Friday 4 November 2016

महिलांनी उद्योग उभारुन आर्थिक परिस्थिती बदलावी
-         जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
Ø वर्धिनी स्‍नेह संम्‍मेलन कार्यक्रम
वर्धा,दि.4 – महिलांनमध्‍ये मोठ्या प्रमाणात प्रतिभाआहे. त्‍या सर्व प्रकारचे कामे सहज करु शकतात. बचतगटाच्‍या माध्‍यमातून वर्धेतील महिला इतर जिल्‍ह्यात मास्‍टर ट्रेनर म्‍हणून काम करित आहेत. त्‍यामुळे महिलांनी आता बचतगटाच्‍या माध्‍यमातून उद्योग सुरु करुन स्‍वःताची व गावाची आर्थिक परिस्थिती बदलवावी असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
महाराष्‍ट्र राज्‍य ग्रामीण जीवनोन्‍नती  अभियाना अर्तगत वर्धीनी स्‍नेह समेलन कार्यक्रम विकास भवन येथे आयोजित करण्‍यात आला होता. या कार्यक्रमाच्‍या उद्घाटन प्रसंगी श्री. नवाल बोलत होते. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, जिल्‍हा अभियान व्‍यवस्‍थापक देवकुमार कांबळे, राजेद्र बरडे वर्धीनी कक्ष प्रमुख अमोलसिंग रोटेल उपस्थित होते.
पुढे बोलतांना जिल्‍हाधिकारी म्‍हणाले, नैसर्गिकरिता पैशाचे अधिकार महिलांना दिले आहे. जिल्‍ह्यात एक लाख महिलांचे संघटन आहे. त्‍यामुळे महिला बचत गटानी तयार केलेली वस्‍तू या संघटनाच्‍या माध्‍यमातून विक्री केल्‍यास मोठी बाजारपेठ जिल्‍ह्यातच उपलब्‍ध होईल. त्‍यामुळे महिलांनी मिशन म्‍हणून आव्‍हान स्विकारुन आपला गावातील प्रत्‍येक महिला सदस्‍या मध्‍ये उद्योग उभारण्‍यासाठी अग्‍नी  प्रज्‍वलीत करावा, असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले.
यावेळी बोलतांना मुख्‍य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे म्‍हणाल्‍या, बचत गटाच्‍या माध्‍यमातून महिलांचे संघटन तयार झाले आहे. ज्‍याप्रमाणे महिला आपल्‍या जिल्‍ह्यातील बचटगटाच्‍या महिला काम करित आहेत तसे काम इतरत्र कोणत्‍याच जिल्‍ह्यात पाहयला मिळत नाही. महिलांवर स्‍वच्‍छतेची आणखी एक जबाबदारी द्यायची आहे. बचतगटातील प्रत्‍येक महिलेने गांवातील पाच कुंटुबाना शौचालय बाधणे आणि वापरण्‍यासाठी प्रात्‍साहित करावे आणि आपल्‍या जिल्‍ह्याला उघड्यावरील शौचापासून मुक्‍ती देण्‍यासाठी या अभियानात सहभागी व्‍हावे, असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले.
यावेळी महिला बचट गटामधील कृषीसखी, पशुसखी, बॅकसखी तसेच संघटिका आणिवर्धीनी म्‍हणून काम करणा-या महिलांनी त्‍यांचे अनुभव कथन केले. वर्धा जिल्‍ह्यातील बचट गटाच्‍या माध्‍यमातून पुढे आलेल्‍या आणि वर्धीनी म्‍हणून उत्‍कृष्‍ट काम करित असलेल्‍या महिलांचा यावेळी सत्‍कार करण्‍यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक करताना देवकुमार कांबळे यांनी वर्धा जिल्‍ह्यात महाराष्‍ट्र राज्‍य ग्रामीण जीवनोन्‍नती अभियाना अर्तगत जिल्‍हा अभियान व्‍यवस्‍थापन कक्ष येथे प्रायोगिक तत्‍वावर वर्धीनीचे कक्ष उघडण्‍यात आलेले आहे. या कक्षा मार्फत वर्धीनीचे समूह संसाधन असे कॅडर तयार करण्‍यात आले आहे. जिल्‍ह्यात एकूण 240 वरिष्‍ठ आणि 140 कनिष्‍ठ वर्धीनी तयार झाल्‍या असून इतर जिल्‍ह्यात या वर्धीनी मास्‍टर ट्रेनर म्‍हणून सामाजीक समावेशन व संस्‍थामक बांधनी करिता प्रशिक्षण देण्‍याकरिता जातात. आतापर्यंत यवतमाळ, गोंदिया, ठाणे, पालघर, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या जिल्‍ह्यामध्‍ये वर्धिनीनी प्रशिक्षण दिले आहे.
या कार्यक्रमाचे संचालन मिनाश्री अटकुलवार तर आभार अमोल सिंग रोटेल यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्‍ह्यातील वर्धीनी आणि त्‍याच्‍या परिवारातील सदस्‍य उपस्थित होते.

00000000

निवृत्‍ती वेतन धारकांना बायोमॅट्रीक जिवन
प्रमाणपत्राची नोंद करण्‍याचे आवाहन
वर्धा,दि.4 –कोषागारातुन निवृत्‍ती वेतन व कुंटूंब निवृत्‍ती वेतन घेणा-या राज्‍य शासकीय निवृत्‍ती वेतन धारकांनी संबंधित उपकोषागारामध्‍ये बसविण्‍यात आलेल्‍या बायोमॅट्रीक मशिनवर जिवन प्रमाणपत्राची नोंद करण्‍याचे आवाहन कोषागार अधिकारी यांनी केले आहे.
जिल्‍हयात वर्धा कोषागार कार्यालय, देवळी, पुलगाव, हिंगणघाट,सेलू, समुद्रपूर,कारंजा (घाडगे), आर्वी व आष्‍टी येथील उपकोषागार कार्यालयात बायोमॅट्रीक मशिन बसविण्‍यात आलेल्‍या  आहे. असे कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे.
                                            0000

सामाजिक वनिकरण विभागाच्‍या वतीने विविध स्‍पर्धेचे आयोजन
वर्धा,दि.4 –राज्‍यातील सर्व प्राथमिक, माध्‍यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यामध्‍ये पर्यावरण, वृक्षसंवर्धन व जलसंवर्धन या विषयाबद्दलची जिज्ञासा निर्माण व्‍हावी, त्‍यांना पर्यावरण संवर्धनाविषयीचे ज्ञान मिळावे व सामाजिक वनीकरण विभागाच्‍या वृक्षलागवड, पडिक जमिन विकास व जलसंवर्धन कार्यक्रमात त्‍यांचा सक्रीय सहभाग वाढावा यासाठी सामाजिक वनीकरण महासंचालनालयाच्‍या वतीने विद्यार्थ्‍यांसाठी निबंध लेखन, चित्रकला व वक्‍तृत्‍व स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे. या स्‍पर्धेमध्‍ये जास्‍तीत जास्‍त विद्यार्थ्‍यांनी सहभागी होण्‍याचे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक यांनी केले आहे.
स्‍पर्धा तीन गटामध्‍ये विभागण्‍यात आलेली आहे. यामध्‍ये प्राथमिक गट (इयत्‍ता 4 ते 7), माध्‍यमिक गट (इयत्‍ता 8 ते 10 वी) व महाविद्यालयीन गट (इयत्‍ता 11 वी ते पुढे) असे गट करण्‍यात आलेले आहे. प्राथमिक गटासाठी फक्‍त चित्रकला स्‍पर्धा तर माध्‍यमिक  व महाविद्यालयीन गटासाठी निबंध व वक्‍तृत्‍व स्‍पर्धाचे आयोजन करण्‍यात आले आहे.
माध्‍यमिक गटातील निबंध स्‍पर्धेचा विषय नैसर्गिक साधन संपत्‍तीचे जतन व संवर्धन तर महाविद्यालयीन गटातील निबंध स्‍पर्धेचा विषय मानव –वन्‍यप्राणी संघर्ष जबाबदार कोण हा आहे. प्राथमिक गटातील चित्रकलेचा विषय वनमहोत्‍सवातील माझे वृक्षारोपन, माध्‍यमिक गटातील जंगलामधील निसर्गरम्‍यदृष्‍य व महाविद्यालयीन गटातील आपली संस्‍कृती आणि पर्यावरण आणि वक्‍तृत्‍व स्‍पर्धेचा माध्‍यमिक गटातील आजची जीवनशैली व पर्यावरण व महाविद्यालयीन गटासाठी जागतिक तापमान वाढ-विकसित व विकसनशील देशाच्‍या भुमिका  आणि राज्‍यस्‍तरीय खुली छायाचित्र स्‍पर्धेसाठी निसर्गाचे मनोहरी रुप हा आहे.
महाविद्यालीन व माध्‍यमिक गटासाठी  प्रथम पुरस्‍कार 500 रुपये, व्दितीय 300 रुपये व तृतीय 200 रुपये महाविद्यालयीन गटासाटी राज्‍यस्‍तरीय प्रथम 1 हजार रुपये , व्दितीय 600 रुपये व तृतीय 400 रुपये व माध्‍यमिक गटासाठी राज्‍यस्‍तरीय प्रथम 700 रुपये, व्‍दतीय 500 रुपये व तृतीय 300 रुपये  प्रा‍थमिक गटातील चित्रकला साठी प्रथम पुरस्‍कार 150 रुपये , व्दितीय100 रुपये व तृतीय 50 रुपये राज्‍यस्‍तर प्रथम 400 रुपये, व्दितीय 300 रुपये व तृतीय 200 रुपये आणि सर्वासाठी खुली छायाचित्र स्‍पर्धेसाठी खुला असलेल्‍या गटासाठी राज्‍यस्‍तर  प्रथम 3 हजार रुपये , व्दितीय 2 हजार रुपये व तृतीय 1 हजार रुपये  याशिवाय प्रत्‍येकी 500 रुपयाची उत्‍तेजनार्थ पारितोषिक देण्‍यात येणार आहे.
शाळा, विद्यालये व महाविद्यालयांनी स्‍पर्धा परिषेचे आयोजन करुन प्रथम तीन क्रमांकाची स्‍पर्धकाची निवड करुन सामाजिक वनीकरण कार्यालयात नावे पाठवावी.अधिक माहितीसाठी उप संचालक, सामाजिक वनीकरण, झोपाटे बिल्‍डींग बॅचलर रोड येथे संपर्क साधावा असे उपसंचालक यांनी कळविले आहे.
                                                00000

प्र.प.क्र-751                                                           4 नोव्‍हेंबर, 2016