Friday 9 September 2011

कनिष्ठ महाविद्यालयाचे तुकडी निर्धारण शिबिर 17 व 18 सप्टेंबर रोजी


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक             जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.9 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------------
          
     वर्धा,दि.9- वर्धा जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे तुकडी निर्धारण शिबीर दि. 17 व 18 सप्टेंबर 2011 रोजी न्यु इंग्लिश हायस्कूल वर्धा येथे आयोजित करण्यात आले आहे.
     दि. 17 सप्टेंबर 2011 रोजी पंचायत समिती वर्धा, सेलू, हिंगणघाट, समुद्रपूर व देवळी या तालुक्यातील कनिष्ठ महाविदृल्यांनी आपले तुकडी निर्धारणाचे प्रस्ताव पद पडताळणीसाठी सादर करुन पटपडताळणी करुन घ्यावी.
     दि. 18 सप्टेंबर 2011 रोजी पंचायत समिती आर्वी, आष्टी व कारंजा या तालुकयातील कनिष्ठ महाविदृयालयांचे तुकडी निर्धारणाचे प्रस्ताव स्विकारण्यात येतील. यानंतर प्रस्ताव स्विकारण्यात येणार नाही व पद पडताळणी करुन मिळणार नाही याची नोंद घ्यावी. असे शिक्षणाधिकारी,माध्यमिक जिल्हा परिषद,वर्धा यांनी कळविले आहे.
                              000000



पर्यावरणपुरक सणांचे साजरीकरणासाठी मार्गदर्शक सुचनाचे पालन करण्यासाठी आवाहन


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक              जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.9 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------------
               
     वर्धा,दि.9-महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण विभागाचे दि.3 मे 2011 निर्णयान्वये पर्यावरणपुरक सणांचे साजरीकरणासाठी मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. त्या सुचनांचे पालन करण्यासाठी जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी आवाहन केले आहे.
     सदर मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यात दिनांक 1 सप्टेंबर 2011 पासुन सुरु झालेल्या गणेशोत्सव व आगामी गणेश विसर्जन, दुर्गात्सव, दिपावली यासह इतर विविध सणांच्या साजरी करण्याच्या वेळी सर्वसाधारण पणे प्रदुषित होणारे जल,हवा घटकांचे प्रदुषण रोखण्यासाठी जसे नद्या, सरोवरे,समुद्र सारख्या जलाशयात मुर्त्यांचे विसर्जन टाळण्याकरीता विविध सामाजिक संस्था/ संघटना यांचे मार्फत तयार करण्यात आलेल्या पर्यायी कृत्रिम तलाव, कुंड सारख्या जलाशयाचा वापर करावा. याशिवाय पर्यावरण प्रदुषण रोखण्याच्या दृष्टीने जनतेने, सार्वजनिक मंडळानी, विविध संस्थांनी/ संघटनानी सर्वतोपरी प्रयत्न करावे असे प्रसिध्दी पत्रकात नमुद आहे.
                              0000



इ-निविदा सादर करण्यासाठी मुदत वाढ


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.9 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------------
                  
     वर्धा,दि.9- वर्धा जिल्ह्यातील 61 रेतीघाटाच्या लिलाव करण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा यांनी दि. 9 सप्टेंबर 2011 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत इ-निवीदा मागविण्यात आलेल्या होत्या. सदर निवीदा दि. 9 सप्टेंबर 2011 रोजी उघडण्यात येणार होत्या परंतु इ-टेडरिंगची प्रक्रीया ही कंत्राटदाराकरीता /लिलावधाराकरिता नविनच असल्यामुळे अनेक लोक दिलेल्या विहित मुदतीमध्ये त्यांच्या इ-निविदा सादर करु शकले नाही. सबब निविदा धारकांना इ-निवीदा सादर करण्याकरिता मुदत वाढवून देणे गरजेचे वाटल्यामुळे इ-निविदा भरण्यास मुदत वाढ देण्यात येत आहे. करीता दि.14 सप्टेंबर 2011 रोजी निविदा दुपारी 12 वाजेपर्यंत खरेदी करता येईल व दि. 14 सप्टेंबर 2011 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत सादर करता येईल. तसेच त्याच दिवशी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा यांच्या सभागृहात उघडण्यात येईल. असे जिल्हाधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.
                              00000



वर्धा जिल्हयातील पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती शुक्रवार दि. 9/9/2011



क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  र्षी  आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
919.95 मि.मी.
7.1 मि.मी.
3
शासनाचे मदत कार्य
सुरू आहे
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान (सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा -863.32(2)मि.मी.
2)सेलू - 913(3) मि.मी.
3)देवळी -909.40(निरंक) मि.मी.
4)हिंगणघाट-880.8(निरंक) मि.मी.
5)आर्वी -1007(निरंक) मि.मी.
6)आष्टी -747.12(0.8) मि.मी.
7)समुद्रपूर -1062.5(24) मि.मी
8)कारंजा-895.4 (27) मि.मी.

Thursday 8 September 2011

विधानमंडळ रोजगार हमी योजना समिती बैठकीचे छायाचित्र


राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचा दौरा


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि. 8 सप्टेंबर 2011
---------------------------------------------------------------------------------

वर्धा, दि.8- वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांचे शासकीय मोटारीने शुक्रवार दिनांक   9 सप्टेंबर 2011 रोजी दुपारी 3 वाजता वर्धा येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमण होईल.
     दुपारी 3.30 वाजता जिल्हाधिकारी वर्धा यांच्याशी चर्चा (स्थळ-शासकीय विश्रामगृह), दुपारी 4.45 वाजता दत्ता मेघे सभागृह सावंगी मेघे,वर्धा कडे प्रयाण, सायंकाळी 5 वाजता आगमण व सुजाण माता अभिनंदन समारोहास उपस्थिती. सोयीनुसार मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.
                              00000

जिल्ह्यातील आठ जलाशये 100 टक्के भरलेले


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि. 8 सप्टेंबर 2011
---------------------------------------------------------------------------------
          
वर्धा,दि.8-वर्धा पाटबंधारे विभाग यांनी पाठविलेल्या अहवालानुसार आज दिनांक 8 सप्टेंबर 2011 रोजी जलाशयातील पाण्याच्या पातळीच्या स्थितीत सुधारणा झाली असून,आठ जलाशये 100 टक्के भरलेली आहे.
     धाम प्रकल्प महाकाली जलाशय पोथरा प्रकल्प  डोंगरगाव, पंचधारा, व मदन उन्नई,,वर्धा कार नदी प्रकल्प व सुकळी लघू प्रकल्प 100 टक्के, लालनाला 99.05 टक्के,नांद प्रकल्प 87.73 टक्के, वडगाव प्रकल्प 92.51 टक्के, उर्ध्व वर्धा धरण 95.32 टक्के, निम्न वर्धा प्रकल्प 11.38 टक्के, बेंबाळा प्रकल्प 39.19 टक्के भरलेले आहेत.
     धाम प्रकल्पातून 34 से.मी.ने 87.06 क्युसेस,पोथरा प्रकल्पातून 40 सें.मी.ने 101.68 क्युसेस, डोंगरगांव प्रकल्पातून 20 से.मी. ने 9.35 क्युसेस , पंचधारा प्रकल्पातून 5 से.मी. ने 2.44 क्युसेस, मदन उन्नई प्रकल्पातून 10 से.मी. ने 7.56 क्युसेस, मदन उन्नई धरणातून       15 सें.मी.ने 16.20 क्युसेस, वर्धा कार नदी प्रकल्पातून 20 से.मी.ने 33.38 क्युसेस व सुकळी लघू प्रकल्पातून 3 से.मी.ने 2 क्युसेस पाण्याचा विसर्ग सांडव्यावरुन होत आहे.
     बोर प्रकल्पाचे 3 व्दार 15 से.मी. ने उघडले असून त्यातून 32 क्युसेस,वडगाव प्रकल्पाचे 5 व्दार 25 से.मी. ने उघडले असून, त्यातून 138.30 क्युसेस,उर्ध्व वर्धा धरणाचे 11 व्दारे 15 से.मी. ने उघडले असून, त्यातून 620 क्युसेस,निम्न वर्धा धरणाचे 30 व्दारे 40 से.मी. ने उघडले असून, त्यातून 570 क्युसेस, बेंबाळा प्रकल्पाचे 2 व्दार 10 से.मी. ने उघडले असून, त्यातून 19.20 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. असे अहवालात नमुद आहे.
                       0000000000





Wednesday 7 September 2011

वर्धा जिल्हयातील पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती, गुरुवार दि. 8/9/2011


 ची
खालील  नमुन्यात  पाठवीत  आहे. कृपया आपल्या माहितीसाठी  सविनय   सादर.
क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  र्षी  आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
912.60 मि.मी.
7.15 मि.मी.
3
शासनाचे मदत कार्य
सुरू आहे
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान (सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा -860(33)मि.मी.
2)सेलू - 910(14) मि.मी.
3)देवळी -909.40(निरंक) मि.मी.
4)हिंगणघाट-880(4) मि.मी.
5)आर्वी -1007(4) मि.मी.
6)आष्टी -747.4(4.20) मि.मी.
7)समुद्रपूर -1038.5(12) मि.मी
8)कारंजा-868.4 (16) मि.मी.