Saturday 4 August 2012

वर्धा जिल्‍ह्यातील 4 ऑगस्टची पावसाची आकडेवारी



वर्धा जिल्‍ह्यातील पावसाची व नैसर्गिक आपत्‍तीची माहिती 
अ.क्र.
                बाब
 नैसर्गिक आपत्‍तीचा तपशील     
1
अतिवृष्‍टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक   
2
अ)यावर्षी आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्‍यममान
ब) गेल्‍या चोवीस तासातील सरासरी पाऊस
358 .8

5.00
3
शासनाचे मदत कार्य
निरंक
4
मृतांची संख्‍या, विज पउून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत गावे
      -
6
बाधीत शहरे
-          
7
नुकसान झालेल्‍या घरांची संख्‍या
-          
8
नुकसान झालेल्‍या गोठ्यांची संख्‍या
-          
9
मृत झालेली जनावरे
-          
10
व्‍यापारी नुकसान
-          
11
आपदग्रस्‍त कुटूंबे व व्‍यक्‍ती
-          
12
पूल व रस्‍त्‍यांचे नुकसान (सार्वजनिक मालमत्‍ता)
-          
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
-          
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्‍यमान मि.मी. मध्‍ये (गेल्‍या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा -8.00(337.9)
2) सेलू 5.00(190.0)
3)देवळी- 1 .00(271.00)
4)हिंगणघाट-5.00(441.4)
5)समुद्रपूर-10.00(504)
6)आर्वी-2.0(447.6)
7)आष्‍टी-1.8(285.8)
8)कारंजा-7.00(392.6)

Friday 3 August 2012

पशुधनाची अचुक मोजणी करा - शेखर चन्‍ने


  • * 19 व्‍या पशुगणनेची 15 सप्‍टेंबर पासून सुरुवात 
  • * जिल्‍ह्यात 3 लक्ष 6 हजार 887 पशुधन
  • * 202 प्रगणक व 44 पर्यवेक्षकांची नियुक्‍ती 
वर्धा, दि. 3 - 19 व्‍या पशुगणनेला जिल्‍ह्यात 15 सप्‍टेंबर पासून सुरुवात होत असून जिल्‍ह्यातील पशुधनाची अचूक मोजणी करण्‍यासाठी ग्रामीण व शहरी भागात योग्‍य नियोजन करा अश्‍या सुचना जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने यांनी आज अधिका-यांना दिल्‍यात.
जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात पशुगणने संदर्भात नियोजन करण्‍यासाठी जिल्‍हाधिका-यांच्‍या अध्‍यक्षतेखाली वरिष्‍ठ अधिका-यांची बैठक आयेाजीत करण्‍यात आली होती. त्‍याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. चन्‍ने बोलत होते.
राज्‍यात पशुगणनेसाठी शासनाने 15 ऑक्‍टोंबर हा संदर्भ दिवस धरुन 15 सप्‍टेंबर ते 15 ऑक्‍टोंबर पर्यंत जिल्‍हृयातील पशुगणनेची पंचवार्षिक नोंदणी करण्‍यात येणार असल्‍याचे सांगताना शेखर चन्‍ने म्‍हणाले की पशुधन, कुक्‍कुटादी पक्षी आणि पशुधन क्षेत्रासाठी वापरली जाणा-या उपकरणांची गणना करण्‍यात येणार आहे. पशुगणनेसाठी ग्रामीण स्‍तरावर पशुसंवर्धन विकास विभागातर्फे तर नगर परिषदेच्‍या क्षेत्रात मुख्‍याधिकारी यांच्‍या मार्फत ही गणना होणार आहे.
 जिल्‍ह्यात मागील पशुगणनेनुसार 3 लक्ष 6 हजार 877 पशुधन असून, यामध्‍ये ग्रामीण भागात 2 लाख 35 हजार 625 तर नगर परिषद क्षेत्रात 71 हजार 252 पशुधनाची नोंदणी करण्‍यात आली होती. जिल्‍ह्यात पशुगणनेसाठी 1 हजार 500 कुटूंब संख्‍येच्‍या आधारे एका प्रगणकाची नियुक्‍ती करण्‍यात येणार असून, यामध्‍ये 155 ग्रामीण तर 47 नगर पालीका क्षेत्रात असे 202 प्रगणकाची नियुक्‍ती करण्‍यात येणार आहे. पशुगणनेसाठी त्‍यांना प्रशिक्षणही देण्‍यात येणार असलयाची माहिती यावेळी जिल्‍हाधिका-यांनी दिली.
          पशुगणनेच्‍या कामात प्रगणकावर नियंत्रणासाठी 44 पर्यवेक्षकांची नियुक्‍तीही करण्‍यात येणार आहे. पशुगणनेमध्‍ये जिल्‍ह्यातील पशुधन सुटणार नाही याची दक्षता घेण्‍याची सुचनाही यावेळी जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने यांनी केली.
           प्रारंभी जिल्‍हा पशुधन उपायुक्‍त डॉ. जी.के. उराडे यांनी 19 व्‍या पशुगणनेची तसेच यासाठी प्रशिक्षण प्रणगणकाची नेमणुका प्रत्‍यक्ष पशुगणना तसेच ग्रामपंचायत गट व नगर परिषदा स्‍तरावर वर्धा, सिंदी, हिंगणघाट, पुलगाव, देवळी व आर्वी आदी स्‍तरावर सुरु केलेल्‍या उपाययोजनांची माहिती दिली. पशुगणनेसाठी मोठ्या शहरामध्‍ये पिंपरी, सिंदी, वरुड, मासला, नालवाडी, बोरगाव मेघे, सावंगी मेघे या सात ठिकाणी अतिरीक्‍त प्रगणकाच्‍या नियुक्‍ती संदर्भातही बैठकीत माहिती दिली.
पशुगणनेसाठी जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेसाठी संनियंत्रण समिती गठीत करण्‍यात आली असून यामध्‍ये मुख्‍य कार्यपालन अधिकारी, नगर परिष्‍दांचे मुख्‍याधिकारी, जिल्‍हा माहिती अधिकारी, जिल्‍हा सांख्यिकी अधिकारी, जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी हे सदस्‍य तर जिल्‍हा पशुसंवर्धन उपसंचालक हे सदस्‍य सचिव म्‍हणून यांचा समावेश राहणार आहे.
यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्‍त डॉ. व्हि.एन. ढगे, जिल्‍हा सांख्यिकी अधिकारी अ.द.गोतमारे, पशुधन विकास अधिकारी डॉ. पी.आर.वानखेडे, पुलगाव नगर परिषदेचे मुख्‍य कार्यपालन अधिकारी एस.डी. टाकरखेडे, हिंगणघाटचे खोब्रागडे आदि अधिकारी यावेळी उपस्थित होते.
                                                

Wednesday 1 August 2012

जनतेच्‍या अपेक्षांची पुर्तता करा - शेखर चन्‍ने

 महसूल दिनी  उत्‍कृष्‍ट कार्याबद्दल  कर्मचा-यांचा गौरव
वर्धा, दि. 1 - महसूल कार्यालयात आलेल्‍या   शेतक-यांना व सामान्‍य जनतेला प्रभावी  व परिणामकारक सेवा देवून महसूल विभागाबद्दल  जनमानसात  चांगली  प्रतिमा निर्माण करा असे आवाहन जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने यांनी आज सुवर्ण जयंती  राजस्‍व  अभियान व महसूल दिनानिमित्‍त आयोजीत कार्यक्रमात केले.
विकासभवन येथे  जिल्‍हाधिकारी कार्यालयात, उपविभागीय महसूल कार्यालय व  तहसिल कार्यालयाच्‍या वतीने महसूल दिनाचे आयोजन करण्‍यात आले होते त्‍याप्रसंगी  मार्गदर्शन करताना जिल्‍हाधिकारी बोलत होते. यावेळी  शेतक-यांना  सातबारा व फेरफार  तसेच राष्‍ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजना व भूस्‍वामी  असल्‍याचे  प्रमाणपत्र तसेच महसूल विभागात  उत्‍कृष्‍ट कार्य करणा-या  नायब तहसिलदार ते कोतवाला पर्यंतच्‍या  सर्व कर्मचा-यांचा गौरव यावेळी  करण्‍यात आला.  
शेतक-यांना महसूल कार्यालयात आल्‍याबरोबर सातबारासह इतर आवश्‍यक
 दस्‍ताऐवज त्‍वरीत मिळावे  ही मापक अपेक्षा असते. महसूल विभागाची  ही नियमित जबाबदारी असून प्रशासन गतीमान करण्‍यासाठी आधुनिक तंत्राचाही  वापर करुन जनतेला अधिक  जलद व परिणामकारक सेवा देण्‍याचा  संकल्‍प महसूल  विभागातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी करावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने यांनी केले.
सुवर्ण जयंती  राजस्‍व अभियाना अंतर्गत   आठ दिवसात अकृषक परवानगी, फेरफार व वारसान हक्‍काच्‍या नोंदी एक महिन्‍यात पूर्ण करणे प्रत्‍येक महिन्‍यात दहा टक्‍के गावात चावडी वाचनाचा कार्यक्रम, मृत व्‍यक्‍तींच्‍या नावे रेकार्डवर राहणार नाही याची दखल तसेच प्रत्‍येक गावात विशेष शिबीराच्‍या माध्‍यमातून सातबारा व इतर प्रमाणपत्राचे वाटप करताना चित्रीकरण करुन  वाटपातील उणीवा दूर करा अशा सुचनाही  जिल्‍हाधिकारी शेखर चन्‍ने  यांनी अधिकारी व  कर्मचा-यांना दिल्‍यात.
       दिप प्रज्‍वलीत करुन महसूल दिनाचे उदघाटन  जिल्‍हाधिका-यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी  अप्‍पर जिल्‍हाधिकारी  संजय भागवत, निवासी उपजिल्‍हाधिकारी श्रीमती विजया बनकर, जिल्‍हा माहिती अधिकारी  अनिल गडेकर, उपविभागीय महसूल अधिकारी हरिष  धार्मिक, तहसिलदार सुधांशु बन्‍सोड आदी उपस्थित होते.
         यावेळी  जिल्‍हाधिकारी कार्यालय, उपविभागीय महसूल कार्यालय व तहसिल कार्यालयातील उत्‍कृष्‍ट सेवेबद्दल कर्मचा-यांना प्रमाणपत्र व पुष्‍पगुच्‍छ देवून गौरविण्‍यात आले.
      निवासी  उपजिल्‍हाधिकारी  श्रीमती विजया बनकर यांनी  महसूल विभाग अधिक गतीमान करण्‍यासाठी  सुवर्ण जयंती  राजस्‍व अभियान जिल्‍ह्यात राबविण्‍यात येत असून या अभियाना अंतर्गत  सर्व महसूल विभागात  विविध उपक्रम राबवून  जनतेला अधिक चांगली सेवा देण्‍याचा प्रयत्‍न असल्‍याचे  सांगितले. सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी सुवर्ण जयंती राजस्‍व अभियाना अंतर्गत राबविण्‍यात येणा-या  विविध उपक्रमाची प्रभावी अंमलबजावनी  करावी असेही यावेळी सांगितले.
      प्रास्‍ताविक  उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी करुन या योजने अंतर्गत 59 लाख 85 हजार 461 दाखल वाटप करण्‍यात आल्‍याचे तसेच समाधान योजनेच्‍या माध्‍यमातून  प्रभावीपणे महसूल सेवा जनतेपर्यंत पोहचविण्‍यात आले असून हा उपक्रम आजपासून  सुरुवात होत असल्‍याचे यावेळी सांगितले. विद्यार्थ्‍यांना  त्‍यांच्‍या शाळा व महाविदृयालयात जातीचे व रहिवासी प्रमाणपत्र वाटप करण्‍याचा अभिनव उपक्रम राबविण्‍यात येत असल्‍याचेही यावेळी त्‍यांनी सांगितले.
       कार्यक्रमाचे संचलन अजय धर्माधिकारी यांनी तर आभार प्रदर्शन तहसिलदार  सुधांशु  बनसोड यांनी मानले. या कार्यक्रमास महसूल विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
                        तहसिल कार्यालयात महसूल दिन
            वर्धा जिल्‍ह्यातील  सर्वतहसिल कार्यालयात महसूल दिनाचे आयोजन करण्‍यात आले. यावेळी  कुटूंब अर्थसहाय्य योजना, नैर्सगिक आपत्‍तीमध्‍ये सापडलेल्‍या कुटूंबाना अर्थसहाय्य, संगणीकृत सातबारा, वर्ग एक व दोन  प्रकरणाचे अंतीम आदेश वाटप, तसेच जात प्रमाणपत्र व उत्‍पन्‍नाचे दाखले देण्‍यात आले.
                                                            0000

वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस कारंजा तालुक्‍यात


   
वर्धा, दिनांक 1 : वर्धा जिल्ह्यात मागील 24 तासात एकूण 28.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. एकूण पावसाची सरासरी 351.8 मि.मी. नोंद करण्‍यात आली आहे.जिल्‍ह्यात सर्वाधिक पाऊस  कारंजा  तालुक्यात 65.4 मि.मी. पाऊस झाला आहे.
            जिल्ह्यात मागील 24 तासात तालुकानिहाय झालेला पाऊस व कंसात एकूण झालेला पाऊस पुढीलप्रमाणे आहे.
            वर्धा- 15.8 मि.मी.(329.9), सेलू- 20  मि.मी.(185), देवळी-14 (270), हिंगणघाट- 15  मि.मी.(436.4), आर्वी- 32.3 मि.मी.(443.6), आष्टी- 49.2 मि.मी.(277), समुद्रपूर- 19 मि.मी. (490), आणि कारंजा-65.4( 382.2)मि.मी. पावसाची नोंद झाली  आहे.                                                                                  
                                                              0000000       
 

वर्धा जिल्‍ह्यात 37(1) व 3 कलम जारी



      वर्धा, दि. 1- जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी  शेखर चन्‍ने यांना प्रदान केलेल्‍या अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) व 3 जारी केले आहे.
      या कलमाचा अंमल दि. 11 ऑगस्‍ट 2012 च्‍या रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल असे आदेशात नमूद आहे.
                                                            0000000

मोर्चा निदर्शने करण्‍यासाठी पोलीस अधिका-यांची परवानगी घ्‍यावी


वर्धा, दि. 1- मुंबई पोलीस अधिनियम सन 1951 कलम 33,35,42,47 अन्‍वये केलेल्‍या कोणत्‍याही आदेशास हा देश अंमलात असे पर्यंत जिल्‍ह्यात जाहीरसभा, निदर्शने, मोर्चे, शोभायात्रा इत्‍यादि जिल्‍ह्यातील पो.स्‍टे. अधिकारी यांचेकडून तारीख, सभेची जागा, द्यावयाच्‍या घोषणा निश्चित करुन परवाना घेतल्‍याशिवाय आयोजन करु नये. शांततेला व सुव्‍यवस्‍थेला बाधा आणणा-या घोषणा देवू नये.
     नमूद आदेश वर्धा जिल्‍हा स्‍थळ सीमेच्‍या हद्दीत दि. 11 ऑगस्‍ट 2012 चे 24 वाजेपर्यंत अंमलात राहील. सदर आदेशाचा भंग केल्‍यास मुंबई पोलीस अधिनियम सन 1951 कलम 134 अन्‍वये कार्यवाहीस पात्र राहील. असे पोलीस अधिक्षक अविनाशकुमार कळवितात.
                                                             0000000

सात गुन्‍हेगार दोन वर्षासाठी तडीपार



वर्धा,दि.1- जिल्‍ह्यातील सात गुन्‍हेगारांना दोन वर्षाच्‍या कालावधीसाठी यवतमाळ व अमरावती या तीन जिल्‍ह्यामधून 30 जुले 2012 पासून तडीपार करण्‍यात आले असल्‍याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी हरषि धार्मिक यांनी दिली.
तडीपार करण्‍यात आलेल्‍या सात व्‍यक्‍ती कोणास आढळुन आल्‍यास जवळच्‍या पोलीस स्‍टेशनला किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालय, वर्धा यांना कळवावे. असे आवाहनही हरिष धार्मिक यांनी केले आहे.
तडीपार करण्‍यात आलेल्‍या  गुन्‍हेगारामध्‍ये महेंद्र सुखदेव म्‍हैसकर रा. बोरगाव (आ.)ता.देवळी, श्रीमती मनोरमा हरिश्‍चंद्र शेंडे वय 51 वर्षे रा. हिंगणघाट फैल, पुलगाव ता. देवळी, राजेंद्र ऊर्फ राजु महादेवराव बोरकर, रा. देवळी ता. देवळी, संजय भैय्यालाल जयस्‍वाल, रा. सिंदी (रे.) ता. सेलु, सुधाकर महादेवराव खेलकर, रा. तळेगाव (टा.), सुधाकर चिंतामन लेंडे रा. बरबडी, वर्धा, सुधीर चंद्रभान सहारे वय 40 वर्षे रा. समतानगर, वर्धा यांचा समावेश आहे.
                                                            0000000

Tuesday 31 July 2012

डाकघरामध्‍ये तात्‍काळ मनिआर्डर सेवा उपलब्‍ध


वर्धा दि.31 – वर्धा मुख्‍य डाकघर,हिन्‍दीनगर, वर्धा मार्केट,मानस मंदीर, कारंजा,खरांगणा,पुलगांव,पुलगांव कॅम्‍प,समुद्रपूर, सेलु,वडनेर,आर्वी,आष्‍टी, देवळी ,सेवाग्राम व हिंगणघाट उपडाकघर येथे तात्‍काळ मनिऑर्डरची सेवा उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे.
          तत्‍काल मनीऑर्डर सेवेमध्‍ये कमीत कमी कमीशन आकारुन तुरंत पैसे पोहचविण्‍यात येतात. त्‍यामुळे जनतेनी या सेवेचा लाभ घ्‍यावा. अधिक माहितीकरीता वरील डाकघरांमध्‍ये संपर्क साधावा असे अधिक्षक,डाकघर वर्धा विभाग,वर्धा यांनी कळविले आहे.
0000

Monday 30 July 2012

जनतेला लोकाभिमुख व गतीमाण प्रशासनासाठी महसूल दिन


       
·         बुधवार दिनांक 1 ऑगष्‍ट रोजी आयोजन
·         तालुका व जिल्‍हा स्‍तरावर विविध कार्यक्रम
·         विविध प्रकारचे दाखले,सातबारा फेरफार करणार

वर्धा दि.30- महसूल विभागातर्फे जनतेला लोकाभिमुख व गतीमान प्रशासन देण्‍यासाठी सुवर्ण जयंती राजस्‍व अभियान राबविण्‍यात येत असून बुधवार दिनांक 1 ऑगष्‍ट रोजी तालुका व जिल्‍हा स्‍तरावर महसूल दिनाचे आयोजन करुन सातबारा,फेरफारासह विविध दाखले देण्‍यात येणार असल्‍याची माहिती अप्‍पर जिल्‍हाधिकारी  संजय भागवत यांनी दिली.
            जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात महसूल दिन आयोजनाबाबत वरिष्‍ठ महसूल अधिका-यांची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी श्रीमती विजया बनकर, उपजिल्‍हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक, सर्व तहसिलदार उपस्थित होते.
            महसूल दिनाचे आयोजन करतांना महसूल विभागाशी संबंधित जनतेची सर्व कामे त्‍वरीत निकाली निघतील तसेच सातबारासह इतर आवश्‍यक प्रमाणपत्र या कार्यक्रमामध्‍ये उपलब्‍ध करुन देण्‍यात यावीत अशा सूचना करतांना संजय भागवत म्‍‍हणाले की, महसूल दिनी तालुका व जिल्‍हा स्‍तरावर उत्‍कृष्‍ट काम करणा-या कर्मचा-यांचाही सत्‍कार करण्‍यात येईल.
            महसूल दिना सोबतच सुवर्ण जयंती राजस्‍व अभियानालाही सुरवात होत असून या अभियाना अंतर्गत ग्रामीण भागात शेतीसाठी आवश्‍यक असलेले पांदन रस्‍ते,विविध दाखले देण्‍यासाठी विविध शिबीराचे आयोजन करणे जनतेची गा-हाणी तसेच तक्रारी सोडविण्‍यासाठी  चावडी वाचन अर्जाचे सुलभिकरण व ऑनलाईन उपलब्‍ध करुन देणे आदी विविध कार्यक्रमाचेही वर्षभर आयोजन करण्‍यात येणार आहे.
                                        वृक्षारोपण करणार
            महसूल दिनानिमित्‍त जिल्‍ह्यातील सर्व तहसिल कार्यालयाच्‍या आवारात वृक्षारोपण करुन महसूल दिन साजरा करण्‍यात येणार आहे. कार्यक्रमात कुटूंब अर्थसहाय्य योजना, श्रावणबाळ आदी सहाय्याच्‍या योजनासह विविध लाभार्थ्‍यांना अनुदानाचे वाटपही यावेळी करण्‍यात येईल.
            तलाठी साजा स्‍तरावर सकाळी गावक-यांच्‍या सहकार्यांने महसूल दिन आयोजित करण्‍यात येईल. यामध्‍ये जमावबंदी,सातबारा,फेरफार नोंदी घेणे विविध प्रकारचे दाखले देणे व महसूल विभागाची प्रलंबित कामे पूर्ण करण्‍यात येतील.
            जिल्‍हा स्‍तरावरही महसूल दिन आयोजित करण्‍यात येणार असून उप‍िवभागीय, तहसिलदार वर्धा तसेच जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या वतीने विकास भवन येथे कार्यक्रम आयोजित करण्‍यात येईल.
                                      जनतेसाठी हेल्‍पलाईन
            महसूल विभागाशी संबंधित असलेली माहिती जनतेला मिळावी यासाठी जिल्‍हा स्‍तरावर हेल्‍पलाईन सुरु करण्‍यात आली आहे, हेल्‍पलाईनसाठी दूरध्‍वनी क्रमांक  07152- 243446 या क्रमांकावर जनतेला माहिती उपलब्‍ध होणार आहे. जनतेनी या हेल्‍पलाईनचा लाभ घ्‍यावा असे आवाहनही अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी केले.
            निवासी उपजिल्‍हाधिकारी श्रीमती विजया बनकर यांनी महसूल दिनाच्‍या आयोजनाची माहिती दिली.
            यावेळी तहसिलदार सुशांत बनसोडे (वर्धा) जे.टी.पुरके (हिंगणघाट) जी.एन.करलुके (आर्वी) प्रकाश महाजन (आष्‍टी) एस.जे.मडावी (कारंजा) ए.जी.गावीत (सेलू) सचिन गोसावी (देवळी) आदी यावेळी उपस्थित होते.
                                                           0000

आपत्‍ती निवारणासाठी प्रशासन सज्‍ज



·         लाईफ जॅकेट, रोप अॅण्‍ड रेक्‍युकीट
·         पूरग्रस्‍त गावासाठी आवश्‍यक साहित्‍य रवाना
·         पोलीस व महसूल विभागासाठी आधुनिक साहित्‍य

            वर्धा दि.30 – अतिवृष्‍टी,पूर तसेच जिल्‍ह्यातील  उदभवना-या  नैसर्गीक आपत्‍तीचा सामना करण्‍यासाठी लाईफ जॉकेट सह रोप अॅण्‍ड रेक्‍युकीट, मेगाफोन ,सर्च लाईटसह आवश्‍यक साहित्‍य उपलब्‍ध झाले आहे. आपत्‍ती निवारणार्थ आवश्‍यक असलेले सर्व साहित्‍य जिल्‍हा व तालुका स्‍तरावरील नैसर्गीक आपत्‍ती निवारण कक्षामध्‍ये सज्‍ज असल्‍याची माहिती अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी दिली.
            आपत्‍ती निवारणासाठी  जिल्‍ह्यास आवश्‍यक असलेले साहित्‍य उपलब्‍ध झाले असून आज संपूर्ण साहित्‍य आपत्‍ती निवारण कक्षाकडे रवाना करण्‍यात आले.
            जिल्‍ह्यास नैसर्गीक आपत्‍ती नियंत्रणासाठी प्राप्‍त झालेल्‍या साहित्‍यामध्‍ये 160 लाईफ जॅकेट, 25 मेघाफोन, 24 फोल्‍डींग स्‍ट्रेचर, दोन रोप अॅण्‍ड रेक्‍यु किट, 25 सर्च लाईट, 280 ड्रम व 280 ट्युब आदी साहित्‍याचा समावेश आहे.
            सर्व साहित्‍य तालुकास्‍तरावर ज्‍या गावांना पुरांचा धोका आहे अशा गावासाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार असून आपत्‍ती निवारणाचा सामना करण्‍यासाठी अधिका-यांना व कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्‍यात आले आहे.
            जिल्‍हा पोलीस अधिक्षक व सर्व तहसिल कार्यालयामध्‍ये लॉईफ जॅकेटसह आवश्‍यक साहित्‍य उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहे. जिल्‍हा स्‍तरावर नैसर्गीक आपत्‍तीचा सामना करण्‍यासाठी यंत्रणा सज्‍ज ठेवण्‍यात आली आहे.
            यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी सुश्री विजया बनकर, उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक, तहसिलदार सुशांत बनसोडे, सचिन गोसावी, ए.जी.गावीत, जी.एन.करलुके, अनिल दलाल, राहुल सारंग, एस.जे.मडावी,जी.टी.पुरके, यु.एस.तोडसाम, आदींनी आपदा  प्रबोधनासाठी साहित्‍यांच्‍या  उपयोगाबाबत माहिती घेतली.
            आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कक्ष प्रमुख किशोर सोनटक्‍के यांनी नैसर्गीक आपत्‍ती निवारणासाठी उपलब्‍ध सुविधांची माहिती दिली.
0000

गुणवंत गरीब विद्यार्थ्‍यांना समाजाने मदत करावी - संजय देवतळे


वर्धा दि.30- स्‍पर्धेच्‍या युगात समाजातील गरीब विद्यार्थी उच्‍च शिक्षणापासून वंचित राहू नये त्‍या विद्यार्थ्‍यांना भविष्‍यात शिक्षण सेवे विविध  क्षेत्रामध्‍ये महत्‍वाची कामगिरी बजावता यावी यासाठी गुणवंत  गरीब व होतकरु विद्यार्थ्‍यांना समाजाने मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन पर्यावरण व सांस्‍कृती विभागाचे मंत्री संजय देवतळे यांनी केले आहे.
हिंगणघाट येथे निखाडे सभागृहात काल खैरी कुणबी समाजाच्‍या वतीने समाज भूषण पुरस्‍कार जेष्‍ठ नागरीक व 10 वी व 12 विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार व गुण गौरव पर्यावरण मंत्री देवतळे यांचे हस्‍ते संपन्‍न झाला त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थानी  रमेशचंद्र बोमाटे हे होते तर प्रमुख पाहुने म्‍हणून आमदार सुभाष थोटे, जिल्‍हा परिषदेचे सभापती प्रा. उषाकिरण थुटे प्रबोधनकार भाऊसाहेब थुटे, माजी आमदार देवराव लडके माजी जि.प.अध्‍यक्ष कलावतीबाई वाकोडकर आदी मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
            शिक्षण व विविध क्षेत्रामध्‍ये मोठया प्रमाणावर स्‍पर्धा निर्माण झाली असून प्रतिष्‍ठीत नागरीकांनी त्‍या विद्यार्थ्‍यांचे उज्‍वल  भविष्‍य घडविण्‍याचा प्रयत्‍न करावा असे सांगून  पर्यावरण मंत्री देवतळे म्‍हणाले की, गेल्‍या दोन वर्षापासून खैरे कुणबी समाजाच्‍या वतीने समाज भूषण पुरस्‍कार, जेष्‍ठ नागरिक व 10 वी  12 वी च्‍या विद्यार्थ्‍यांनी मिळविलेल्‍या उल्‍लेखनिय यशाबाबत गुण गौरव केला जातो ही बाब गौरवरस्‍पद अशीच आहे.या कार्यक्रमातून जेष्‍ठ नागरीकांनी केलेली उल्‍लेखनिय कामगिरी नव्‍या पिढीला माहिती होणार असून त्‍यांनी केलेल्‍या कार्याची प्रेरणा सुध्‍दा मिळत असते. हिंगणघाट, समुद्रपूर व वरोरा गावामध्‍ये हा समाज सधन समजल्‍या जातो. त्‍या कारनाने हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्‍यामध्‍ये समाजाच्‍या वतीने उकृष्‍ट असे सभागृहाची निर्मिती  करण्‍यात यावी.सभागृहामध्‍ये सामाजिक विषयाची चर्चा व अडिअडचणीवर चर्चा करुन समाजाला  योग्‍य दिशादर्शक मार्ग मिळत असतो. होतकरु व गरीब विद्यार्थ्‍यासाठी स्‍पर्धात्‍मक परिक्षेचे वर्ग चालवून त्‍यांचे उज्‍वल भविष्‍य घडविण्‍याचा प्रयत्‍न करावा असेही ते म्‍हणाले.
यावेळी बोलतांना आमदार धोटे म्‍हणाले की कृषी क्षेत्रावर हा समाज विसंबून असल्‍यामुळे अनेकांना गरीबीचा सक्ष्‍मता करावा लागतो.या समाजाच्‍या उन्‍नतीसाठी सामुहिकरित्‍या प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे.या क्षेत्रामध्‍ये अनेक शैक्षणिक संस्‍थावर समाजाचे वर्चस्‍व आहे. त्‍या संस्‍थाचालकांनी  शैक्षणिक क्षेत्रासाठी स्‍पर्धेचे वर्ग उघडून गुणवंत विद्यार्थी निर्माण करावे असे आवाहन केले.
यावेळी व्‍यासपिठावरुन अनेक मान्‍यवरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी उल्‍लेखनिय व वैशिष्‍ठयपूर्ण काम करणा-या व्‍यक्‍तींचा मान्‍यवरांचे हस्‍ते समाजभूषण पुरस्‍कार देवून  गौरविण्‍यात आले.तसेच 37 जेष्‍ठ नागरीक व 75 प्रतिशनाच्‍या वर 10 वी मध्‍ये गुण प्राप्‍त करणारे 30 विद्यार्थी तसेच 12 वी मध्‍ये गुण प्रापत करणारे 12 विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार व गुणगौरव करण्‍यात आला.
            या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक वसंत पाल यांनी केले तर संचालन प्रा. उमेश बोबडे व आभार गजानन नांदूरकर यांनी मानले.या कार्यक्रमासाठी मोठया संखेने हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्‍यातील नागरीक व ग्रामस्‍थ उपस्थित होते.
                                                       00000

वर्धा जिल्ह्यात सर्वत्र पाऊस


        वर्धा, दिनांक 30 : वर्धा जिल्ह्यात पाऊस पडत असल्याने पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात एकूण 8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
       जिल्ह्यात मागील 24 तासात तालुकानिहाय झालेला पाऊस व कंसात एकूण झालेला पाऊस पुढीलप्रमाणे              
       वर्धा- 9.8 मि.मी.(307.7), सेलू-11.00 मि.मी.(162.00), देवळी-6.00 (249.6), हिंगणघाट-10.00 मि.मी.(417.4), समुद्रपूर-4.3 मि.मी. (457.00), आष्टी 7.6 मि.मी.(214.0), आर्वी 3.3 मि.मी.(393.3) आणि कारंजा-11.3 ( 303.8) पावसाची नोंद झाली आहे.
                                  ***