितात.

Wednesday 1 February 2012

मतदानाचे दिवशी आठवडी बाजार बंद


  वर्धा, दि.1- निवडणूक आयोगाच्‍या  दि. 3 जानेवारी 2012 चे पत्रानुसार  जिल्‍हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार वर्धा जिल्‍ह्यात जिल्‍हा परिषद मधील 51 निवडणूक विभाग व पंचायत समिती मधील 102 निर्वाचन गणाचे निवडणूका दिनांक 7 जानेवारी 2012 रोजी घेण्‍याचे निश्चित झाले आहे.
      पणन संचालक, महाराष्‍ट्र पुणे यांचे दि. 19 एप्रिल 1995 चे पत्रानुसार मतदानाचे दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्‍याचे आदेश आहेत. जिल्‍ह्यातील 51 निवडणूक विभाग व 102 निर्वाचक गणाचे मतदार क्षेत्रात दिनांक 7 फेब्रुवारी 2012 ला मतदानाचे दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्‍यात यावे. सदर दिवशी भरणारा आठवडी बाजार तो दिवस बदलवून अन्‍य दिवशी भरविण्‍यास काहीच हरकत नाही. असे जिल्‍हाधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.

सानेवाडी येथे पोषण आहार कार्यक्रम


     वर्धा,दि.1-राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियान नागरी प्रजनन व बाल आरोग्‍य कार्यक्रमांतर्गत नागरी भागातील मागास व झोपडपट्टी परिसरातील लोकांचे आरोग्‍यमान उंचावण्‍यासाठी नगर पालिका क्षेत्रामध्‍ये सामान्‍य रुग्‍णालयाच्‍या जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ.आर.डी.रावखंडे यांच्‍या मार्गदर्शनामध्‍ये सामान्‍य रुग्‍णालयातील  नागरी आरोग्‍य  केंद्र क्र. 1 सानेवाडी अंतर्गत अंगणवाडी क्र. 18 गोटे ले आऊट, वर्धा येथे (दि. 24 जानेवारी 2012 ला) नुकताच समतोल पोषक आहार कार्यक्रम घेण्‍यात आला.
     या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नगरसेविका योगिता बागडे, बालविकास अधिकारी माहुर्ले, माजी नगरसेवक निलेश खोंड , वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्‍पा वानखडे, अंगणवाडी सेवीका नम्रता वानखेडे तसेच परिसरातील महिला व माता उपस्थित होत्‍या.
     यावेळी उपस्थित पाहुण्‍यांनी मनोगत व्‍यक्‍त करताना सांगितले की पोषण आहाराविषयीचे महत्‍व प्रतयेक मातेने जाणून घेवून आहार धेतांना ज्‍यामध्‍ये जास्‍तीत जास्‍त पोषक घटक असतील असा आहार सेवन केला पाहिजे. म्‍हणजे जन्‍माला येणारे बाळ सुदृढ राहिल. मुलांच्‍या वाढीसाठी ज्‍या पोषक आहाराची आवश्‍यकता आहे तो आहार वेळेत मिळाला नाही तर मुल कुपोषणाकडे वळतात. त्‍यामुळे बालकाचा मानसिक, शारीरिक व बौध्‍दीक वाढ योग्‍य प्रमाणात होत नाही. म्‍हणूनच बालकांच्‍या वाढीकरीता आहार देताना स्‍वच्‍छ व पेाषक आहार द्यायला पाहिजे. शासकिय स्‍तरावर गरोदर माता व बालक यांच्‍याकरीता विविध आरोग्‍य विषयक शासकिय योजना राबविल्‍या जातात त्‍यांचा योग्‍य प्रकारे लाभ घेतला पाहिजे. तसेच 0 ते 5 वयोगटातील मुलांचे आरोग्‍य सुदृढ राहण्‍याकरीता पोषण आहाराचे महत्‍व, पोषण आहारामध्‍ये काय पदार्थ व किती प्रमाणात घ्‍यायला पाहिजे याविषयी मार्गदर्शन करण्‍यात आले.
     कार्यक्रमाचे संचालन अर्चना भुरे तर आभार प्रदर्शन डॉ. शिल्‍पा वानखेडे यांनी केले. यावेळी परिसरातील महिला उपस्थित होत्‍या.

क्रीडा नैपुण्‍य चाचणीचे आयोजन 7 फेब्रुवारी रोजी


      वर्धा,दि.1- शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत सुरु असलेल्‍या विविध क्रीडा प्रबोधिनीमध्‍ये क्रीडा नैपुण्‍य चाचण्‍याव्‍दारे प्रवेश देण्‍यात येतो. महाराष्‍ट्रात शारिरीक शिक्षण व क्रीडा क्षेत्राच्‍या दर्जा उंचावण्‍यासाठी आणि राज्‍यातुन जास्‍तीत जास्‍त आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे खेळाडु तयार होण्‍यासाठी वैज्ञानिक पध्‍दती, अध्‍यावत उपकरणे आणि प्रशिक्षण यावर अधिकाधिक प्रमाणात भर देण्‍याची गरज आहे. या उद्देशानं राज्‍यातील खेळ परंपरा अंतःसामर्थ्‍य व खेळ सुविधा लक्षात घेवुन राज्‍यात पुणे येथे शिवछत्रपती क्रीडा पीठाची स्‍थापना केलेली आहे.
     बॅटरी ऑफ टेस्‍टव्‍दारे निवड क्रीडा नैपुण्‍य चाचण्‍या शाळा स्‍तरावरुन तालुकास्‍तर, जिल्‍हास्‍तर आणि राज्‍यस्‍तरीय चाचण्‍याचे आयोजन करण्‍यात येणार आहे. या करीता दि. 7 फेब्रुवारी 2012 रोजी सकाळी 11 वाजता जिल्‍हा क्रीडा संकुल, वर्धा येथे जिल्‍हास्‍तरीय क्रीडा नैपुण्‍य चाचणीचे आयोजन करण्‍यात येणार आहे.
    वर्धा जिल्‍ह्यातील सर्व शाळेतील क्रीडा शिक्षक तालुका क्रीडा संयोजक यांनी ज्‍या खेळाडुंना शाळास्‍तरावर चाचणीत 8 गुण प्राप्‍त  आहेत अशा खेळाडुंनी इलीजीबिलीटी फॉर्म सह उपस्थित राहावे, असे जिल्‍हा क्रिडा अधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.     

Monday 30 January 2012

जानेवारी 2012 महिण्याचे शिधावाटप परिमाण


वर्धा, दि.30- जिल्ह्यातील सर्व कौटुंबिक शिधा पत्रिका धारकांना माहे   जानेवारी  2012 महिण्याकरीता स्वस्त धान्य दुकानातून शिधा वस्तु वाटपाचे परिणाम पुढील प्रमाणे निश्चीत करण्यात आलेले आहे. प्रत्यक्ष  धान्य साठा साखरेच्या उपलब्धतेनुसार वितरण करण्यात येईल.
            दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी बीपीएल कार्ड धारकांना 25 किलो गहू प्रतीकिलो 5 रु. दराने, तांदूळ 19 किलो प्रतीकिलो 6 रु. दराने, साखर प्रत व्यक्ती 500 ग्राम 13.50 प्रती किलो दराने मिळेल.अंत्योदय कार्ड    धारकांना  25 किलो गहू 2 रु. प्रती किलो दराने, 19किलो तांदुळ प्रती किलो   3 रु. दराने, प्रती व्यक्ती 500 ग्राम साखर 13.50 रुपये प्रती किलो दराने मिळेल. अन्नपूर्णा कार्ड धारकांना 5 किलो गहू 5 किलो तांदूळ बिनामुल्य दराने मिळेल. एपीएल कार्ड    धारकांना 10 किलो गहु 7.20 रुपये दराने, 5 किलो तांदूळ 9.60 रुपये   दराने मिळेल.
            तालुकानिहाय खापरी डेपोतून वितरीत झालेल्या केरोसीनचे किरकोळ विक्री दर प्रत लिटरचे दर कंसाबाहेर दिले असून, बोरखेडी डेपोतून वितरीत होणारे केरोसीनचे दर कंसामध्ये पुढील प्रमाणे दर्शविण्यात आले आहे.
        वर्धा 14.55 (14.48),देवळी 14.81 (14.75), सेलू 14.67 (14.62),आर्वी 14.74(14.69),आष्टी 14.95 (14.97),कारंजा 14.84 (14.93),हिंगणघाट 14.75(14.63),समुद्रपूर 14.49 (14.40) आहे.
      शहर विभाग तालुका मुख्यालयी प्रती व्यक्ती 2 लिटर प्रमाणे जास्तीत जास्त 20 लिटर ग्रामीण भागात 15 लिटर केरोसिनचे वाटप करण्यात येईल.असे  जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.
                                       00000