Friday 21 September 2012

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश रविवारी वर्धेत


      वर्धा, दि. 21- केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांचे रविवार दिनांक 23 सप्‍टेंबर 2012 रोजी सेवाग्राम येथे सकाळी 10 वाजता नागपूरहून आगमन होईल. आश्रम परिसरातील नई तालीमच्‍या आयोजित कार्यक्रमाला मंत्री महोदय उपस्थित राहतील. सायंकाळी 5 वाजता सेवाग्राम येथून नागपूरला प्रयाण करतील.
                                                000000

कापूस कीडीच्‍या नियंत्राणासाठी उपाययोजना



      वर्धा, दि.21- आर्वी उपविभागातील कारंजा तालुक्‍यात बोंदडठाणा, धर्ती, एकांबा, नरसिंगपुर, रानवाडी ,सेलगाव, सुसुंद्रा व ठाणेगाव या भागात कापुस पिकावर पांढरी माशी या कीडींचा प्रादुर्भावामुळे आर्थिक नुकसान पातळीचे जवळ आढळलेला आहे. या किडीचे नियंत्रण करण्‍यासाठी शेतक-यांनी पुढील प्रमाणे उपाययोजना  सुचविण्‍यात येत आहेत.
      पिकाचे वेळोवेळी बारकाईने निरीक्षण करावे, पिकात हेक्‍टरी 10 ते 12 पिवळे चिकट सापळे लावावे. कपाशी भोवती मका, चवळी, झेंडू व एरंडी या सापळा पिकांची पेरणी करावी. सोबतच निंबोळी तेल 50 मिली अथवा डायमेथोईट 30 ईसी. 10 मिली किंवा असिटामेप्रिड 20 टक्‍के 4 ग्रॅम अथवा अॅसिफट 75 टक्‍के 20 ग्रॅम अथवा ट्रायझोफॉस 40 टक्‍के 20 मिली यापैकी कोणती एक औषध 10 लिटर पाण्‍यात मिसळुन फवारावे. गरजेनुसार 8-10 दिवसाचे अंतराने वरील शिफारस केलेले अन्‍य किटकनाशकाची फवारणी करावी.
     ढगाळ वातावरणात फवरणी करताना स्टिकर 2 मिली लिटर पाण्‍यात मिसळावे. फवारणी शक्‍यतो वारा स्थिर असताना, सकाळी लवकर वा उशिरा  दुपारनंतर करावी. पानाचे खालचे भागात व बांधावरही फवारणी करावी. पॉवर पंप वापरताना कीटकनाशक मात्रा 2.5 ते 3 पट ठेवावी.
      शेतकरी बांधवांनी तातडीने सुचविलेल्‍या उपाययोजना कराव्‍यात व गाव पातळीवर सविस्‍तर मार्गदर्शनासाठी कृषि सहाय्यक , किड सर्वेक्षक यांना संपर्क साधावा असे आवाहन आर्वीचे उपविभागीय कृषी अधिकारी मुकुंद येवले यांनी केले आहे.
                                            00000

डाक अदालत 26 सप्‍टेंबर रोजी


24 सप्‍टेंबर पर्यंत तक्रारी स्विकारणार
          वर्धा, दि. 21 – भारतीय डाक विभाग, वर्धा व्‍दारा दिनांक 26 सप्‍टेंबर 2012 रोजी अधिक्षक डाकघर, वर्धा यांचे कार्यालयामध्‍ये सकाळी 11 वाजता डाक अदालत आयोजित करण्‍यात आली आहे.
       पोस्‍टाच्‍या कामासंबंधीच्‍या  ज्‍या तक्रारीचे सहा आठवड्याचे आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्‍तर मिळाले नसेल अशा तक्रारीची डाक अदालत मध्‍ये दखल घेतल्‍या जाईल. विशेषतः टपाल, स्‍पीड पोस्‍ट, काऊंटर सेवा, डाक वस्‍तू, पार्सल, बचत बँक व मनी ऑर्डर संबंधीच्‍या तक्रारी  विचारात घेतल्‍या जातील. तक्रारीचा उल्‍लेख  सर्व तपशीलासह केलेला असावा.
      संबंधीतांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार अधिक्षक डाकघर वर्धा विभाग यांचे नावे दिनांक 24 सप्‍टेंबर 2012 अथवा तत्‍पूर्वी  पोहोचेल अशा बेताने पाठवावी. तदनंतर आलेल्‍या तक्रारीचा विचार केला जाणार नाही. तक्रार कर्त्‍यांना डाक अदालतसाठी स्‍वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. असे अधिक्षक डाकघर, वर्धाविभाग, वर्धा कळवितात.
                                             000000

Thursday 20 September 2012

शुक्रवारी कारंजा येथे आरटीओ कॅम्‍प


          वर्धा दि.20-  उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा शिबीर कॅम्‍प शुक्रवार दिनांक 28 सप्‍टेंबर रोजी कारंजा येथील विश्रामगृह येथे आयोजित करण्‍यात आला असल्‍याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्‍हाण यांनी दिली.
          कारंजा येथे यापूर्वी 29 सप्‍टेंबर रोजी आरटीओ कॅम्‍प होणार होता.परंतु यात बदल झाला असून सर्व वाहनधारकांनी व जनतेनी दिनांक 28 सप्‍टेंबर रोजी उपस्थित राहावे असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्‍हाण यांनी केले आहे.
00000

संजय गांधी योजना 3 ऑक्‍टोंबरला मुलाखती


     वर्धा दि.20- संजय गांधी  योजनेअंतर्गत लाभार्थ्‍यांच्‍या मुलाखती बुधवार दिनांक 3 ऑक्‍टोंबर रोजी सकाळी 11.00 वाजता संजय गांधी (शहर) विभागामध्‍ये आयोजित करण्‍यात आल्‍या आहेत.
संजय गांधी योजनेअंतर्गत अर्ज मंजुरीसाठी सादर करणा-या  अर्जदारांनी यापूर्वी सादर केलेल्‍या कागदपत्राच्‍या मूळ प्रती घेवून तहसील कार्यालय,वर्धा येथे प्रत्‍यक्ष मुलाखतीसाठी  उपस्थित रहावे असे नायब तहसीलदार (संजय गांधी) यांनी कळविले आहे.
संजय गांधी अर्ज  मंजुरी बैठकीबाबत नगर सेवक व समाजसेवक यांनी लाभार्थ्‍यांना माहिती द्यावी असे आवाहन संजय गांधी शहर विभाग समितीचे अध्‍यक्ष श्री. सुधीरभाऊ पांगुळ व समितीचे इतर सदस्‍यगण यांनी  केले आहे.
00000

Wednesday 19 September 2012

शनिवारी पायी चाला प्रदुषण टाळा


 वर्धा, दि. 19- वाहनांची वाढती संख्‍या व त्‍यामुळे होणारे प्रदुषण कमी करण्‍याच्‍या उदे्शाने शनिवार दिनांक 22 सप्‍टेंबर,2012 प्रदुषणमुक्‍त दिवस म्‍हणून पाळण्‍यात येणार   आहे. प्रत्‍येकाने वाहनांचा वापर टाळून एक दिवस पायी चालून पर्यावरण संवर्धणाला सहकार्य करावे असे आवाहन सामाजीक वणीकरण विभागाचे उपसंचालक प्रविणकुमार बडगे यांनी केले आहे.
          22 सप्‍टेंबर हा दिवस जागतिक कार विरहीत दिन म्‍हणून पाळण्‍यात येतो.वाहनांच्‍या वाढत्‍या वापरामुळे होणारा प्रदुषण कमी करण्‍यासाठी सर्व नागरीक, अधिकारी,कर्मचारी,शासकीय कार्यालय, सेवाभावी संस्‍था,शैक्षणिक संस्‍था, राष्‍ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी आणि सर्व निसर्ग प्रेमींनी या दिवशी शासकीय,खाजगी वाहनांचा कमीत कमी वापर करुन त्‍याऐवजी सार्वजनिक वाहनाचा वापर करावा.आणि  प्रदुषण कमी करुन पर्यावरणाचा समतोल राखणे कामी सहकार्य करावे असे आवाहनही प्रविणकुमार बडगे यांनी केले आहे.
          कार विरहित दिन पाळतांना शक्‍यतो शनिवारी कार्यालयात किंवा आस्‍थापनात येतांना कुढल्‍याही प्रदुषण पसरविणा-या वाहनांचा उपयोग टाळावा.
          सर्व अधिकारी,कर्मचारी यांनी शक्‍यतोवर दिनांक 22 सप्‍टेंबर,2012 रोजी शासकीय,खाजगी वाहनांचा कमीत कमी वापर करावा, प्रदुषण न करणा-या सायकल सारख्‍या वाहनांचा वापर करण्‍यात यावा, शक्‍य तेवढा जास्‍त सार्वजनिक वाहनाचा वापर करावा, एकाच ठिकाणी, एकाच मार्गावर कार्यालये,आस्‍थापना असल्‍यास जास्‍तीत जास्‍त अधिकारी,कर्मचारी यांनी मिळून एकाच चारचाकी वाहनांचा वापर करावा असेही आवाहन प्रविणकुमार बडगे यांनी केले आहे.
00000

Sunday 16 September 2012

समजस्‍याची भावना ठेवून दाव्‍याचा निपटारा करावा - न्‍या. शिवणकर

वर्धा, दि. 16 – पक्षकारांचा वेळ व पैसा वाचविण्‍याचे व्‍यासपीठ हे लोकन्‍यालय समजल्‍या जाते प्रत्‍येक तारखेवर पक्षकांराचा होणारा मानसिक त्रास लोकन्‍यायालयामुळे सपुष्‍टात येऊ शकतात  या करीता वादी व प्रतिवादी पक्षकारांनी सामंजस्‍यापणाची भुमिका ठेवून आपल्‍या दाव्‍याचा निपटारा तातडीने करावा. असे आवाहन प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश तसेच जिल्‍हा विधिसेवा प्राधिकरणाचे अध्‍यक्ष न्‍या . अशोक शिवणकर यांनी केले.
          येथील जिल्‍हा सेवा प्राधिकरण वर्धा यांच्‍या सभागृहात महालोक अदालतीचे उदघाटन दिपप्रज्‍वलीत करुन झाले. त्‍यावेळी अध्‍यक्षपदावर ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्‍हा बार असोशिनचे अध्‍यक्ष अॅड. अशोक दौड व दिवाणी न्‍यायाधिश वरिष्‍ठ स्‍तर तथा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्‍य सचिव एस.एम.येलेट्टी आदी मान्‍यवर उपस्थित होते.
          न्‍यायालयातील प्रलंबित प्रकरणाचा निपटारा तातडीने होण्‍यासाठी महालोक अदालतीचे आयोजन करण्‍यात आले. असल्‍याचे सांगून न्‍या.शिवणकर म्‍हणाले की, या महालोक अदालतीमुळे आपसी दाव्‍याचा निकाल समोपचाराने लागत असल्‍यामुळे दोन्‍ही पक्ष समाधानी होऊन घरी परत जात असतात यामुळे समाजात एक चांगला फायंदा व वातावरण तयार होत असून आपसी वैर भावना सपुष्‍ठात येत असते असेही ते म्‍हणाले.
 याप्रसंगी बेालतांना अॅड.दौड म्‍हणाले की, प्रलंबित न्‍यालयीन प्रकरणांना त्‍वरीत निकाली काढण्‍यासाठी महालोक अदालद महत्‍वपुर्ण भुमिका निभावीत असते. यांत सहभागी वादी व प्रतीवादी यांना त्‍वरीत न्‍याय मिळतो. उलट मनामध्‍ये असलेली कुटुता दुर होऊन समाजात आंनदाचे वातावरण निर्माण होते. वेळ व पैसा त्‍या सोबत वाढलेल्‍या त्रासामुळे पक्षकारांना दिलासा मिळत असतो असेही ते म्‍हणाले.
            या महालोक आदालतीमध्‍ये 14 पॅनल राहणार असून त्‍यामध्‍ये प्रमुख न्‍यायाधिश पॅनल सदस्‍य अभियोक्‍ता व सामाजसेवक तसेच न्‍यायीक कर्मचा-यांचा समावेश असेल. या महालोक अदालतीमध्‍ये मोटार वाहन अपघात प्रकरणे, दिवाणी व फौजदारी अपिल व विद्युत कायदयाचे प्रकरणे, भुसंपादनाची प्रकरणे, विवाह कायदा व दिवाणी दावे, फौजदारी व वैवाहीक प्रकरणे, बँकेची प्रकरणे व बिएसएनल संबंधी प्रकरणाचा समावेश आहे.
    कार्यक्रमाचे संचलन व आभार अधिक्षक ता.ग.पठाण यांनी मानले.यावेळी न्‍यायधिश समाज सेवक, अधिवक्‍ता न्‍यायाधिश कर्मचारी व पक्षकार मोठया संख्‍येने उपस्थित होते.