Saturday 17 December 2011

सार्वजनिक सुट्टया–2012


        वर्धा,दि.17-महाराष्‍ट्र राज्‍यात सन 2012 सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्टया म्‍हणून जाहीर केले आहेत.
      प्रजासत्‍ताक दिन गुरुवार दि.26 जानेवारी 2012, महाशिवरात्री सोमवार दि. 20 फेब्रुवारी 2012, होळी (दुसरा दिवस) गुरुवार दि. 8 मार्च 2012, गुढीपाडवा शुक्रवार दि. 23 मार्च 2012, महावीर जयंती गुरुवार दि. 5 एप्रिल 2012, गुड फ्रायडे शुक्रवार दि.6 एप्रिल2012, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती शनिवार दि. 14 एप्रिल 2012, महाराष्‍ट्र दिन मंगळवार दि. 1 मे 2012, स्‍वातंत्र्य दिन बुधवार दि. 15 ऑगस्‍ट 2012, पारसी नववर्ष दिन (शहेनशाही) शनिवार दि.18 ऑगस्‍ट 2012, रमझान ईद (ईद-उल-फितर)(शव्‍वल-1) सोमवार दि. 20 ऑगस्‍ट 2012, गणेश चतुर्थी बुधवार दि. 19 सप्‍टेंबर 2012, महात्‍मा गांधी जयंती मंगळवार दि. 2 ऑक्‍टोंबर 2012, दसरा बुधवार दि. 24 ऑक्‍टोंबर 2012, बकरी ईद (इद-उल-झुआ)
शुक्रवार दि. 26 ऑक्‍टोंबर 2012, दिवाळी अमावस्‍या (लक्ष्‍मीपूजन) मंगळवार दि. 13 नोव्‍हेंबर 2012, दिवाळी (बलिप्रतिपदा) बुधवार दि.14 नोव्‍हेंबर 2012,गुरुनानक जयंती बुधवार दि.28 नोव्‍हेंबर 2012, ख्रिसमस मंगळवार दि. 25 डिसेंबर 2012.
बँकाना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्‍यासाठी सोमवार दि. 2 एप्रिल 2012, बँकाना आपले अर्ध-वार्षिक लेखे पूर्ण करता येण्‍यासाठी शनिवार दि. 29 सप्‍टेंबर 2012.ह्या दोन सुट्टया केवळ बँकांपुरत्‍याच मर्यादित राहतील. त्‍या  शासकीय कार्यालयांना लागू होणार नाहीत.  
 पुढील सण रविवारी येतात ईद-ए-मिलाद रविवार दि. 5 फेब्रुवारी 2012, छत्रपती शिवाजी महाराज जयंती रविवार दि. 19 फेब्रुवारी 2012, रामनवमी रविवार दि. 1 एप्रिल 2012, बुध्‍द पोर्णिमा रविवार दि. 6 मे 2012, मोहरम रविवार दि. 25 नोव्‍हेंबर 2012,  असे शासनाचे उप सचिव सि.म.इनामदार  यांनी शासनातर्फे जारी राजपत्राव्‍दारे कळविले आहे.

12 उत्‍तीर्ण युवक युवतींना टपाल एजन्‍सीची संधी


    वर्धा,दि.17- टपाल खात्‍यातर्फे सुशिक्षित युवकांना टपाल अभिकर्ता होण्‍यासाठी आमंत्रित करण्‍यात येत आहे.
     सदर एजन्‍सी 18 वर्षे पूर्ण झालेल्‍या  व 12 वी इयत्‍ता उत्‍तीर्ण असणा-या व्‍यक्‍तीला घेता येईल. या अंतर्गत सदर एजन्‍सीसाठी चांगली जागा असणे आवश्‍यक राहील. या ठिकाणी टपाल तिकिटे विकणे त्‍यासेाबतच रजिस्‍टर्ड पत्रांची नोंदणी तसेच मनी आूर्डर नोंदणी करणे आदींना येथे मंजूरी देण्‍यात येईल. यासाठी मंजूर दराने कमिशन दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी टपाल खात्‍याच्‍या मुख्‍य कार्यालयातील अधिक्षकांशी संपर्क साधावा. असे आवाहन टपाल अधीक्षक यु.एम.शहादे यांनी एका प्रसिध्‍दीपत्राव्‍दारे केले आहे.

डाक–अदालत


     वर्धा,दि.17- भारतीय डाक विभाग, वर्धा व्‍दारा दिनांक 30 डिसेंबर 2011 रोजी अधिक्षक डाकघर वर्धा
यांचे कार्यालयामध्‍ये सकाळी 11 वाजता डाक अदालत आयोजित करण्‍यात आली आहे. पोस्‍टाच्‍या कामासंबंधीच्‍या ज्‍या तक्रारीचे सहा आठवड्याचे आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्‍तर मिळाले नसेल अशा तक्रारीची डाक अदालत मध्‍ये दखल घेतल्‍या जाईल.
विशेषतः टपाल, स्‍पीड पोस्‍ट, काउंटर सेवा, डाक वसतू , पार्सल, बचत बँक व मनी आूर्डर संबंधीच्‍या तक्रारी विचारात घेतल्‍या जातील.
तक्रारीचा उल्‍लेख सर्व तपशील सह केलेला असावा. संबंधीतांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार अधीक्षक डाकघर,वर्धा  यांचे नावे दि. 23 डिसेंबर 2011 पर्यंत पोहोचेल अशा बेताने पाठवावी. त्‍यानंतर आलेल्‍या तक्रारीचा विचार केला जाणार नाही. तक्रार कर्त्‍यांना डाक अदालतसाठी स्‍वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.असे अधिक्षक, डाकघर, वर्धा विभाग,वर्धा यांनी कळविले आहे.           

Friday 16 December 2011

वीज बचत म्‍हणजे राष्‍ट्रास मदत !

घरात आयएसआय प्रमाणित तारांचा वापर आणि प्रमाणित उपकरणांचा वापर केल्‍यास वीज बचत व सोबतच पैशांची बचत होईल या उपायांनी राष्‍ट्रालाही मोठी मदत होवू शकेल. - प्रशांत दैठणकर
व्‍यय आणि अपव्‍यय यात संतुलन राखणे आपल्‍याला जमलं पाहिजे हे जमलं तर बचत आपली आणि आपल्‍या राष्‍ट्राचीच होणार आहे. विषय विजेच्‍या बचतीचा आहे. विज्ञानानुसार वीज ही निर्माण करावी लागते. वीज साठवून ठेवण्‍याच्‍या यंत्रणा महागड्या आहेत त्‍यामुळे वीज साठवून ठेवण्‍याला मर्यादा आहेत. या पार्श्‍वभूमीवर आपल्‍यापैकी प्रत्‍येक व्‍यक्‍तीने विजेची बचत कशी करता येईल याचा विचार करायला हवा.
विजेचे उत्‍पादन व आपल्‍या पर्यंतचे वहन यासाठी लाखो किलोमीटरचे वाहिन्‍यांचे जाळे आणि उपकेंद्रे निर्माण करावी लागतात. ज्‍या धातूमधून वीज वाहून नेली जाते त्‍या धातूमुळे काही प्रमाणात विजेची घट होत असते. आपण आपल्‍या घरापर्यंत आलेली वीज घरात सुव्‍यवस्थित पध्‍दतीने वापरायला हवी.
घरात विजेचा वापर करताना आयएसआय प्रमाणित तारांचा तसेच ऊर्जा बचतीचे प्रमाणपत्र लाभलेल्‍या उपकरणांचाच वापर करावा. स्‍वस्‍त आणि दर्जाहीन तारामुळे विजेचा सुयोग्‍य वापर शक्‍य होत नाही सोबतच आग लागण्‍याचाही मोठा धोका असतो. प्रमाणित उपकरणे वापरली तर बचत होत असते.
ज्‍या ठिकाणी शक्‍य आहे अशा सर्व ठिकाणी सोलार उपकरणांचा वापर जरुर करावा. घरात पाणी गरम करण्‍यासाठी विजेचा वापर करणे चुकीचे आहे. आपला देश हा भरपूर सूर्यप्रकाशाचा देश आहे त्‍यामुळे सोलर अर्थात सूर्याच्‍या उर्जेचा वापर करता येईल अशी यंत्रणा घरात बसवणं सहज शक्‍य आहे.
सायंकाळी दिवे लावल्‍यानंतर सर्व खोल्‍यांमध्‍ये रात्रभर दिवे चालू ठेवण्‍याचा प्रकार अनेक घरात दिसतो. यात ज्‍या खेालीत कुणीही नाही अशा खोल्‍यांमधील दिवे बंद ठेवले तरी पुरेशी बचत सहजपणाने आपण करु शकतो. अनेक ठिकाणी घरावरील टाकीत पाणी चढविले जाते. याकरिता विद्युतपंपांचा वापर होतो. टाकी भरुन वाहू लागते तरीही पंप सुरु राहतो असा प्रकार शहरी भागात हमखास दिसतो.टाकी भरत आल्‍यावर पंप बंद करणारी स्‍वयंचलित यंत्रणा बाजारात उपलब्‍ध आहे त्‍याचा वापर सर्वांनी सुरु केला तर हजारो युनिट वीज सहज वाचेल.
उत्‍पादनाचा खर्च वाढल्‍याने वीज महाग होत आहे. या पार्श्‍वभूमीवर वीज बचत करुन आपण स्‍वतःचा आणि राष्‍ट्राचा फायदा करु शकतो आणि तो आपण करावा.
प्रशांत दैठणकर

एलपीजीचा वाहनासाठी वापर अयोग्‍य !

स्‍वयंपाकाचा गॅस अर्थात एलपीजी चा वाहनाच्‍या इंधनाच्‍या रुपात अनेक ठिकाणी गैरवापर होताना दिसत आहे. ही अतिशय गंभीर बाबत आहे. यातून अनेक समस्‍या तर निर्माण होत आहेतच सोबत अपघातांचा धोकादेखील वाढत आहे. याबाबत हा विशेष लेख. - प्रशांत दैठणकर

सध्‍या ऊर्जा बचत हा कळीचा मुद्दा बनला आहे. पेट्रोल आणि डिझेल यांची दरवाढ होत आहे सोबतच येणा-या काळात गॅसचेही दर वाढण्‍याची शक्‍यता आहे. या सर्वांमागे दळणवळणाच्‍या किंमतीत होणारी वाढ अधिक कारणीभूत आहे.
नैसर्गिक वायू आपण प्रक्रिया करुन वाहनात इंधन म्‍हणून वापरतो त्‍याच प्रमाणे घराघरात एलपीजीच्‍या रुपात स्‍वयंपाकाचा गॅस म्‍हणूनही याचा वापर होतो. या गॅसची किंमत पेट्रोल आणि डिझेलच्‍या तुलनेत सध्‍या कमी भासते याला कारण ही जीवनावश्‍यक बाब मानून त्‍यावर मोठ्या प्रमाणावर सबसिडी दिली जाते व त्‍याच्‍या दरांवर अद्यापही शासनाने नियंत्रण ठेवलेले आहे.
वाहनात सीएनजी ऐवजी एलपीजी वापरण्‍याचा प्रकार वाढला असल्‍याने सबसिडीपायी शासकीय निधी त्‍यात जातो परिणामी शासकीय कंपन्‍यांचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे असं निदर्शनास आलं आहे.
वाहनासाठी जो गॅस वापरला जातो तो वेगळ्या प्रकारचा असतो. तिथं एलपीजी वापरणं घातक आहे. मुळात हा वायू अत्‍यंत ज्‍वलनशील आहे. गॅसच्‍या टाकीतून गाडीच्‍या टाकीत भरताना वायूगळती तसेच स्‍फोट होणे आदी अपघातांची शक्‍यता असते.
पेट्रोल- डिझेल ऐवजी गॅसचा इंधन म्‍हणून वापर करण्‍यासाठी स्‍वतंत्र यंत्रणा बसवावी लागते. हे गॅस किट देखील अनेकजण प्रमाणित वापरत नाहीत. या चुकीच्‍या किंवा दर्जाने सुमार असलेल्‍या गॅसकिटमुळे गळती होवून वाहने जळाल्‍याच्‍या घटना आपण माध्‍यमातून वाचतो परंतु करताना तिच चूक केली जाते. यामुळे आता अपघातांचा धोकादेखील वाढला आहे.
एलपीजीचा गैरवापर थांबला नाही तर त्‍यावरील सबसिडी बंद करायचा निर्णय शासनाला घ्‍यावाच लागेल. त्‍या स्थितीत गॅसची किंमत आता आहे त्‍यापेक्षा दुप्‍पट होवू शकते त्‍यामुळे आपण गॅसचा योग्‍य वापर केला पाहिजे.
वाहनात गॅसचा वापर करायचा असेल तर आयएसआय आणि आरटीओव्‍दारा प्रमाणित असेच गॅसकिट वापरावे जिथे उपलब्‍ध आहे तिथेच अशा किटचा व त्‍यात फक्‍त सीएनजीचा वापर करावा.
घरातील गॅस हा गृहिणींचा जिव्‍हाळ्याचा विषय असतो त्‍या विषयाला आपण घरातच ठेवावे व वाहनाचे इंधन म्‍हणून एलपीजीचा वापर टाळावा हेच चांगलं.
प्रशांत दैठणकर

Thursday 15 December 2011

डिसेंबर 2011 महिन्‍याचे शिधावाटप परिमाण


        वर्धा, दि.15- जिल्ह्यातील सर्व कौटुंबिक शिधा पत्रिका धारकांना माहे   डिसेंबर 2011 महिन्‍याकरीता स्वस्त धान्य दुकानातून शिधा वस्तू वाटपाचे परिमाण  पुढील प्रमाणे निश्चीत करण्यात आलेले आहे. प्रत्यक्ष  धान्य साठा व साखरेच्या उपलब्धतेनुसार वितरण करण्यात येईल.
          दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी बीपीएल कार्ड धारकांना 25 किलो गहू प्रतीकिलो 5 रु. दराने, तांदूळ 19 किलो प्रतीकिलो 6 रु. दराने, साखर प्रति व्यक्ती 500 ग्राम 13.50 प्रती किलो दराने मिळेल.अंत्योदय कार्ड    धारकांना  25 किलो गहू 2 रु. प्रती किलो दराने, 19किलो तांदुळ प्रती किलो   3 रु. दराने, प्रति व्यक्ती 500 ग्राम साखर 13.50 रुपये प्रती किलो दराने मिळेल. अन्नपूर्णा कार्ड धारकांना 5 किलो गहू व 5 किलो तांदूळ विनामुल्य दराने मिळेल. एपीएल कार्ड    धारकांना 10 किलो गहु 7.20 रुपये दराने, 5 किलो तांदूळ 9.60 रुपये   दराने मिळेल.
   तालुकानिहाय खापरी डेपोतून वितरीत झालेल्या केरोसीनचे किरकोळ विक्री दर प्रति लिटरचे दर कंसाबाहेर दिले असून, बोरखेडी डेपोतून वितरीत होणारे केरोसीनचे दर कंसामध्ये पुढील प्रमाणे दर्शविण्यात आले आहे.
  वर्धा14.55(14.48),देवळी14.81(14.75),सेलू14.67(14.62),आर्वी14.74(14.69),आष्टी 14.95(14.97),कारंजा14.84(14.93),हिंगणघाट 14.75(14.63),समुद्रपूर 14.49 (14.40) आहे.
          शहर विभाग व तालुका मुख्यालयी प्रति व्यक्ती 2 लिटर प्रमाणे जास्तीत जास्त 20 लिटर व ग्रामीण भागात 15 लिटर केरोसिनचे वाटप करण्यात येईल.असे  जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.

परिक्षा केंद्रावर 144 कलम लागू

         वर्धा,दि.15-महाराष्‍ट्र राज्‍य लोकसेवा आयोगाच्‍या  लिपिक पदाच्‍या पूर्व परिक्षा दि. 18 डिसेंबर 2011 रोजी जे.बी.सायन्‍स कॉलेज,वर्धा,जी.एस.कॉमर्स कॉलेज वर्धा, यशवंत महाविद्यालय वर्धा, केसरीमल गर्ल्‍स  हायस्‍कूल वर्धा या परीक्षा केंद्रावर घेण्‍यात येणार आहे.

     परीक्षा सुरळीतपणे पार पडाव्‍या  यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी जयश्री भोज यांना प्राप्‍त  अधिकारान्‍वये या परीक्षा केंद्रावर सीआरपीसी 144 कलम लागू करण्‍यात आले असून, दि.18 डिसेंबर 2011 रेाजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्‍या 100 मीटर वरील परिसरात दोन किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तींना एकत्रीत येण्‍यावर प्रतिबंध करण्‍यात आले आहे. तसेच झेरॉक्‍स, फॅक्‍स , मोबाईल फोन, ई-मेल व इंटरनेट आदी सेवेवर प्रतिबंध करण्‍यात आले आहे.

Wednesday 14 December 2011

डॉलरची अन् इंधनाची भरारी

डॉलरचा वाढता दर आणि इंधनाचा वाढता दर यांचं एक नातं आहे. त्‍यामुळे येणा-या काळात इंधन आणखी महागणार हे स्‍पष्‍ट आहे. सार्वजनिक वाहन प्रणालीचा वापर वाढवून आपण या संकटावर निश्‍चितपणे मात करु शकतो.
- प्रशांत दैठणकर
आज डॉलर महागल्‍याने महागाई वाढणार ही चिंता सर्वांना आहे. आणि ते खरं देखील आहे. आंतरराष्‍ट्रीय व्‍यवहारात ज्‍या पध्‍दतीने चलनाचा वापर होतो त्‍या चलनात येणारा चढउतार प्रत्‍येक देशाला सहन करावा लागतो. रुपयाचं मुल्‍य काय याचा विचार करुन जगात आपणास व्‍यवहार करावे लागणार आणि याचा थेट परिणाम इंधनांच्‍या किंमतीवर होणार असून पर्यायाने सर्वच बाबींच्‍या किंमती वाढण्‍यावर होणार आहे.
इंधन बचत करा असं वारंवार सांगण्‍यात येतं. त्‍याला कारण अर्थातच आपण इंधनाच्‍या बाबतीत स्‍वयंपूर्ण नाही. आपण क्रुड ऑईल आंतरराष्‍ट्रीय बाजारातून विकत घेत असतो. हे इंधन घेताना आपणाला खरेदी डॉलरमध्‍ये करावी लागते. डॉलरचा भाव 45 रुपयांवरुन आता 52 रुपयांच्‍या वर पोहोचला त्‍यामुळे खरेदी करताना जादा रक्‍कम मोजावी लागते परिणामी आपणास अधिक भाव मोजावा लागणार हे सत्‍यच आहे.
इंधन बचतीचा सर्वात सोपा मार्ग म्‍हणजे आपण सार्वजनिक वाहनांचा वापर वाढवायला हवा. आपणाकडे गेल्‍या 15 वर्षात लोकांच्‍या हाती मोठ्या प्रमाणात पैसा यायला लागला सोबतच बँकांनी कर्जपुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढविला याचा परिणाम वाहनसंख्‍येत अमर्याद वाढ होण्‍यावर झालेला आहे.
सुलभ हप्‍त्‍याने कर्जरुपाने वाहन घेणे सोपे पण त्‍यामुळे इंधनाचा वापर वाढतो. पब्‍लीक ट्रान्‍सपोर्टचा वापर केल्‍यास यावर नियंत्रण राहू शकते. माझ्याकडे कार आहे पण ती कधी वापरावी याचं मला शिक्षण नाही यामुळे आहे तर वापरा, या अट्टहासाने रस्‍त्‍यावर रहदारी तर वाढली सोबतच इंधनाची मागणी आणि अपघातांची संख्‍याही वाढली आहे.
ज्‍या मुल्‍याचा इंधनात आपण एकटे एका वाहनात 10-15 किलोमीटर जाता त्‍याच्‍या निम्‍म्‍या किंमतीत 50 जण बसच्‍या माध्‍यमातून जाऊ शकतात याचं भान आपण ठेवलं तर ही इंधनाची मागणी नियंत्रणात राहील. इंधनाचा खप नियंत्रित राहीला नाही तर येणा-या काळात याच्‍या किंमती आणखी वाढतील हे स्‍पष्‍टच आहे.
सार्वजनिक वाहन प्रणालीचा वापर ही आज काळाची गरज बनली आहे आणि आपण हा विषय गांभिर्याने घेऊन त्‍यानुरुप बदल घडवण्‍याची वेळ आली आहे.
प्रशांत दैठणकर

वर्धा जिल्‍ह्यात 37 (1) आणि(3)कलम लागू

 वर्धा,दि.14- जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी जयश्री भोज यांना प्रदान केलेल्‍या अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) आणि (3) कलम जारी केले आहे.
     या कलमाचा अंमल दि. 22 डिसेंबर 2011 चे रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल असे आदेशात नमूद आहे.

Tuesday 13 December 2011

पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर

  वर्धा, दि. 13- जिल्‍ह्यातील आठ पंचायत समितीच्‍या सभापतीच्‍या पदाचे आरक्षण जाहीर करण्‍यात आले असून,
त्‍याचा तपशिल पुढील प्रमाणे आहे.
     पंचायत समिती आर्वीचे सभापती पद अनुसूचित जाती महिला , सेलू पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमाती, हिंगणघाट पंचायत समितीचे सभापती पद ना.मा.प्रवर्ग महिला, वर्धा पंचायत समितीचे सभापती पद ना.मा.प्रवर्ग, आष्‍टी पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिला, समुद्रपूर पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिला,  कारंजा पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण , देवळी पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण  साठी आरक्षण करण्‍यात आले आहे. असे जिल्‍हाधिकारी, वर्धा यांनी अधिसुचना व्‍दारे कळविले आहे.

जिल्ह्यात केरोसीनचे वितरण

वर्धा दि.13 - जिवनावश्यक घटकात मोडत असलेल्या केरोसिचे वितरण  जिल्हाधिकारी, वर्धा यांनी एका पत्रानुसार जाहीर केले आहे.
माहे डिसेंबर 2011 करीता  तालुकानिहाय परवाना धारकांना केरोसिचे आवंट पुढील प्रमाणे आहे.
जी.एम.राठी वर्धा यांना 180 किलो लिटर. आर्वीचे इब्राहीमखाँ नवरखॉन यांना 156 किलो लिटर, वर्धा येथील रतलाल केला  108 किलो लिटर, देवळी येथील वंदना सुनिल गावंडे यांना 60 किलो लिटर, समुद्रपूर येथील एस.आर.शेंडे यांना 108 किलो लिटर,वर्धा येथील कांतीलाल किशोरीलाल यांना 144 किलो लिटर, वर्धा येथील इब्राहीमजी आदमजी यांना 132 किलो लिटर, आर्वी येथील बी.ए.लाठीवाला यांना 120 किलो लिटर, हिंगणघाट येथील एफ.ए.रहेमतुल्ला यांना 120 किलो लिटर, पुलगाव येथील टि.के.ऍ़ड न्स यांना 96 किलो लिटर केरोसिचे वितरण केल्याचे पत्रकात मुद आहे.

केंद्र पुरस्‍कृत शेतकरी अभ्‍यास दौरा

 वर्धा,दि.13- केंद्र पुरस्‍कृत गळीत धान्‍य विकास कार्यक्रमांतर्गत वर्धा, सेलू, देवळी या तालुक्‍यांमधून सन 2011-12 अंतर्गत शेतकरी अभ्‍यास दौ-याला उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी हिरवी झेंडी दाखवून दौ-यास सुरुवात केली.
       पाच दिवसाच्‍या दौ-यामधे प्रमुख प्रादेशिक संशोधन केंद्र(सोयाबिन), डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अमरावती येथे सोयाबिनवरील संशोधनाचा अभ्‍यास, तालुका परतवाडा येथील चांगले उत्‍पादनक्षम संत्रा फळबागेची पाहणी, सोयाबिन अनुसंधान निर्देशालय, इंदोर येथे सोयाबिन लागवड तंत्रज्ञान, सोयाबिनवरील एकात्मिक किड व्‍यवस्‍थापन, एकात्मिक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, सोयाबिनचे नविन वाण, सुधारित औजारांचा वापर, सोयाबिनवरील प्रक्रिया बाबतचे आधुनिक तंत्रज्ञान जसे सोयामिल्‍क, सोयापनीर, सोयावडी इत्‍यादी बाबींचे प्रशिक्षण मिळणार आहे.
     कृषि विज्ञानकेंद्र उज्‍जैन येथे नवीन संशोधित सोयाबीन वाणांची माहिती मिळणार आहे. त्‍यामुळे शेतक-यांचे पुढील हंगामामध्‍ये सायोबिनचे उत्‍पादन व उत्‍पादकता वाढवून निव्‍वळ नफ्यामध्‍ये वाढ करणे हा या शेतकरी अभ्‍यास दौ-याचा उद्देश आहे.
     या अभ्‍यास दौ-यामध्‍ये 100 शेतकरी सहभागी झाले आहेत.                    

Monday 12 December 2011

वर्धा विजयी उमेदवार


†.Îú.
×¾Ö•ÖµÖß ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸ü
ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖÃÖ ×´ÖôûÖ»Ö껵ÖÖ
¾Öî¬Ö ´ÖŸÖÓÖ“Öß ÃÖӏµÖÖ
¯ÖϳÖÖÖ 1
¯ÖÖ
1
´ÖÃÖ¸üÖ´Ö ×ÖŸÖÖ †•ÖµÖ
2050
¯ÖϳÖÖÖ 1 (†)
úÖòÖÏêÃÖ
2
ׯ֯ÖÓôêû नलिनी धनराज
1803
¯ÖϳÖÖÖ 1 (²Ö)
úÖòÖÏêÃÖ
3
šü֍ãú¸ü ÃÖÖêÆÖØÃÖÖ ŸÖê•ÖØÃ֐Ö
1838
¯ÖϳÖÖÖ 1 (ú)
úÖòÖÏêÃÖ
4
Ö›üÃÖê “ÖÓ¦ü¿ÖêÖ¸ü ¯ÖÖÓ›ãü¸ÓüÖ
2047
¯ÖϳÖÖÖ 1 (›ü)
úÖòÖÏêÃÖ





†.Îú.
×¾Ö•ÖµÖß ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖ“Öß ­ÖÖÓ¾Öê
ˆ´Öê¤ü¾ÖÖ¸üÖÃÖ ×´ÖôûÖ»Ö껵ÖÖ ¾Öî¬Ö ´ÖŸÖÓÖ“Öß ÃÖӏµÖÖ
¯ÖϳÖÖÖ 2
¯ÖÖ
1
Öî¸üú¸ü ¾ÖÂÖÖÔ ×ú¿ÖÖê¸ü
2022
¯ÖϳÖÖÖ 2 (†)
úÖòÖÏêÃÖ
2
†Ö›êü ¿Ö¸ü¤ü ´ÖÖ¸üÖêŸÖ¸üÖ¾Ö
2065
¯ÖϳÖÖÖ 2 (²Ö)
úÖòÖÏêÃÖ
3
¿Öê­›êü †ÖúÖ¿Ö ¯ÖÏ´ÖÖê¤ü
2443
¯ÖϳÖÖÖ 2 (ú)
úÖòÖÏêÃÖ
4
Öã•Ö¸ü ׿ֻÖÖ ÃÖã¸ü•Ö
1592
¯ÖϳÖÖÖ 2 (›ü)
úÖòÖÏêÃÖ

वर्धा विजयी उमेदवार



.Îú.
विजयी उमेदवाराची नावे
उमेदवारास मिळालेल्या वैध मतांची संख्या
प्रभाग
पक्ष
1
ठाकरे सुरेश रामराव
2150
प्रभाग 3 (अ)
रा.का
2
जग्यासी शांताबाई मनोहर
2073
प्रभाग 3 (ब)
रा.का
3
श्रध्दा ओमप्रकाश मुरारका
1649
प्रभाग 3 (क)
रा.का
4
कुलधरीया कमलकिशोर गुलाबचंद
1496
प्रभाग 3 (ड)
भा.ज.प





अ.क्र.
विजयी उमेदवाराची नावे
उमेदवारास मिळालेल्या वैध मतांची संख्या
प्रभाग
पक्ष
1
तराळे अतुल मोतीरामजी
1446
प्रभाग 4 (अ)
भा.ज.प
2
माया मारोतराव काळे
1849
प्रभाग 4 (ब)
कॉग्रेस
3
कोपरे सुमित्रा अरविंद
1937
प्रभाग 4 (क)
भा.ज.प
4
प्रफुल मदनबाबु शर्मा
1563
प्रभाग 4 (ड)
कॉग्रेस





अ.क्र.
विजयी उमेदवाराची नावे
उमेदवारास मिळालेल्या वैध मतांची  संख्या
प्रभाग
पक्ष
1
धोपटे सुशिल वसंतराव
1627
प्रभाग 5 (अ)
कॉग्रेस
2
उमाटे माया राजेश
2043
प्रभाग 5 (ब)
भा.ज.प
3
कोलते शुभांगी नरेश
1996
प्रभाग 5 (क)
भा.ज.प
4
राऊत पवन अरुण
2289
प्रभाग 5 (ड)
भा.ज.प










अ.क्र.
विजयी उमेदवाराची नावे
उमेदवारास मिळालेल्या वैध मतांची संख्या
प्रभाग
पक्ष
1
कुत्तरमारे त्रिवेणी रामकृष्ण
2947
प्रभाग 6 (अ)
रा.का
2
इंगळे योगिता सजंय
1798
प्रभाग 6 (ब)
अपक्ष
3
ठाकुर संतोष जयवंतसिंग
2320
प्रभाग 6 (क)
रा.का
4
महंतारे सुनिल केशव
3201
प्रभाग 6 (ड)
रा.का





अ.क्र.
विजयी उमेदवाराची नावे
उमेदवारास मिळालेल्या वैध मतांची संख्या
प्रभाग
पक्ष
1
दिपीका दिपक आडेपवार
2212
प्रभाग 7 (अ)
रा.का
2
मनोज शरदराव रोकडे
1379
प्रभाग 7 (ब)
शिवसेना
3
जैन लता अजीत
1371
प्रभाग 7 (क)
भा.ज.प
4
जगदिश अचलदास टावरी
1239
प्रभाग 7 (ड)
रा.का





अ.क्र.
विजयी उमेदवाराची नावे
उमेदवारास मिळालेल्या वैध मतांची संख्या
प्रभाग
पक्ष
1
गुजर निर गुलाबराव
1729
प्रभाग 8 (अ)
ब.स.पा
2
सहारे रिना रविंद्र
2399
प्रभाग 8 (ब)
ब.स.पा
3
शेख शबाम बानो शेख सलीम
1831
प्रभाग 8 (क)
ब.स.पा
4
चव्हाण सचिन रमेशराव
1676
प्रभाग 8 (ड)
ब.स.पा















अ.क्र.
विजयी उमेदवाराची नावे
उमेदवारास मिळालेल्या वैध मतांची संख्या
प्रभाग
पक्ष
1
बुटले सिध्दार्थ नामदेव
1701
प्रभाग 9 (अ)
अपक्ष
2
दिपा गुलाबचंद आहुजा
2544
प्रभाग 9 (ब)
अपक्ष
3
राखी दुर्गेश पांडे
999
प्रभाग 9 (क)
भा.ज.प
4
शेख इकबाल शेख चांद
908
प्रभाग 9 (ड)
अपक्ष





अ.क्र.
विजयी उमेदवाराची नावे
उमेदवारास मिळालेल्या वैध मतांची संख्या
प्रभाग
पक्ष
1
बागडे योगिता दिलीप
1829
प्रभाग 10 (अ)
कॉग्रेस
2
खोंड भारती निलेेश
2334
प्रभाग 10 (ब)
कॉग्रेस
3
रमणलाल टिल्लुमल लालवाणी
1182
प्रभाग 10 (क)
रा.का