Friday 24 August 2012

सोयाबीनला सांभाळा जैवीक व रासायनीक औषधी उपलब्‍ध


      
        वर्धा,दि.24- सोयाबीन, कापूस तसेच तुरीच्‍या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवत असल्‍यामुळे  शेतक-यांनी  पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी  तात्‍काळ उपाययोजना करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. कृषी  विभागातर्फे गळीत धान्‍य विकास कार्यक्रमाअंतर्गत  जैवीक व रासायनीक औषधांचा पुरवठा तालुका स्‍तरावर उपलब्‍ध  करुन दिला असून,  शेतक-यांना  आवश्‍यकतेनुसार 50 टक्‍के अनुदानावर पुरवठा  करण्‍यात येत आहे.
           जिल्‍ह्यात  केन्‍द्र पुरस्‍कृत   गळीत धान्‍य विकास कार्यक्रमा अंतर्गत सोयाबीन पिकांची  56 प्रकल्‍प राबविण्‍यात येत आहेत. या प्रकल्‍पा अंतर्गत सोयाबीनवर येणा-या  किड रोगाच्‍या नियंत्रणासाठी रासायनीक व जैविक औषधे  उपलब्‍ध   करुन देण्‍यात आली आहेत. यामध्‍ये  अॅझाडीरेक्‍टीन  1500 पीपीएम चा  1 हजार 120 लिटरचा पुरवठा, बिव्‍हेरीया बॅसियाना चा 4 हजार 480 किलोचा पुरवठा, सुडोमोनास  2 हजार 240 किलो व वहर्टीसिलीयम  4 हजार 480 किलोचा पुरवठा करण्‍यात आला आहे.
         सोयाबीन या पिकासाठी जैविक किड नियंत्रणा अंतर्गत बिव्‍हेरीया 2 हजार 464 किलो व  व्‍हर्टीसिलीयमचा 1 हजार 232 किेलोचा पुरवठा ही उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे. शेतक-यांच्‍या मागणीनुसार  पीक संरक्षण औषधी  चा पुरवठा सुध्‍दा उपलब्‍ध  झाला आहे. केन्‍द्र पुरस्‍कृत गळित धान्‍य  विकास कार्यक्रमा अंतर्गत बिव्‍होरीया बासीयानाचाही  पुरवठा करण्‍यात येत आहे.
         पिकावरील किड रोग संरक्षण व सल्‍ला प्रकल्‍पाबद्दल  कापूस व सोयाबीन पिकाकरीता  1 हजार 344 थेरोमन सापळे (कामगंध सापळे) व 7 हजार 296 स्‍पोडो त्‍पेराही उपविभागीय स्‍तरावर उपलबध करुन देण्‍यात आला आहे. तसेच विभागीय स्‍तरावरुनही किटकनाशकांचा पुरवठा करण्‍यात येणार आहे.
          सोयाबीन पिकांवर  उंट अळी , तंबाखूवरील पाने खाणारी अळी व चक्रभुंगा किडीच्‍या नियंत्रणासाठी जैवीक व रासायनीक औषधांचा निश्चितच लाभ होणार आहे. शेतक-यांनीही किड नियंत्रणासाठी तात्‍काळ उपाययोजना करावेत तसेच तालुका कृषि अधिकारी यांचेकडून बिव्‍हेरीया, बॅसीयाना या जैविक किटक नाशकाची मागणी  तात्‍काळ नोंदवावी त्‍यामुळे सोयाबीन पिकाचे संरक्षण करणे निश्चितच सुलभ होणार आहे.
                                                             0000

नागभुषण पुरस्‍काराचे रविवारी वितरण


                           
       वर्धा, दि. 24- ज्‍येष्‍ठ गांधीवादी विचारवंत व अर्थशास्‍त्राचे गाढे अभ्‍यासक प्रा. ठाकुरदास बंग यांना यावर्षीचा नागभूषण पुरस्‍कार रविवार दिनांक  26 ऑगस्‍ट रोजी दुपारी 4 वाजता सेवाग्राम आश्रम येथे आयोजीत विशेष समारंभात देण्‍यात येणार आहे.
          नागभूषण अवार्ड फाऊंडेशनच्‍या वतीने दिल्‍या जाणा-या नागभुषण पुरस्‍कारामध्‍ये  1 लाख रुपये , सन्‍मान चिन्‍ह, शाल व श्रीफळ  यांचा समावेश आहे. ज्‍येष्‍ठ  गांधीवादी नेते नारायणभाई देसाई यांच्‍या हस्‍ते ठाकुरदासजी बंग यांना नागभूषण पुरस्‍कार दिल्‍या जाणार असून या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी  सर्वोदय संघाच्‍या अध्‍यक्षा राधाबहन भट्ट राहणार  आहेत.  यावेळी  सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष मा.म.गडकरी  प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्थित   राहणार असल्‍याची माहिती नागभुषण  अवार्ड फांऊडेशनचे प्रमुख गिरीश गांधी  यांनी दिली.
      विदर्भाच्‍या विकासात मोलाचे योगदान देणा-या किंवा विदर्भाचा नावलौकीक राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर वाढवणा-या  सन्‍माननीय व्‍यक्‍तींना  दरवर्षी   हा नागभुषण पुरस्‍कार देऊन गौरविण्‍यात येतो.  नागभूषन अवार्ड फाऊंडेशनचे अध्‍यक्ष प्रभाकरराव मुंडे, उपाध्‍यक्ष सत्‍यनारायण नुवाल, सचिव गिरीश गांधी, कोषाध्‍यक्ष  ब्रिजकिशोर अग्रवाल तसेच सदस्‍य म्‍हणून  सुरेश शर्मा, अजयकुमार संचेती, डी.आर.माली, राजेंद्र पुरोहीत, सागर मेघे, मोहन अग्रवाल व विलास काळे हे सुध्‍दा या कार्यक्रमास उपस्थित   राहणार आहेत. नागभूषन वितरण समारंभास  उपस्थित राहण्‍याचे आवाहन नागभूषण अवार्ड फाऊंडेशनचे महासचिव गिरीश गांधी यांनी केले आहे.
       ज्‍येष्‍ठ स्‍वातंत्र्य सैनिक , भुदान चळवळीचे कार्यकर्ते व लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्‍या संपूर्ण क्रांतीचे प्रमुख कर्णधार असलेले गांधीवादी विचारवंत ठाकुरदास बंग हे 1942 मध्‍ये  महात्‍मा गांधी यांनी  गोवालीया टँक मैदानावर केलेल्‍या करा वा मरो च्‍या आवाहनानंतर आपल्‍या नोकरीचा राजीनामा देऊन  स्‍वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी त्‍यांना  दोन वर्षे सक्‍त मजूरीची शिक्षाही झाली होती. प्रो.बंग हे जहाल अहिंसक  सत्‍याग्रही म्‍हणूनही ओळखले जात होते.  
           आचार्य विनोबा भावेंच्‍या आवाहनानंतर ठाकूरदासजी बंग यांनी 1957 मध्‍ये भूदान पदयात्रा काढली. महात्‍मा गांधी  सोबत स्‍वातंत्रय आंदोलन, विनोबा भावे यांचेसोबत सर्वोदय आंदोलन व जयप्रकाश नारायण यांचे सोबत संपूर्ण क्रांती आंदोलन या तीनही राष्‍ट्रीय आंदोलनामध्‍ये त्‍यांचा सहभाग राहीलेला आहे.
                                                     000000

वर्धा व हिंगणघाट शहरात दूधाच्‍या पॉलीथीन मधे बदल


    
           वर्धा, दि.24 -  शासकीय दूध योजना वर्धा मार्फत वर्धा व हिंगणघाट येथे 500 मि.ली. पिशवीतून दूध विक्री करण्‍यात येते . सध्‍या 500 मि.ली. पॉलीफिल्‍मचा साठा संपुष्‍ठात आल्‍याने हिंगणघाट व वर्धा येथे दूध ग्राहकांना 1000 मि.लि.  पॉलीपिफल्‍म मधून 500 मि.ली. दूधाचा पुरवठा करण्‍यात येईल.  याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्‍यावी असे दुग्‍धशाळा व्‍यवसथापक, शासकीय दिुध योजना, वर्धा यांनी कळविले आहे.
                                                  00000

निवृत्‍ती वेतन धारकांचा मेळावा



           वर्धा,दि.24-  निवृत्‍तीवेतन तसेच कुटूंब निवृत्‍ती वेतन घेणा-या राज्‍य शासकीय निवृत्‍ती वेतन धारकांच्‍या अडचणी  व त्‍यांचे  निराकरण करण्‍यासाठी कोषागार कार्यालयात दिनांक 7 सप्‍टेंबर 2012 रेाजी सकाळी 8  वाजता मेळावा  आयोजित  करण्‍यात आला आहे.
       निवृत्‍तीवेतन व कुटूंब वेतन धारकांनी निवृत्‍ती वेतन संदर्भातील अडचणी सोडविण्‍यासाठी वर्धा येथील कोषागार कार्यालयात उपस्थित राहून आपल्‍या अडचणीचे निराकरण करावे असे आवाहन कोषागार अधिकारी  श्री.पराते यांनी केले आहे.
                                                  0000000

वर्धा मुख्‍यालय व सर्व तहसिलमधे लोकअदालत


        वर्धा, दि. 24- जिल्‍हा वि‍धी सेवा प्राधिकरणातर्फे वर्धा  मुख्‍यालयी  व जिल्‍ह्यातील सर्व तहसिलमधे दिनांक 16 सप्‍टेंबर 2012 रोजी  महालोक अदालतीचे   आयोजन करण्‍यात आले आहे.
        महालोक अदालतीमध्‍ये  प्रलंबीत प्रकरणांचा निपटारा होणार असल्‍यामुळे  जनतेनी  महालोक अदालतीच्‍या माध्‍यमातून  न्‍यायालयात प्रलंबित असलेली व दाखलपुर्व प्रकरणे आपसी तडजोडीने झटपट निकाली काढण्‍यासाठी सहभागी होण्‍याचे आवाहन महाराष्‍ट्र राज्‍य विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्‍यक्ष व मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायमुर्ती  डी.डी. सिन्‍हा  यांनी केले आहे.
        महालोकअदालतीमध्‍ये  ज्‍या न्‍यायालयात वाद सुरु आहे  तिथे एक साधा अर्ज करुन आपले प्रकरण महालोकअदालत मध्‍ये ठेवून आपला वाद कायमचा संपुष्‍टात आणता येईल. असे प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश तसेच अध्‍यक्ष जिल्‍हा  विधी सेवाप्राधिकरण, वर्धा यांनी  आवाहन केल आहे.
                                                              00000

सोशालिस्‍ट चौकात वाहतुकीस अडथडा अधिसुचना जारी


  
वर्धा, दि. 24 – सोशालीस्‍ट चौक हा बजाज चौक ते नागपूरकडे जाणारा मुख्‍य रस्‍ता असल्‍याने त्‍या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ नये  व रहदारीस कुठल्‍याही प्रकारचा अडथडा होऊ नये म्‍हणून  वाहतुकीचे  सुनियोजीत रीतीने  नियमन करण्‍याकरीता  मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ब) अन्‍वये  जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाशकुमार यांनी आज अधिसुचना जारी केली आहे. या अधिसुचनेची अंमलबजावनी दिनांक 1 सप्‍टेंबर 2012 पासून अंमलात येणार आहे.  
 सोशालिस्‍ट चौक येथे कामगारांच्‍या उभे राहणा-या वाहतुकीस अडथडा निर्माण होत असल्‍याने  ते यापुढे भाजी मार्केट (बजाज चौक) च्‍या पाठीमागे रोडवर, वर्धा अर्बन बँकेच्‍या समोरील रोडवर , शास्‍त्री चौक ते पँथर चैाक ते जयभीम चौक कडे जाणा-या राष्‍ट्रभाषा रोडवर उभे राहू शकतात.
          जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाशकुमार यांनी  आज जारी केलेल्‍या  अधिसूचनेची अंमलबजावनी  दिनांक 1 सप्‍टेंबर 2012  पासून करण्‍यात येत असून, या आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल. असेही या अधिसुचनेत स्‍पष्‍ट केले आहे.
                                                0000000       

Wednesday 22 August 2012

पीक संरक्षणासाठी ऑनलाईन किड नियंत्रण


          
              चक्रीभुंगा व उंट अळी पासून सोयाबीन सांभाळा

          वर्धा, दि. 22 -  सोयाबीन व कापूस या दोन महत्‍वाच्‍या  पिकांवर येणा-या किड रोगाचे  नियंत्रण करण्‍यासाठी  जिल्‍ह्यात  विशेष प्रकल्‍प राबविण्‍यात येत असून पिकांवरील किडीबाबत निरीक्षण  ऑनलाईन पध्‍दतीने  संकलीत करण्‍यात येवून त्‍यावर नियंत्रणासाठी  विशेष उपाययोजना  करण्‍यात  येत असल्‍याची माहिती  जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी आज दिली.
         वर्धा जिल्‍ह्यात सुमारे 1 लाख 70  हजार 104 हेक्‍टर   क्षेत्रावर सोयाबीन, तर 1 लाख 85 हेक्‍टर क्षेत्रावर कापूस पिकाची पेरणी  पूर्ण झाली आहे. पिकांना  आवश्‍यक असणारा समाधानकारक पाऊस झाल्‍यामुळे पिकांची  वाढही समाधानकारक असून, जिल्‍ह्यातील देवळी, कारंजा, सेलू , वर्धा , आदी तालुक्‍यात त उंट अळी व चक्रीभुंगाचा प्रादुर्भाव वाढत असून त्‍यावर  तातडीने नियंत्रण करणे आवश्‍यक  आहे.
       पिकांवरील किड नियंत्रणासाठी जिल्‍ह्यात  27 स्‍काऊट  आणि तीन  किड नियंत्रकाची नेमणूक करण्‍यात आली असून, प्रत्‍येक आठवड्यामध्‍ये  32 ठिकाणी  पिकांच्‍या  किडीबाबत प्रत्‍येक स्‍काऊट निरीक्षण घेऊन त्‍याचा अहवाल  ऑनलाईन  पध्‍दतीने बुधवार व शनीवारी कृषि विद्यापिठाला पाठविल्‍या जातो. प्रत्‍येक आठवडयात  जिल्‍ह्यातून 864  निरीक्षणे घेतल्‍या जातात. त्‍यानुसार विद्यापिठाकडून  सुचविण्‍यात आलेल्‍या  किड नियंत्रणची माहिती  8 हजार    शेतक-यांना  एसएमएस व्‍दारे पाठविली जाते.
          किड नियंत्रणाबाबत या आठवड्यात मिळालेल्‍या निरीक्षणानुसार  उंट अळीचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकांवर  दिसुन आला असून शेतक-यांनी  सतर्क राहून  त्‍याचे नियंत्रण करणे आवश्‍यक आहे. उंट अटीमुळे आर्वी तालुक्‍यातील कारंजा, पाचोड, सोरटा, विरुळ, देवळी तालुक्‍यातील अडेगाव, अंदोरी, आंजी , बोपाकूर, खर्डा, दापोरी, गणेशपूर, गौळ, गिरोली , काजळसरा, मोमीनपुरा, पाथरी , पिंपळगाव (लुटे), सोनेगाव. कारंजा तालुक्‍यातील धर्ती, संसधर, ठाणेगाव, सेलू तालुक्‍यातील आमगाव, हमदापूर, हिवरा, जंगलपूर, जोगापूर, मोर्चापूर, सेलडोह.
वर्धा तालुक्‍यातील  बोरगाव, सावरी, दिग्रस, गणेशपूर, गोंदापूर, कारला, करंजी, कांजी, मदनी, महाका, नारायणपूर, साखरा, तरोडा, उमरी मेघे, वाठोडा, येनकापूर, झाडगाव या गावामध्‍ये उंट अळीचे नियंत्रण तातडीने करणे आवश्‍यक आहे.
                                                                            
 असे करा नियंत्रण
          सोयाबीन व कापूस पिकावरील किड नियंत्रणासाठी शेतात पक्षांना बसण्‍यासाठी पक्षी  थांबे  तयार करावेत. यावर बसणारे पक्षी शेतावर बसणा-या अळ्या टिपून खातात. तसेच  प्रकाश सापळ्यांचा नियंत्रीत उपयोग करुन किडीचे पतंग नष्‍ट करावे. शेतामध्‍ये  कामगंद सापळे हेक्‍टरी  दहा सापळे लावावे.
        किडीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्‍यास  किटकनाशकांचा वापर करावा. यामध्‍ये  क्विनालफॉस , क्‍लोरोपायरीफॉस, इमामेक्‍टीन  बेन्‍झाएट, स्‍पीनोसॅड, थायोडीकार्ब, प्रोफेनोफॉस, बिव्‍हेरीया बॅसियाना चा वापर करावा.
      चक्रीभुंगा या किडीसाठी  डायमथोएट किंवा थेनव्‍हॅलरेट , प्रायजोफास्‍ट यापैकी   एका किटकनाशनाचा प्रती 10 लिटर पाण्‍यात मिसळवून फवारणी करावी. पावरस्‍प्रे फवारणी करावयाची असल्‍यास किटकनाशकांची मात्रा तिप्‍पट करावी.
            सोयाबीन पिकावरील चक्रीभुंगा ही महत्‍वाची किड आहे. या किडीचा मादीभुंगा पाणाच्‍या फांदीवर किंवा मुख्‍य खोडावर एकमेकापासून 1 ते दीड सें.मी. अंतरावर दोन गोल काप करुन त्‍यात अंडी टाकतो. त्‍यामुळे चक्रकापाचा वरचा भाग सुटतो. अंड्यातून निघालेली अळी पाणाचे देठ व फांदीतून आत जाते. या किडीचा प्रादुर्भाव मुंग, उडीद, बरबटी या पिकावर सुध्‍दा होऊ शकतो. या किडीमुळे उत्‍पादनही मोठ्या प्रमाणात घटते.
           पिकावरील  उंटअळी  आणि चक्रीभुंगा किडीचे नियंत्रण करण्‍यासाठी तांत्रिक माहिती  शेतक-यांनी  तालुका कृषि अधिकारी अथवा मंडळ अधिकारी यांचेकडून घ्‍यावी. व शेताततील पिकांचे संरक्षण करण्‍यासाठी  प्राधान्‍याने उपाययोजना करावीत, असे आवाहनही जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहे ब-हाटे यांनी केले आहे.
                                                  00000

आधुनिक शेतीसाठी युवा 40 शेतक-यांना पॉलीहाऊस


                                 ऋण प्रसंस्‍करण केन्‍द्राचा अभिनव उपक्रम
         वर्धा, दि.22– परंपरागत शेती ऐवजी  उच्‍च तंत्रज्ञानावर आधारीत  शेतीला चालना देण्‍यासाठी  वर्धा जिल्‍ह्यातील  युवा शेतक-यांना  पॉली हाऊसच्‍या माध्‍यमातून  आधुनिक शेती  करण्‍यासाठी  जिल्‍ह्याची  अग्रणी बँक असलेल्‍या बँक ऑफ इंडियाच्‍या  ऋण प्रसंस्‍करण केन्‍द्राने  अभिनव उपक्रमाची  सुरुवात केली आहे.
          शेतक-यांना खरीप व रब्‍बी  पिकांसाठी  कर्ज पुरवठा करत असतानाच  शेतक-यांनी  उच्‍च  तंत्रज्ञानावर आधारीत शेती करावी  तसेच  युवा शेतक-यांनी प्रगत  शेतीचा अंगीकार करावा  यासाठी   शेडनेट व पॉलीहाऊस  च्‍या  माध्‍यमातून भाजीपाला व फूलशेती करण्‍यासाठी  जिल्‍ह्यातील 40 शेतक-यांना    कृषि  ऋण प्रसंस्‍करण   केन्‍द्रातर्फे  अर्थसहाय्य  करण्‍यात आली असल्‍याची माहिती  या केन्‍द्राचे  वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापक  एस.वाय. शिर्सीकर  यांनी आज दिली.
         जिल्‍ह्यातील शेतक-यांना या केन्‍द्रामार्फत मार्गदर्शन करण्‍यासोबत त्‍यांना शेती व शेती संलग्‍न पुरक उद्योगांना कर्जपुरवठा  करण्‍यात येत असून, प्रगत शेतीच्‍या तंत्रज्ञानासाठी सुलभपणे  व अल्‍पावधीत कर्ज प्रकरणे मंजूर  करण्‍यात येत असून  या योजनेचा जिल्‍ह्यातील शेतक-यांना  चांगला उपयोग होत आहे.  या केन्‍द्रातर्फे किसान क्रेडीट कार्ड, जमिन सुधारणा, हरितगृह (शेड नेट, पॉली हाऊस, कृषि विषयक यंत्रसामुग्री, दुध उत्‍पादक , पोल्‍ट्री फार्म, बकरी पालन, फूलशेती, फळबाग, तसेच सौर कुंपनासाठी या बँकेतर्फे शेतक-यांना सुलभपणे कर्जपुरवठा करण्‍यात येते.
         जिल्‍ह्याची अग्रणी बँक असलेल्‍या   बँक ऑफ इंडिया तर्फे मागील वर्षी  1 हजार 447 शेतक-यांना  34 कोटी 18 लाख रुपयाचा कर्ज पुरवठा करण्‍यात आला असून, यावर्षी  497 शेतकरी खातेदारांना 15 कोटी 75 लाख रुपये   कर्ज पुरवठा करण्‍यात आला आहे.
                             युवा शेतक-यांचे शेडनेट
          जिल्‍ह्यातील युवा शेतक-यांना  शेतीविषयक तांत्रिक माहिती देऊन  तसेच अत्‍याधुनिक माहिती च्‍या आधारावर शेडनेट व पॉलीहाऊस सुरु करण्‍यासाठी प्रोत्‍साहन दिले आहे त्‍यामुळे जिल्‍ह्यात शेडनेट व पॉली हाऊस व्‍दारे  मोठ्या प्रमाणात उत्‍पादनालाही सुरुवात झाली  आहे. हिंगणघाट तालुक्‍यातील  मारोतराव झोटींग यांना  दोन पॉलीहाऊस साठी 24 लाख रुपयाचे कर्ज उपलब्‍ध करुन दिले असून, त्‍यांनी भाजीपाला व फुलशेतीचा अभिनव उपक्रम राबविला आहे.

        धानोरा येथे अशोक शंकरराव बुचे यांना पॉली हाऊस साठी 12 लाख रुपये तर हिंगणी येथील प्रगतीशील शेतकरी अजय डेकाटे , वाहीतपूर येथील जगदीश महाकाळकर , आर्वी येथील यामीनी महल्‍ले  , मोर्यापूर येथील रमेश राजाराम उमरे, धानोरा येथील रामदास बुचे, घोराड येथील त्रयंबक सोनबा माहुरे आदी  शेतक-यांना  4 लाख रुपायापासून  तर 18 लाख रुपयापर्यंत शेडनेट व पॉली हाऊससाठी  कर्ज पुरवठा उपलब्‍ध करुन दिला आहे.
           जिल्‍ह्याच्‍या अग्रणी बँकेतर्फे ग्रामीण भागातील 26 शाखाव्‍दारे शेतक-यांना कृषि विकासासाठी आवश्‍यक वित्‍त पुरवठ्यासह उच्‍च  तंत्रज्ञानावर आधारीत शेती करण्‍यासाठी कर्ज पुरवठ्यास तांत्रिक माहितीही  दिली जात असल्‍याची माहिती  वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापक  एस.वाय. शिर्सीकर यांनी  दिली.
                                                0000

29 ऑगस्‍टला सद्भावना दौड


   
    2 हजार विद्यार्थी सहभागी होणार
           मानवी साखळीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन
   वर्धा, दि. 22- सामाजिक ऐक्‍य  तसेच  सदभावना  दिनाच्‍या  निमीत्‍ताने   दिनांक  17 ऑगस्‍ट ते 31 ऑगस्‍ट पर्यंत सामाजिक ऐक्‍य  पंधरवाडा  साजरा करण्‍यात येत असून, दिनांक 29 ऑगस्‍ट रोजी सदभावना दौड व सामाजिक ऐक्‍यासाठी   मानवी साखळी  तयार करण्‍यात येणार असल्‍याची माहिती  निवासी उपजिल्‍हाधिकारी  श्रीमती विजया बनकर यांनी आज दिली.
       जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात  सदभावना दिवस व सामाजिक ऐक्‍य पंधरवाडा साजरा करण्‍याचे संदर्भात वरिष्‍ठ अधिकारी व विभाग प्रमुखांची बैठक आयेाजीत करण्‍यात आली होती.
सामाजिक ऐक्‍य पंधरवाडा निमित्‍त जिल्‍ह्यात  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात येणार असून यामध्‍ये  युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात घेण्‍यात येणार आहे. जिल्‍ह्यातील  विविध धर्माच्‍या व अनेक भाषा बोलणा-या लोकांमध्‍ये एकात्‍मते विषयी ऐक्‍याची   भावना सौहार्द भावना वृध्‍दींगत करुन हिंसाचार टाळणे   हा पंधरवाडा साजरा करण्‍यामागची  संकल्‍पना आहे.
वर्धा जिल्‍ह्यात तसेच शहरात  सामाजिक ऐक्‍य पंधरवाडा निमित्‍त सदभावना दौड दिनांक 29 ऑगस्‍ट रोजी सकाळी 8 वाजता आयेाजीत करण्‍यात आली आहे. सदभावना दौड जिल्‍हा क्रिडा स्‍टेडीयम  येथून  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, विश्रामगृह  मार्गे महात्‍मा गांधी चौक व जिल्‍हा स्‍टेडीयम येथे विसर्जीत होईल. या सदभावना दौडीमध्‍ये शहरातील विविध शाळांचे 2 हजार विद्यार्थी सहभागी होणार असून त्‍यांना सदभावना दिनाची शपथ दिली जाईल.
सामाजिक ऐक्‍य पंधरवाडा निमित्‍त सकाळी 8.30 वाजता महात्‍मा गांधी चौक ते जिल्‍हा स्‍टेडीयम पर्यंत मानवी साखळी तयार करण्‍यात येईल. व जनतेमध्‍ये सौहार्दाचे वातावरण निर्माण व्‍हावे यासाठी  पथनाट्यासह विविध कार्यक्रमाचेही  आयोजन करण्‍यात येईल.
जिल्‍हाधिकारी, जिल्‍हा पोलीस अधिक्षक, मुख्‍य कार्यपालन अधिकारी , जिल्‍ह्यातील वरिष्‍ठ अधिकारी  यांच्‍या उपस्थितीत सदभावना दौडीला हिरवी झेंडी दाखविण्‍यात येईल. तसेच स्‍टेडीयमवर  विविध कार्यक्रमाचेही आयोजन करण्‍यात येईल. यावेळी वृक्षारोपनाचाही कार्यक्रम आयेाजीत करण्‍यात आला असलयाची माहिती निवासी उपजिल्‍हाधिकारी श्रीमती विजया बनकर यांनी दिली. सदभावना दौडीसाठी समन्‍वयक म्‍हणून  जिल्‍हा क्रिडा अधिकारी  प्रदिप शेटीये हे काम पाहतील. स्‍थानिक व्‍यवस्‍था  वर्धा नगर परिषदेचे मुख्‍याधिकारी  यांचेकडे सोपविण्‍यात आले आहे. उपविभागीय महसूल अधिकारी  हरिष धार्मिक व तहसिलदार  सुशांत बनसोडे हे कार्यक्रमाच्‍या आयोजनाचे समन्‍वयक अधिकारी म्‍हणून  काम पाहणार आहेत.
          यावेळी  जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. सोनवने,  प्राथमिक व माध्‍यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी , पोलीस वाहतूक नियंत्रण अधिकारी , सामाजिक वनीकरण तसेच शहरातील विविध महाविदृयालयाचे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेचे प्राचार्य, जिल्‍हा व्‍यवसय व प्रशिक्षण अधिकारी आदी  यावेळी  उपस्थित होते.
                                      000000000

कामगार मंत्री हसन मुश्रीफ आज शहरात


       वर्धा, दि.22 – कामगार आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे गुरुवार दिनांक 23 ऑगस्‍ट रोजी सकाळी 10-30 वाजता नागपूर येथून मोटारीने आगमन    शासकीय विश्रामगृह येथे राखीव राहील.
       सकाळी 11 वाजता कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती येथे आयोजीत वर्धा जिल्‍ह्यातील राष्‍ट्रवादी पक्ष प्रमुख कार्यकर्त्‍यांच्‍या बैठकीस उपस्थित राहतील.  व दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंतचा वेळ राखीव असून दुपारी 3 वाजता येथून मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.
                                                00000

माजी सैनिकांच्‍या पाल्‍यांना शिष्‍यवृत्‍ती


              
        वर्धा, दि.22- सैनिक कल्‍याण विभागाचे  निर्देशानुसार सैनिक कल्‍याण कार्यालयातर्फे माजी सैनिकांच्‍या पाल्‍यांकरीता शिष्‍यवृत्‍ती  योजना राबविण्‍यात येत आहे.
      ज्‍या माजी सैनिकांचे पाल्‍य इयत्‍ता दहावी व बारावी मध्‍ये आणि पदवीका किंवा पदवी व पदव्‍यूत्‍तर परीक्षेमधे अंतीम वर्षी 60 टक्‍क्‍यापेक्षा जास्‍त गुण घेवून उत्‍तीर्ण झाले असतील अशा माजी सैनिकांनी नविन शिष्‍यवृत्‍तीसाठी व मागील वर्षी  शिष्‍यवृत्‍ती  घेतलेल्‍या माजी सैनिकांनी जुन्‍या शिष्‍यवृत्‍तीसाठी  दि. 10 ऑक्‍टोंबर 2012 पर्यंत आले अर्ज जिल्‍हा सैनिक कल्‍याण कार्यालय वर्धा या कार्यालयात सादर करावेत.
     ज्‍या माजी सैनिकांनी वर्ष 2009-2010, 2010-11 प 2011-12 मध्‍ये पंतप्रधान शिष्‍चृत्‍ती योजने अंतर्गत शिष्‍यवृत्‍ती घेतली होती. अशा माजी सेनिकांनी सुध्‍दा दिनांक 10 ऑक्‍टोंबर 2012 पर्यंत या कार्यालयात येवून आपले फॉर्म भरावे जेने करुन आपले फॉर्म पुढील कार्यवाही करीता पाठविता येतील. लाभार्थी माजी सैनिकांनी सैनिक कल्‍याण कार्यालयात येताना आपले ओळख पत्र, अर्ज, पाल्‍याचा शिकत असल्‍याचा दाखला व मागील वर्षी उत्‍तीर्ण झाल्‍याची मार्कलीस्‍ट  घेवून यावी. ज्‍या पाल्‍यांनी  सीईटी किंवा इतर कारणासाठी गॅप घेवुन शैक्षणिक वर्ष 2012 -13 मध्‍ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहे. अशा पाल्‍यांनी (प्रतीज्ञा पत्र) घेवून यावे. तरी वरील योजनेचा जिल्‍ह्यातील जास्‍तीत जास्‍त माजी सैनिकांनी लाभ घ्‍यावा  असे आवाहन फ्ला. ले.धनंजय य. सदाफळ, जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी, वर्धा यांनी केले आहे.
                                           0000000
       

Tuesday 21 August 2012

वाढत्‍या किंमतीला नियंत्रित ठेवण्‍यासाठी अन्‍न धान्‍यांची खुल्‍या बाजारातून विक्री


       वर्धा दि.21-  राज्‍यात वाढत्‍या किंमती नियंत्रित करण्‍याकरीता महाराष्‍ट्र शासनाने खुल्‍या बाजार विक्री योजने अंतर्गत (OMSS)(D) गहू 94.88 मे.टन व तांदुळ 8.52 टन भारतीय अन्‍न महामंडळ मार्फत उपलब्‍ध करुन दिलेला आहे.
         महामंडळ,सहकारी संस्‍था,फेडरेशन,स्‍वयंसहाय्यता बचत गट अथवा इतर शासकीय,निमशासकीय संस्‍थांच्‍या माध्‍यमातून वितरीत करावयाचा आहे. तसेच राज्‍य शासनाच्‍या शैक्षणिक संस्‍था,अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,स्त्रियांचे वसतीगृह इत्‍यादीसाठी करता येईल. याचप्रमाणे मासिक उपभोग 30 मे.टनापेक्षा गव्‍हाचे छोटे प्रक्रियादार उदाः चक्‍की ,बेकरी,इत्‍यादींना जो प्रथम येईल त्‍यास प्रथम वितरण या तत्‍वावर वितरीत करता येईल.
केंद्र शासनाचे गहू रु. 1170 व तांदूळ (कच्‍चा) अ प्रत रु.1537.31 साधारण रु.1492.54 हे खरेदी दर आहे. उपरोक्‍त दरावर एपीएमसी चार्जेस,ऑक्‍ट्राम,वाहतूक हाताळनूक व अनुषंगीक बाबीसह समाविष्‍ठ करुन विक्री दर ठरविण्‍यात येईल. परंतु विक्री दर प्रति क्विंटल गहू 1395 ब व तांदुळ (कच्‍चा) अ प्रत 1762.31 साधारण रु. 1717.54 यापेक्षा जास्‍त असणार नाही.
जिल्‍हाधिकारी यांनी निश्चित केलेल्‍या किंमतीने सदर गहू व तांदुळाची विक्री करण्‍यात येईल.
          उपरोक्‍त नमूद केल्‍यापेक्षा जास्‍त दराने गहू व तांदूळाची विक्री करता येणार नाही.विक्री करतांना शिधापत्रिकेची आवश्‍यकता भासणार नाही. गहू व तांदुळ अनुदानीत किंमतीचा फायदा सर्व सामान्‍य ग्राहकांना मिळावा हा शासनाचा मुख्‍य उद्देश असल्‍याने सामान्‍य ग्राहकांना उपलब्‍ध होईल. याची दक्षता घ्‍यावी. याबाबत दर,शर्ती व अटीची माहिती त्‍या-त्‍या तालुक्‍यातील तहसिलदार यांचे कार्यालयाकडून उपलब्‍ध होईल. गहू व तांदुळाची मागणी महसिलदार यांचेकडे आवश्‍यक कागदपत्रासह त्‍वरीत नोंदवावी. असे जिल्‍हा पुरवठा अधिकारी,वर्धा यांनी कळविले आहे.
00000

Sunday 19 August 2012

वर्धा जिल्ह्यात 24 तासात सरासरी 22.68 मि.मि.पाउस


      वर्धा, दिनांक 20 : वर्धा जिल्ह्यात मागील 24 तासात 22.68 सरासरी मि.मि.पावसाची नोंद झाली आहे. आतापावेतो जिल्ह्यात एकूण सरासरी  471.04  मि.मी. पावसाची नोंद झाली असून जिल्‍ह्यात सर्वाधिक पाऊस हिंगणघाट तालुक्यात 62.00 मि.मी. पाऊस झाला आहे.
          जिल्ह्यात मागील 24 तासात तालुकानिहाय झालेला पाऊस व कंसात एकूण झालेला पाऊस पुढीलप्रमाणे
          वर्धा- 11.05 मि.मी.(483.01), सेलू- 10.00 मि.मी.(264.00), देवळी-28.00 (363.07), हिंगणघाट- 62.00 (618.00), आर्वी-7.00 मि.मी.(547.00), आष्टी- 4.08 मि.मी.(410.02), समुद्रपूर-49.00  मि.मी.(679.07), आणि कारंजा-9.01 (505.05 )मि.मी. पावसाची नोंद झाली असून आजपर्यंत 471.04   मि.मी. सरासरी एवढा पाऊस झाला आहे.
                                  0000000