Friday 31 March 2017

शासकिय निवृत्तीरवेतन धारकांचे वेतन 7 एप्रिल पर्यंत होणार वर्धा दि 1-मार्च 2017 मधील कामाचा निपटारा करण्यानचे दृष्टी्ने व आर्थिक वर्षाचा शेवट असल्यााने वर्धा कोषागारातून निवृत्तीा वेतन/कुंटुब निवृत्तीर वेतन घेणा-या राज्यक शासकिय निवृत्ती वेतन धारकाचे मार्च महिन्यााचे निवृत्तीी वेतन 7 एप्रिल पर्यंत विलंबाने बँकेत जमा करण्या्त येणार आहे. असे कोषागार अधिकारी रविंद्र फुलझेले यांनी कळविले आहे.



शासकिय निवृत्‍तीवेतन धारकांचे वेतन 7 एप्रिल पर्यंत होणार
     वर्धा दि 1-मार्च 2017 मधील कामाचा निपटारा करण्‍याचे दृष्‍टीने व आर्थिक वर्षाचा शेवट असल्‍याने वर्धा कोषागारातून निवृत्‍ती वेतन/कुंटुब निवृत्‍ती वेतन घेणा-या राज्‍य शासकिय निवृत्‍ती वेतन धारकाचे मार्च महिन्‍याचे निवृत्‍ती वेतन 7 एप्रिल पर्यंत विलंबाने बँकेत जमा करण्‍यात येणार आहे. असे कोषागार अधिकारी  रविंद्र फुलझेले यांनी कळविले आहे.

Thursday 30 March 2017



योजनाची प्रचार प्रसिध्‍दी चलचित्ररथाव्‍दारे
Ø हाथीबेड यांनी हिरवी झेंडी
Ø जिल्‍हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
     वर्धा दि 30- राज्‍यात अनुसुचित जाती योजने अतंर्गत विविध योजना राबविण्‍यात येतात. या योजनांचा लाभ ग्रामीण भागातील  नागरिकांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी  जिल्‍हा माहिती कार्यालयाचे वतीने चलचित्ररथ व्‍दारे  जनजागृती करण्‍यात येत आहे. या चलचित्ररथाला राष्‍ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्‍य दिलीप के. हाथीबेड यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसरातून हिरवी दाखवून रवाना केले. यावेळी जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, समाज कल्‍याण सहाय्यक आयुक्‍त बाबासाहेब देशमुख,  जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी अविनाश रामटेके, जिल्‍हा माहिती अधिकारी मनिषा सावळे उपस्थित होत्‍या.
            चित्ररथ जिल्‍हयातील आठही तालुक्‍यातील अनुसुचित जातीची अधिक  लोकसंख्‍या असलेल्‍या 120 गावांमध्‍ये 29 मार्च ते 29 एप्रिल अशा 32 दिवसाच्‍या कालावधित फीरुन योजनाचा प्रचार व प्रसार करणार आहे. या चलचित्राव्‍दारे शासनाच्‍या स्‍वच्‍छ भारत मिशन, जलयुक्‍त शिवार अभियान, कृषि विभागाच्‍या योजना, मुद्रा बँक योजना, रोकड रहित व्‍यवहार, महसुल विभागाच्‍या योजना, आरोग्‍य विभागाच्‍या योजना व पशुसंवर्धन विभागाच्‍या अशा विविध अनुसुचित जातीसाठी असलेल्‍या  योजनांची चलचित्र(एल.ए.डी. स्‍क्रीन) व्‍दारे प्रचार करण्‍यात येत आहे. हा चित्ररथ  दररोज तीन गावामध्‍ये सायंकाळी गावात फीरुन  प्रचार करण्‍यात येत आहे. यामध्‍ये जीपीएस यंत्रणा लावण्‍यात आली आहे. यामुळे सुविधा उपलब्‍ध आहे. यामुळे सदर चित्ररथ कोणत्‍यागावामध्‍ये प्रचार करीत आहे. याबद्दल प्रशासनाला मोबाईलवर माहिती उपलब्‍ध होते.  नागरिकांनी चित्ररथाच्‍या माध्‍यमातून योजनांची माहिती जाणून घ्‍यावी, व योजनेचा सं‍बंधित विभागाकडे जावून योजनेचा लाभ घेण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.