Saturday 16 July 2011

पालकमंत्र्यांनी तक्रारी व निवेदने स्विकारली

     महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक                     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा        दि.16 जूलै  2011
-------------------------------------------------------------------------
       वर्धा, दि. 16- येथील विश्राम भवना मध्ये सामान्य जनतेच्या तक्रारी, गा-हाणी व समस्या  जाणून घेण्यासाठी आज वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी  जनता दरबाराचे आयोजन केले होते. या जनता दरबारामध्ये त्यांनी अनेक तक्रारी व निवदने स्विकारुन तक्रार धारकाचे समाधान केले. आली.
          याप्रसंगी जि.प.अध्यक्ष विजय जयस्वाल, जिल्हाधिकारी जयश्री भोज, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी लिना बन्सोड, अतिरीक्त जिल्हाधिकारी विनय मुन , निवासी जिल्हाधिकारी राजेश खवले आदि मान्यवर उपस्थित होते.
          या जनता दरबारामध्ये जनतेच्या तक्रारी, गा-हाणी ऐकून  मंत्रीमहोदयांनी योग्य मार्गदर्शन केल्यामुळे तक्रारकर्त्यांचे समाधान झाले तर काही तक्रारकर्त्यांचे निवेदने संबधित विभागाकडे पाठविण्यात आले. त्यावर तातडीने कार्यवाही करावी,असे निर्देश देण्यात आले. आज 100 ते 150 च्या दरम्यान तक्रारी व निवेदने प्राप्त झाली. त्यामध्ये महसुल विभाग, विद्यूत विभाग, कृषि विभाग, नगर पालीका, घरकुल पुर्नवसन, अल्पबचत पोष्टल एजन्ट कमिशन व इतर तक्रारीचा समावेश आहे.
          यावेळी मोठ्या संख्येने सामान्य नागरिक उपस्थित होते.
                                                   00000

कोठेकर कुटूंबियांना प्राधान्यक्रमाने शासकिय योजना लाभ देण्यात येईल - पालकमंत्री

          महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक                     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा        दि.16 जूलै  2011
-------------------------------------------------------------------------
   वर्धा,दि.16 - सेलू तालुक्यातील देऊळगांव येथील शेतकरी विठ्ठल कोठेकर यांनी 10 ऑक्टोंबर 2010 रोजी विष प्राशन करुन आत्महत्या केली. त्यांचे कुटूंब अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे ते अल्पभूधारक असल्यामुळे त्यांच्या कुटूबियांना प्राधान्य क्रमाने शासनाच्या विविध योजनाचा लाभ देण्यात येईल,अशी ग्वाही वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे  पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिली.
याप्रसंगी जि.प.अध्यक्ष विजय जयस्वाल, जिल्हाधिकारी जयश्री भोज, पंचायत समिती सेलूचे सभापती निलिमाताई दंडारे, मुख्य कार्यपालन अधिकारी लिनाताई बन्सोड , पंचायत समिती सदस्य बालेश मोरवाल,उपविभागीय अधिकारी धार्मिक, तहसिलदार गावीत, कृषि विभागाचे व पंचायत समितीचे अधिकारी  उपस्थित होते.
          स्व. विठ्ठल कोठेकर यांचे वय 48  होते, त्यांच्यावर विविध कार्यकारी संस्थेचे 9 हजार 500 रुपये कर्ज होते. त्यांच्याकडे 2 एकर जमीन आहे. स्व.कोठेकर यांना दोन मुली व एक मुलगा असून,म्हातारे वडील किसनजी कोठेकर आहे. त्यांची एक मुलगी रेखा शिकत असून, सचिन मुलाच्या  एका हाताला त्रास असल्याचे त्यांच्या पत्नी रेखा कोठेकार यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. यावर पालकमंत्री म्हणाले की, मुलीच्या शिक्षणात खंड पडणार नाही. याची खबरदारी घेण्यात येणार असून, मुलीच्या भविष्यातील शिक्षण आपण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सचिन  यांच्या हाताला होणा-या त्रासावर औषधोपचार  व उपचार करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक,वर्धा यांच्याकडून तपासण्या  करुन घेण्यात याव्या असे  आदेश दिले. या कुटूंबाला कृषी विभागाकडून शेततळे मिळाले असून, शासनाकडून विहीरीचे बांधकाम करुन देण्यात येईल. कुटूंबातील वडीलांना  संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचे तसेच त्यांच्या नावाने जमिनीचे फेरफार करण्याचे यावेळी निर्देश दिले.रेखा कोठेकर यांना विविध कार्यकारी सोसायटीतून 50 हजाराचे कर्ज मंजूर करण्याचे  निर्देश देवून जुने कर्ज त्यातून वसूल करण्यात यावे अश्या सुचना दिल्या.
आत्महत्याग्रस्त कुटूंबियांना शासनाकडून 13 जानेवारी 2011 रोजी 1 लक्ष रुपये देण्यात आले असून, काही रक्कम अल्प बचतीमध्ये गुंतविण्यात आले आहे. अत्यंत भावूक वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्र्याचे हस्ते शेतीच्या उपयोगासाठी स्प्रेपंप व रासायनिक खतांची पिशवी यावेळी देण्यात आली.
याप्रसंगी गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
                                 000000

Friday 15 July 2011

पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती दि.16/7/2011

क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  वर्षी आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
242.06 मि.मी.

0.35 मि.मी.
3
शासनाचे मदत कार्य
निरंक
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान(सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा - 192.05(0.2) मि.मी.
2)सेलू - 243..00(2.0) मि.मी.
3)देवळी -213.52(निरंक) मि.मी.
4)हिंगणघाट-280.04(निरंक) मि.मी.
5)समुद्रपूर - 306.9(निरंक) मि.मी.
6)आर्वी -314.00(निरंक) मि.मी.
7)आष्टी -156.8 (0.6) मि.मी.
8)कारंजा-229.4 (निरंक) मि.मी.

दिवाणी व फौजदारी न्यायालय नवीन इमारतीमध्ये स्थानांतर

प्रसिध्दी पत्रक                                           महाराष्ट्र शासन                     दि.15 /7/2011        
                                                      जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   
------------------------------------------------------------------------------------------
          वर्धा,दि.15- सेलू जि. वर्धा येथील  सद्यास्थितीत सुरु असलेले दिवाणी व फौजदारी  न्यायालय  प्रफुल लुंगे यांचे खाजगी इमारतीमध्ये आहे. 
 दि. 17 जुलै 2011 पासून  दिवाणी व फौजदारी न्यायालय  रमेश एम. सोमनाथे यांचे खाजगी इमारतीमध्ये बुलडाणा अर्बन गोडवूनला लागुन, सुकळी स्टेशन रोड, सेलू येथे  रविवार दि. 17 जुलै 2011 रोजी सकाळी 11 वाजता पासून स्थानांतरीत होत आहे. याबाबत सर्व अधिवक्ता, पक्षकार, ठाणेदार व इतर संबंधीतांनी नोंद घ्यावी. असे प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा यांनी कळविले आहे.
                                                         000000000

दूधाच्या विक्री दरात वाढ

          महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक                     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा        दि.15  जूलै  2011
------------------------------------------------------------------------
         वर्धा,दि.15 - महाराष्ट्र शासनाने दूध ग्राहकांसाठी नविन विक्रीचे दर जाहिर केले असून, त्या दरानुसार ग्राहकांना दूधाची  खरेदी करावी लागेल. वाढीव दर तात्काळ प्रभावसह लागू झाले आहे.
नविन दराप्रमाणे गाईचे दूध 1 लिटर  पिशवितून रु. 27 ( रुपये सत्तावीस) व गाईचे दूध 500 मि.लि. पिशवीतून रु. 13.50 ( तेरा रुपये पन्नास पैसे) असेल.
शासनाने दिनांक 7 जुलै 2011 पासून गाईचे दूध विक्री दरात वाढ केल्यामुळे सध्या नविन पॉलिफिल्मचा पुरवठा होईपर्यंत जुन्या पॉलीफिल्म मधून दूधाचे वितरण करण्यात येईल. त्यावर जूनीच प्रिंट असली तरी दि. 7 जुलै 2011 पासुन गाईच्या 500 मि.लि.1/2  (अर्धा लिटर) करीता विक्री किंमत रुपये 13.50 राहील याची ग्राहकांनी नोंद घ्यावी. असे दुग्धशाळा व्यवस्थापक, शासकीय दूध योजना, वर्धा कळवितात.
                                00000000

जनतेच्या अडचणी व समस्या पालकमंत्री जाणून घेणार

 महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक            जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा        दि.15  जूलै  2011
--------------------------------------------------------------------
         वर्धा,दि.15- राज्याचे वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक हे दिनांक 16 जुलै 2011 रोजी वर्धेच्या दौ-यावर येणार असून येथील विश्राम  भवनामध्ये  सकाळी 11-30 ते 12-30 या कालावधीमध्ये सामान्य नागरीकांच्या अडचणी व समस्या जाणून घेवून तक्रारीचे निवेदन स्विकारणार आहेत.
          ज्या कुणाला समस्या व अडचणी संबधी मंत्री महोदयांची  भेट घ्यावयाची असेल त्यांनी   11-30 ते 12-30 या कालावधीत विश्रामगृह येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, वर्धा यांनी केले आहे.
                                                00000

Thursday 14 July 2011

पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती दि.15/7/2011

क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  वर्षी आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या  चोवीस  तासातील  सरासरी पाऊस
242.06 मि.मी.

29.05 मि.मी.
3
शासनाचे मदत कार्य
निरंक
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची  संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान(सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये ( गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा  - 192.5 (17.4) मि.मी.
2)सेलू - 343.0(62.0) मि.मी.
3)देवळी -213.52(13.0) मि.मी.
4)हिंगणघाट -180.4(22.0) मि.मी. 5)समुद्रपूर - 306.9(11.0) मि.मी.
6)आर्वी - 314.0 (51.0) मि.मी.
7)आष्टी -156.8 (33.6) मि.मी.
8)कारंजा-229.4 (22.4) मि.मी.