Friday 8 June 2012

आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्‍यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी



                                   
पृथ्‍वीवर  ऋतुचे चक्र अव्‍याहत पणे सुरु असते.चार महिण्‍यानुसार एक ऋुतू ठरलेला असतो.त्‍यामध्‍ये उन्‍हाळा,पावसाळा व हिवाळा हे ऋुतू क्रमशाह येत असतात. परंतु पावसाळा म्‍हटल की अतिवृष्‍टी ,नदी व नाल्‍यांना येणा-या पुरामुळे होणारी जीवीत व वित्‍त हाणी तसेच विजेच्‍या अपघातामुळे होणारी हाणी ठरलेली असते. ती आकस्मिक असल्‍यामुळे प्रशासनाला नव्‍हेतर शासनाला मदतीचा हात द्यावा लागतो. यासाठी प्रशासन दक्ष असून या आपातकालीन परिस्थितीमध्‍ये प्रशासनाने अधिका-यांशी समन्‍वय ठेवून संपूर्ण तयारी केली आहे.
शोधन व बचाव पथकाचे गठण
        पावसाळयामध्‍ये नदी व नाल्‍यांना पूर येवून नदीकाठावरील गावे पाण्‍याखाली येतात ही परिस्थिती अतिवृष्‍टी व सततधार पावसामुळे उदभभवते  ही आपातकालीन परिस्थिती तातडीने हाताळण्‍यासाठी प्रत्‍येक गाव स्‍तरावर, तालुका पातळीवर बचाव व मदत कार्यासाठी शोध व बचाव पथक स्‍थापण्‍यात आलेले आहे.यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्‍यात येणार आहे. शहरी भागासाठी आपत्‍ती व्‍यवस्‍थापनेबाबत नगरपालिकांना आवश्‍यक सूचना दिल्‍या असून समाजकार्य महाविद्यालयाचे  निवडक 40 विद्यार्थ्‍यांचे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन स्‍वयंसेवक पथक निर्माण करण्‍यात येणार आहे. त्‍यांचे प्रशिक्षण सुध्‍दा लवकर होणार आहे.
                                              वेबसाईटवर  पूरपरिस्थितीची कार्यपध्‍दती
          जिल्‍हयाची पूरपरिस्थितीची कार्यपध्‍दती नव्‍याने तयार करण्‍यात आली असून ती जिल्‍हयाच्‍या वेबसाईटवर टाकण्‍यात आला आहे.तसेच प्रशासनाकडून जनजागृती करण्‍याचे कार्यक्रम व आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाचा सामना कशाप्रकारे करण्‍यात यावा याबाबत पुस्‍तके छापून वितरीत करण्‍यात आली आहे.
                                                  संदेश वहन यंत्रणा
          आपातकालीन परिस्थितीमध्‍ये संदेश वहन यंत्रणा  महत्‍वाची असून  ती सुर‍क्षित राहावी यासाठी प्रशासन योग्‍य ती काळजी घेत आहे.यासाठी जिल्‍हा स्‍तरावर  स्‍वतंत्र नियंत्रण कक्ष स्‍थापित करण्‍यात आले असून त्‍यासाठी  अधिकारी नियुक्‍त करण्‍यात आले आहे. जिल्‍हा आपात व्‍यवस्‍थापन अधिकारी म्‍हणून किशोर सोनटक्‍के यांचेकडे कार्यभार देण्‍यात आला आहे. संपर्कासाठी कार्यालयातील दूरध्‍वनी क्रमांक 243446 असा आहे. तसेच याच कक्षात निवासी उपजिल्‍हाधिकारी यांचा दूरध्‍वनी क्रमांक 240872 च्‍या क्रमांकावर संदेश देता येईल. मोबाईलवरुन एसएमएस करुनही परिस्थितीच्‍या बाबत विचारणा करण्‍यात येते. नियंत्रण कक्ष 1 जून पासून 24 तास कार्यान्वित झाला आहे.
                                                पर्जन्‍य मापक यंत्रे
         जिल्‍हयातील प्रत्‍येक मंडळस्‍तरावर पर्जन्‍य मापक यंत्र बसविण्‍यात आले असून ते सुस्थितीत राहण्‍यासाठी संबंधितांना सूचना देण्‍यात आल्‍या आहे. अतिवृष्‍टीची माहिती पर्जन्‍य मापक यंत्राव्‍दारे मिळणार असल्‍याने शेतक-यांना त्‍याचा मोठा फायदा होण्‍याची शक्‍यता आहे. पावसामुळे शेतीची होणारी  हाणी  तसेच पिक परीस्थितीची माहिती  या यंत्रणेव्‍दारे प्रशासनाला कळणार असल्‍याने याचा लाभ शेतक-यांना मिळणार आहे.                                                                                           

नदीकाठावरील गावे
            सेलू तालुक्‍यातील धाम  नदीच्‍या काठावर येळाकेळी, सुकळीबाई, घोराड,कोपरा, चांणकी, खडका, बोरी, सोई,  किन्‍ही, हिंगणी, सेलू, सिरसमुद्रपूर, बाभुळगांव, सुरगांव, वडगांव कला  ही गावे बसलेली
आहे.देवळी तालुक्‍यात वर्धा नदीच्‍या काठावर तांभा,अंदोरी, आंजी,नांदगांव,सावंगी (मे) हिवरा,खर्डा,शिरपूर होरे, गुंजखेडा,पुलगांव,बाभुळगांव (पु), कांदेगांव, कविटगांव बोपापूर वाणी ही गावे नदी काठावर येत असून यशोदा  नदीच्‍या काठावर बोपापूर, सोनेगांव व दिघी ही गावे बसलेली आहे. हिंगणघाट तालुक्‍यातील वना व वर्धा नदीच्‍या काठावर हिंगणघाट, कान्‍होली कात्री व पोटी ,पोथरा नाल्‍यावर पारडी, लहान व मोठा कोसुर्ला ही गावे वसलेली आहे. समुद्रपूर तालुक्‍यात वणा नदी काठावर वाघसूर,कोढाळी, कानकाठी, कोटी, सेवा, चाकूर, महागांव, उमरी व कुर्ला नांद व धाम नदी काठावर धानोली,सावंगी (दे) व नांदरा, बोर व कोथरा नदी काठावर डोंगरगांव, लालनाला प्रकल्‍पाचे प्रवाहाच्‍या काठावरील गावे कोरा व पवन, आष्‍टी तालुक्‍यातील वर्धा नदीवर बेलोरा, टेकाडा, वाघोली ,सिरगांव, बेलोरा (खु.), अंतोरा (जुना) काकडी नदीवरील गावे चिस्‍तुर ,तळेगांव मेलाई नदीच्‍यास काठावर अजीतपूर व कारंजा ,कारंजा तालुक्‍यातील कार नदीच्‍या काठावरील गावावर काकडा व परसोडी ही गावे पूरग्रस्‍त म्‍हणून ओळखली जातात. अतिवृष्‍टी असो की  सततधार पावसामुळे नदी व नाल्‍यांना आलेल्‍या पूरामुळे  या गावातील गावक-यांना मोठा फटका बसत असतो.
       याशिवाय पूरग्रस्‍त गावे म्‍हणून वर्धा तालुक्‍यात नदीकाठावरील 31 गावे, आर्वी तालुक्‍यात 22 गावे आहेत. सेलू तालुक्‍यात नदीकाठावर 39 गावे असून पुरांचा अतिधोका असणा-या गावांची संख्‍या 15 आहे. देवळी तालुक्‍यात नदीकाठावरील 25 गावे असून पुराचा अतिधोका असणा-या गावाची संख्‍या 16 आहे. हिंगणघाट तालुक्‍यात नदीकाठावरील गावांची संख्‍या 24 असून पुराचा अतिधोका असणा-या गावाची संख्‍या 7 आहेत. समुद्रपूर तालुक्‍यात नदीकाठावरील गावांची संख्‍या 35  असून पुराचा अतिधोका असणा-या गावाची संख्‍या 15 आहे. आष्‍टी तालुक्‍यात  नदीकाठावरील गावांची संख्‍या 14 असून पुराचा अतिधोका असणा-या गावाची संख्‍या 10 आहे. कारंजा  तालुक्‍यात  नदीकाठावरील गावांची संख्‍या 11 असून दोन गावे पुरग्रस्‍त  समजण्‍यात येतात.
            पूरग्रस्‍त गावांना वैद्यकीय सेवा व औषधाचा पुरवठा करण्‍यासोबत धान्‍याचा आवश्‍यक साठा सुध्‍दा करुण ठेवण्‍याच्‍या सूचना संबंधित यंत्रणेला जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी दिल्‍या. पूरग्रस्‍त परिस्थितीमध्‍ये तसेच आपत्‍ती व्‍यवस्‍थापनातील जिल्‍हास्‍तरावर नियंत्रण कक्षाची  सेवा 24 तास अविरतपणे सुरु राहील त्‍यामुळे पुरग्रस्‍त लोकांना आवश्‍यक ती मदत देवून मदत कार्य सुरळीत सुरु असल्‍याची खात्री पटविता येईल.
          आपत्‍ती व्‍यवस्‍थापनासाठी यंत्रणा कामाला लागलेली असून त्‍याचे सकारात्‍मक परिनाम लवकरच दिसून येतील यात शंका नाही.
                                                          

खरीप हंगामासाठी कर्जपूरवठा


कर्जमेळाव्‍याव्‍दारे
                         

·         हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्‍यात 12 जून पासून शुभारंभ
·         कर्ज मेळाव्‍यासोबत सातबारा व फेरफार  

वर्धा दि.8 – खरीप हंगामासाठी शेतक-यांना विविध बँकाकडून सुलभपणे कर्जपुरवठा मिळावा यासाठी मंडल स्‍तरावर कर्ज मेळावा आयोजित करण्‍यात आला आहे. हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्‍यात 12 जून पासून कर्जमेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती उपविभागीय महसूल अधिकारी उमेश काळे यांनी दिली.
         हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्‍यात दिनांक  12 ते 22 जून चक लरआचकह पर्यन्‍त प्रत्‍येकी आठ मेळावे राष्‍ट्रीयकृत बँकांच्‍या सहकार्याने आयोजित करण्‍यात येणार असून या मेळाव्‍यासोबत शेतक-यांना सातबारा, फेरफार तसेच महसूल विभागाशी संबंधित आवश्‍यक प्रमाणपत्रासाठी अर्ज स्विकारण्‍यात येणार  असल्‍याची माहिती श्री. उमेश काळे यांनी दिली.
         हिंगणघाट तालुक्‍यात शेतक-यासाठी आठ कर्ज मेळावे  आयोजित करण्‍यात येणार असून अल्‍लीपूर येथे 12 जून रोजी स्‍टेट बँक ऑफ इंडिया येथे, वडनेर 13 जून (ग्रामपंचायत) सावलीवारा व पोहणा 14 जून (ग्रामपंचायत) कलगांव 16 जून (बँक ऑफ इंडिया) हिंगणघाट 18 जून (तहसिल कार्यालय) शिरसगांव व वाघोली 22 जून बँक ऑफ बडोदा येथे आयोजित करण्‍यात आला आहे.
         समुद्रपूर तालुक्‍यात 11 जून पासून कर्ज मेळावे आयोजित करण्‍यात आले आहे.माजगांव व कांढळी 11 जून (ग्रामपंचायत व बँक ऑफ इंडिया ) समुद्रपूर व नंदोरी 13 जून (तहसिल कार्यालय)  गिरड 13 जून (बँक ऑफ इंडिया) कोरा (ग्रामपंचायत) 14 जून वायगाव गोड (बँक ऑफ इंडिया) जांब (ग्रामपंचायत) येथे कर्ज मेळावे होतील.
         कर्ज मेळाव्‍यामध्‍ये महसूल, सहकार जिल्‍हा व राष्‍ट्रीयकृत बँकांचे अधिकारी व कर्मचारी तसेच तलाठी, सरपंच व जिल्‍हा प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्‍याची माहिती उपविभागीय महसूल अधिकारी उमेश काळे यांनी दिली.
                                                             0000

उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्‍या - अजित कोर्डे


                           
                   जिल्‍ह्यातील गुणवंत विद्यार्थ्‍यांचा    गौरव
            वर्धा, दि.8 – विद्यार्थ्‍यांना  शैक्षणिक गुणवत्‍ता वाढविण्‍यासाठी तसेच उच्‍च शिक्षणासाठी समाजातील गरीब व होत करु विद्यार्थ्‍यांनी बँकांच्‍या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्‍यावा असे आवाहन बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्‍यवस्‍थापक अजित कोर्डे यांनी केले.
            बाराबी परिक्षेत 90 पेक्षा जास्‍त गुण मिळवून प्राविण्‍य मिळविलेल्‍या विद्यार्थ्‍यांचा गौरव जिल्‍ह्याची अग्रणी बँक बँक आफफ इंडिया तर्फे न्‍यू आटर्स कॉलेज येथे आयोजित करण्‍यात आला होता. त्‍याप्रसंगी मार्गदर्शन करतांना श्री. कोर्डे बोलत होते.
     अध्‍यक्षस्‍थानी माहिला विकास संस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ. राजेश भोयर होते.  तर प्रमुख पाहूणे म्‍हणून जिल्‍हा अधिक्षक कृ‍षी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्‍हा नियेाजन अधिकारी प्रकाश डायरे, बँकेचे वयवसाय विकास अधिकारी एस.एम. शास्‍त्री, मुख्‍य प्रबंधक नितीश नायक, जिल्‍हा प्रबंधक मोहन मशानकर  उपस्थित होते.
      बँकेचे केवळ कर्ज देणे व जमा राशी स्विकारणे एवढेच कार्य नसून सोबतच सामाजिक बांधिलकी समजून गुणवंत विद्यार्थ्‍याना त्‍यांची शैक्षणिक गुणवत्‍ता वाढविण्‍याकरीता तसेच त्‍यांच्‍या मदतीकरीता बँक सदैव तत्‍पर असल्‍याचे यावेळी अजित कोर्डे यांनी  सांगितले. शेतक-यांच्‍या मुलांना उचच शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी बँकेतर्फे पुढाकार घेण्‍याची ग्‍वाही त्‍यांनी यावेळी दिली.
     माणूस सर्व प्राण्‍यात श्रेष्‍ठ आहे . किती जगतो, किती संपत्‍ती मिळवितो  त्‍यापेक्षा ज्ञान  मिळवून किती लोकांचे कल्‍यान करतो , ही भावना विद्यार्थ्‍यांनी  घेऊन पुढील आयुष्‍य पूर्ण करावे असे विचार जिल्‍हा कृषि अधिक्षक ब-हाटे यांनी व्‍यक्‍त  केले.
            न्‍यू आर्ट कॉमर्स अॅनड सायन्‍स कॉलेज परिसरात वृक्षारोपन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्‍यात आली. गुणवंत विद्यार्थ्‍यांना फळ वृक्षरोपण, स्‍मृति चिन्‍ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्‍यात आला.
            अध्‍यक्षीय  भाषणात डॉ. राजेश भोयर यांनी विद्यार्थ्‍यानी  कठोर परिश्रम घेवून ज्ञान संपादन करावे तसेच ज्‍या क्षेत्रात नोकरीच्‍या संधी अधिक आहेत असे क्षेत्र निवडावे असे आवाहन विद्यार्थ्‍यांना केले.
               जिल्‍हा नियेाजन अधिकारी प्रकाश डायरे यांचेही यावेळी भाषण झाले.
              न्‍यू इंग्लिश ज्‍यू. कॉलेजचे 11, जानकीदेवी बजाज सायन्‍स कॉलेजचे 11, कमला नेहरु ज्‍यूनिअर कॉलेज ,  गांधीग्राम कनिष्‍ठ महा., न्‍यू आर्टस अॅण्‍ड कॉमर्स महा., आनंदराव मेघे कनिष्‍ठ महा. प्रतयेकी एक , जवाहर नवोदय विद्यालय 4, लायड विद्यालय 6 अशा एकूण 39 विद्यार्थ्‍यांचा गुण गौरव करण्‍यात आला.
      कार्यक्रमाचे संचलन मुरलीधर बेलखोडे यांनी केले तर बा.दे हांडे यांनी राष्‍ट्र वंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली. डॉ.डी.के.अग्रवाल ग्रामीण प्रशिक्षण केंद्राचे अधिकारी काळे, संजय इंगळे तिगावकर, ओंकार धावडे, बागदरकर, डॉ.बोबडे आदि मान्‍यव प्रमुख्‍याने उपस्थित होते.                                                                                                   00000

Thursday 7 June 2012

शेतक-यांना पीक कर्ज वाटपासाठी जिल्‍हयात 11 जून पासून कर्ज वाटप मेळावे - श्रीमती जयश्री भोज


                                                                                                     
    
·         85 हजार 855 शेतकरी खातेदार
·         खरीपासाठी 449 कोटी 13 लाखाचे नियोजन
·         सर्व राष्‍ट्रीयकृत बँकांना कर्ज वाटण्‍याच्‍या सूचना
·         मंडळ स्‍तरावर कर्ज मेळावे
·         शेतक-यांनी कर्ज मेळाव्‍याचा लाभ घ्‍यावा.

वर्धा,दि.7 शेतक-यांना खरीप हंगामासाठी आवशकतेनुसार लवकर कर्ज उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी मंडळ स्‍तरावर कर्ज मेळावे आयोजित करण्‍यात येणार आहे.जिल्‍हयातील सर्व शेतक-यांनी कर्ज मेळाव्‍यास उपस्थित राहावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी केले आहे.कर्ज मेळावे मंडळ स्‍तरावर 11 जून पासून आयोजित करण्‍यात येणार आहे.
         पीककर्ज वाटण्‍यासाठी राष्‍ट्रीयकृत व खाजगी बँकांना 488 कोटी 19 लाख रुपयाचा कृषीकर्ज पतपुरवठा निश्चित करण्‍यात आला आहे.कृषी पतधोरणाचा लाभ जिल्‍हयातील 93 हजार 30 शेतक-यांना मिळणार आहे. खरीप पीक हंगामासाठी 85 हजार 588 शेतकरी कृषी खाते धारकांसाठी 449 कोटी 13 लाख रुपये खरीप कर्जाचे उद्दीष्‍ट  निश्चित केले आहे.
         शेतक-यांना लवकर कर्ज उपलब्‍ध होण्‍यासाठी मंडळस्‍तरावर 11 जून पासून कर्ज मेळावे आयोजित करण्‍यात आले आहेत. कर्ज मेळाव्‍यामध्‍ये महसूल,बँक तसेच सहकारी संस्‍थाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित राहतील. यावेळी शेतक-याकडून  पिक कर्जाचे अर्ज भरुन घेण्‍यात येतील अशी माहितीही जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
         मंडळ स्‍तरावर आयोजित करण्‍यात येणा-या कर्ज मेळाव्‍याचा कार्यक्रम निश्चित करण्‍यात आला आहे. पुलगांव येथे दिनांक 11 जून रोजी ललिताबाई मोरारका हायस्‍कूल, दिनांक 12 जून रोजी अंदोरी येथील ग्रामपंचायत कार्यालय व देवळी येथील नगरभवन, दिनांक 13 जून रोजी गीरोली येथील ग्रामपंचायत येथे. 16 जून रोजी विजयगोपाल येथील यशवंत हायस्‍कूल, 17 जून रोजी भिडी येथील यशवंत हायस्‍कूल येथे कर्ज मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे.
                                              वर्धा तालुका
         वर्धा तालुक्‍यातील शेतक-यांना कर्ज वाटपासाठी मंडळ स्‍तरावर तहसिलदार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली दिनांक 12 जून पासून  कर्ज मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे.
         सेवाग्राम येथे 12 जून रोजी ग्रामपंचायत कार्यालय. वर्धा येथे 13 जून रोजी तहसिल कार्यालय व तळेगांव येथे ग्रामपंचायत कार्यालय. वायफड,वायगांव व आंजी येथे 14 जून रोजी ग्रामपंचायत कार्यालय तसेच सालोड येथे 15 जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात कर्ज मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे.
                                              खरीपसाठी 449 कोटी 13 लाख
         जिल्‍हा कृषी कर्ज पतधोरणानुसार अग्रीणी बँकेनी वाणिज्‍य जिल्‍हा व खाजगी बँकांना खरीपासाठी पीककर्जाचे  449 कोटी 13 लाख रुपयाचे कर्ज वाटपाचे धोरण निश्चित केले आहे. याचा लाभ 85 हजार 588 खातेदार शेतक-यांना मिळणार आहे.
         खरीप पिककर्ज वाटपासाठी वाणिज्‍य बँकांना 391 कोटी 26 लाख रुपयाचे उद्दीष्‍ट देण्‍यात आले आहे. तसेच खाजगी बँकांना 6 कोटी 27 लाख जिल्‍हा बँकांना 47 कोटी रुपयाचे कर्ज वाटपाचे उद्दीष्‍ट आहे. वैनगंगा कृष्‍णा ग्रामीण बँकेने 14 कोटी 64 लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्‍ट देण्‍यात आल्‍याचे माहिती अग्रणी बँकेचे जिल्‍हा व्‍यवस्‍थापक एम.बी. मशानकर यांनी दिली.                                                                                           
         खरीप पीककर्ज वाटपासाठी सर्वाधिक स्‍टेट बँक ऑफ इंडियाला 21 हजार 243 खातेदार शेतक-यांना  121 कोटी 29 लाख, बँक ऑफ इंडियाला 16 हजार 983 खातेदारांना 110 कोटी 83 लाख, बँक ऑफ महाराष्‍ट्रला 7 हजार 774 खातेदारांना 50 कोटी 19 लाख, बँक ऑफ बरोडा 2 हजार 576 खातेदारांना 20 कोटी 91 लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडियाला 4 हजार 885 खातेदारांना 23 कोटी ,पंजाब नॅशनल बँकेला 20 कोटी 91 लाख, युनियन बँक 3 कोटी 14 लाख, सिंडीकेट बँक 2 कोटी 9 लाख, आंध्र बँक 1 कोटी 57 लाख रुपयाचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्‍ट देण्‍यात आले आहे. 
         मंडळ स्‍तरावर आयोजित कर्ज मेळाव्‍यास शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून खरीप हंगामास आवश्‍यकतेनुसार कर्जासाठी विहीत अर्ज मेळाव्‍यात सादर करावे असे आवाहनही जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी केले आहे.
                                                             0000
                                    

अध्‍यापक शिक्षण पदविका 12 जून पर्यन्‍त प्रवेश अर्ज करा


          वर्धा दि.7- अध्‍यापक शिक्षण पदविका (डिएड) प्रथम वर्षाच्‍या शासकीय कोटयातील विक्री व स्विकृती प्रवेश अर्ज 12 जून पर्यन्‍त आहे.
            प्रवेशासाठी जिल्‍हा शिक्षण व प्रशिक्षण संस्‍था जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयामागे, वर्धा दूरध्‍वनी क्र. 07152-240591 येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यन्‍त स्विकारल्‍या जातील.
इयत्‍ता 12 वी मध्‍ये किमान 50 टक्‍के गुणासह उत्‍तीर्ण असलेले खुल्‍या प्रवर्गातील उमेदवार तसेच किमान 45 टक्‍के गुणासह उत्‍तीर्ण असलेला मागासवर्गीय उमेदवार प्रवेशासाठी पात्र असतील किमान कौशल्‍यावर आधारीत अभ्‍यासक्रमातील कृषी गटातील हार्टीकल्‍चर व क्रॉप सायन्‍स तसेच आरोग्‍य व वैद्यकीय सेवा गटातील क्रेंच अॅण्‍ड प्रिस्‍कुल हे विषय घेवून 12 वी उत्‍तीर्ण विद्यार्थ्‍यी प्रवेशास पात्र असणार आहे. तसेच महाराष्‍ट्राचा आदिवासी असलेला सी.बी.एस.सी. किंवा आय.सी.एस.ई. किंवा नॅशनल ओपन स्‍कुल बोर्ड ची परीक्षा उत्‍तीर्ण विद्यार्थ्‍यी महाराष्‍ट्र राज्‍याचा अधिवासी असल्‍याचे त्‍या जिल्‍हयाच्‍या जिल्‍हाधिकारी यांचे प्रमाणपत्र असणे आवश्‍यक असेल. आवेदन पत्राची माहिती पुस्तिकेसह किंमत खुल्‍या प्रवर्गातील उमेदवारासाठी रु.200 असून,मागासवर्गीय उमेदवारासाठी रु. 100 आहे. मागासवर्गीय उमेदवारांनी आवेदनपत्र विकत घेतांना जात प्रमाणपत्राची प्रत दाखविणे आवश्‍यक राहील असे जिल्‍हा शिक्षण व प्रशिक्षण संस्‍थेचे प्राचार्य यांनी कळविले आहे.
                                                        0000 

अपंगासाठी मोफत संगणकीय प्रशिक्षण


       वर्धा दि.7- अपंग कल्‍याण आयुक्‍तालय व सांगली जिल्‍हा परिषद तर्फे पौढ अपंगासाठी संगणकीय व व्‍यावसायीक मोफत प्रशिक्षण देण्‍यात येते. या संस्‍थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्‍ट्र राज्‍य व्‍यवसाय शिक्षण परिक्षा मंडळ,मुंबईची शासन मान्‍यता आहे. तसेच एम.एस.सी.आय.टी. या संगणक प्रशिक्षणासाठी हे अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्‍हणून शासन मान्‍यता आहे.
            सन 2012-13 या चालू शैक्षणिक वर्षासाठी सर्टिफिकेट इन कॉम्‍युटर ऑपरेशन वुईथ एम.एस. ऑफीस (संगणक कोर्स) (किमान इ. 8 वी पास) 25 जागा, सबमर्सिबल सिंगल फेज थ्री फेज मोटर अॅण्‍ड अर्मिचर रिवायडींग (किमान इ. 9 वी पास) 25 जागा,एम.एस.सी.आय.टी. वरील सर्व 50 विद्यार्थ्‍यासाठी प्रवेश देण्‍यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष फक्‍त अपंग मुलांना प्रवेश दिला जाणार आहे.
            प्रशिक्षण कालावधीत राहण्‍याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्यावत व परीपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्‍टीकल्‍स व व्‍यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण नेटवर्कींग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ञ निदेशक, उज्‍वल यशाची परंपरा, समाज कल्‍याण विभागाकडून स्‍वयंरोजगारासाठी,व्‍यवसायासाठी बीज भांडवल योजना आदी सुविधा आहे.
          प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधिक्षक,शासकीय पौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्‍हेत्रे मळा, गोदड मळयाजवळ, मिरज ता.मिरज,जि.सांगली पिनकोड क्र. 416410  फोन क्र.0233-2222908 मोबाईल क्र. 9881609940,9922577561 या पत्‍यावर पोस्‍टाव्‍दारे किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही.प्रवेश अर्ज पूर्णपणे भरुन फोटोसह संस्‍थेकडे पाठवावेत. किंवा समक्ष भरुन द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्‍याचा दाखला, अपंगत्‍व असल्‍याबाबतचे सक्षम  अधिका-याचे प्रमाणपत्र व उत्‍पन्‍नाचा दाखला यांच्‍या झोरॉक्‍स प्रती जोडाव्‍यात.प्रवेश अर्ज संस्‍थेकडे 25 जुलै,2012 पुर्वी पो‍हचतील अशा बेताने पाठवावेत.प्रवेश अर्ज प्राप्‍त झाल्‍यानंतर तज्ञ समिती व्‍दारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्‍यात येईल.
                                                   00000

Wednesday 6 June 2012

49 गावांमध्‍ये 60 नविन विंधन विहीरी - श्रीमती जयश्री भोज


 
पाणी टंचाई       टंचाई कृती आराखड्यातील कामांना गती
  • विंधन विहीरीसाठी 41 लाख 67 हजार रुपये मंजूर
  • कारंजा व देवळी तालूक्‍यातील पाच गावात दोन टँकर
  • 51 खाजगी विहीरींचे अधिग्रहण
वर्धा,दि.6-ग्रामीण पाणी टंचाई आराखड्यातील प्रस्‍तावित उपाययोजना तातडीने पूर्ण करण्‍यात येणार असून 49 गावामध्‍ये 60 नविन विंधन विहीरीसाठी 41 लाख 67 हजार रुपये मंजूर करण्‍यात आले असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी आज दिली.
  
वर्धा जिल्‍हा पाणी टंचाई निवारणार्थ 3 कोटी 13 लाख 44 हजार रुपये खर्चाचा कृती आराखडा तयार करण्‍यात आला असून पाणी टंचाई झालेल्‍या गावामध्‍ये 303 उपाययोजना पूर्ण करण्‍यात येणार आहेत.
            पाणी टंचाई निवारणार्थ 60 नवीन विंधन विहीरी मंजूर करण्‍यात आल्‍या असून, 42 विंधन विहीरीचे कामे सुरु आहेत. पूर्ण झालेल्‍या  विंधन विहीरीवर तात्‍काळ  यावर हातपंप बसवून पिण्‍याचे पाणी उपलबध करुन देण्‍यात येत असल्‍याची माहितीही जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी आज दिली. मंजूर करण्‍यात आलेलया नविन विंधन विहीरीमध्‍ये वर्धा तालुकयातील आठ, सेलू चार, देवळी अकरा, आर्वी पंधरा, कारंजा पाच , हिंघनघाट चार आणि समुद्रपूर तालुक्‍यातील तेरा विंधन विहीरीचा समावेश आहे.
                          पाच गावात दोन टँकर
            पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई असलेल्‍या कारंजा व देवळी तालुक्‍यातील पाच गावात दोन टँकर व्‍दारे पिण्‍याचे पाणी पुरविण्‍यात येत आहे. टँकरव्‍दारे पाणीपुरवठा करण्‍यात येणा-या गावांमध्‍ये कारंजा तालुक्‍यातील बोटाना, मोरगाव ढोले, देवळी तालुक्‍यातील लक्ष्‍मीनारायणपूर, चिटकी व शेकापूर झोपडी या गावाचा समावेश आहे.
             पाणी टंचाई निवारणासाठी जिल्‍ह्यात 51 खाजगी विहीरीचे अधिग्रहण करण्‍यात आले असून, 95 पाणी पुरवठा नळ योजनांची विशेष  दुरुस्‍ती करण्‍यात येत असल्‍याची माहितीही जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
                        4 हजार 270 विंधन विहीरी
             जिल्‍ह्यात 49 हजार 270 विंधन विहीरी असून याव्‍दारे ग्रामीण भागात पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या पुरवठा करण्‍यात  येत  असून, विंधन विहीरीवर हातपंप, दुहेरी पंप तसेच विद्युत पंप बसविण्‍यात आले आहेत. 431 हातपंप आठमाही तर 3 हजार 441 बारमाही हातपंपाव्‍दारे पाणी उपलबध करुन देण्‍यात येत आहेत.विंधन विहीरीवर हातपंपासोबत 30 दूहेरी पंप बसविण्‍यताआले असून 132 विद्युत पंप सुरु आहेत.
            पाणी टंचाई निवारणासाठी कालबध्‍द कार्यक्रम तयार करण्‍यात  आला असून, प्रत्‍येक गावात पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा करण्‍याच्‍या सूचना  दिल्‍या असल्‍याची माहितीही जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.

राज्‍य शासकीय निवृत्‍ती धारकांना सुचना


      वर्धा कोषागार कार्यालयातून निवृत्‍तीवेतन, कुटूंब निवृत्‍तीवेतन घेणा-या राज्‍य शासकीय निवृत्‍ती वेतनधारकांना वेतनाबाबत काही अडचणी असल्‍यास त्‍या अडचणीचे निराकरण करण्‍यासाठी दिनांक 12 जून,2012 रोजी सकाळी 8.00 ते 12.00 वाजेपर्यन्‍त कोषगार कार्यालय,वर्धा येथे मेळावा आयोजित केलेला आहे.तरी संबंधितांनी कोषागार कार्यालय,वर्धा येथे हजर राहून अडचणीचे निराकरण करुन घ्‍यावे असें कोषागार अधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.
                                                 00000

अनुदानावर शेतक-यांना कृषी साहीत्‍य उपलब्‍ध


        वर्धा, दि. 6- केंद्र पुरस्‍कृत गळीतधान्‍य विकास कार्यक्रमा अंतर्गत पुढीलप्रमाणे कृषी साहित्‍य पंचायत समिती स्‍तरावर शासनाने अनुदानावर उपलब्‍ध करुन दिले आहे.
            कृषी साहित्‍यामध्‍ये एचडीपीई पाईप प्रतिनग रु. 448 असून यामध्‍ये अनुदान 112.50 आहे.,हायटेक स्‍प्रेपंप प्रतिनग रु. 1266 असून यामध्‍ये अनुदान 663 आहे.,पावर स्‍प्रेपंप प्रतिनग रु.4219 असून यामध्‍ये अनुदान रु.2000 आहे.,वखर प्रतिनग रु. 2950 असून यामध्‍ये अनुदान रु. 1475 आहे., डवरा प्रतिनग रु. 1225 असून  यामध्‍ये अनुदान रु. 612.50 आहे., जिप्‍सम प्रतिनग रु. 2850 मेटन असून यामध्‍ये अनुदान रु. 1875 मे.टन आहे. अनुदान वगळून शिल्‍लक रक्‍कम  शेतक-यांना भरावी लागेल.            
तसेच 50 टक्‍के अनुदानावर ब्रशकटर व बहु पिक मळणी यंत्र अनुदानावर लवकरच उपलब्‍ध होत असल्‍याने  त्‍याचे प्रस्‍ताव पंचायत समिती स्‍तरावर  घेणे सुरु आहे.
आर्वी,आष्‍टी व कारंजा या पंचायत समिती स्‍तरावर  फलोत्‍पादन पिक संरक्षण योजने अंतर्गत संत्रावरील फायटोप्‍थोरा  नियंत्रणासाठी मेटॅलॅक्झील औषधी  यांची एकूण प्रती 500 ग्रामची किंमत रु. 424 असून अनुदान रु. 212 व वसुल पात्र रथ्क्‍कम रु. 212 उपलब्‍ध आहे. तसेच लवकरच या  योजनेत डायमेथोऐट मानोकोटोफॉस व फोसेटील संत्रावरील कोळशी व फायटरेप्‍थोरा नियंत्राणासाठी उपलब्‍ध होत असल्‍याने त्‍याचे अर्ज पंचायत समिती स्‍तरावर घेणे सुरु आहे.
            केंद्र पुरस्‍कृत कृषी अभियांत्रिकीकरण योजने अंतर्गत टॅक्‍टर 40 एच पी पर्यन्‍त रु. 45000/- अनुदान,पावर टिलर 8 एच पी पेक्षा जास्‍त अश्‍वशक्‍तीचे रु.45000/- अनुदान तसेच ट्रॅक्‍टरचलीत औजारामध्‍ये रोटाव्‍हेटर, सीड कम फर्टीलायझार ड्रील,रिपर ,नांगर व इतर ट्रॅक्‍टरचलीत औजारे  किंमतीच्‍या 40 टक्‍के किंवा रु. 10000/- अनुदानापर्यन्‍त व 25 टक्‍के अनुदानावर पिक संरक्षण औजारे यासाठी पंचायत समिती स्‍तरावर प्रस्‍ताव घेणे सुरु आहे.
            यासाठी पंचायत समितीत कृषी अधिकारी,विस्‍तार अधिकारी (कृषी) यांचेशी संपर्क साधावा असे जिल्‍हयाचे कृषी विकास अधिकारी आर.के. गायकवाड यांनी आवाहन केले आहे.

क्षयरुगणाची माहिती देणे खाजगी वैद्यकीय व्‍यावसायीकांना बंधनकारक


                          
          वर्धा, दि. 6- क्षयरोग हा मायकोबॅक्‍टेरीया टयुबरक्‍यूलोसीस या जिवाणूमुळे होतो. निरोगी व्‍यक्‍ती थुंकी दुषीत क्षयरुग्‍णाच्‍या संपर्कात आल्‍यास त्‍याला क्षयरोग होण्‍याची शक्‍यता असते.निरोगी व्‍यक्‍तीच्‍या शरीरात क्षरोगाच्‍या जंतूचा शिरकाव झाल्‍यानंतर ज्‍या व्‍यक्‍तीची रोगप्रतिकार शक्‍ती चांगली आहे त्‍या व्‍यक्‍तीला ती उशीरा दिसून येतात.क्ष्‍यरुग्‍णाची लक्षणे दिसून आल्‍यानंतर त्‍या रुग्‍णाची माहिती सार्वजनिक आरोग्‍य यंत्रणेला देणे विषयी वैक्ष्‍कीय व्‍यवसायीकांना बंधनकारक आहे.
            15 दिवसाच्‍या वरील कालावधीचा खोकला,भूक मंदावणे,वजन कमी होणे, हलकासा परंतु सायंकाळी येणारा ताप, बेडक्‍यातून रक्‍त पडणे,छातीत दुखणे, चालतांना श्‍वास भरुन येणे,धाप लागणे, वयोवृध्‍द व्‍यक्‍ती, कुपोषीत व्‍यक्‍ती, बालके,धुम्रपान करणा-या व्‍यक्‍ती मधुमेही व्‍यक्‍ती एच आय व्‍ही बाधित व्‍यक्‍ती फुफ्फुसाचे इतर विकार असलेली व्‍यक्‍ती.उदा. सिलिकोसीस,दमा,अस्‍थमा इत्‍यादी लक्षणे असल्‍यास अशा व्‍यक्‍तीनें थुंकी नमुना तपासून घेणे आवश्‍यक आहे.
            अशा लक्षणाच्‍या मध्‍यवर्गीय अथवा साधारण परिस्थिती असध्णा-या व्‍यक्‍ती हया सरकारी दवाखाण्‍यात येवून तपासणी करुन घेतात.परंतु सधन कुटूंबातील व्‍यक्‍ती इतरांना आपला रोग माहित होवू नये म्‍हणून खाजगी डॉक्‍टराकडे जावून उपचार घेतात.त्‍यामुळे अशा व्‍यक्‍तीची माहिती सरकारी यंत्रणेला कळत नाही.म्‍हणून केंद्र शासनाचे आदेशान्‍वये जिल्‍हयातील सर्व खाजगी वैद्यकीय व्‍यावसायीकांनी  त्‍यांच्‍याकडे निदान व उपचारावर असणा-या क्षयरुग्‍णाची माहिती जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, जिल्‍हा परिषद वर्धा व जिल्‍हा क्षयरोग अधिकारी, जिल्‍हा क्षयरोग केंद्र, सामान्‍य रुग्‍णालय परिसर वर्धा यांना विहीत नमुन्‍यात दर महिन्‍याला कळवावी.तसेच जुने क्षयरोगी बरे झाल्‍याची माहिती देण्‍यात यावी.
            खाजगी डॉक्‍टरांचा उपचार घेणे कांही रुग्‍णांना परवडणारा नसल्‍यामुळे काही रुग्‍ण सरकारी दवाखान्‍याकडे वळतात व कांही रुग्‍ण आपली बदनामी होईल या भितीने सरकारी दवाखाण्‍यात न येता खाजगी डॉक्‍टरांचा अर्धवट उपचार घेवून मधात पैशाच्‍या अभावामुळे सोडून देतात.अशा अर्धवट उपचाराचे रुग्‍ण Multi Drug Resistance (MDR) होतात व त्‍यांना दोन वर्ष कालावधीच्‍या उपचाराला सामोरे जावे लागते. अर्धवट उपचारामुळे,अज्ञानामुळे समाजात असे बरेचशे (एमडीआर) रुग्‍ण वाढलेले आहे.क्षयरुग्‍णाच्‍या मृत्‍यूच्‍या प्रमाणात वाढ झाालेली आहे. त्‍यावर आळा बरावा, रुग्‍ण बरे दहोण्‍याच्‍या प्रमाणात वाढ व्‍हावी.हा यामागचा शासनाचा उद्देश असल्‍यामुळे खजगी वैद्यकीय व्‍यावसायीकांनी शासनाच्‍या उपक्रमाला सहकार्य द्यावे व आपल्‍याकडील क्षयरुग्‍नाची माहिती दर महिण्‍याला  जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी व जिल्‍हा क्षयरोग अधिकारी यांना न चुकता कभ्ळवावी असे आवाहन  जिल्‍हा क्षयरोग अधिकारी,जिल्‍हा क्षयरोग केंद्र,वर्धा यांनी केले आहे.
                                                                0000          

शेतकरी अजय अवचट यांच्‍या शेतीला प्रधान सचिव मालीनी शंकर यांची भेट


          वर्धा, दि. 6-सेलू तालुक्‍यातील वाहिदपूर येथे अजय अवचट  यांची फुलांची शेती असून कृषी विभागांच्‍या अनेक  योजना सुध्‍दा राबविल्‍या जाताता.पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभागाच्‍या प्रधान सचिव तथा पालक सचिव मालीनी शंकर यांनी शेतकरी अजय अवचट यांच्‍या फुलशेजीला भेट देवून इतर कृषी विभागाच्‍या विकासात्‍मक योजनेची पाहणी केली. त्‍यांच्‍या समवेत जिल्‍हाधिकारी जयश्री भोज, जिल्‍हा कृषी अधिक्षक, भाऊसाहेब ब-हाटे, जिल्‍हा कृषी अधिकारी, उस.जी.डाबरे आदि मान्‍यवर उपस्थित होते.
            यावेळी राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियाना अंतर्गत पॉलीहाऊसची पाहणी केली.पॉली हाऊसमधील अद्यावत तंत्रज्ञान,लागवड खर्च,फुलांची विक्री,फर्टीगेशन,पिक संरक्षण, गटशेजी इ. विषयी माहिती जाणून घेतली.सोबतच  शेडनेट हाऊस मधील भाजीपाला उत्‍पादन व विक्री व्‍यवस्‍था,मालाचे साठवणुकीसाठी व प्रतवारीसाठी उभारण्‍यात आलेल्‍या पॅक हॉउसची उभारणी केली.वर्धा उपविभागामधील 30 सेडनेट हाऊस व 5 पॉली हाऊस आणि 3 पॅक हाऊसची उभारणी झााली असून शेतकरी उच्‍च तंत्रज्ञानावर आधारीत शेती करुन सिमला मिरची,काकडी,टमाटर, कारले इ. भाजीपाला पिका मधून 1.50 ते 2.00 लाख निव्‍वळ नफा एका हंगामामध्‍ये कमावत असल्‍याचे भेटीत शेतक-यांनी सांगितले.
            सेलू तालुक्‍यात राबविण्‍यात येत असलेल्‍या विदर्भ प्रवासी सिंचन कार्यक्रमातंर्गत मोहनापूर शिवारात रुंद वरंबा व सरी पध्‍दतीने उभारणीची लागवड करण्‍याचे तंत्रज्ञान तसेच प्रकल्‍पात इतर बाबी जसे ठिंबक संच,तुषार संच,शेततळे, ढाळीचे बांध, सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण इ.बाबी 1000 हे क्षेत्राचे समुह स्‍वरुपात (क्‍लस्‍टर) राबविण्‍यात येणार असून कपाशीची हेक्‍टरी उत्‍पादनात वाढ करणे व कपाशीला शास्‍वत सिंचनाची व्‍यवस्‍था निर्माण करुन देणे, जेणे करुन शेतक-याचे उत्‍पादन व निव्‍वळ नफ्यात वाढ घडवून येईल.सदर प्रकल्‍पाची पाहणी केल्‍या नंतर त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले.सदर प्रकल्‍प भेटीचे वेळी मंडल कृषी अधिकारी सेलू झाडे,कृषी सहाय्यक गायकवाड इ. उपस्थित होते.
                                                      00000      


Tuesday 5 June 2012

शेतकरी अजय अवचट यांच्‍या शेतीला प्रधान सचिव मालीनी शंकर यांची भेट


                     
वर्धा, दि. 5-सेलू तालुक्‍यातील वाहिदपूर येथे अजय अवचट  यांची फुलांची शेती असून कृषी विभागांच्‍या अनेक  योजना सुध्‍दा राबविल्‍या जाताता.पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभागाच्‍या प्रधान सचिव तथा पालक सचिव मालीनी शंकर यांनी शेतकरी अजय अवचट यांच्‍या फुलशेजीला भेट देवून इतर कृषी विभागाच्‍या विकासात्‍मक योजनेची पाहणी केली. त्‍यांच्‍या समवेत जिल्‍हाधिकारी जयश्री भोज, जिल्‍हा कृषी अधिक्षक, भाऊसाहेब ब-हाटे, जिल्‍हा कृषी अधिकारी, उस.जी.डाबरे आदि मान्‍यवर उपस्थित होते.
            यावेळी राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियाना अंतर्गत पॉलीहाऊसची पाहणी केली.पॉली हाऊसमधील अद्यावत तंत्रज्ञान,लागवड खर्च,फुलांची विक्री,फर्टीगेशन,पिक संरक्षण, गटशेजी इ. विषयी माहिती जाणून घेतली.सोबतच  शेडनेट हाऊस मधील भाजीपाला उत्‍पादन व विक्री व्‍यवस्‍था,मालाचे साठवणुकीसाठी व प्रतवारीसाठी उभारण्‍यात आलेल्‍या पॅक हॉउसची उभारणी केली.वर्धा उपविभागामधील 30 सेडनेट हाऊस व 5 पॉली हाऊस आणि 3 पॅक हाऊसची उभारणी झााली असून शेतकरी उच्‍च तंत्रज्ञानावर आधारीत शेती करुन सिमला मिरची,काकडी,टमाटर, कारले इ. भाजीपाला पिका मधून 1.50 ते 2.00 लाख निव्‍वळ नफा एका हंगामामध्‍ये कमावत असल्‍याचे भेटीत शेतक-यांनी सांगितले.
            सेलू तालुक्‍यात राबविण्‍यात येत असलेल्‍या विदर्भ प्रवासी सिंचन कार्यक्रमातंर्गत मोहनापूर शिवारात रुंद वरंबा व सरी पध्‍दतीने उभारणीची लागवड करण्‍याचे तंत्रज्ञान तसेच प्रकल्‍पात इतर बाबी जसे ठिंबक संच,तुषार संच,शेततळे, ढाळीचे बांध, सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण इ.बाबी 1000 हे क्षेत्राचे समुह स्‍वरुपात (क्‍लस्‍टर) राबविण्‍यात येणार असून कपाशीची हेक्‍टरी उत्‍पादनात वाढ करणे व कपाशीला शास्‍वत सिंचनाची व्‍यवस्‍था निर्माण करुन देणे, जेणे करुन शेतक-याचे उत्‍पादन व निव्‍वळ नफ्यात वाढ घडवून येईल.सदर प्रकल्‍पाची पाहणी केल्‍या नंतर त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले.सदर प्रकल्‍प भेटीचे वेळी मंडल कृषी अधिकारी सेलू झाडे,कृषी सहाय्यक गायकवाड इ. उपस्थित होते.
                                                      00000      

शासकीय तंत्र माध्‍यमिक शाळेचा निकाल 87 टक्‍के



वर्धा, दि. 5-  स्‍थानिक शासकीय तंत्र माध्‍यमिक शाळा केंद्र, वर्धा येथील एच.एस.सी. व्‍हीकेशनल (एम.सी.व्‍ही..सी) शाखेचा निकाल 87.50 टक्‍के लागला असून 56 विद्यार्थी परिक्षेलाबसले असून त्‍यापैकी 49 विद्यार्थी पास झाले आहे.
त्‍यापैकी संस्‍थेतून एम.आर.ई.डी.ए. चा सुदर्शन भास्‍कर पाटील हयाने 74.66 टक्‍के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकविला आहे.तसेच कु.पुजा प्रकाशराव कदम हिने 71.83 टक्‍के गुण मिळवून व्दितीय क्रमांक मिळविला व मेक्‍यानिकल टेक्‍नॉलॉजी या व्‍यवसायातील सागर विलासराव पट्टेवार हयाने 71 टक्‍के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकविला आहे.
            यशस्‍वी विद्यार्थ्‍यासाठी संस्‍थेचे मुख्‍याध्‍यापक तथा जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.डी. भोयर, शिक्षक टेकाराम भोयर,प्रशांत भोयर, सौ. पाललिक ठाकरे,निदेशक विजय भगत,विजय जगताप,पद्मा चवडे हयांनी अथक परिश्रम घेतले असे मुख्‍याध्‍यापक, शासकीय माध्‍यमिक शाळा केंद्र,वर्धा यांनी कळविले आहे.
                                                       0000

पर्यावरण विषयक सुनावणी 20 जून रोजी


                    

वर्धा,दि.5- मे.लॅनको विदर्भ थर्मल पॉवर  लिमीटेड मौजा मांडवा, पुलई, बेलगांव ता.जि. वर्धा या प्रस्‍तावित प्रकल्‍पाची पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणी दिनांक 20 जून,2012 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्‍हा क्रीडा संकुल पटांगण, वर्धा येथे ठेवण्‍यात आली आहे. तरी संबंधितांनी उपस्थित रहावे असे तहसिलदार,वर्धा यांनी कळविले आहे.
                                                           0000