Thursday 10 May 2012

कारंजा येथील आदिवासी वसतीगृहात प्रवेश

     वर्धा,दि.10- जिल्‍ह्यातील कारंजा (घा.) येथे आदिवासी विकास विभागाव्‍दारे आदिवासी मुलींकरीता शासकीय वसतीगृह सुरु करण्‍यात आलेले आहे.सदर वसतीगृहात 8 व्‍या वर्गापासुन ते पुढील शिक्षण घेणा-या आदिवासी विद्यार्थिनींना वर्ग 8, वर्ग 11 वा व बी.अे. पार्ट-1 मध्‍ये प्रवेश देणे सुरु आहे. सदर वसतीगृहात भोजन व निवासाची मोफत व्‍यवस्‍था  असुन दरमहा निर्वाह भत्‍ता  देण्‍यात येतो. तसेच पाठ्यपुस्‍तके व शैक्षणिक साहित्‍य निःशुल्‍क पुरविण्‍यात येते.
    इच्‍छुक विद्यार्थिनींनी प्रवेश अर्ज आवश्‍यक कागदपत्रासह भरुन आपला प्रवेश निश्चित करावा. प्रवेश अर्ज कार्यालयीन वेळेत वसतीगृहाच्‍या कार्यालयात विनामुल्‍य  मिळतील. प्रवेश अर्ज वितरित करण्‍याची अंतिम तारीख निकाल लागल्‍यापासुन 15 दिवस असेल.अर्जासोबत गुणपत्रिकेची सत्‍यप्रत, शाळा सोडल्‍याचा दाखला सत्‍यप्रत, तहसिलदार यांचा जातीचा दाखला, तहसिलदार यांचे उत्‍पन्‍नाचे प्रमाणपत्र, शिकत असलेल्‍या  शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र (ग्रामपंचायतचे) जोडावयाचे असल्‍याची माहिती गृहपाल, आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, कारंजा घाडगे, जि. वर्धा कळवितात.

व्‍यवसायीकांनी परवाना अथवा नोंदणी घेणे बंधनकारक

    वर्धा,दि.10-जिल्‍ह्यातील सर्व अन्‍न पदार्थ उत्‍पादक, विक्रेते, वितरक, हॉटेल,रेस्‍टारंट,पानपट्टीधारक, धाबेवाले, कॅटरर, फिरते विक्रेते, दुध विक्रेते, बेबीफुड व फुड सप्‍लीमेंट विक्रेते, मांस व मांस पदार्थ विक्रेते, अस्‍थायी स्‍टॉलधारक, फळ व भाजीपाला विक्रेते, घरगुती खानावळ व डब्‍बेवाले तसेच अन्‍न पदार्थ वाहतुक करणारे वाहतुकदार, सरकारी स्‍वस्‍त धान्‍य दुकान, शासकीय व निमशासकीय गोदाम, बचतगट व इतर अन्‍न व्‍यवसाय चालक  यांना दि. 5 ऑगस्‍ट 2011 पासुन संपुर्ण महाराष्‍ट्र राज्‍यामध्‍ये अन्‍न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नुसार त्‍याची अंमलबजावणी सुरु झालेली असून कलम 31 (1) व (2) नुसार सर्व अन्‍न व्‍यवसाय चालक यांनी परवाना घेणे अथवा नोंदणी करणे बंधनकारक आहे.
     विना परवाना व्‍यवसाय करणे कलम 63 नुसार कायद्याने गुन्‍हा आहे व त्‍यांच्‍या विरुध्‍द न्‍यायालयीन कार्यवाही होऊ शकते. ज्‍या अन्‍न व्‍यावसायीकांनी अन्‍न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954 अंतर्गत परवाना घेतला असेल अशा व्‍यावसायीकांनी दि. 4 ऑगस्‍ट 2012 पूर्वी कार्यालयात रितसर अर्ज करुन नवीन कायद्यानुसा पारवान्‍याचे परिवर्तन करुन घेणे बंधनकारक आहे. जर अन्‍न व्‍यवसाय चालक यांनी दि. 4 ऑगस्‍ट 2012 पूवी्र अन्‍न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत आपल्‍या जून्‍या परवान्‍याचे परिवर्तन करुन घेतले नाही तर त्‍यांचा व्‍यवसाय विना परवाना गृहीत धरुन त्‍यांचेविरिफध्‍द तसेच विना परवाना व्‍यवसाय करणा-या अन्‍न व्‍यवसाय चालक विरुध्‍द कायदेशिर कार्यवाही करण्‍यात येईल. या कार्यालयामार्फत माहे मे व जुन 2012 मध्‍ये ग्रामीण भागात परवाना शिबीरांचे आयोजन करण्‍यात येत आहे. त्‍याचप्रमाणे परवाना अट क्र. 14 नुसार सर्व उत्‍पादक,आयातदार,वितरक  यांनी अन्‍न पदार्थ खरेदी व विक्रीचा व्‍यवहार हा कायद्यामध्‍ये दिलेल्‍या  बिलाचा मसुदा फार्म-ई नुसारच करावा व प्रत्‍येक बिलावर परवानाधारकाचा अथवा नोंदणीधारकाचा क्रमांक

नमुद असेल याची दक्षता घ्‍यावी तसेच आपण अन्‍न पदार्थाची खरेदी व विक्री करताना तो परवानाधारक किंवा नोंदणीधारक आहे व त्‍यांचा परवाना अथवा नोंदणीक्रमांक बिलावर नमुद आहे याची खातरजमा करावी.
      सर्व अन्‍न व्‍यवसायीकांनी सहायक आयुक्‍त यांचे कार्यालय, अन्‍न व औषध प्रशासन सुदामपुरी,आरती चौक, वर्धा येथे तत्‍परतेने नुतनीकरणाकरीता अथवा नविन परवान्‍याकरीता रितसर अर्ज करावा अथवा या प्रशासनातर्फे आयोजीत करण्‍यात असलेल्‍या  विविध तालुक्‍यातील शिबिरांमध्‍ये रितसर अर्ज करुन परवाना घ्‍यावा. अन्‍न व्‍यवसाय चालक यांना परवाना अथवा नोंदणीबाबत कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्‍यास कार्यालयीन दुरध्‍वनी क्र. 07152-243078 अथवा सहाय्यक आयुक्‍त (अन्‍न) चे दि..तु.संगत यांचा भ्रमणध्‍वनी क्र. 9867264888 वर संपर्क साधावा असे कळविले आहे.
                            0000  

2012-13 चे खरीप हंगामाचे नियेाजन जिल्‍ह्यात 1 लाख 65 हजार हेक्‍टरमध्‍ये सोयाबिनची लागवड

        वर्धा दि.10– वर्धा जिल्‍ह्यात कृषी विभागाने 2012-13 या वर्षाकरीता खरीप पिकाचे नियेाजन केले असुन, जिल्‍ह्यामध्‍ये 1 लाख 65 हजार हेक्‍टर  क्षेत्रामध्‍ये सर्वाधिक सोयाबिन पिकाची लागवड करण्‍यात येणार असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.
     जिल्‍हाधिकारी यांच्‍या सभागृहात काल 2012-13 या वर्षाच्‍या खरीप हंगामाची आढावा बैठक त्‍यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाली त्‍याप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या.
    यवेळी जि.प.चे मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने, कृषी अधिक्षक भाऊसाहेब ब-हाटे, नाबार्डचे सहारूयक महाप्रबंधक स्‍नेहल बन्‍सोड, जिल्‍हा अग्रणी बँकेचे व्‍यवस्‍थापक एल.डी.डोंगरे, तालुका कृषि अधिकारी व संबधित अधिकारी उपस्थित होते.
     वर्धा जिल्‍ह्यामध्‍ये 4 लक्ष 10 हजार 500 हेक्‍टर  जमीनीच्‍या क्षेत्रावर  लागवडीचे नियेाजन केले आहे त्‍यामध्‍ये कापसाची लागवड 1 लक्ष 63 हजार हेक्‍टर क्षेत्रावर,  सोयायिबनची 1 लक्ष 65 हजार हेक्‍टर क्षेत्रावर, तुर 74 हजार 900 हेक्‍टर क्षेत्रावर, ज्‍वारी 5 हजार हेक्‍टर  क्षेत्रावर, भुईंमुंग 350 हेक्‍टर क्षेत्रावर , मुंग 900 हेक्‍टर  क्षेत्रावर , उडिद 725 हेक्‍टर क्षेत्रावर  व तीळ 625 हेक्‍टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन आहे.
       आर्वी तालुक्‍यात 48 हजार 450 हेक्‍टर क्षेत्रावर लागवडीचे नियेाजन करण्‍यात आले असून, त्‍यामध्‍ये ज्‍वारी 950 हेक्‍टर , कापूस 23 हजार हेक्‍टर , सोयाबिन 17 हजार हेक्‍टर , तुर 7 हजार 400 हेक्‍टर , मुंग 50 हेक्‍टर , उडिद 25 हेक्‍टर  , तीळ 25 हेक्‍टर क्षेत्राचा  समावेश आहे. कारंजा 42 हजार 500 हेक्‍टर क्षेत्राचे नियेाजन करण्‍यात आले असून, त्‍यामध्‍ये तालुक्‍यात  42 हजार 500 हेक्‍टर क्षेत्राचे नियेाजन करण्‍यात आले असून,त्‍यामध्‍ये ज्‍वारी 1 हजार 300 हेक्‍टर , कापूस 7 हजार 200 हेक्‍टर , सोयाबिन 27 हजार 500, भुईमंग 200, तूर 6 हजार, मुंग 150, उडिद 100, तीळ 50 हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. आष्‍टी तालुक्‍यात 29 हजार 800 हेक्‍टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन करण्‍यात आले असून, त्‍यामध्‍ये ज्‍वारी 250 हेक्‍टर , कापूस 13 हजार 400 हेक्‍टर , सोयाबिन 8 हजार 500 हेक्‍टर , भुईमुंग 50 हेक्‍टर, तुर 7 हजार 500 हेक्‍टर , मुंग व उडिद प्रत्‍येकी 50 हेक्‍टर क्ष्‍ेात्राचा समावेश आहे. वर्धा तालुकयात 54 हजार हेक्‍टर लागवड क्षेत्राचे नियेाजन करण्‍यात आले असून त्‍यामध्‍ये ज्‍वारी 300 हेक्‍टर, कापूस 23 हजार 400 हेक्‍टर, सोयोबिन 20 हजार हेक्‍टर , तूर 10 हजार हेक्‍टर , मुंग, तीळ व उडिद प्रत्‍येकी 100 हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे.सेलू तालुक्‍यात 44 हजार 100 हेक्‍टर क्षेत्रावर लागवडीचे नियेाजन करण्‍यात आले असून, त्‍यामध्‍ये ज्‍वारी 700 हेक्‍टर , कापूस 20 हजार हेक्‍टर , सोयाबिन 13 हजार हेक्‍टर, भुईंमुंग 100 हेक्‍टर , तूर 10 हजार हेक्‍टर , मुंग, उडिद व तीळ प्रत्‍येकी 100  हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. देवळी तालुक्‍यात  54 हजार 850 क्षेत्रावर लागवडीचे  नियेाजन करण्‍यात आले असून, त्‍यामध्‍ये ज्‍वारी 500 हेक्‍टर , कापूस 19 हजार हेक्‍टर, सोयाबिन 25 हजार हेक्‍टर , तूर 10 हजार हेक्‍टर, मुंग 150 हेक्‍टर, उडिद व तीळ 100 हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. हिंगणघाट तालुक्‍यात  66 हजार 700 हेक्‍टर लागवडीचे नियेाजन करण्‍यात आले असून, त्‍यामध्‍ये ज्‍वारी 500 हेक्‍टर , कापूस 25 हजार हेक्‍टर , सोयाबिन 26 हजार हेक्‍टर , तूर 15 हजार, मुंग 100, उडिद व तीळ प्रत्‍येकी 50 हेक्‍टर क्षेत्राचा  समावेश आहे. समुद्रपूर तालुक्‍यात  70 हजार 100 हेक्‍टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन करण्‍यात आले असून, ज्‍वारी 500 हेक्‍टर , कापूस 32 हजार हेक्‍टर , सोयाबिन 28 हजार हेक्‍टर , तूर 9 हजार हेक्‍टर , मुंग, उडिद व तीळ प्रत्‍येकी 200 हेक्‍टर क्षेत्रावर लागवडीचे नियेाजन करण्‍यात आले आहे.
               खरीप हंगामासाठी रासायनिक खते
     खरीप हंगाम 2012-13 खरीप हंगाम 2012-13 करीता रासायनिक खताचे खात्‍यामार्फत एकुण 94300 मे. टनाचे आवंटन मंजुर झाले असुन, त्‍यामध्‍ये युरीया 26810 मे.टन, डीएपी 29900 मे.टन, अेमओपी 8370 मे.टन, एसएसपी 10120 मे.टन, संयुक्‍त खत 18840 मे.टनाचा समावेश आहे. त्‍याचे तालुकानिहाय व ग्रेडनिहाय आवंटन करण्‍यात आले आहे. हंगामात पुरवठ्यासंदर्भात तुटवडा भासू नये म्‍हणून खात्‍याने 15294 मे.टन बफर साठा आवंटीत केला असून, त्‍यापैकी 10215 मे.टन साठा नियंत्रीत गोदामात शिल्‍लक आहे.अशी माहिती बैठकीत देण्‍यात आली.
                           000000   

2012-13 चे खरीप हंगामाचे नियोजन जिल्‍ह्यात 1 लाख 65 हजार हेक्‍टरमध्‍ये सोयाबिनची लागवड

     वर्धा दि.10– वर्धा जिल्‍ह्यात कृषी विभागाने 2012-13 या वर्षाकरीता खरीप पिकाचे नियोजन केले असुन, जिल्‍ह्यामध्‍ये 1 लाख 65 हजार हेक्‍टर  क्षेत्रामध्‍ये सर्वाधिक सोयाबिन पिकाची लागवड करण्‍यात येणार असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.

Tuesday 8 May 2012

अनुदान पात्रतेसाठी खाजगी प्राथमिक शाळांनी ऑनलाईन अर्ज केलेल्‍या शाळांच्‍या प्रस्‍तावावर आक्षेप नोंदविण्‍याबाबत सुचना

      वर्धा दि.8 न्‍यु इंग्‍लीश प्राथमिक शाळा, वर्धा, विनायक प्राथमिक शाळा, पिपरी, मातोश्री सिताबाई टालाटूले प्राथ.शाळा सिंदी (रे), नारायणराव महंतारे प्राथमिक शाळा, संत ज्ञानेश्‍वर वार्ड, हिंगणघाट, संजय गांधी उर्दू प्राथमिक शाळा, हिंगणघाट, मातोश्री खोडे प्राथमिक शाळा, संत कबीर वार्ड,हिंगणघाट, के.टी.महाजन प्राथमिक शाळा, वडनेर, कृषक प्राथमिक शाळा, आर्वी या शाळांनी अनुदान पात्रतेसाठी मुल्‍यांकन करण्‍याकरीता www.mahdoesecondary.com  या वेबसाईटवर  अर्ज उपलब्‍ध केलेला आहे. या शाळांवर कोणाचाही आक्षेप किंवा हरकती असल्‍यास दिनांक 10 मे 2012 पर्यंत लेखी स्‍वरुपात सादर करावे. त्‍यानंतर कोणाचेही आक्षेप किंवा हरकती स्विकारल्‍या जाणार नाही. असे शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी कळविले आहे.
                              00000

Monday 7 May 2012

परिक्षा केंद्रावर 144 कलम लागू

       वर्धा, दि.7 – महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या वैद्यकीय शिक्षण आणि औषध प्रशासन यांचे मार्फत  MHT- CET-2012  प्रवेशासाठी चाचणी परीक्षा दि. 10 मे 2012 रेाजी यशवंत महाविद्यालय, वर्धा, जे.बी.सायन्‍स कॉलेज, वर्धा, जी.एस.कॉमर्स कॉलेज, वर्धा, सुशिल हिंमतसिंघका विद्यालय, वर्धा, न्‍यु ईंग्‍लीश हाय स्‍कूल, वर्धा, केसरीमल गर्ल्‍स हायस्‍कूल, वर्धा, भारत ज्ञान मंदीरम कॉन्‍व्‍हेंट, वर्धा, अग्रगामी हायस्‍कूल, वर्धा, डॉ.आर.जी.भोयर इन्‍स्‍टीट्युट ऑफ फॉर्म अॅण्‍ड रिसर्च, वर्धा, न्‍यु ईंग्लिश ज्‍युनिअर कॉलेज, वर्धा आणि लोक महाविद्यालय, वर्धा या परिक्षा केन्‍द्रावर घेण्‍यात येणार आहे.
     परिक्षा सुरळीतपणे पार पाडाव्‍या यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी जयश्री भोज  यांना प्राप्‍त अधिकारान्‍वये या परिक्षा केंद्रावर 144 कलम लागू करण्‍यात आले असून दि.10 मे 2012 रोजी सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत  परिक्षा केंद्राच्‍या 100 मिटर  परिसरात दोन किंवा त्‍या पेक्षा अधिक व्‍यक्‍तींना एकत्रीत येण्‍यावर प्रतिबंध करण्‍यात आले आहे. तसेच झेरॉक्‍स, फॅक्‍स, मोबाईल, फोन, र्इ-मेल व इंटरनेट आदी सेवेवर प्रतीबंध करण्‍यता आले आहे.
                              00000