Saturday 11 August 2012

वर्धा, दिनांक 11 : वर्धा जिल्ह्यात मागील 24 तासात एकूण 20.2 मि.मि.पावसाची नोंद झाली आहे. आतापावेतो जिल्ह्यात एकूण सरासरी 434.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्या त सर्वाधिक पाऊस कारंजा तालुक्यात 40.0 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात मागील 24 तासात तालुकानिहाय झालेला पाऊस व कंसात एकूण झालेला पाऊस पुढीलप्रमाणे वर्धा- 24.00 मि.मी.(455.6), सेलू- 11 मि.मी.(245.0), देवळी-4.6 (309), हिंगणघाट-निरंक-.(488.0), आर्वी-25.0 मि.मी.(519.0), आष्टी 30.0 मि.मी.(381.2), समुद्रपूर-7.2 मि.मी.(599.4), आणि कारंजा-40 (479.6 )मि.मी. पावसाची नोंद झाली असून आजपर्यंत 434.6 मि.मी. .

वर्धा जिल्ह्यात पावसाची सरासरी 434.6 वर्धा, दिनांक 11 : वर्धा जिल्ह्यात मागील 24 तासात एकूण 20.2 मि.मि.पावसाची नोंद झाली आहे. आतापावेतो जिल्ह्यात एकूण सरासरी  434.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्‍ह्यात सर्वाधिक पाऊस कारंजा तालुक्यात 40.0 मि.मी. पाऊस झाला आहे.
          जिल्ह्यात मागील 24 तासात तालुकानिहाय झालेला पाऊस व कंसात एकूण झालेला पाऊस पुढीलप्रमाणे
          वर्धा- 24.00 मि.मी.(455.6), सेलू- 11 मि.मी.(245.0), देवळी-4.6 (309), हिंगणघाट-निरंक-.(488.0), आर्वी-25.0 मि.मी.(519.0),
आष्टी 30.0 मि.मी.(381.2), समुद्रपूर-7.2 मि.मी.(599.4),
आणि कारंजा-40  (479.6 )मि.मी. पावसाची नोंद झाली असून आजपर्यंत 434.6  मि.मी. सरासरी एवढा पाऊस झाला आहे.

Friday 10 August 2012

वर्धा जिल्ह्यात पावसाची सरासरी 434.6 मि.मि.


    वर्धा, दिनांक 11 : वर्धा जिल्ह्यात मागील 24 तासात एकूण 20.2 मि.मि.पावसाची नोंद झाली आहे. आतापावेतो जिल्ह्यात एकूण सरासरी  434.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्‍ह्यात सर्वाधिक पाऊस कारंजा तालुक्यात 40.0 मि.मी. पाऊस झाला आहे.
          जिल्ह्यात मागील 24 तासात तालुकानिहाय झालेला पाऊस व कंसात एकूण झालेला पाऊस पुढीलप्रमाणे
          वर्धा- 24.00 मि.मी.(455.6), सेलू- 11 मि.मी.(245.0), देवळी-4.6 (309), हिंगणघाट-निरंक-.(488.0), आर्वी-25.0 मि.मी.(519.0),
आष्टी 30.0 मि.मी.(381.2), समुद्रपूर-7.2 मि.मी.(599.4),
आणि कारंजा-40  (479.6 )मि.मी. पावसाची नोंद झाली असून आजपर्यंत 434.6  मि.मी. सरासरी एवढा पाऊस झाला आहे.
                                  0000000

राष्‍ट्रीय ग्रामिण आरोग्‍य अभियाना अंतर्गत कार्यशाळा


        वर्धा, दि. 10- जिल्‍हा परिषद वर्धाच्‍या आरोग्‍य विभागातर्फे जिल्‍ह्यातील सर्व तालुका आरोग्‍य अधिकारी व  वैद्यकिय अधिक्षक, उपजिल्‍हा रुग्‍णालय, ग्रामिण रुग्‍णालय तसेच सर्व आरोग्‍य पर्यवेक्षक आणि आरोग्‍य कर्मचारी  यांच्‍या करीता राष्‍ट्रीय ग्रामिण आरोग्‍य अभियान अंतर्गत जिल्‍हा स्‍तरीय कार्यक्रम अंमलबजावणी आराखडा सन 2012-13 या विषयावर  कार्यशाळेचे आयोजन दि. 2 ऑगस्‍ट 2012 रोजी जिल्‍हा प्रशिक्षण पथक येथे करण्‍यात आले.
            या कार्यशाळेचे उदघाटन प्रभारी जिल्‍हाधिकारी तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने  यांचे अध्‍यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार , जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. दिलीप माने , डॉ. एस.डी.निमगडे, स्‍वयंसेवी संस्‍थेचे प्रतिनिधी  अभयुदय मेघे यांचे उपस्थित दिप प्रजवलन करुन करण्‍यात आले.
       या कार्यशाळेचे प्रासताविक मध्‍ये बोलतांना डॉ. दिलीप माने  म्‍हणाले  जिल्‍हा सतरीय कार्यक्रम अंमलबजावणी आराखडा व कार्यशाळचे आयोजनामागील भुमिका विषय केली.
       आपल्‍या प्रमुख मार्गदर्शनपर भाषणात प्रभारी जिल्‍हाधिकारी तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने  म्‍हणाले की जिल्‍ह्यातील सर्व गरोदर मातांना गुणवत्‍तापुर्वक आरोग्‍य सेवा पुरविल्‍यास  प्रसुतीमध्‍ये  होणारी गुंतागुंत टाळता येवून एक नविन सुदृढ पिढी निर्माण होईल. सर्व गरोदर मातांची प्रसुती ही शासकिय संस्‍थेतच व्‍हावयास पाहिजे यावर विशेष भर दिला तसेच आराखउ्याची अंमलबजावणी आरोग्‍य विभागातील शेवटच्‍या स्‍तरापर्यंत प्रभावीपणे करणे अतिशय महत्‍वाचे आहे. जेणे करुन जिल्‍ह्यातील प्रत्‍येक नागरिकांना गुणवत्‍तापुर्वक आरोग्‍य सेवा देता येईल.
      कार्यशाळेत इतर मान्‍यवरांनी  आपले मार्गदर्शनपर विचार व्‍यकत केले. यानंतर  डॉ. निमगडे यांनी सर्व विषयाच्‍या अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने सादरीकरणाव्‍दारे कार्यशाळेला मार्गदर्शन केले तसेच जननी सुरक्षा कार्यक्रम, जननी शिशु सुरक्षा  कार्यक्रमाचे, आशा योजना, सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम, आय.पी.एच.एस.आर.के.एस. तसेच ईतर राष्‍ट्रीय कार्यक्रमाचे सादरीकरण त्‍यासंबधीत  समन्‍वयकाने  विभाग प्रमुखाने केले.
       या कार्यशाळेच्‍या आयोजनाकरीता वैद्यकीय अधिकारी डॉ. राज गहलोत व  जिल्‍हा व्‍यवस्‍थापन अधिकारी डॉ. कु. अनुजा बारापात्रे यांच्‍या संपूर्ण कर्मचारी वृंदानी सहकार्य केले. कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन सुनिल गायधने यांनी केले.
                                                                0000000

माजी वायु सैनिकांच्‍या पाल्‍यांना शिष्‍यवृत्‍ती


वर्धा, दि.10- माजी वायुसैनिकांच्‍या पाल्‍यांसाठी सन 2012-13 करीता  शिष्‍यवृत्‍ती  दि. 28 जून 2012 चे अन्‍वये  जाहिर झाली असून, नमुना फॉर्म व माहितीपत्रक  IAF BA  च्‍या www.indianairforce.nic.in   या वेबसाईटवर उपलब्‍ध आहे.  यासाठी जिल्‍हा सैनिक कल्‍याण  अधिकारी, वर्धा यांच्‍याशी संपर्क साधावा.
                                                0000 

माजी सैनिक रोजगार मेळावा


            वर्धा,दि.10- जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी वर्धा यांचे अध्‍यक्षतेखाली बुधवार दिनांक 29 ऑगस्‍ट 2012 रोजी जिल्‍हा सैनिक कल्‍याण कार्यालय, वर्धा येथे सकाळी  11 वाजता माजी सैनिकांचा  रोजगार मेळावा आयोजीत केलाआहे.
        रोजगार पटावरील माजी सैनिकांनी  मेळाव्‍यास उपस्थित रहावे व रोजगार नोंदणीपत्रक अद्यावत करण्‍यासाठी सोबत आणावे. असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी, वर्धा यांनी केले आहे.

                                                0000

हत्‍यारबंद पहरेदाराची भरती


         वर्धा,दि.10-स्‍टेट बँक ऑफ हैदराबाद, प्रधान कार्यालय, गनफउनड्री हैदराबाद यांनी महाराष्‍ट्र राज्‍यात विविध ठिकाणी स्‍टेट बँक ऑफ हैदराबादमध्‍ये हत्‍यारबंद पहारेदार यांची भरती करण्‍याबाबत कळविले आहे तरी ईच्‍छुक  माजी सैनिक उमेदवारांनी जिल्‍हा सैनिक कल्‍याण कार्यालय, वर्धा येथे दिनांक 17 ऑगस्‍ट 2012 पर्यंत संपर्क करावा.
          उमेदवाराची  शैक्षणिक पात्रता 8 वी पास,  उमेदवार 12 वी पास नसावा. शारीरीक पात्रता  SHAPE-I , आवेदन पत्र पोहचण्‍याची  शेवटची तारीख 25 ऑगस्‍ट 2012 आहे. उमेदवारांनी  जातीचे प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, शाळा सोडल्‍याचा दाखल, डिस्‍चार्ज बुक याचा समावेश असावा.
          वर्धा जिल्‍ह्यातील पात्र माजी  सैनिकांनी जास्‍तीत जास्‍त संख्‍येनी  या संधीचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन फ्ला.ले.धनंजय य. सदाफळ, जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी , वर्धा यांनी केले आहे.
                                                0000000

Thursday 9 August 2012

अत्‍याचार पिडीतांना जातीचे प्रमाणपत्र उपलब्‍ध करुन द्यावे - जिल्‍हाधिकारी


          वर्धा, दि. 9- अनुसूचित जाती व अनुसूचित जामीतीच्‍या घटकातील अत्‍याचार पिडीतांना कायदेशिररित्‍या त्‍वरीत लाभ व न्‍याय मिळवून देण्‍यासाठी जातीच्‍या प्रमाणपत्राची गरज असते.  अन्‍यथा  असे प्रकरणातील लाभार्थींना लाभ व न्‍याय मिळवून देण्‍यासाठी विलंब लागतो. या प्रकरांना विलंब होऊ नये यासाठी संबधित विभागाने अत्‍याचार पिडीतांना जातीचे प्रमाणपत्र तातडीने उपलब्‍ध करुन देण्‍यात यावे असे निर्देश जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने यांनी दिले.
          जिल्‍हाधिकारी यांच्‍या सभागृहात आज जिल्‍हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्‍न झाली त्‍याप्रसंगी ते बोलत होते.
      यावेळी अप्‍पर पोलीस अधिक्षक टि.एस.गेडाम, सामाजिक न्‍याय विभागचे सहाय्यक आयुक्‍त के.जे. बागुल, समितीचे सदस्‍य विजय पर्वत, डॉ. ए.एच.रिझवी, चंद्रशेखर झोड, शासकिय अभियोक्‍ता एम.एन.माळोद व नाहस विभागाचे पोलीस निरीक्षक ए.पी. सातघरे आदी मान्‍यवर  उपस्थित होते.
       ग्रामीण क्षेत्रातील अत्‍याचार पिडीतांना पुरेसे ज्ञान नसल्‍यामुळे  त्‍या व्‍यक्‍ती  कायदेशिर बाबीसाठी पुढाकार घेत नसल्‍याचे सांगून जिल्‍हाधिकारी चन्‍ने म्‍हणाले की  अन्‍यायग्रस्‍थ  लोकांना कायदेशिर बाबीचे मार्गदर्शन करुन आवश्‍यक ते कागदपत्रे प्राप्‍त  करुन घेतल्‍यास पिडीतांना शासनाकडून अर्थसहाय्य  मंजूरीच्‍या प्रक्रिया तातडीने पूर्ण होईल.  त्‍याचा लाभ सर्वसामान्‍य पिडीतांना होऊ शकेल.
        याप्रसंगी बोलताना सहाय्यक आयुक्‍त बागुल म्‍हणाले की, एप्रिल 2012 ते जुलै 2012 याकालावधीमध्‍ये अनुसूचित जाती व जमाती अत्‍याचारप्रतिबंध कायद्याअंतर्गत 9 प्रकरणापैकी 4 प्रकरणे  न्‍यायालयात दाखल झाली असून उर्वरीत पाच प्रकरणे  पोलीस तपासावर आहेत. त्‍यातील काही प्रकरणांत जात प्रमाणपत्र प्रलंबित आहेत. तथापि या 9 प्रकरणापैकी तीन प्रकरणामध्‍ये लाभार्थ्‍यांना  1 लक्ष 81 हजार 250 रुपयाचे अर्थसहाय्य देण्‍यात आले असल्‍याची माहिती  त्‍यांनी  दिली.
       यावेळी समितीच्‍या सदस्‍यांनी आपले विचार व्‍यक्‍त केले.
                                           000000  

Wednesday 8 August 2012

कंत्राटी पध्‍दतीने सफाई कामागारांची नियुक्‍ती


         वर्धा, दि. 8- जिल्‍हा रेाजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन कार्यालय, वर्धा अंतर्गत काम वाटप समिती मार्फत जिल्‍हा‍ आरोग्‍य अधिकारी , जिल्‍हा परिषद, वर्धा यांचे अंतर्गत प्राथमिक आरोग्‍य केंद्र, अल्‍लीपूर येथील आस्‍थापनेवरील एक सफाई कामगार कंत्राटी पध्‍दतीने नियुक्‍त करावयाचा आहे.
          जिल्‍ह्यातील इच्‍छूक सुशिक्षित बेरोजगारांच्‍या सहकारी सेवा संस्‍थानी काम वाटपाचे अटी व शर्ती पूर्ण करु शकती ल अशा संस्‍थांनी सहाय्यक संचालक, , जिल्‍हा रेाजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, वर्धा यांचेशी दि. 10 ऑगस्‍ट 2012 पर्यंत संपर्क साधावा.                               0000


वर्धा जिल्ह्यात पावसाची सरासरी पाऊस 415 मि.मी.


           वर्धा, दिनांक 8-: वर्धा जिल्ह्यात मागील 24 तासात एकूण 19.5 मि.मी.  पावसाची नोंद झाली आहे. एकूण पावसाची आतापावेता सरासरी 415.00 मि.मी. नोंद करण्‍यात आली आहे.
       जिल्ह्यात मागील 24 तासात तालुकानिहाय झालेला पाऊस व कंसात एकूण झालेला पाऊस पुढीलप्रमाणे
       वर्धा- 3.1 मि.मी.(429.02), सेलू- 10  मि.मी.(234), देवळी-2.6 (301.04), हिंगणघाट- निरंक मि.मी.(485.4), आर्वी- निरंक मि.मी.(494), आष्टी 0.4 मि.मी.(355.04), समुद्रपूर-2.4 मि.मी.(581), आणि कारंजा- 1.00 मि.मी.( 439.06)मि.मी. पावसाची नोंद झाली  आहे.
                                                            0000000

आंतरराष्‍ट्रीय युवा दिना निमित्‍ताने मॅरेथॉन स्‍पर्धेत युवकांनी सहभागी व्‍हावे -अप्‍पर जिल्‍हाधिकारी


     
     वर्धा, दि. 8- एच.आय.व्‍ही. व एड्स या रोगा विषयी समाजातील युवा पिढींना अधिक माहिती व्‍हावी तसेच या रोगा पासून होणा-या दुष्‍परिणामाची जाणीव निर्माण व्‍हावी यासाठी आंतरराष्‍ट्रीय युवा दिना निमित्‍ताने येत्‍या 12 ऑगस्‍ट रेाजी आरोग्‍य विभागा मार्फत जिल्‍हासतरावर मॅरार्थान दौड स्‍पर्धेचे आयेाजन करण्‍यात येणार आहे. युवकांनी मोठ्यासंख्‍येने या मॅरेथॉन दौड स्‍पर्धेमध्‍ये सहभागी वहावे असे आवाहन  अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी केले आहे.
     जिल्‍हाधिकारी यांच्‍या सभागृहात एच.आय.व्‍ही. एड्स नियंत्रण संस्‍थेची आढावा बैठक काल त्‍यांचे अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाली त्‍यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी अप्‍पर पेालीस अधिक्षक टि.एस.गेडाम, निवासी वैदृयकीय अधिकारी धामटे व स्‍वयंसेवी संस्‍थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
      एच.आय.व्‍ही. रोगाने ग्रासलेल्‍या रुग्‍णांना समाजात एकाकीपणाचे जीवन जगावे लागत असल्‍यामुळे त्‍यांच्‍या उदर्निवाहासाठी शासन निर्णयानुसार बाधित रुग्‍णांना  लाभ देण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात  येणार असल्‍याचे सांगून अप्‍पर जिल्‍हाधिकारी भागवत म्‍हणाले की अच.आय.व्‍ही. एड्सला आळा घालण्‍यासाठी स्‍वयंसेवी संस्‍थांनी समाजात जनजागृती करुन या रोगाचे आरोग्‍यावर होणारे विपरीत परिणामाची माहिती देण्‍यात यावी. तसेच या रुग्‍नांना तातडीने औषधोपचार करुन समोपदेशन करण्‍यात यावे असे आवाहन यांनी केले.
      याप्रसंगी शिवा देवगडे यांनी गेल्‍या तीन महिन्‍यात एडस बाधीत रुग्‍णावर करण्‍यात आलेल्‍या औषधोपचाराबाबत माहिती सांगून आंतरराष्‍ट्रीय युवा दिनानिमित्‍त काढण्‍यात येणा-या मॅराथॉन रॅलीच्‍या स्‍पर्धेची माहिती दिली.
      यावेळी एडस नियंत्रण संस्‍थाचे सदस्‍य उपस्थित होते.
                        000000        

सार्वजनिक वाचनालयांनी लोकराज्‍य मासिक सुरु करावे


           
     वर्धा, दि. 8-महाराष्‍ट्र शासनातर्फे प्रकाशित होणा-या लोकराज्‍य हे मासिक सर्व सार्वजनिक शासनमान्‍य ग्रंथालयामध्‍ये सुरु करावे अशा सुचना नागपूर विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक संजय बनसोड यांनी केले आहे.
           वर्धा जिल्‍ह्यातील सर्व  शासनमान्‍य ग्रंथालयांनी महाराष्‍ट्र शासनाचे मुख्‍पत्र असलेलया लोकराज्‍य मासिकाच्‍या दोन प्रती ग्रंथालयासाठी सुरु कराव्‍यात. तसेच लोकराज्‍य या मासिकाची वार्षिक वर्गणी  रुपये 100 जिल्‍हा माहिती अधिकारी, प्रशासकीय भवन, 2 रा माळा, वर्धा  येथे जमा करावी अशी सुचनाही शासकीय जिल्‍हा ग्रंथालयाचे ग्रंथपाल सुरज मडावी यांनी केली आहे.
                                                            00000

कुंडी पंचायत समिती गणाची निवडणूक मतदानाच्‍या दिवशी आठवडी बाजार बंद


       वर्धा, दि. 8- कारंजा पंचायत समितीची गण क्र. 12 कुंडी या मतदान क्षेत्रात दि. 12  ऑगस्‍ट रोजी मतदान होत असून या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्‍यात येणार आहे. तसेच या दिवशी  भरणारा आठवडी बाजार अन्‍य दिवशी भरण्‍यास जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने  यांनी सुचना केली आहे.
        जिल्‍ह्यात पंचायत समिती कारंजा मधील गण क्रमांक 12 कुंडीचे पोट निवडणूक 12 ऑगस्‍ट रोजी होत असल्‍यामुळे पणन संचालकांनी मतदानाच्‍या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्‍यास कळविले असून मतदानाच्‍या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवावा असेही जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्‍दारे कळविले आहे.
                                                            00000


हातपंपाव्‍दारे मिळणार निर्जंतुंकीकरण पिण्‍याचे पाणी


नाविन्‍यपूर्ण संशोधन
                             वर्धाच्‍या युवा अभियंत्‍याचे संशोधन
       वर्धा, दि.8-ग्रामीण भागात पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी हातपंपाचा सर्वत्र वापर होतो. परंतू हातपंपाव्‍दारे मिळणारे पाणी शुध्‍द असतेच असे नाही. हातपंपामधून  येणा-या  पाण्‍यासोबतच क्‍लोरीनची  मात्रा मिसळून  शुध्‍द पाणी करण्‍याचे   संशोधन वर्धाचे युवा अभियंता  व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे दिपक धोटे  यांनी  यशस्‍वीपणे  संशोधन केले आहे. अशा प्रकारचे  क्‍लोरी -डी  प्रथमच विकसीत झाले आहे.
ग्रामीण भागात पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी  सार्वजनिक विहीरीसह हातपंपाचा वापर मोठ्या  प्रमाणात  केल्‍या जातो. परंतू भुगर्भातून येणारे पाणी  शुध्‍द करण्‍यासाठी  कुठलीही  शास्‍त्रशुध्‍द व्‍यवस्‍था  अद्यापपर्यंत उपलब्‍ध नाही. पाण्‍यामध्‍ये  ब्लिचींग पावडर मिसळवून  पिण्‍याच्‍या पाण्‍याचा  पुरवठा केल्‍या जातो. परंतू हातपंपाव्‍दारे पिण्‍यासाठी वापरण्‍यात येणा-या पाण्‍यामध्‍ये  योग्‍य प्रमाणात  क्‍लोरीन मिसळल्‍या न गेल्‍यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जलजन्‍य आजाराचा सामना करावा लागतो.
जनतेला शुध्‍द क्‍लोरीनेशन झालेले पाणी मिळावे यासाठी  युवा अभियंता दिपक धोटे यांनी सलाईन पध्‍दतीवर आधारीत क्‍लोरी -डी   नावाचे  हँडपंप  निर्जंतुकीकरण यंत्र विकसीत केले असून हे यंत्र  अत्‍यंत  अल्‍प किमतीत  शक्‍य झाले  आहे. तसेच हे यंत्र कुठल्‍याही  हातपंपावर सहजपणे  बसविणे शक्‍य आहे.
पिण्‍याच्‍या पाण्‍याचे  निर्जंतुकीकरण करताना ज्‍या पध्‍दतीने  सलाईन व्‍दारे रुग्‍णांना  औषध दिले जाते त्‍याच पध्‍दतीचा वापर करुन  हातपंपावर पाच लिटर  क्‍लोरीनचे मिश्रण  येईल या पध्‍दतीचे  पिव्‍हीसी  कंटेनर बसविण्‍यात आले.  या कंटेनर मधून क्‍लोरीनचे द्रावण व्‍दीपध्‍दतीव्‍दारे थेट भूगर्भातील पाण्‍यात मिसळविण्‍याची व्‍यवस्‍था तयार केली आहे. पाणी हातपंपाव्‍दारे काढताना या पाण्‍यामध्‍ये थेट क्‍लोरीन मिसळत असल्‍यामुळे  शुध्‍द पाण्‍याचा पुरवठा करणे सुलभ झाले आहे.
वर्धा जिल्‍हा परिषदेच्‍या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात दिपक धोटे हे शाखा अभियंता म्‍हणून कार्यरत असून ग्रामीण भागात  पिण्‍याचे शुध्‍द पाणी  पुरविण्‍याची  जबाबदारी  असताना  ग्रामपंचायतमध्‍ये  पुरविण्‍यात येणा-या ब्लिचींग पावडरमध्‍ये  क्‍लोरीनचे प्रमाण  अल्‍प असल्‍यामुळे  तसेच क्‍लोरीन चुन्‍यामध्‍ये असल्‍याने  हातपंपामध्‍ये  मिसळतांना क्‍लोरीनचे प्रमाण कमी  तसेच चुन्‍याच्‍या द्रवणामुळे
 हातपंपातील पाईपही  खराब होण्‍याची  शक्‍यता  अधिक होती. क्‍लोरीन मिसळताना  हातपंप उघडणे व  भुगर्भातील पाण्‍यात क्‍लोरीन टाकने  अत्‍यंत  क्लिस्ट  काम
असल्‍याने  भुगर्भातील  थेट पाणी पिण्‍याशिवाय  जनतेला पर्याय नव्‍हता  त्‍यामुळे  जलजन्‍य आजारही  होण्‍याची  शक्‍यता अधिक असायची .
           हातपंपामधून  मिळणा-या पाण्‍यामध्‍ये क्‍लोरीनचे द्रवण मिश्रीत पाणी  देण्‍यासाठी  केलेल्‍या संशोधनाला यश आले असून, अशा प्रकारचे  क्‍लोरीनयुक्‍त  पाणी मिळण्‍याचे  हे बहुधा  पहिले संशोधन ठरले आहे.
क्‍लोरी-डी  हे निर्जंतुकीकरण करुन पाणी  पुरवठा करण्‍याच्‍या  संयंत्रासाठी  सुमारे 3 हजार 500 रुपये खर्च अपेक्षित असून हे सयंत्र तयार करण्‍यासाठी  स्‍थानिक  वर्धा येथीलच अनिल खैरकर यांच्‍या  कार्यशाळेत  हे यंत्र तयार करण्‍यात आले आहे. यासाठी  ग्रामीण पाणी पुरवठा  विभागाचे कार्यकारी अभियंता डी.एल. बोरकर, सहाय्यक भूवैज्ञानिक  नितीन महाजन, उपअभियंता
श्री. अजय बेले, शाखा अभियंता  श्री. भगत यांचे सहकार्य लाभले आहे.  
                     क्‍लोरीन ऐवजी  सोडियम हायपोक्‍लोराईड 
          पिण्‍याच्‍या पाण्‍यामध्‍ये  सर्वत्र ब्लिचींग पावडरचा वापर करण्‍यात येतो. ब्लिचींग पावडरमध्‍ये सुमारे 33 टक्‍के क्‍लोरीन  आहे. ग्रामीण भागात पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी क्‍लोरीन  वापरताना त्‍याचा जास्‍त दिवस वापर केल्‍यामुळे  त्‍यातील क्‍लोरीनचे प्रमाण कमी होऊन चुना शिल्‍लक राहतो त्‍यामुळे  हातपंपाचे साहित्‍यही खराब होण्‍याचा धोका असतो.
          क्‍लोरीनेशन करताना  सोडीयम हायपोक्‍लोराईड  या द्रव स्‍वरुपातील  वापर केल्‍यास  60 टक्‍के पर्यंत  क्‍लोरीन चे प्रमाण उपलब्‍ध  होऊ शकते. क्‍लोरी-डी यामध्‍ये  सोडीयम हायपोक्‍लोराईडचा वापर सुलभ पध्‍दतीने करणे शक्‍य आहे.
                 क्‍लोरी-डी  या यंत्राव्‍दारे  हातपंपाच्‍या  सहाय्याने  थेट 200 फुटापर्यंत भूगर्भातील पाण्‍यामध्‍ये  क्‍लोरीन मिश्रण मिळविणे सहज सुलभ  आहे तसेच आयव्‍ही ट्युबचा वापर केल्‍यास  हातपंपामधून  येणा-या पाण्‍यासोबत आवश्‍यक असलेली  क्‍लोरीनची मात्रा मिसळून पिण्‍याचे शुध्‍द पाणी पुरवू शकत असल्‍याचे  यावेळी  शाखा अभियंता दिपक धोटे यांनी  सांगितले.
                     प्रधान सचिवांकडून  क्‍लोरी-डी पाहणी
          ग्रामीण भागात  हातपंपासोबत  क्‍लोरीन  मिश्रीत पाणी उपलब्‍ध   होणा-या क्‍लोरी-डी  या संशोधनाची  व उपकरणाची  पाहणी  राज्‍याच्‍या  पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभागाच्‍या  प्रधान सचिव  श्रीमती मालीनी शंकर यांनी  केली. हातपंपासाठी  उपयुक्‍त असलेले  क्‍लोरी- डी  या  उपकरणाची पेटेंट करण्‍याची सुचना तयांनी  केली.
          जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने, पाणी  पुरवठा विभागाचे  अधिक्षक अभियंता  किरणकुमार कोसे यांनीही  क्‍लोरीन डी हे संयंत्र  पाणी निर्जंतुकीकरणासाठी  उपयुक्‍त असल्‍याचे  सांगि‍तले.
                                                                    
                                        ०००००००

Tuesday 7 August 2012

संकटात सापडलेल्‍या महिलांकरीता 103 व 1091 टोल फ्री हेल्‍पलाईन


वर्धा, दि. 7 - महिलांवर होणा-या अन्‍याय व अत्‍याचारास प्रतिबंध व्‍हावा व संकटात सापडलेल्‍या   महिलांना तातडीने सहाय्य व्‍हावे यासाठी 1091 हा टोल फ्री हेल्‍पलाईन  क्रमांक भारत संचार निगम तर्फे उपलब्‍ध करुन दिला आहे.
             महिलांवर होणा-या अन्‍याय व अत्‍याचारास प्रतिबंध व्‍हावा या उद्देशाने शासन विविध पावले उचलत आहे. या अनुषंगाने  संकटात सापडलेल्‍या महिलांना तातडीने सहाय्य करण्‍यासाठी मुंबई व उपनगर जिल्‍ह्यामध्‍ये महानगर टेलीफोन लिमिटेड यांच्‍यातर्फे 103 व राज्‍यातील सर्व जिल्‍ह्याकरीता भारत संचार निगम लिमीटेड यांच्‍या तर्फे 1091 हा हेल्‍पलाईन क्रमांक कार्यरत आहे.
                                                            00000

116 ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणूकीची आचार संहिता लागू - शेखर चन्‍ने


                               

·        28  ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक
·        9 सप्‍टेंबर रेाजी मतदान
·        ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता

         वर्धा, दि. 7- राज्‍य निवडणूक आयोगाने जिल्‍ह्यातील 116
ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक व 18 ग्रामपंचायतींच्‍या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचार संहिता लागू राहणार आहे. यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग  होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्‍यावी, अशा सूचना जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने यांनी दिल्‍यात.
      जिल्‍ह्यात ग्रामपंचायतीच्‍या 116 सार्वत्रिक निवडणूका व 28 ग्रामपंचायतीच्‍या पेाटनिवडणूका येत्‍या 9 सप्‍टेंबर रोजी होवू घातल्‍या आहेत.
                                                            000000

जिल्‍हा पोलीस क्रीडा स्‍पर्धेचे थाटात उदघाटन



     वर्धा, दि. 7 – काल पोलीस मुख्‍यालयाच्‍या क्रीडांगणावर जिल्‍हा  पोलीस क्रिडा स्‍पर्धेचे उदघाटन  जिल्‍हा  पोलीस अधिक्षक अविनाशकुमार अप्‍पर पोलीस अधिक्षक टी.एस.गेडाम तसेच उत्‍तम  गालवाचे उपव्‍यवस्‍थापक अजयकुमार यांनी  क्रिडा ज्‍योत पेटवून  केले.
           यावेळी निवासी उपपोलीस अधिक्षक मुरलीधर नळे उपविभागीय पोलीस अधिकारी  मनोज पाटील, व्हि.एच.सुसतकर, पी.एस.देशमुख, पोलीस निरीक्षक बाबा डोंगरे, श्री, मिर्झा, श्री. कुहीकर आदी मान्‍यवर उपस्थित होते.
            याप्रसंगी प्रास्‍तावीक करताना अप्‍पर पोलीस अधिक्षक गेडाम म्‍हणाले की, पेालीस क्रीडा स्‍पर्धा दरवर्षी सातत्‍याने आयोजित केली जाते. जिल्‍हा पोलीस अधिक्षकांच्‍या  मार्गदर्शनाखाली संपन्‍न होणा-या या क्रीडा स्‍पर्धेमध्‍ये वर्धा मुख्‍यालय, हिंगणघाट, आर्वी , पुलगांव व वर्धा उपविभागातील 150 पेालीस सहभागी झालेले असून, या क्रीडा स्‍पर्धेमध्‍ये हॉकी, फुटबाल, हॉलीबॉल, कबड्डी व अॅथलीटीक च्‍या  सर्व प्रकारांचा या स्‍पर्धेत समावेश करण्‍यात आला आहे. स्‍पर्धकांनी आपली खेळाडू वृत्‍ती जोपासून सांघीक भावनेने  खेळ करावा, असे आवाहन त्‍यांनी  याप्रसंगी केले.
     क्रीडा स्‍पर्धेचे उदघाटन करताना उत्‍तम गालवाचे अजयकुमार म्‍हणाले की, पेालीसांना समाजाच्‍या संरक्षणाची जबाबदारी व कर्तव्‍यही पार पाडावी लागतात. यामुळे त्‍यांना शारिरीक व मानसिक तनावाला सामोरे जावे लागते. या प्रकारामुळे  पोलीसांच्‍या आरोग्‍यावर सुध्‍दा विपरीत परिणाम होत असतो. मात्र क्रीडा स्‍पर्धेत पेालीस सहभागी  झाल्‍याने पेालीसांचे आरोग्‍य सुदृढ राहत असते. तसेच त्‍यांना तनावमुक्‍त जीवन जगता येते. क्रीडा  स्‍पर्धेत सहभागी झाल्‍याने  त्‍यांच्‍या कार्यक्षमतेत सुध्‍दा वाढ होते. असे सांगून  स्‍पर्धेत सहभागी  झालेल्‍या  खेळाडूंना त्‍यांनी शुभेच्‍छा  देवून क्रीडा स्‍पर्धेचे उदघाटन झालयाचे जाहीर केले.                                                                                                                          
     तत्‍पूर्वी सर्व क्रीडा स्‍पर्धकांनी  पथसंचलन करुन मान्‍यवरांना सलामी दिली. यावेळी उत्‍तम गालवाचे अनेक अधिकारी, पेालीस अधिकारी  व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार  प्रदर्शन मुरलीधर नळे यांनी मानले.
                                                            00000

लोकशाही दिनातील तक्रारी प्राधान्‍याने सोडवा - संजय भागवत




·        लोकशाही दिनात 71 तक्रारी दाखल
·        शेती, अतिक्रमण, नुकसान भरपाई संदर्भात तक्रारी
वर्धा,दि.7- जिल्‍हा लोकशाही दिन हा जिल्‍ह्यातील जनतेला आपली      गा-हाणी मांडण्‍याचे हक्‍काचे व्‍यासपिठ उपलब्‍ध झाले असून, लोकशाही दिनात 71 नागरिकांनी आपली गा-हाणी मांडली. अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी प्रत्‍येक नागरिकांच्‍या तक्रारीची दखल घेवून त्‍यांची गा-हाणी ऐकलीत.
      जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात आयोजित लोकशाही दिनात 71 तक्रारी प्राप्‍त झाल्‍यात यात 41 नविन असून 30 जुन्‍या तक्रारी संदर्भात आपल्‍या मागण्‍याचे निवेदन सादर केले.
लोकशाही दिनात महिन्‍याच्‍या पहिल्‍या सोमवारी जिल्‍ह्यातील जनतेच्‍या गा-हाणी व तक्रारीची दखल  घेवून त्‍या विविध विभाग प्रमुखांकडून  तीस दिवसात सोडविण्‍याबाबत संबंधित विभागांना पाठविण्‍यात येत असल्‍यामुळे जनतेच्‍या गा-हाणी व तक्रारीची दखल घेतली जाते. लोकशाही दिनात जनतेच्‍या तक्रारीची निराकरण होवून त्‍यांना योग्‍य न्‍याय देण्‍याचा जिल्‍हा प्रशासनाचा प्रयत्‍न राहातो.
     लोकशाही दिनात दाखल होणारी प्रत्‍येक तक्रार निर्धारित कालावधीत सोडवून त्‍या संदर्भातील माहिती तक्रार करणा-या नागरिकांनादेण्‍याची सूचना यावेळी अपर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी विभाग प्रमुखांना केली.
      लोकशाही दिन सर्व विभाग प्रमुख उपस्थित असल्‍यामुळे जनतेची गा-हाणी तात्‍काळ सोडविण्‍यासही मदत होत आहे. यावेळी सहकार, नगर प्रशासन, विद्युत वितरण कंपनी, पोलीस विभागाशी संबंधित तक्रारी संदर्भात तक्रार दाराला तात्‍काळ वस्‍तुस्थितीची माहिती देण्‍यात आली.
     जिल्‍हा परिषदे संदर्भातील तक्रारीची दखलही यावेळी घेण्‍यात येवून ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्‍यात आला.
     लोकशाही दिनात प्राप्‍त होणा-या प्रत्‍येक तक्रारी संदर्भात विभाग प्रमुखाकडून वस्‍तुस्थिती तसेच तक्रारीचा निपटारा करण्‍या संदर्भात तात्‍काळ कार्यवाही करुन अहवाल मागविण्‍यात येत असल्‍याची माहिती अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी दिली.
      यावेळी विविध विभागाचे वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.
                                              000000