Thursday 7 July 2011

वाढत्‍या लोकसंख्‍येचे संकट


भारत हा विकसनशील देश आहे. विकासदरात झपाट्याने वाढ होणारा देश म्‍हणून जगभरात आपली ओळख आहे. दर्जेदार शिक्षण, उत्‍तम आरोग्‍य सेवा, पुरेसे अन्‍नधान्‍य, पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय, निवा-याची उपलब्‍धता यांचा लाभ सर्वसामान्‍य जनतेपर्यंत पोहोचावा, यासाठी शासनाच्‍यावतीने सर्वतोपरी प्रयत्‍न करण्‍यात येत आहेत; तथापि वाढत्‍या लोकसंख्‍येमुळे हे प्रयत्‍न अपुरे ठरत आहेत.
आपला देश नैसर्गिक साधनसामुग्रीने श्रीमंत असून या साधनसामुग्रीचा वापर लोकांचे जीवनमान उंचावण्‍यासाठी मोठ्या प्रमाणावर व्‍हावयास हवा, अशी अपेक्षा व्‍यक्‍त होते. लोकांच्‍या शासनाकडून खूप मोठया अपेक्षा असतात. दीर्घ व आरोग्‍यपूर्ण जीवन जगणे, ज्ञान प्राप्‍त करणे व चांगल्‍या प्रतीचे राहणीमान उपभोगणे या प्रमुख तीन अपेक्षा शासनाने पूर्ण कराव्‍यात अशी अपेक्षा असते. मानव विकास निर्देशांक ठरवतांना याच निकषांचा विचार होतो. मात्र लोकसंख्‍येत होणारी प्रचंड वाढ ही विकासाचे गणित बिघडवून टाकत असलेली दिसून येते.
देशात नुकतीच जनगणना पार पडली. त्‍यात तात्‍पुरती आकडेवारी जाहीर करण्‍यात आली. त्‍यानुसार महाराष्‍ट्राची लोकसंख्‍या 9 कोटी 68 लक्ष 88 हजारावरुन 11 कोटी 23 लक्ष 72 हजार 972 इतकी झाली आहे. जगातील एकूण २३१ देशांपैकी फक्‍त चीन, भारत, युनायटेड स्‍टेट्स ऑफ अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझील, पाकिस्‍तान, बांग्‍लादेश, नायजेरिया, रशिया, आणि जपान या 10 देशांचीच लोकसंख्‍या महाराष्‍ट्रापेक्षा अधिक आहे. उत्‍तर प्रदेशानंतर ( 19 कोटी 95 लक्ष 80 हजार) महाराष्‍ट्र हे देशातील दुस-या क्रमांकाचे लोकसंख्‍या असलेले राज्‍य आहे. महाराष्‍ट्राच्‍या एकूण लोकसंख्‍येमध्‍ये पुरुषांची संख्‍या 5 कोटी 83 लक्ष 61 हजार 397 तर स्‍त्रियांची संख्‍या 5 कोटी 40 लक्ष 11 हजार 575 इतकी आहे. शून्‍य ते सहा वर्षे वयाच्‍या मुलांची संख्‍या 1 कोटी 28 लक्ष 48 हजार 375 इतकी असून मुलींचे प्रमाण हजार मुलांमागे 883 इतके आहे.
परभणी जिल्‍ह्याचा विचार करता २०११ च्‍या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्‍या 18 लक्ष 35 हजार 982 असून त्‍यामध्‍ये 9 लक्ष 46 हजार 185 पुरुष तर 8 लक्ष 89 हजार ७९७ स्‍त्रियांचा समावेश आहे. शून्‍य ते सहा वर्ष वयाच्‍या मुलांची संख्‍या 2 लक्ष 51 हजार 851 इतकी आहे. मुलींचे दर हजार मुलांमागे प्रमाण केवळ ८६६ इतके आहे. एकूण साक्षरतेचे प्रमाण ७५.२२ टक्‍के असून पुरुष साक्षरता ८५.६६ टक्‍के तर स्‍त्री साक्षरता ६४.२७ टक्‍के इतकी आहे.
महाराष्‍ट्र राज्‍यातील स्‍त्री-पुरुष प्रमाण (स्‍त्रियांची संख्‍या प्रति हजार पुरुष) ९२५ इतके असून देशपातळीवर हेच प्रमाण ९४० इतके आहे. जालना, बीड, रायगड आणि सिंधुदुर्ग या 4 जिल्‍ह्यात स्‍त्री-पुरुष प्रमाणात 20 अंकाहून अधिक घट झालेली आहे. शून्‍य ते सहा वर्षे ह्या वयोगटातील स्‍त्री-पुरुष प्रमाणातही फार मोठ्या प्रमाणात घट झालेली असून ती चिंतेची बाब आहे. राज्‍यातील २३ जिल्‍ह्यात राष्‍ट्रीय सरासरीपेक्षा (दरहजारी ९१४) कमी स्‍त्री-पुरुष प्रमाण आहे. राज्‍यातील 35 जिल्‍ह्यांपैकी सातारा, सांगली, कोल्‍हापूर आणि चंद्रपूर या 4 जिल्‍ह्यांमध्‍येच बालकांमधील स्‍त्री-पुरुष प्रमाण वाढल्‍याचे दिसून येते. परभणीसह जालना, बीड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा आणि जळगाव या 7 जिल्‍ह्यांमध्‍ये बालकांमधील स्‍त्री-पुरुष प्रमाण ५० हून अधिक अंकानी घटलेले आहे.
राज्‍यातील बीड, जालना, नंदूरबार आणि गडचिरोली या 4 जिल्‍ह्यातील साक्षरतेचे प्रमाण राष्‍ट्रीय साक्षरतेपेक्षा (७४.०४ टक्‍के) कमी आहे. पुरुष साक्षरतेमध्‍ये नंदूरबार आणि गडचिरोली तर स्‍त्री साक्षरतेमध्‍ये परभणीसह बीड, जालना, हिंगोली, नंदूरबार, गडचिरोली या 6 जिल्‍ह्यातील प्रमाण राष्‍ट्रीय साक्षरतेच्‍या प्रमाणापेक्षा कमी असल्‍याचे आढळून आले आहे.
विविध कुटुंबकल्‍याण कार्यक्रम राबविण्‍यामध्‍ये महाराष्‍ट्र राज्‍य नेहमीच आघाडीवर राहिले आहे. तथापि लोकसंख्‍येत होणारी वाढ रोखण्‍यासाठी आरोग्‍यविषयक कार्यक्रमांची कठोरपणे अंमलबजावणी व्‍हावयास हवी. लोकसंख्‍यावाढीला आळा घालता आला नाही तर अन्‍न, वस्‍त्र,निवारा, पाणी या सारखे प्रश्‍न आणखी गंभीर होतील. महागाई, चलनवाढ यांना वारंवार सामोरे जावे लागणार आहे. स्‍त्री-पुरुषांच्‍या प्रमाणात असणारी तफावतही आणखी एका सामाजिक संकटाला आमंत्रण देणारी ठरणार आहे. मुलींना जन्‍माला न घालण्‍याचे प्रमाणही वाढत आहे.यासंबंधी कठोर कायदेशीर उपाय योजूनही त्‍याला कितपत आळा बसू शकतो, असा प्रश्‍न आहे. समाजाचा प्रतिगामी दृष्‍टिकोन बदलावा यासाठी लेक वाचवा’, मुलींच्‍या जन्‍माचे स्‍वागत’,मुलीला जन्‍म देणा-या महिलेच्‍या सासूचा जाहीर सत्‍कार असे अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. याचे दृश्‍य परिणाम आगामी काळात दिसतीलच. थोडक्‍यात, समाजातील स्‍त्री-पुरुषांचे प्रमाण योग्‍य राहून उपलब्‍ध लोकसंख्‍येला शिक्षण, आरोग्‍य, अन्‍न, वस्‍त्र, निवारा यांची सुविधा मिळावी. समृध्‍द व बलशाली भारताचे स्‍वप्‍न साकार व्‍हावे असे वाटत असेल तर वाढत्‍या लोकसंख्‍येचे संकट रोखण्‍यासाठी होणा-या शासनाच्‍या प्रयत्‍नास समाजाचेही पाठबळ आवश्‍यक आहे
राजेंद्र सरग
जिल्‍हा माहिती अधिकारी,
परभणी

डी.टी.एड् प्रवेशाकरीता अर्ज स्विकृती व विक्री

                              महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.310   *         जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.७ जुलै 2011 
------------------------------------------------------------------------------

                                                                                           डी.टी.एड् प्रवेशाकरीता अर्ज स्विकृती व विक्री


       वर्धा, दि.7- सत्र 2011-2012 करिता अध्यापक पदविका अभ्‍यासक्रम (डी.टी.एड्.) चे शासकीय कोट्यातील आवेदन पत्र विक्रीकरीता 6 जुलै 2011 ऐवजी 9 जुलै 2011 पर्यंत सुरु असून, आवेदन पत्र स्विकृती 7 जुलै 2011 ऐवजी 10 जुलै 2011 पर्यंत स्विकारण्यात येतील. तसेच आवेदन पत्र विक्री व स्विकृती सुट्टीच्या दिवशी सुध्दा सुरु राहिल. असे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वर्धा यांनी कळविले आहे.
                                  0000

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन

महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.3०9   *         जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.७ जुलै 2011 
------------------------------------------------------------------------------------------
      जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन
वर्धा, दि. 7- क्रीडा व युवक सेवा संचालनालय,जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत सन 2011-2012 या सत्रातील शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन तालुका पासून जिल्हास्तरापर्यंत शालेय, ग्रामीण, महिला व केंद्रशासन पुरस्कृत क्रीडा स्पर्धा 27 जुलै 2011 पासुन सुरु होणार आहेत. स्पर्धेचा प्रारंभ सुब्रतो कप फुटबॉल क्रीडा स्पर्धे पासुन होणार आहे.
तालुका निहाय प्रवेश फी भरण्याची अंतिम तारीख व सभा दिनांक पुढील प्रमाणे आहे. वर्धा, देवळी, सेलू तालुक्यासाठी सभा दिनांक 15 जुलै 2011 रोजी असून प्रवेश फी भरण्याची अंतिम  दि. 21 जुलै 2011 आहे. हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यासाठी सभा दि. 16 जुलै 2011 रोजी असून प्रवेश फी भरण्याची अंतिम  दि. 22 जुलै 2011 आहे.आर्वी, आष्टी तालुक्यासाठी सभा दि. 18 जुलै 2011 रोजी असून प्रवेश फी भरण्याची अंतिम  दि. 25 जुलै 2011 आहे. कारंजा तालुक्यासाठी सभा दि. 18 जुलै 2011 रोजी प्रवेशफी भरण्याची अंतिम दि. 26 जुलै 2011 आहे.
त्या अनुषंगाने सर्व शाळांनी खालील प्रमाणे तालुका निहाय प्रवेश फी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,वर्धा येथे जमा करुन आपला प्रवेश निश्चित करावा. तसेच ज्या शाळांना याबाबत परिपत्रक प्राप्त झाले नसेल त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधून, आपले परिपत्रक प्राप्त करुन घ्यावे तसेच अधिक माहिती करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे कार्यालयीन कामकाजाचे वेळेत संपर्क साधावा, असे जिल्हा जिल्हा क्रिडा अधिकारी वर्धा यांनी कळविले आहे.
                        000000





मतदार याद्या प्रसिध्दीची सुचना

महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.3०८   * जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.७ जुलै 2011 
-----------------------------------------------------------------------
                       मतदार याद्या प्रसिध्दीची सुचना
वर्धा,दि.7- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व महाराष्ट्र विनिर्दीष्ट सहकारी संस्थेच्या समित्यावरील निवडणूक नियम 1971 मधील नियम 4 ते 5 नुसार समुद्रपूर सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती मर्या. समुद्रपूर ता. समुद्रपूर जि. वर्धा या विनिर्दीष्ट सहकारी संस्थेच्या निवडणूकी करीता मतदारांच्या प्रारुप याद्या तयार करुन दिनांक 12 जुलै 2011 (मंगळवार) रोजी प्रसिध्द करण्यात येतील.
 या मतदार यादीची प्रत तपासणीसाठी जिल्हाधिकारी, वर्धा यांचे कार्यालय (निवडणूक विभाग), जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वर्धा यांचे कार्यालय, आणि व्यवस्थापक, समुद्रपूर तहसील सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती मर्या.समुद्रपूर, ता. समुद्रपूर, जि. वर्धा  या  ठिकाणी उपलब्ध आहे.
मतदार यादीमध्ये जर नावे समाविष्ट करावयाची असतील किंवा नावाबाबत हरकत, आक्षेप घ्यावयाचा असेल किंवा यादीमधील नोंदीबाबत फेरफार  अथवा दुरुस्ती सुचवावयाची असेल तर तसा दावा किंवा आक्षेप जिल्हाधिकारी, वर्धा निवडणूक विभाग यांचेकडे दिनांक 10 ऑगस्ट 2011 (बुधवार) पर्यंत लेखी सादर करावा.
 पोष्टाने पाठवावयाचा असल्यास तसा प्रत्येक दावा किंवा आक्षेप महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या समित्यावरील निवडणूक नियम 1971 च्या नियम 6 च्या तरतुदीनुसार दिनांक 10 ऑगस्ट 2011 पर्यंत मिळेल अशा रितीने पाठवावा. यानंतर आलेला दावा किंवा आक्षेप विचारात घेतला जाणार नाही याची नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी,वर्धा यांनी कळविले आहे.
                    00000
        

Wednesday 6 July 2011

फोन करा झाडे लावा


                महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.307  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.6 जुलै 2011 
----------------------------------------------------------------------------
    फोन करा झाडे लावा
     वर्धा,दि,6- दि. 5 जून ते 15 जुलै या वनमहोत्सव कालावधीमध्ये आपल्या शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचे काम सामाजिक वनीकरण विभागाने, राष्ट्रीय हरीत सेनेच्या शिक्षण विद्यार्थ्यांमार्फत राबविण्याचे योजिले आहे.
     या कार्यक्रमा अंतर्गत आपण फक्त दुरध्वनी संपर्क करुन लागवड करावयाच्या पाच वृक्षाची नावे संपर्क साधण्यास सक्षम अशा व्यक्तीचे मार्फत नोंदवू शकतात. मागणी नोंदवीतांना आपले नांव,राहण्याचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक असवश्यक असून पाच वृक्षांची नांवे संबंधीत राष्ट्रीय हरीत सेनेचे शिक्षक व स्वयंसेवक अथवा लागवड अधिकारी वर्धा यांना कळवावे.नोंदविलेल्या यादीचा प्रभाग निहाय विभागणी करुन आपली रोपे आपल्या परिसरातील राष्ट्रीय हरीत सेनेचे विद्यार्थ्यांमार्फत घरपोच पाठविण्यात येईल.करतील.
     तत्पूर्वी आपण आपल्या लागवड क्षेत्रात 4 मीटर अंतरावर 30x30x30 से.मी. किलो आकारमानाचे खड्डे खोदुन त्यात भरण्यासाठी सुपीक माती,शेनखत अथवा गांढूळ खत 1/2 किलो प्रती खड्डा अथवा रासायनिक खते डीएपी 50 ग्रॅम प्रती खड्डा याप्रमाणे पुर्व तयारी करुन ठेवणे आवश्यक आहे.
            लागवड करण्यास सवलतीचे दरात पुढील रोपे उपलब्ध करुन दिली जाते. तसेच आवळा, सिताफळ, जांभुळ, कडूनिंब 5 रु. प्रतीरोप, गुलमोहर, पेलटोफॉर्म, कांचन  10 रु. प्रती रोप उपलब्ध आहेत. सदर कार्यक्रम 10 जुलै ते 31 जुलै पर्यंत कार्यान्वीत राहील.मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात यावी.आवाहन सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक पी.एस.पवार यांनी केले आहे.

                         00000

लेखन दिवस अर्थात 8 जुलै... !



      आपल्या मराठी भाषेचं वैशिष्टय म्हणजे आपल्या भाषेतल्या म्हणी होत. एका वाक्यात मोठं सांगण्याचं काम या म्हणीमधून होते ग्रामीण भागात लांबलचक संवाद न करता म्हणींच्या माध्यमातून संवाद म्हणजे आगळा आनंद असतो. हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे 8 जुलै अर्थात लेखन दिवस.
      दिसामाजी काही लिहित जावे, प्रसंगी अखंडीत वाचित जावे असं संतवचन आहे. लिहिणाराच नसेल तर वाचणारा काय वाचणार ? आपल्या कडे लिखाणाची मोठी परंपरा आहे. ज्यावेळी कागदाचा शोध लागला त्यावेळी या लिखाणाच्या कार्याने वेग घेतला असला तरी त्यापूर्वी लिखाण होतच होते.
      लिखाणाच्या या परंपरेचा वेध घेताना अगदी पूरातन काळात गुहेत माणूस रहात असायचा त्या काळात त्याने रेखाटलेल्या चित्रांचा पहिले लिखाण म्हणून उल्लेख करावा लागेल. अभिव्यक्ती साठी त्यावेळी ते उपलब्ध साधन वापरले गेले.
      नंतरच्या काळात आयुधांच्या मदतीने दगडांवर कोरिव काम करुन शिलालेख मोठया प्रमाणावर लिहिले गेले यातही राज घराणे आणि त्यांचा गुणगैारव मोठया प्रमाणावर असे ज्या काळात वेदांचे आणि उपनिषदाचे पठण सुरु झाले त्या काळापासून त्याचे लिखाण होईपर्यंतचा प्रवास हा मौखिकच होता.
      भूर्जपत्र हे माध्यम सापडल्यानंतर मोठया प्रमाणावर ग्रंथनिर्मिती शक्य झाली तरी धातूवर लिखाण करणे, दगडांवर लिखाण करणे अशी परंपरा कायम राहिली होती. कागदाचा शोध लागल्यानंतर लिखाणाला योग्य माध्यम मिळाले असे म्हणण्यापेक्षा लिखाण हे सामान्यासाठी अभिव्यक्तीचे नवे माध्यम बनले. कागदाचा शोधानंतर लागलेला महत्वाचा शोध अर्थातच मुद्रणाचा. या दोन महत्वाच्या शोधांनी जग ख-या अर्थानं बदलून टाकलं.
      लिखाणाची इच्छा असणं आणि प्रत्यक्षात लेखन करणं प्रत्येकाला जमतं असं नाही पण, लिहिलेलं वाचणं सा-या अक्षर प्रेमींना जमतं यातूनच साहित्याची परंपरा पुढे आली विविध क्षेत्रातील ज्ञान शब्दरुपानं कागदावर आल्यानंतर त्याला पुढच्या पिढीपर्यंत नेणं सोपं झाल. यातून शिक्षण पध्दतीतही बदल घडला गुरुकुलांची परंपरा जाऊन शाळा आल्या.
      शाळेतले शिक्षक असो की, चौथ्या स्तंभाचे शिलेदार अगदी साधा अकाउन्टंन्ट देखील या लेखनाच्या बळावरच प्रगती करु शकला हे विसरता येत नाही दुसरीकडे ज्यांच्या आयुष्यात लेखनाचा संबंधच आला नाही अशा ग्रामीण क्षेत्रातही भाषा सूत्र मजबूत राहिले.
      नावात काय असं विचारणारा विल्यम शेक्सपिअर असो की आपल्या शब्दातून     वाचणा-याला खळाळून हसायला लावणारे पुलं. या लेखनाची ही जादू आता तंत्रातील प्रगतीमुळे ज्याला लिहिता येतं तो लिहित आहे. फेसबूकसारख्या समुदायानं सा-या जगाला लिहितं केलं असा निष्कर्ष वावगा ठरणारा नाही.
      ज्याला जसं जमतय, जसं सूचतय तसं कोणतीही भीड न बाळगता लिहिणारे लाखोजण या माध्यमात दिसतील. माहितीच्या महाजालात विविध क्षेत्राची माहिती याच स्वरुपात आता आपल्याला उपलब्ध आहे. वेबसाईटस्‍ आणि ब्लॉग्सनी लेखकांना नवं माध्यम दिलय. तंत्राच्या प्रगतीनं लेखनात जसं पुढचं पाऊल पडलं तसं ते नाटय सिनेक्षेत्रातही पडलय तंत्रानं आणखी एक बदल केला तो म्हणजे संगमंचावर घडणारं नाटय घरात टिव्हीच्या पडद्यावर आणलं ज्याचा रिमोट तुमच्या हाती असतो.
      वाचन क्षेत्रात ही तंत्रज्ञानानं बदल घडवले आहेत माहितीच्या महाजालात असंख्य ग्रं‍थ आज सर्वांसाठी खुले झाले. पुढचं पाऊल म्हणजे ई-बुक रिडरच्या रुपात किंडल सारखी उपकरणं सहजरित्या ग्रंथालय बाळगायला समर्थ झाली त्यासाठी एकच सांगणं ज्याला लिहिता येतं त्यानी ते लिहावं... लेखक व्हावं
                                                                        -प्रशांत दैठणकर
0000000

शेतकरी आत्महत्याचे एक प्रकरण मदती करीता पात्र


महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.306  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.6 जुलै 2011 
-----------------------------------------------------------------
          शेतकरी आत्महत्या एक प्रकरण
                 मदती करीता पात्र
     वर्धा, दि. 6-शेतकरी आत्महत्या प्रकरणाची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी जयश्री भोज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी शेतकरी आत्महत्याचे एक प्रकरण सर्वानूमते मदतीस पात्र ठरले.
     यावेळी जि.प. उपाध्यक्ष सुनिल राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बन्सोड, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उप पोलीस अधिक्षक (गृह) नळे, समिती सदस्य सोहम पंड्या, कृषि भुषण पुरस्कार प्राप्त डॉ. नंदकिशोर तोटे, अनिल मेघे, जिल्हा कृषि अधिक्षक सि.एस.बराते उपस्थित होते.
     या बैठकीत तीन प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी चौकशीचे एक प्रकरण गजानन बावने यांचा प्रलंबीत कृषि अहवाल प्राप्त झाल्यामुळे त्यांचे प्रकरण मदतीस पात्र ठरविण्यात आले आहे.
     नापिकी, कर्जबाजारीपणा, व तगादा हे शासनाचे निकष पूर्ण करीत नसल्याने शेतकरी आत्महत्याची दोनप्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहे.
                        000000



कृषीभुषण पुरस्कार प्राप्त डॉ. नंदकिशोर तोटे यांचा जिल्हाधिका-यांचे हस्ते सत्कार



          महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.305         जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.6 जुलै 2011 
-----------------------------------------------------------------
             कृषीभुषण पुरस्कार प्राप्त डॉ. नंदकिशोर तोटे
                 यांचा जिल्हाधिका-यांचे हस्ते सत्कार
वर्धा,दि.6- महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्ताने ज्यांनी कृषी क्षेत्रामध्ये ऊल्लेखनीय व भरीव अशी कामगीरी केली असून कृषि विकासात मोलाचा वाटा आहे असे पवनार येथील कृषिभुषण पुरस्कार प्राप्त डॉ. नंदकिशोर तोटे यांचा जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पुष्पगुच्छ देवून सन्मानित  केले.
      यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुनिल राऊत, मुख्य कार्यपालन अधिकारी लिना बन्सोड, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा कृषि अधिक्षक बि.एस.बराते, सोहम पंड्या, अनिल मेघे आदि मान्यवर उपस्थित होते.
      1 जुलै 2011 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती क्रिडा संकुल पुणे येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषिभूषण डॉ. नंदकिशोर तोटे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते त्यांना स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.
      2006 चा कृषिभूषण व 1994 चा शेतीनिष्ठ हे महाराष्ट्र शासनाचे कृषि पुरस्कार प्राप्त डॉ. नंदकिशोर तोटे ह्यांनी पारंपरागत शेतीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रकारचे प्रयोग त्यांनी आपल्या शेतीतून महाराष्ट्र व विदर्भाच्‍या शेतक-यांपर्यंत पोहचविले आहे. प्रगत शेती करण्याकरीता युरोप राष्ट्राचा विदेश दौराही त्यांनी केलेला आहे. ते शेतीनिष्ठ व प्रयोगशिल शेतकरी आहेत.
      शेतकरी सुखी व्हावा त्याला त्याच्या घामाचा योग्य मोबदला कसा मिळविता येईल त्याकरीता शेतीच्या विकासासाठी त्यांनी केलेले प्रयोग ह्यांचे मार्गदर्शन टि.व्ही., वर्तमान पत्र व कृषि विभागाच्या मार्गदर्शन शिबिरातून ते नेहमी करीत असतात. व शेतीवर भेट देणा-या शेतक-यांना योग्य माहिती देऊन त्यांचे समाधान करतात.
                          00000

Tuesday 5 July 2011

फिरते नांव नोंदणी पथकाचा दौरा कार्यक्रम

महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.304    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.6 जुलै 2011
--------------------------------------------------------------------------------
फिरते नांव नोंदणी पथकाचा दौरा कार्यक्रम
वर्धा,दि.4- जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, वर्धा या कार्यालयाचे फिरते नांव नोंदणी पथक माहे जुलै 2011 मध्ये खालील नमुद ठिकाणी दिलेल्या तारखांना भेटी देऊन नांव नोंदणी करण्यात येणार आहे.
     इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या मुळ प्रती, जातीचे मुळ प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक असून, नोंदणी सकाळी 11 ते सायं. 5 वाजेपर्यंत हजर राहुन करुन घ्यावी.
     दि.7 जुलै 2011 रोजी पंचायत समिती कारंजा, दि. 10 जुलै 2011 रोजी पंचायत समिती आर्वी, दि. 12 जुलै 2011 रोजी पंचायत समिती सेलु, दि. 15 जुलै 2011 रोजी पंचायत समिती समुद्रपूर, दि. 16 जुलै 2011 रोजी पंचायत समिती हिंगणघाट, दि. 18 जुलै 2011 रोजी नगर परिषद पुलगांव,   दि. 19 जुलै 2011 रोजी पंचायत समिती देवळी.
00000
                    

           



Rainfall data for today 6 july 2011


अ.क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  वर्षी आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
147.57 मि.मी.
3.62 मि.मी.
3
शासनाचे मदत कार्य
निरंक
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान(सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा        - 134.40(0.9) मि.मी.
2)सेलू        -  177(3) मि.मी.
3)देवळी     -  155.42(10) मि.मी.
4)हिंगणघाट -  132.5(1.3) मि.मी.
5)समुद्रपूर   -  209.8(4) मि.मी.
6)आर्वी      -    107(2) मि.मी.
7)आष्टी     -     82.4 (3.2) मि.मी.
8)कारंजा    -   182(4.6) मि.मी.