Friday 26 August 2011

वर्धा जिल्हयातील पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती, शनिवार दि.27/8/2011


वर्धा जिल्हयातील  पावसाची     नैसर्गिक आपत्तीची  माहिती  दि.27/8/2011 ची
खालील  नमुन्यात  पाठवीत  आहे. कृपया आपल्या माहितीसाठी  सविनय   सादर.
क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  र्षी  आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
677.9 मि.मी.

34.16 मि.मी.
3
शासनाचे मदत कार्य
निरंक
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान(सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा -604.7(19.5) मि.मी.
2)सेलू - 703(17) मि.मी.
3)देवळी -767.88(49.2) मि.मी.
4)हिंगणघाट-628.2(11) मि.मी.
5)आर्वी -792(107) मि.मी.
6)आष्टी -600.8(53.6) मि.मी.
7)समुद्रपूर -677(7) मि.मी
8)कारंजा-643.16(9.0) मि.मी.

परिक्षा केंद्रावर 144 कलम लागू


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक           जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा  दि.26 ऑगस्ट 2011
–––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––-----------
               
     वर्धा, दि. 26- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहाय्यक पदासाठी  या राज्येसेवा पूर्व परिक्षा दिनांक 28 ऑगस्ट 2011 रोजी वर्धा येथील जी.एस.कॉमर्स कॉलेज, यशवंत महाविद्यालय, जानकी देवी बजाज सायन्स कॉलेज व सुशील हिंमतसिंघका महाविद्यालयातील परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
     या परीक्षा सुरळीतपणे पार पडाव्या यासाठी जिल्हा दंडाधिकारी जयश्री भोज यांना प्राप्त अधिकारान्वये परिक्षा केंद्रावर कलम 144 लागू करण्यात आली आहे.
     या कलमाचा अंमल दि. 28 ऑगस्ट 2011 पर्यंत राहणार असून, सकाळी 6 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राचे 100 मीटरचे परिसरात 2 अथवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या जमावावर आणि सदर परिक्षा केंद्राचे 100 मीटरचे परिसरात सर्व झेरॉक्स, मोबाईल, एसटीडी, आयएसडी, फॅक्स, संगणक, ई-मेल, इंटरनेट सेवा इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स आदी सुविधा व उपकरणाचे वापरावर व सदर बाबतची केंद्रे सुरु राहण्यावर निर्बंध व प्रतिबंध करण्यात आले आहे. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.                                                             00000


जलाशयातील पाण्याच्या पातळीची आजची स्थिती


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक          जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा  दि.20 ऑगस्ट 2011
–––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––-----------
                
     वर्धा,दि.26-वर्धा पाटबंधारे विभाग यांनी पाठविलेल्या अहवालानुसार आज दिनांक 26 ऑगस्ट 2011 रोजी जलाशयातील पाण्याच्या पातळीची स्थिती पुढील प्रमाणे आहे.
     धाम प्रकल्प महाकालीच्या जलाशयातील पूर्ण संचय पातळी 328.60 मिटर असून, पाण्याचा उपयुक्त साठा 62.51 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयातील साठा 37.28 द.ल.घमी. असून, उपयुक्त साठ्याची वास्तविक टक्केवारी 59.65 आहे. पोथरा प्रकल्प धरणाची पूर्ण संचय पातळी 229.40 मिटर असून, पाण्याचा उपयुक्त साठा 34.72 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयातील साठा 32.02 द.ल.घ.मीटर असून, उपयुक्त साठ्याची वास्तविक टक्केवारी 92.21 आहे.बोर प्रकल्प जलाशयातील पूर्ण संचय पातळी 330.40 मीटर असून, पाण्याचा उपयुक्त साठा 127.42 द.ल.घ. मिटर आहे. जलाशयातील साठा 99.33 द.ल.घ.मीटर असून, उपयुक्त साठ्याची वास्तविक साठयाची टक्केवारी  78 आहे.
डोंगरगाव प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी 297.95 मीटर असून, उपयुक्त साठा 4.44 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयातील साठा 3.04 द.ल.घ.मीटर असून, वास्तविक साठ्याची टक्केवारी 68.60 आहे. पंचधारा प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी 305.50 मीटर असून, उपयुक्त साठा 8.75 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयाचा साठा 5.30 द.ल.घ.मीटर असून, वास्तविक साठ्याची टक्केवारी 60.57 आहे. मदन प्रकल्प पूर्ण संचय पातळी 329.90 मीटर असून उपयुक्त साठा 10.56 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयातील साठा 6.49 द.ल.घ.मीटर असून,वास्तविक साठ्याची टक्केवारी 61.50 टक्के आहे. मदन उन्नई धरणाची पूर्ण संचय पातळी 273.65 मीटर असून,उपयुक्त साठा 2.70 द.ल.घ.मीटर
आहे.जलाशयातील साठा 1.77 द.ल.घ.मिटर असून, साठ्याच्या वास्तविक टक्केवारी 65.85 टक्के आहे. लाल नाला प्रकल्प संचय पातळी 234.15 मिटर असून, उपयुक्त साठा 27.613 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयातील साठा 24.32 द.ल.घ.मीटर असून, टक्केवारी 88.11 आहे. नांद प्रकल्पातील साठा 247 मीटर असून, उपयुक्त साठा 53.18 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयातील साठा 14.49 द.ल.घ.मीटर असून, साठ्याची टक्केवारी 27.94 आहे.
वडगाव प्रकल्पातील संचय पातळी 255.10 मीटर असून, उपयुक्त साठा 136 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयातील साठा 108.32 द.ल.घ. मीटर असून, जलाशयाची साठ्याची टक्केवारी 79.64 आहे. उर्ध्व वर्धा धरणाची संचय पातळी 342.50 मीटर असून, उपयुक्त साठा 548.14 द.ल.घ.मीटर आहे. धरणात 444.68 द.ल.घ.मीटर साठा असून साठ्याची टक्केवारी 78.84 आहे. वर्धा कार नदी प्रकल्पात पूर्ण संचय पातळी 432.65 मीटर असून, उपयुक्त साठा 21.063 आहे. जलाशयाचा साठा 21.06 द.ल.घ.मीटर असून, साठ्याची टक्केवारी 100 आहे.11.80 क्युमेक्स पाणी सोउण्यात येत असून 10 से.मी. प्रवाहाने विसर्ग होत आहे. निम्न वर्धा प्रकल्पाची संचय पातळी 283.60 मीटर असून उपयुक्त साठा 216.87 द.ल.घ. मीटर आहे. जलाशयातील साठा 22.16 द.ल.घ.मीटर असून, टक्केवारी 21.46 आहे. या धरणात 21.05 क्युमेक्सने पाण्याचा विर्ग होत असून धरणाचे 7 गेट 5 से.मी. ने उघडले आहे. बेंबाळा प्रकल्पात संचय 269.50 मीटर असून, उपयुक्त साठा 302.67 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयातील साठा 120.83 द.ल.घ.मीटर असून, साठ्याची टक्केवारी 39.92 आहे. पाण्याचा विसर्ग 57.60 क्युमेक्स ने होत असून 2 गेट 20 से.मी.ने उघडले आहे.सुकळी लघू प्रकल्‍पात संचय पातळी 286.15 मीटर असून, उपयुक्त साठा 10.27 द.ल.घ.मीटर आहे. जलाशयाची पातळी 8.98 द.ल.घ.मीटर असून, त्यांची टक्केवारी 87.48 आहे. अशी माहिती वर्धा पाटबंधारे सिंचन विभागाच्या अहवालात नमूद आहे.
                   000000

महाराष्ट्र शासन

वर्धा जिल्ह्यात आता पावेतो 641 मि.मी. सरासरी पाऊस


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा  दि.26 आगस्ट 2011
---------------------------------------------------------------------------------

                
वर्धा, दि.4- वर्धा जिल्ह्यात आतापावेतो 641.57 मि.मी. सरासरी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली असून, गेल्या चोविस तासास सेलू तालुक्यात 54 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तालुकानिहाय कंसातील आकडे हे एकूण पावसाचे असून, कंसाबाहेरील आकडे हे आज पडलेल्या पावसाचे आहे.
     वर्धा 45.3 (585.2) मि.मी., सेलू 54 (649) मि.मी., देवळी 23.06(744.82) मि.मी., हिंगणघाट 3 (617.2) मि.मी., आर्वी 31 (685) मि.मी., आष्टी 21.6 (547.2) मि.मी.,समुद्रपूर 3 (670) मि.मी., कारंजा 26.16 (634.16) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
     आज जिल्ह्यात एकूण 206.98 मि.मी. पाऊस पडला असून आतापावेता एकूण 5132.58 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज सरासरी पडलेला पाऊस  25.87 मि.मी. असून, आतापर्यंत 641.57 मि.मी. एकूण सरासरी एवढा पाऊस पडला आहे.
                                          000000


जिल्ह्यातील ६२ रेतीघाटांचा लिलाव ई-टेंडर पद्धतीने


 महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.26 ऑगस्ट 2011
--------------------------------------------------------------------------
         
वर्धा, दि. 26- सन 2011-12 या वर्षात वर्धा जिल्ह्यातील 62 रेतीघाटाचा लिलावाकरीता प्रत्येक रेतीघाटाकरीता स्वतंत्रपणे ईच्छूक व्यक्तिकडून  ई-निविदा पध्दतीने निविदा मागविण्यात येत आहे.
रेतीघाटाच्या लिलावाकरीता ई-निविदा सादर करण्यासाठी जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा ई-निविदा बाबत प्रशिक्षण माहिती व मार्गदर्शन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. लिलाव करावयाच्या वाळू/ रेतीघाटाची अपसेट प्राईज, लिलावाच्या अटी शर्ती  व ईतर संबधीत माहिती  www.onlinetenders.co.in  या संकेतस्थळावर उपलबध आहे. दि. 26 ऑगस्ट 2011 पासुन दि. 9 सप्टेंबर 2011 रोजी दुपारी     2 वाजेपर्यंत ऑनलाईन   ई  निविदा सादर करावयाच्या आहे.
हा लिलाव 1 ऑगस्ट 2011 ते 31 जुलै 2012 या कलावधीसाठी आहे. इच्छूकांनी यासाठी ई-टेंडर पध्दतीनेच बोली लावता येणार आहे.  याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
                      0000





Thursday 25 August 2011

वर्धा जिल्हयातील पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती,शुक्रवार दि.26/8/2011

क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  र्षी  आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
641.57 मि.मी.

25.87 मि.मी.
3
शासनाचे मदत कार्य
निरंक
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान(सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा -585.2 (45.3) मि.मी.
2)सेलू - 649(54.0) मि.मी.
3)देवळी-744.82(23.06)मि.मी.
4)हिंगणघाट-617.2(3.0) मि.मी.
5)आर्वी -685(31) मि.मी.
6)आष्टी -547.2 (21.6) मि.मी.
7)समुद्रपूर -670 (3) मि.मी
8)कारंजा-634.16(26.16) मि.मी.