Monday 12 December 2011

जिल्‍हास्‍तरीय युवा महोत्‍सवाचे आयोजन


          
    वर्धा,दि.12- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व्‍दारा जिल्‍हा  क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा च्‍या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी जिल्‍हास्‍तर युवा महोत्‍सवाचे आयोजन दि. 15 डिसेंबर 2011 रोजी सकाळी 10 वाजेपासून जिल्‍हा क्रीडा संकुल सभागृह, वर्धा येथे करण्‍यात येत आहे.
     या महोत्‍सवामध्‍ये लोकनृत्‍य, लोकगित, एकांकिका, शास्‍त्रीय गायण, शास्त्रीय  वाद्य  (सितार, बासरी, विणा, तबला, मृदुंग, हार्मोनियम, गिटार) शास्‍त्रीय नृत्‍य , वक्‍तृत्‍व इत्‍यादी बाबींचा समावेश असून, युवकांच्‍या  विविध कलागुणांना वाव देवून त्‍यांच्‍यातील सुप्‍त कलागुणांना युवक महोत्‍सवाचे माध्‍यमातून प्रदर्शित करण्‍याची संधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व्‍दारा प्रतिवर्षी उपलब्‍ध  करुन दिली जात आहे. तसेच महाराष्‍ट्र राज्‍याचा संघ राष्‍ट्रीय स्‍तरावर प्रतिवर्षी उत्‍कृष्‍ठ कामगिरी करीत आहे.
     जिल्‍ह्यातील शाळा महाविद्यालये, युवा मंडळे, संगीत विद्यालयातील 15 ते 35 वर्ष वयोगटातील युवक, युवतींना जास्‍तीत जास्‍त संख्‍येने युवक महोत्‍सवात सहभाग घ्‍यावा व आपला प्रवेश दि. 14 डिसेंबर 2011 पर्यंत जन्‍म तारखेच्‍या दाखल्‍यासह जिल्‍हा क्रीडा अधिकारी, कार्यालय,वर्धा येथे नोंदवावा. असे जिल्‍हा क्रीडा अधिकारी, प्रदिप शेटिये यांनी कळविले आहे.
                     0000

No comments:

Post a Comment