Wednesday 13 July 2011

जाती प्रमाणपत्र पडताळणीची मुदत 15 जुलै

          महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक                   जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा          दि.13  जूलै 2011
-------------------------------------------------------------------------
       वर्धा,दि.13- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दि. 22 जुन 2011 अन्वये सन 2010-2011 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 11 वी , 12 वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना जाती प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज सादर करण्यास दि. 15 जुलै 2011 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
            शैक्षणिक सत्र 2010-2011 मध्ये इयत्ता 11 वी 12 वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी जाती प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज विहित मुदतीत सादर केलेले नाही व वैद्यकिय, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र व औषध निर्माणशास्त्र या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवू इच्छितात अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जाती प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज सादर करण्यासाठी दि. 15 जुलै 2011 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
            विद्यार्थ्यांनी  जाती प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दिनांक 15 जुलै 2011 पर्यंत महाविद्यालयात सादर करावे. शैक्षणिक संस्थेनी अर्ज स्विकारतांना विद्यार्थ्यांकडून उक्त नमूद अभ्‍यासक्रमात प्रवेश मिळू शकला नाही तर त्याची जबाबदारी जाती प्रमाणपत्र  तपासणी समितीवर अथवा शासनावर राहणार नाही असे प्रमाणपत्र घेऊनच अर्ज स्विकारावे. शैक्षणिक संस्थेला प्राप्‍त झालेले अर्ज त्यांनी दि. 10 ऑगस्ट 2011 पर्यंत संबंधित विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेकडे सादर करावे व विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी दिनांक 16 ऑगस्ट 2011 पर्यंत संबंधित जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करावे. असे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र.1, नागपूर विभाग, नागपूर यांनी कळविले आहे.
                                                 000000

No comments:

Post a Comment