Friday 13 April 2012

विधी साक्षरता शिबीर आयोजन सामाजिक संस्‍थाकडून प्रस्‍ताव आमंत्रित



                    
   वर्धा,दि. 13-  2012-2013 या वर्षात कमीत कमी 12 विधी साक्षरता शिबीरे आयोजीत करण्‍याकरीता सामाजिक संस्‍थाकडून सहाय्य अनुदान देण्‍याकरीता विहीत नमुन्‍यात दोन प्रतीत प्रस्‍ताव  द्यावयाचे आहे.
           प्रस्‍तावासोबत सामाजिक संस्‍थांनी पुढीलप्रमाणे कागदपत्र जोडणे आवश्‍यक आहे. प्रस्‍ताव  दि. 23 एप्रिल 2012 पुर्वी  सदस्‍य सचिव, जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा यांचेकडे  सादर  करावे.
         सहाय्यक अनुदान व अधिस्विकृती फॉर्म संपूर्ण भरलेले असावे. अशासकीय संस्‍थेचे नोंदणी प्रमाणपत्रा , अशासकीय संस्‍थेचा संस्‍थापना लेख व अधिसंघ नियमावली याची प्रत. मागील तीन वर्षाचा लेखापरिक्षण अहवाल. मागील वर्षाचा संस्‍थांचा वार्षिक अहवाल. प्रती शिबीराकरीता होणारा संभाव्‍य खर्च दाखविणारा प्रत्‍येक शिर्षाखाली होणा-या खर्चाचे अंदाजपत्राक. अशासकीय संस्‍थेस विधी साक्षरता मध्‍ये काम करीत असल्‍याचा अनुभव असल्‍याबाबतची कागदपत्रो. अशासकीय संस्‍था 2012-13 मध्‍ये जिल्‍ह्यात शिबिरे घेणार आहेत त्‍याची ठिकाणे . मागील आर्थिक वर्षात ज्‍या अशासकीय संस्‍थेचा प्रस्‍ताव मंजूर झाला होता, त्‍या अशासकीय  संस्‍थेने उपयोगिता प्रमाणपत्र, सी.ए.रिपोर्ट, परफॉर्म्‍न्‍स रिपोर्ट, अध्‍यक्ष , जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्रा प्रसताव पाठविण्‍याच्‍या पूर्वी पाठविणे आवश्‍यक आहे. या बाबींची पूर्तता केलयानंतरच त्‍या अशासकीय संस्‍थेचा प्रस्‍ताव योग्‍य असल्‍यास पाठवावा. आलेल्‍या सर्व अशासकीय संस्‍थेच्‍या प्रस्‍तावातून पुक्‍त एकाच अशासकीय संस्‍थेचा प्रस्‍ताव अध्‍यक्षांच्‍या शिफारस पत्रासहीत पाठवावे. सदर प्रस्‍ताव दोन प्रतीत असणे आवश्‍यक आहे.
                                                            000000

रविवारी पल्‍स पोलिओ लसीकरण मोहिम



       वर्धा, दि. 13-  पोलीओ निर्मूलन कार्यक्रमा अंतर्गत राज्‍यात 1995 पासून पल्‍स पोलीओ लसीकरण मोहिम राबविण्‍यात येत आहे. पल्‍स पोलीओ लसीकरण मोहिमेची दुसरी फेरी दिनांक 15 एप्रिल 2012 रोजी  राबवायची आहे.
       जिल्‍ह्यात 1296 लसीकरण केंद्राची व्‍यवस्‍था करण्‍यात आली असुन यामध्‍ये ग्रामीण भागात 1114 , शहरी क्षेत्रात 182 केंद्रे आहेत. या मोहीमेत एकूण 3163 कर्मचारी व 260 पर्यवेक्षक व अधिकारी कार्यरत राहणार आहेत. यावर्षी ग्रामीण भागातील 86687 लाभार्थींना शहरी क्षेत्रात 30454 असे एकूण 117141 लाभार्थींना पेालीओचा डोज पाजण्‍यात येणार आहे. याशिवाय टोल नाके, फिरती पथके, ट्रान्‍झीट टिम्‍स, पर्यवेक्षकिय पथके, वाहन व्‍यवस्‍था पुरेशा प्रमाणात करण्‍यात आलेली आहे.

             दि. 15 एप्रिल 2012 च्‍या सत्रात आपल्‍याकडील व परिसरातील 5 वर्षाचे आंतील बालकांना  पोलीओ लसीकरण केंद्रांवर नेऊन लस पाजून घ्‍यावी आणि मोहिम यशस्‍वी करावी. स्‍थानिक लोकप्रतिनिधीनी आपल्‍या कार्यक्षेत्रातील  5 वर्षाचे आंतील  एकही बालक पोलीओ डोजपासून वंचित राहणार नाही याबाबत सतर्क राहुन पल्‍स  पोलीओ लसीकरण मोहीम यशस्‍वी करावी. असे आवाहन जिल्‍हा पल्‍स पोलिओ लसीकरण समन्‍वय  समीतीचे अध्‍यक्ष तथा जिल्‍हाधिकारी जयश्री भोज, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन, सदस्‍य सचिव तथा जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी  डॉ.के.झोड.राठोड  यांनी केले आहे.

उत्‍कृष्‍ट पत्रकारिता पुरस्‍कार 2011प्रवेशिका आमंत्रित


         वर्धा,दि.13- राज्‍य शासनाच्‍या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्‍कृष्‍ट पत्रकारिता, उत्‍कृष्‍ट लेखन आणि उत्‍कृष्‍ट दूरचित्रवाणी, वृत्‍तकथा, उत्‍कृष्‍ट छायाचित्रकार पुरस्‍कार स्‍पर्धा  जाहीर करण्‍यात आली आहे. या स्‍पर्धेसाठी 2011 या कॅलेंडर वर्षाकरीता दिनांक 1 जानेवारी 2011 ते 31 डिसेंबर 2011 पर्यंतच्‍या कालावधीसाठी प्रवेशिका मागविण्‍यात येत आहेत.
     पत्रकार, इलेक्‍ट्रानिक मिडिया, माहिती व जनसंपर्क अधिकारी व कर्मचारी, वृत्‍तपत्र व छायाचित्रकार, छायाचित्रकार असे पाच गट या स्‍पर्धेसाठी  असतील. सन 2011 या वर्षापासून पुरस्‍काराची रक्‍कम वाढविण्‍यात आली असून 41 हजार रुपये एवढी करण्‍यात आली आहे.
          उत्‍कृष्‍ट  पत्रकारिता पुरस्‍कार 2011 चे माहिती पत्रक / अर्जाचे नमुने सर्व विभागीय माहिती  कार्यालयास व सर्व जिल्‍हा माहिती कार्यालयात उपलब्‍ध आहेत. तसेच महाराष्‍ट्र शासनाच्‍या www.maharashtra.gov.in   dgipr.maharashtra.gov.in  या वेबसाईटवर देखील उपलब्‍ध आहेत.
          प्रवेशिका पाठविण्‍याची अंतीम तारीख 30 एप्रिल 2012 अशी राहील. तरी पत्रकारिता व छायाचित्रकार क्षेत्रात  कार्यरत लोकांनी स्‍पर्धेत सहभागी होण्‍याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे करण्‍यात आले आहे.
                                                  0000000

Tuesday 10 April 2012

जिल्‍ह्यात 37(1) आणि 3 कलम जारी


         वर्धा, दि.11- जिल्‍ह्यात  शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी जयश्री  भोज यांना प्रदान केलेल्‍या  अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)  आणि 3 कलम लागू केले आहे.
        या कलमाचा अंमल दि. 21 एप्रिल 2012  च्‍या रात्री  12 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द  कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल, असे आदेशात नमूद आहे.
                                                  0000000

राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियानाअंतर्गत जि.प. अध्‍यक्षाचे हस्‍ते धनादेशाचे वाटप


          वर्धा, दि. 11- राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान सन 2011-12 अंतर्गत हरितगृह उभारणी करणे या घटकात वर्धा उपविभागात 4 हरितगृह कार्यान्वित करण्‍यात आलेले आहे. त्‍यामध्‍ये अजय महादेवराव डेकाटे  रा. हिंगणी ता. सेलु, यांचेकडे  1.67 हेक्‍टर शेती असून,त्‍यांचेकडे संत्रा व मोसंबी, फळपिकाची व गुलाब 0.50 हेक्‍टर या फळपिकाची लागवड झालेली  आहे. तसेच त्‍यांनी हार्टिकल्‍चर ट्रेनिंग सेंटर, तळेगांव (दाभाडे) ता. मावळ जि. पुणे येथे हरित गृहातील शेती बाबत पाच दिवस प्रशिक्षण घेऊन  प्रशिक्षणातून  प्रवृत्‍त होऊन त्‍यांनी शेतात 1000 चौ.मी. आकाराचे पॉली हाऊस व 2000 चौ. मि. आकाराचे शेडनेट हाऊसची उभारणी केलेली आहे. शेडनेट हाऊस मध्‍ये दोडके व पॉलीहाऊस मध्‍ये कोथिंबीर ही पिके घेतलेली आहे. त्‍यांचेकडे पॅक हाऊस 600 चौ. फुट आकाराचे बांधकाम झालेले आहे. मीनी  ट्रॅक्‍टर 18 एच पी  व नर्सरी (वनराई) कार्यान्वित आहे.
       डेकाटे यांना पॉलीहाऊस, शेडनेट हाऊस व पॅक हाऊस उभारणी करीता बँक ऑफ इंडिया, हिंगणी शाखा ता. सेलु यांनी 20 लाख रुपयाचे कर्ज मंजूर केले आहे. राष्‍ट्रीय  फलोत्‍पादन अभियानातंर्गत कृषि विभागाकडून 3,52,800 रुपयाचे धनादेश  जि.प. चे अध्‍यक्ष नानाभाऊ ढगे यांचे हस्‍ते  प्रदान करण्‍यात आले.
         यावेळी जिल्‍हा कृषि अधिक्षक  संतोष डाबरे, उपविभागीय कृषि अधिकारी, वर्धा, आर्वी, हिंगणघाट उपस्थित होते.
                                                            00000000
माजी आमदार अमर काळे यांच्‍या आईचे निधन झाल्‍याने त्‍यांचे निवासस्‍थानी  सांत्‍वन करताना
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात