Saturday 10 November 2012

अपंगासाठी कर्जपुरवठा मर्यादेत वाढ -शिवाजीराव मोघे


           वर्धा दि.10- समाजात दुर्लक्षित असलेल्‍या अपंगांना त्‍यांच्‍या स्‍वतःच्‍या पायावर उभे राहता यावे तसेच त्यांना स्‍वाभिमानाने जीवन जगता यावे यासाठी अपंग व्‍यक्‍तींना शासन  25 हजारा पर्यंत  कर्ज वाटत करीत होते. या कर्जाची मर्यादा वाढवून ती दिड लाखा पर्यंत करण्‍यात आली असून यामध्‍ये 30 टक्‍के अनुदानाचा समावेश असल्‍याची माहिती सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली.
            महाराष्‍ट्र राज्‍य अपंग वित्‍त व विकास महामंडळ मुंबई व आचार्य विनोबाभावे ग्रामीण रुग्‍णालय,सावंगी मेघे येथील सभागृहात  आयोजित करण्‍यात आलेल्‍या अपंगांना धनादेश वाटप व अपंगांना साहित्‍य वाटप तसेच सामाजिक न्‍याय भवनात व रुग्‍णालयात  जिल्‍हा अपंग पूनर्वसन केंद्राचे उदघाटन त्‍यांच्‍या हस्‍ते आज संपन्‍न झाले. त्‍यावेळेस ते बोलत होते.
            यावेळी मंचावर अध्‍यक्षस्‍थानी अपर जिल्‍हाधिकारी संजय भागवत तर प्रमुख उपस्थितीत नगर पालिकेचे अध्‍यक्ष आकाश शेंडे, महाराष्‍ट्र राज्‍य अपंग वित्‍त व विकास महामंडळाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक सुहास काळे, जिल्‍हा परिषद समाजकल्‍याण अधिकारी जया राऊत, ओबीसी महामंडळाचे व्‍यवस्‍थापक अतुल बोकीन पल्‍लीवार,आचार्य विनोबा भावे रुग्‍णालयाचे अभूदय मेघे, अधिष्‍ठाता संदिप श्रीवास्‍तव,डॉ.एस.एस.पटेल,डॉ. आर.सी.गोयल,अपंग केंद्राचे समन्‍वयक डॉ. सक्‍सेना, यवतमाळ जिल्‍हा परिषदचे सदस्‍य देवानंद पवार, आदि मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
            समाजातून दूर्बल व दूर्लक्षित असलेला घटक म्‍हणून अपंग व्‍यक्‍तीकडे पाहिले जात असल्‍याचे सांगून सामाजिक न्‍याय मंत्री मोघे म्‍हणाले की, या घटकांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणण्‍यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्‍यात येत असते. त्‍यांच्‍या  कर्ज पुरवठ्यासाठी  उत्‍पन्‍नाची मर्यादा वाढवून ती 1 लाख रुपये करण्‍यात आली आहे. तसेच कर्ज पुरवठ्यामध्‍ये भरघोष वाढ करण्‍यात आली असून अपंग व्‍यक्‍तींना आता स्‍वतःच्‍या पायावर सहज उभे राहता येईल अशी  सोय शासनाने  करुन दिली आहे. अपंग व्‍यक्‍तींना दुस-यावर निर्भर राहू नये यासाठी त्‍यांना ट्रायासिकल व्हिलचेअर्स,कॅलीपर्स,जयपूर फुट व श्रवणयंत्रही देण्‍यात येणार आहेत.अपंगांच्‍या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबश्‍द असल्‍याचे ते म्‍हणाले.    यावेळी बोलतांना अप्‍पर जिल्‍हाधिकारी भागवत म्‍हणाले की, अपंगाचे जीवन हे परावलंबी आहे.त्‍यांना स्‍वावलंबन बनविण्‍यासाठी शासनाच्‍या योजनाची जोड दिल्‍यास ते निश्चितच आत्‍मनिर्भर होतील. अपंग पूनर्वसन केंद्राच्‍या माध्‍यमातून हे सर्व कार्य होणार असल्‍यामुळे अपंगांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्‍ह्यात 12 लाख लोकसंख्‍या आहे.यात अंदाजे दोन टक्‍के अपंगव्‍यक्‍ती गृहीत धरल्‍यास
 जवळपास 24 हजार अपंग व्‍यक्‍ती आढळून येवू शकतात यासाठी वर्षाला 3 कोटीचा खर्च अपेक्षित आहे.  सोबतच आयटीआय मध्‍ये सुरु असलेली जिल्‍हा कौशल्‍य उपक्रमाच्‍या
अल्‍पकालीन कोर्सेस मध्‍ये स्‍वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिल्‍यास अपंगांना आपल्‍या पायावर उभे राहता येईल. त्‍यासाठी प्रस्‍ताव तयार करुन शासनाकडे पाठविण्‍यात येईल.त्‍या प्रस्‍तावाला मंजूरी दिल्‍यास अंपंग व्‍यक्‍तीच्‍या समस्‍या सुटण्‍यासाठी मदत होईल. मुंबई येथे दोन रुग्‍णालयातून शिक्षण अपंगत्‍वाचे प्रमाणपत्र दिले जाते ही सोय वर्धेत झाल्‍यास विदर्भातील अनेक अपंगांना त्‍याचा लाभ मिळू शकेल असेही ते म्‍हणाले.
            अपंग वित्‍त व विकास महामंडळाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक काळे म्‍हणाले की, राज्‍यात 9 जिल्‍ह्यामध्‍ये अपंग पुनर्वसन केंद्र उघडण्‍यात येणार आहेत. त्‍यात पहिले केंद्र हे वर्धेमध्‍ये उघडण्‍यात आले असून यासाठी आचार्य विनोबाभावे रुग्‍णालयांनी तयारी दर्शविली होती. तसेच सामाजिक न्‍याय भवनात अपंग पुनर्वसन कार्यालय उघडण्‍यात आले आहे. हे कार्यालय वित्‍त विभागाचा कार्यभार सांभाळणार असून अपंग विकासाचे कार्य रुग्‍णालय पाहणार आहे. रुग्‍णालयातून अपंगाची संपूर्ण तपासणी व साहित्‍याचे वितरण करण्‍यात येणार आहे. अपंग सवंर्गाच्‍या विकासासाठी शासनाने अपंगाचे आरक्षण भरण्‍याचे कार्य सुरु केले आहे,अपंगाचे धोरण व कृती आराखड्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. अपंगाच्‍या भागभांडवलात 25 कोटीची तरतूद करण्‍यात आली होती त्‍यात वाढ करुण  ती 150 कोटी करण्‍यात आली आहे, अपंग क्षेत्रामध्‍ये सेवाभावी वृत्‍तीने कार्य करणा-या व्‍यक्‍तींना नियमितपणे पुरस्‍कार देण्‍यात येत आहे. अशा  अनेक सुधारणा घडवून आणण्‍याचा प्रयत्‍न  असून त्‍यासाठी शासनाचे सहकार्य व सकारात्‍मक भूमिका असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
            यावेळी अभूदय मेघे यांनीही आपले विचार मांडले.यावेळी 17 अपंग लाभार्थ्‍यांना 17 तिढ सायकलीचे 12 अपंग लाभार्थ्‍यांना व्हिलचेअरचे 3 अपंग लाभार्थ्‍यांना कॅलीपर्सचे 10 अपंग लाभार्थ्‍यांना जयपूर फुटचे दोन अपंग लाभार्थ्‍यांना श्रवण यंत्राचे वितरण तसेच चार अपंग लाभार्थ्‍यांना 3 लक्ष 50 हजाराचे धनादेश व 5 अपंग लाभार्थ्‍यांना 7 लक्ष 50 हजाराचे कर्ज मंजुरीचे आदेश मान्‍यवराचे हस्‍ते देण्‍यात आले.
            तत्‍पूर्वी मंत्रीमहोदयांनी सामाजिक न्‍याय भवनातील व आचार्य विनोबाभावे रुग्‍णालयातील जिल्‍हा अपंग पुनर्वसन केंद्राचे उदघाटन केले तसेच रुग्‍णालयात जावून अपंग व्‍यक्‍तीची  माहिती जाणून घेतली.
            कार्यक्रमाचे संचालन संजय इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन अतूल कोतपल्‍लीवार यांनी मानले. यावेळी मोठ्या संखेने अपंग व्‍यक्‍तीचे नातेवाईक रुग्‍णालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच सर्वसामान्‍य लोक उपस्थित होते.
00000

Tuesday 6 November 2012

ग्रामविकासाला सर्वोच्‍च प्राधान्‍य देणारे आदर्श ग्रामसेवक


   
वर्धा,दिनांक 6 – गावांच्‍या  सर्वांगीन विकासासोबत निर्मल व हागणदारीमुक्‍त  गाव करण्‍याचे  नियोजन करणा-या  व त्‍याची  प्रभावी अंमलबजावनी करुन  लोकसहभागाने  आपले गाव सातत्‍याने  आदर्श ठेवणा-या 16 ग्रामसेवकांचा गौरव  आज जिल्‍हा परिषदेतर्फे करण्‍यात आला.
     ग्रामसेवकांनी  आपल्‍या  कार्यक्षेत्रातील गावात वैशिष्‍यपूर्ण  उपक्रमाची आखणी करुन लोकसहभागातून   अंमलबजावनी करणा-या  ग्रामसेवकांच्‍या कार्याची  दखल घेऊन  तयांचा आदर्श इतर गावांनीही गिरवावा असा उपक्रम जिल्‍हा परिषदेच्‍या ग्रामपंचायत विभागाने सुरु केला असून, आदर्श ग्रामसेवक पुरस्‍कार देऊन  त्‍यांच्‍या कार्याची  दखल घेतली आहे.
     जिल्‍हा परिषदेच्‍या सभागृहात अध्‍यक्ष  ज्ञानेश्‍वर ढगे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने   यांनी    16 आदेर्श ग्रामसेवकांना शाल श्रीफळ पुष्‍पगुच्‍छ   व प्रमाणपत्र देऊन   गौरविले. त्‍यावेळी ग्रामसेवकांनीही  आपण केलेल्‍या   कामाची   नोंद   प्रशासनाने    घेतली याचे समाधान  पुरस्‍कार स्विकारताना  जाणवत होते.   
     यावेळी  मार्गदर्शन करताना जिल्‍हा  परिषद अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे म्‍हणाले की, विविध योजनांच्‍या  अंमलबजावणीसाठी  ग्रामसेवक हा महत्‍वाचा घटक असून, शेतकरी व सामान्‍य  जनतेपर्यंत  शासनाच्‍या  विविध योजना  पोहचवतो आणि जनतेलाही  या योजनांचा  लाभ देण्‍यासाठी  प्रोत्‍साहीत करतो . त्‍यामुळे ग्रामसेवक हा ग्रामीण भागाच्‍या  विकासाचा  महत्‍वाचा कणा आहे.  
       मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने  यांनी   विविध विकास योजनांच्‍या अंमलबजावनीमध्‍ये विभागात वर्धा जिल्‍हा आघाडीवर असून महात्‍मा गांधी नरेगा योजनेच्‍या अंमलबजावनीसाठी  ग्रामसेवकांनी पुढाकार घेतल्‍यामुळेच वर्धा जिल्‍ह्याची  पंतप्रधान पुरस्‍कारासाठी शिफारस  झाली आहे. ग्रामसेवकांनी आपल्‍या  कार्यक्षेत्रातील  गावांचा विकास आराखडा तयार करुन  त्‍यानुसार  प्रत्‍यक्ष  अंमलबजावनीला सुरुवात करावीत अशी सुचना केली.  
     यावेळी  शिक्षण व आरोग्‍य  समितीच्‍या सभापती श्रीमती उषाताई थुटे, महिला व बालकल्‍याण समितीच्‍या सभापती श्रीमती निर्मलाताई बिजवे, समाजकल्‍याण सभापती नंदकिशोर कंगाले यांचेही  मार्गदर्शनपर भाषणे झाली.
     प्रास्‍ताविक स्‍वागत उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी केले. यावेळी  आदर्श ग्रामसेवक पुरस्‍कार मिळालेल्‍या  ग्रामसेवकांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
                           000000

डेंग्‍यू नियंत्रण व प्रतिबंधात्‍मक उपाययोजना सुरु डेंग्‍यू आजारामुळे 24 रुग्‍ण बाधीत


वर्धा,दिनांक 5 – डेंग्‍यूसह साथीच्‍या आजारावर नियंत्रण व प्रतिबंधात्‍मक उपाययोजना लागन झालेल्‍या  गावात प्रभावीपणे  सुरु करण्‍यात आल्‍या  असून, खाजगी रुग्‍णालयात उपचार घेत असलेलया रुग्‍णांची माहिती तसेच रक्‍तजल नमुन्‍यांची तपासणी सुरु करण्‍यात आली  असल्‍याची  माहिती जिल्‍हा परिषदेचे  मुख्‍य कार्यपालन अधिकारी श्री. शेखर चन्‍ने यांनी आज दिली.
     साथीच्‍या आजारासोबत डेंग्‍यूमुळे आजारी पडलेल्‍या  रुग्‍णांना तात्‍काळ  औषधोपचार मिळावा यासाठी  तालुका व जिल्‍हास्‍तरावर आरोग्‍य विभागातर्फे विशेष कक्ष  सुरु करण्‍यात आला आहे.
      मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने  यांनी  आज सेलू  तालुक्‍यातील  सिंदी रेल्‍वे तसेच सलाईकला येथील  प्राथमिक आरोग्‍य  केन्‍द्रांना  भेट देऊन साथीच्‍या आजाराबाबत सुरु असलेल्‍या  उपाययोजना व औषधोपचाराबाबत जिल्‍हा आरोग्‍य  अधिकारी डॉ. माने यांचेकडून संपूर्ण माहिती घेतली. तसेच  ग्रामस्‍थांशी  थेट  संवाद साधून  डेंग्‍यू आजाराबाबत  करावयाच्‍या  उपाययोजना व ग्रामस्‍वच्‍छता, पिण्‍याचे पाणी, गावातील गटारांची स्‍वच्‍छता  करण्‍यासाठी  ग्रामस्‍थांनी  पुढाकार घेवून  आपले गाव स्‍वच्‍छ ठेवण्‍याचे  आवाहन यावेळी केले.
     संशयीत  डेंग्‍यू  आजाराकरीता  जिल्‍ह्यात  139 लोकांचे रक्‍तजल नमुने  देण्‍यात आले असून, त्‍यापैकी  24 रुग्‍ण  डेंग्‍यू  दुषीत आढळले आहेत. यामध्‍ये वर्धा जिल्‍ह्यातील 6, सेलू 1 , देवळी 1, कारंजा 3, आर्वी 2 ,हिंगणघाट 9, समुद्रपूर 2 अशा 24 रुगणांचा  समावेश आहे.
      डेंग्‍यूचे  अथवा किटकजन्‍य आजाराचे रुग्‍ण  आढळलेल्‍या  गावामध्‍ये  आरोग्‍य  विभागाअंतर्गत गृहभेटीव्‍दारे संरक्षण करण्‍यात येत असून, या भेटीमध्‍ये  रुग्‍णांचे  रक्‍ताचे नमूने घेणे व ते पुणे येथे तपासणीसाठी पाठवित असतानाच किटकसंमाहरकाव्‍दारे डास संकलन करुन  डासघनता काढणे यावर विशेष भर असल्‍याचे  सांगताना  मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने म्‍हणाले की, डासाची उत्‍पत्‍ती होणार नाही यासाठी  गप्‍पीमाशांचा उपयोग तसेच शिघ्र ताप पथकाव्‍दारे भेट देऊन त्‍वरीत उपचार व निदान करण्‍यावर या मोहिमे अंतर्गत विशेष भर देण्‍यात आल्‍यामुळे  जिल्‍ह्यात  साथीच्‍या आजारावर  तात्‍काळ नियंत्रण शक्‍य झाले आहे.
       डासांची  उत्‍पत्‍ती होणार  नाही यासाठी ग्रामस्‍तरावर  प्रभावी उपाययोजना आवश्‍यक असून, ग्रामस्‍थांच्‍या सहभागाने शेणाचे खड्डे गावाबाहेर हलविणे, उकीरड्यावर लिंडेन पावडरची डस्‍टींग करणे, प्रत्‍येक घरात फ्रॉगींग करणे व जनतेला आरोग्‍य  शिक्षणाव्‍दारे आठवड्यातून  एक दिवस कोरडा दिवस पाळण्‍याच्‍या सुचनाही  देण्‍यात आल्‍या आहेत.
     डेंग्‍यू नियंत्रण व प्रतिबंधात्‍मक उपाययोजने अंतर्गत  शहरी भागामध्‍ये  झोपड्यावर टाकण्‍यात येणा-या  प्‍लॅस्‍टीकवर पाणी  साठवून  डास होण्‍याची जास्‍त  शक्‍यता  असल्‍यामुळे  प्रत्‍येकांनी घराच्‍या प्‍लॅसटींकवरुन तात्‍काळ काढून टाकावे. असे आवाहन  करताना मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने  यांनी उघड्यावर संडास केल्‍यामुळे  तसेच अस्‍वच्‍छतेमुळे  साथीचे रोग होणार नाही याची काळजी प्रत्‍येक  ग्रामपंचायत स्‍तरावर घेण्‍यात येत असल्‍याचे  त्‍यांनी सांगितले.
     ज्‍या गावांमध्‍ये  मागील वर्षी  साथीची लागन झाली होती अशा गावांमध्‍ये नियमितपणे सर्वेक्षण तसेच किटक संमाहरकामार्फत कंटेनर सवर्हेक्षण  करण्‍यात येणार आहे. आरोग्‍य कर्मचा-यामार्फत नियमितपणे 10 टक्‍के  घरांचे  कंटेनर सर्व्‍हेक्षण  करण्‍यात येऊन रुग्‍ण आढळून आल्‍यास पॅरामिटर्स प्रमाणे कारवाही करण्‍यावर  भर देण्‍यात आला आहे.
     किटकजन्‍य  ताप उद्रेक नियंत्रणासाठी  जिल्‍हा प्रशासनातर्फे संपूर्ण प्रतिबंधात्‍मक उपाययोजना, करण्‍यात आल्‍या असून, ग्रामस्‍वचछता व परिसर स्‍वचछतेसाठी सर्व जनतेनी सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने यांनी केले आहे.
                           000000

डेंग्‍यू,मलेरीया साथरोग नियंत्रणासाठी परिसर स्‍वच्‍छ ठेवा जनतेला सहकार्याचे आवाहन - ज्ञानेश्‍वर ढगे


        वर्धा, दि.5 – डेंग्‍यू, मलेरीया आदि साथीच्‍या आजारावर नियंत्रणासाठी जिल्‍ह्यातील  सर्व ग्रामपंचायत व नगरपरिषदांनी परिसर स्‍वच्‍छतेवर  विशेष भर देऊन कुठेही डासाची  उत्‍पत्‍ती  होणार नाही याची  खबरदारी घ्‍यावी  तसेच जनतेनेही पाण्‍याच्‍या  साठवणूक  न करता घराचा परिसर स्‍वच्‍छ ठेवण्‍यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे यांनी आज केले आहे. 
     साथीच्‍या आजारावर नियंत्रणासाठी तसेच हा आजार होऊच नये यासाठी  ग्रामीण जनतेनी  वैयक्तिक पातळीवर प्रतिबंधात्‍मक उपाययोजना सुरु करणे आवश्‍यक असून , प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करताना ज्ञानेश्‍वर ढगे म्‍हणाले की, घर व घराच्‍या परिसरात पाणी साचने असल्‍यास त्‍यामध्‍ये डास, अळ्या आढळून आल्‍यास  असे पाणीसाठे नष्‍ट करावे, आठवड्यातील किमान कोरडा दिवस म्‍हणून पाळावा, निरुपयोगी वस्‍तू , फुटके माठ, फाटके टायर, कुंडया यामध्‍ये  पाण्‍याची साठवणूकीमुळे  डासांची उत्‍पत्‍ती  होते. असे साहित्‍य नष्‍ट करावे. घरातील कुलरमधे पाणी गोळा  होणार नाही अशा ठिकाणी व्‍यवस्‍थीत ठेवावे.
     घरातील अथवा गावातील कुटूंबात कोणत्‍याही व्‍यक्‍तीस ताप आल्‍यास  त्‍याला तात्‍काळ  शासकीय रुग्‍णालयामध्‍ये  उपचारासाठी पाठवावे. तसेच तालुका अथवा प्राथमिक आरोग्‍य  केन्‍द्रास यासंबधीची माहिती द्यावी. असे आवाहन करताना जिल्‍ह्यातील  सर्व आरोग्‍य   केन्‍द्र व उपकेंद्रांमध्‍ये साथीच्‍या रोगासाठी  तात्‍काळ  औषधोपचार करण्‍यासाठी  वैद्यकीय चमू  ठेवण्‍यात आली आहे.
     ग्रामीण भागामध्‍ये   अस्‍वच्‍छ  वातावरणामुळे  व सांडपाण्‍याच्‍या नाल्‍यांमध्‍ये  पाणी  साचल्‍यामुळे  डासांची  उत्‍पत्‍ती  होऊ शकते व त्‍यामुळे  डेंग्‍यू , मलेरीया आदी  साथीच्‍या  रोगाची लागन काही भागात आढळून आल्‍यामुळे  ग्रामपंचायतींनी  विशेष दक्षता घ्‍यावी,  अशा सुचना करताना ज्ञानेश्‍वर ढगे म्‍हणाले की जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, जिल्‍हा शल्‍य  चिकित्‍सक  यांच्‍या  प्रमुख उपस्थितीत विशेष मोहीम जिल्‍ह्यात सुरु असून, जनतेनी  वैयक्तिक पातळीवरही खबरदारी घ्‍यावी. असे आवाहनही  जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष  ज्ञानेश्‍वर ढगे यांनी आवाहन केले आहे.
                         0000000

जिल्‍ह्यात 134 कलम लागू


   वर्धा,दि.5- जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्‍हणून 16 नोव्‍हेंबर 2012 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम सन 1951 च्‍या कलम 34 कलम लागू करण्‍याचा आदेश जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांनी जारी केला आहे.
     मुंबई पोलीस अधिनियम सन 1951  कलम 33,35,42 व 47 अन्‍वये केलेल्‍या  कोणत्‍याही आदेशास हा आदेश अंमलात असेपर्यंत  वर्धा जिल्‍ह्यात जाहीर सभा, निदर्शने , मोर्चे, शोभायात्रा  आदीबाबत  पोलीस स्‍टेशन अधिका-यांकडून  परवानगी घेतल्‍याशिवाय आयोजीत करु नये. तसेच शांततेला व सुव्‍यवस्‍थेला बाधा आणणा-या घोषणा देऊ नये असेही आदेशात नमूद केले आहे.
                           00000

8 नोव्‍हेंबर पर्यंत निवीदा स्विकारणार


      वर्धा,दि.5 -जिल्‍हाधिकारी कार्यालयातील विविध शाखेत स्‍थापित असलेले संगणक सयंत्रे, प्रिंटर, फॅक्‍स मशिन दुरुस्‍ती व देखभाल करीता वार्षिक करार करावयाचा आहे.
     आपले दरपत्रक बंद लिफाफ्यात दिनांक 8 नोव्‍हेंबरच्‍या दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्‍हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातील लिपीकाकडे  शासकीय वेळेत सादर करावयाचे आहे. प्राप्‍त झालेल्‍या निविदा दिनांक 9 नोव्‍हेंबर रोजी दुपारी 12 वाजता निवासी उपजिल्‍हाधिकारी , वर्धा यांचे दालनात उघडण्‍यात येतील. याबाबतची सविस्‍तर माहिती (दर पत्रक अटी व शर्ती) www.wardha.nic.in   या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे.
     कोरे निविदा अर्ज जिल्‍हा नाझिर , जिल्‍हाधिकारी कार्यालय, वर्धा  यांचेकडे विक्रीकरीता उपलब्‍ध आहेत.असे जिल्‍हाधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे. 
                           000

जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज स्‍वीकारणे सुरु


      वर्धा, दिनांक 5 – स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था च्‍या राखीव प्रभागातून निवडणूक लढवू इच्छिणा-या मागासवर्गीय उमेदवारांच्‍या जाती दावा पडताळणीबाबत दिनांक 31 डिसेंबर 2013 पर्यंत होणा-या ग्रामपंचायत निवडणूकीत निवडून आलेल्‍या उमेदवारास 6 महिन्‍यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्‍यात आले आहे.
      दिनांक 31 डिसेंबर 2013 पर्यंत होणा-या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी इच्‍छूक मागासवर्गीय उमेदवारांचे जात पडताळणीचे अर्ज निवडणूकीचे नामनिर्देशनपत्र भरण्‍याच्‍या अखेरच्‍या दिवसापर्यंत  जिल्‍हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे स्विकारण्‍यात येतील. असे जिल्‍हाधिकारी यांनी कळविले आहे.
                               00000 

पत्रव्‍दारा डी.टी.एड. प्रशिक्षण


      वर्धा, दि. 5-बालकांना मोफत व सक्‍तीच्‍या  शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत महाराष्‍ट्र राज्‍यातील जिल्‍हा परिषद, नगरपालीका, नगरपरिषद, महानगरपालीका, कटक मंडळाच्‍या प्राथमिक शाळा आणि सर्व व्‍यवस्‍थापनाच्‍या सर्व माध्‍यमाच्‍या  शासनमान्‍यता प्राप्‍त  खाजगी प्राथमिक व माध्‍यमिक अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विना अनुदानित शाळा तसेच आदिवासी विकास व समाजकल्‍याण विभागाच्‍या प्राथमिक व माध्‍यमिक शाळा व शासकीय मान्‍यताप्राप्‍त   खाजगी आश्रमशाळेतील पात्र अप्रशिक्षित प्राथमिक, माध्‍यमिक शिक्षण, शिक्षण सेवक, निमशिक्षक अपंक एका‍त्‍मीक शिक्षण योजने तील शिक्षण यांच्‍यासाठी  सन 2012-2013 साठी शासन निर्णयानुसार पत्रव्‍दारा डि.टी.एड.प्रशिक्षण योजनेची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्‍यात येत आहे.
      पत्रव्‍दारा डि.टी.एड. प्रशिक्षण प्रवेशाचे आवेदनपत्र व माहिती पुस्तिका शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिलहा परिशद यांचेकडे दिनांक 17 नोव्‍हेंबर 2012 पर्यंत कार्यालयीन  वेळेत शासकीय सुटीचे दिवस सोडून रुपये 200 (रुपये दोनशे फक्‍त) शुल्‍कासह  उपलब्‍ध  होतील. मुंबई व उपनगरातील अप्रशिक्षित प्राथमिक शिक्ष , शिक्षण सेवकासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बृहन्‍मुंबई हिंदु कॉलनी, दादर यांचेकडे उपलबध होतील. संबंधित अप्रशिक्षित शिक्षक, शिक्षण सेवकांनी पूर्ण भरलेली आवेदनपत्रे दिनांक 19 नोव्‍हेंबर 2012 पर्यंत आपल्‍या विद्यालयाच्‍या मुख्‍याध्‍यापकामार्फत माहिती पुस्तिकेत नमुद केल्‍याप्रमाणे ज्‍या ठिकाणाहुन आवेदनपत्र घेतली त्‍याच ठिकाणी सादर करावीत. उशिरा अगर पोष्‍टाने व कुरिअरने आलेली आवेदनपत्रे स्विकारली जाणार नाहीत. पात्र अप्रशिक्षित शिक्षकांनी 31 मार्च 2015 पुर्वी प्रशिक्षित होणे बंधनकारक असल्‍याने ही अंतिम प्रवेश प्रक्रिया राहणार आहे. याची सेवेत असलेल्‍या आणि सक्षम प्राधिका-याची मान्‍यता असलेल्‍या सर्व व्‍यवस्‍थापनाच्‍या व माध्‍यमाच्‍या पात्र अप्रशिक्षित प्राथमिक व माध्‍यमिक शिक्षकांनी नोंद घ्‍यावी. असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्‍हा परिषद, वर्धा कळवितात.
                           00000

सार्वजनिक ग्रंथालयासाठी पुरस्‍कार योजना


     वर्धा,दि.6 - महाराष्‍ट्र शासनाच्‍या उच्‍च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्‍यातील शासनमान्‍यताप्राप्‍त  सार्वजनिक ग्रंथालयाच्‍या गुणात्‍मक विकास व्‍हावा, त्‍यांचया कउून अधिक चांगल्‍या सेवा दिल्‍या जाव्‍यात  यासाठी  प्रोत्‍साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी उत्‍कृष्‍ट ग्रंथालये व ग्रंथालय चळवळीतील उत्‍कृष्‍ट कार्यकर्ते व सार्वजनिक ग्रंथालयामधील कर्मचारी यांना शासनातर्फे पुरस्‍कार  देऊन गौरविण्‍यता येते.
      या योजनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्‍कार  यांचे नावाने शासनमान्‍य सार्वजनिक ग्रंथालयांच्‍या शहरी व ग्रामीण पातळीवरील अ,ब,क,ड वर्गातील प्रत्‍येकी एक अशा एकूण 8 पुरस्‍कारासाठी  ग्रंथालयांकडून प्राप्‍त  प्रस्‍तावांतून निवड समितीकडून निवड करण्‍यात येते. तसेच डॉ. एस.आर.रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्‍कार यांचे नावाने ग्रंथालय चळवळीच्‍या  विकासासाठी  कार्य करणा-या कार्यकर्त्‍यांना  व सेवाभावी  वृततीने काम करणा-या उत्‍कृष्‍ट कर्मचा-यांना प्रोत्‍साहन मिळावे या उद्देशाने राज्‍यस्‍तरावर प्रत्‍येकी  एकेक व महसूली विभागातून प्रत्‍येकी एक याप्रमाणे  एकूण 14 पुरस्‍कारासाठी त्‍यासाठीच्‍या  निवड समितीकडून निवड करण्‍यात येते.
      2012-13 या वर्षासाठी  या पुरस्‍कार योजनेमध्‍ये सहभागी होऊ इच्छिणा-या शासनमान्‍य  सार्वजनिक ग्रंथालयांनी तसेच ग्रंथालय चळवळीत ज्‍या कार्यकर्त्‍यांनी  व कर्मचा-यांनी किमान 15 वर्ष ग्रंथालयीन क्षेत्राच्‍या विकासासाठी कार्य केलेले आहे अशा पात्र ठरणा-या इच्‍छूक ग्रंथालय, कार्यकर्ते, कर्मचारी यांनी आपल्‍या विभागाच्‍या  सहाययक ग्रंथालय संचालक कार्यालयाकडे  30 नोव्‍हेंबर 2012 पूर्वी सादर करावेत. विद्यमान वर्षापासून  अर्ज करणा-या संस्‍था, व्‍यक्‍ती यांना प्रत्‍यक्ष भेटी देऊन प्राथमिक तपासणीनंतरच प्रस्‍ताव  अंतिमतः निवड समितीकडे सादर करण्‍यात येणार आहेत. याबाबत प्रस्‍ताव पाठविण्‍याची मुदतीत कार्यवाही  करावी. असे आवाहन दि. श्री. च्‍व्‍हाण, संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य  यांनी केले आहे.
                              00000