Friday 3 June 2016

विभागीय आयुक्‍त अनुपकुमार यांची
पिंपरी, आगरगावला भेट
Ø ग्रामस्‍थांशी चर्चा
Ø 446 घराचे नुकसान
Ø आरोग्‍य कॅम्‍प सुरु

        वर्धा,दि.1-नुकत्‍याच पुलगाव येथील घटनेच्‍या पार्श्‍वभूमीवर पिंपरी  आणि  आगरगावला आज विभागीय आयुक्‍त अनुप कुमार यांनी भेट देऊन ग्रामस्‍थासोबत चर्चा केली. स्‍फोटामुळे घरांचे नुकसान झाले आहे. आवाजामुळे ग्रामस्‍थांना त्रास होऊ नये यासाठी आरोग्‍य तपासणी करण्‍यसाठी विशेष वैद्यकिय कॅम्‍प सुरु करण्‍याच्‍या सुचना दिल्‍यात. 446 घरांना तडे गेले असून मदतीबाबत तात्‍काळ कार्यवाही  करण्‍याच्‍या सुचनाविभागीय आयुक्‍तांनी  दिल्‍या. यावेळी जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, जिल्‍हा परिषेदेचे उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी श्री.इलमे, गटविकास अधिकारी श्री. शिंदे, तहसिलदार श्रीमती तेजस्विनी जाधव, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी उपस्थित होते.
            आगरगाव 337 , पिंपरी 92 ,नागझरी 17 घरांच्‍या नुकसानीच्‍या संदर्भाबाबत बांधकाम विभाग, महसूल विभाग, ग्रामसेवक यांनी प्रत्‍यक्ष नुकसानीचे सर्वेक्षण  करुन अहवाल सादर करण्‍याच्‍या सुचना यावेळी. विभागीय आयुक्‍त यांनी  दिल्‍या.

                                                            0000
केंद्रीय पथकाने केली दुष्‍काळ भागाची पहाणी
जाम गावातील शेतक-यांनी मांडल्‍या आपल्‍या कैफियती
        वर्धा,दि.1-सन 2015 मधील खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी झाल्‍यामुळे शेतक-याचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले असून अशा शेतक-यांना केंद्रशासनामाफर्त मदत मिळावी यासाठी वर्धा जिल्‍ह्यातील शेतक-यांशी  चर्चा करण्‍यासाठी  आलो आहेत. असे केंद्रशासनाच्‍या निती आयोगाचे अधिकारी डॉ. रामानंद यांनी समुद्रपूर तालुक्‍यातील जाम येथे शेतक-यांशी चर्चा करतांना सांगितले.
            वर्धा जिल्‍ह्यातील समुद्रपूर तालुक्‍यातील जाम येथील ग्रामपंचायतीच्‍या सभागृहात आज  केंद्र शासनाच्‍या दुष्‍काळ पाहणी पथकातील सदस्‍य निती आयोगाचे अधिकारी डॉ. रामानंद केंद्र शासनाच्‍या ग्रामविकास  विभागाचे अवर सचिव रामा वर्मा, केंद्र शासनाच्‍या जलसंसाधन विभागाचे उपसंचालक मिलींद  पानपाटील, अे.जी.एम.एफ. सी.आय.मुंबईचे एम.एम.बोराडे,डायरेक्‍टर सेट्रल इलेक्‍ट्रीसिटी चे जे.के. राठोड यांनी आज जाम गावातील शेतक-यांशी चर्चा करुन त्‍यांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या यावेळी शेतक-यांना त्‍यांनी गावात पिण्‍याचे पाणी आहे का ? मागच्‍या वर्षी किती टक्‍के उत्‍पादन झाले, पीक पेरणी व इतर खर्च किती झाला व उत्‍पादन किती मिळाले तसेच आणेवारी 50 टक्केच्‍या आत आहे का  याबाबत सविस्‍तर चर्चा केली.
यावेळी निती आयोगाचे अधिकारी डॉ. रामानंद यांनी जाम येथील शेतकरी अमोल जांभळीकर यांच्‍याकडून  मागच्‍या वर्षी झालेल्‍या उत्‍पादनाबाबतची  मा‍हिती जाणून घेतली.  यावेळी जांभळीकर यांनी सांगितले की, माझ्याकडे दहा एकर शेती असून सन 2015 मध्‍ये खरीप  हंगामात मी कापूस व सोयाबिन व तूरीचा पेरा केला होता. त्‍यासाठी  पाच लाख रुपये खर्च केले परंतु उत्‍पन्‍न दोन लाखही आलेले नाही. त्‍यामुळे शेतकरी खूप अडचणीत आहे. अशीच बोलकी प्रतिक्रीया अवधूत सोमल, अजय  पिटे या शेतक-यांनी व्‍यक्‍त केली. यावेळी पथकातील पाचही सदस्‍यांनी जांम गावातील शेतक-यांच्‍या समस्‍या  समजून घेत केंद्र शासनाच्‍या कृषी विभागांच्‍या योजनांचा आपल्‍याला लाभ मिळाला आहे की, मिळाला नसेल तर आपण मिळवून देण्यासाठी प्रयत्‍न करु असेही त्‍यांनी यावेळी सांगितले
            यावेळी काही शेतक-यांनी कैफियत मांडतांना  सांगितले की, खरीपाचा हंगाम गेल्‍यावर रब्‍बी हंगाम चांगला होईल या आशेवर शेतक-यांनी रब्‍बीसाठी खर्च केले परंतु तोंडाशी घास आला असतांना अचानक गारपीट आल्‍यामुळे शेतक-यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. यापुढे  या जिल्‍हयातील  शेतकरी हवालदील झालेला असून  त्‍याला शासकीय मदतीची मोठ्या प्रमाणात गरज आहे.असेही शेतक-यांनी  पथकाकडे मागणी केली.
            काही शेतक-यांनी जलयुक्‍त शिवारांची  कामे या परिसरात सुरु करण्‍यात  यावेत,पिकांचे  निल गाई मोठया प्रमाणात नुकसान करतात त्‍यांचा  बंदोबस्‍त करावा अशी मागणीही  त्‍यांनी पथकाकडे केली.
            या पथकासोबत अप्‍पर जिल्‍हाधिकारी  दीपक नलवडे,समुद्रपूरचे तहसिलदार सचिन यादव, हिंगणघाटचे तहसिलदार दीपक कारंडे, कृषी सहसंचालक विजय घावडे , जिल्‍हा कृषी अधिकारी डॉ. भारती इत्‍यादी उपस्थित होते.  

                                                                        0000

Wednesday 1 June 2016




पालकमंत्र्यासह चार मंत्र्यांकडून
जखमींची विचारपूस
Ø खबरदारी म्‍हणून एअर अॅम्‍ब्‍यूलन्‍स तैनात
    वर्धा,दि.31-पुलगाव येथील दारुगोळा भांडाराला भीषण आग लागून स्‍फोट झाला. या पार्श्‍वभूमीवर वर्धा जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार , सार्वजनिक आरोग्‍य मंत्री डॉ. दीपक सावंत, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज सावंगी मेघे येथील रुग्‍णालयात उपचार घेत असलेल्‍या जखमींची भेट घेवून आस्‍थेवाईकपणे विचारपूस केली आणि जिल्‍हा प्रशासनाकडून घटनेची पार्श्‍वभूमी जाणून घेतली.
            हा स्‍फोट दुदैर्वी असून या भयंकर स्‍फोटामुळे प्राण हानी व वित्‍तहानी झाली. काही जण जखमी झाले. पुलगाव परिसरातील लोकांमध्‍ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
            अधिक माहिती देतांना पालकमंत्री सूधीर मुनगंटीवार म्‍हणाले, स्‍फोटाची माहिती मिळताच राज्‍य शासनाने खबरदारीचा उपाय म्‍हणून जिल्‍हा प्रशासनाला योग्‍य ते निर्देश दिले. अग्निशमनचे बंब, वैद्यकीय सुविधा याबरोबरच परिसरातील लोंकाची निवासव्‍यवस्‍था तातडीने करण्‍यात आली.
एअर अॅब्‍म्‍युलन्‍स तैनात
            जखमींना मुबंई येथे हलविण्‍याची गरज पडली तर खबरदारीचा उपाय म्‍हणून राज्‍यशासनाने एअर अॅम्‍ब्‍यूलन्‍सची सोय करुन ठेवली आहे. अशी माहिती यावेळी आरोग्‍य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. दरम्‍यान सावंगी मेघे येथील रुग्‍णालयात जाऊन चारही मंत्रीमहोदयांनी  जखमींची व त्‍यांच्‍या कुंटूंबियांची भेट घेतली. शासनातर्फे सर्वोतोपरी मदत केली जाईल,त्‍यांनी दिला. असा विश्‍वास दिला.
            या स्‍फोटामुळे ज्‍या गावाचे किंवा व्‍यक्‍तीचे नुकसान झाले असेल त्‍यांना योग्‍य ती मदत केली जाईल. आता परिस्थिती नियंत्रणात  असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. असे आवाहनही मंत्रीमहोदयांनी केले.   

यावेळी खासदार रामदास तडस माजी खासदार दत्‍ता मेघे, जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल आदी  उपस्थित होते. 
पुलगाव दारुगोळा स्फोटातील मृत्‍यु पावलेल्‍या
कुटुंबियांना 5 लाख, तर जखमींना 1 लाखाची मदत
    वर्धा,दि.31- पुलगाव येथील दारुगोळा भांडाराला भीषण आग लागुन झालेल्‍या स्‍फेाटात मृत्‍यु पावलेल्‍या व्‍यक्तींच्‍या कूटुंबियांना 5 लाख रुपये तर जखमींना 1 लाख रुपये मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतुन तात्‍काळ देण्‍याचे निर्देश मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास दिली असल्‍याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिली.
            या स्‍फोटाच्‍या पार्श्‍वभुमीवर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक आरोग्‍य मंत्री डॉ. दिपक सावंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी रूग्णालयामध्‍ये जाऊन जखमींची विचारपूस केली.
          या घटनेची माहिती आपण मुख्‍यमंत्र्यांना दिली. मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतुन मृत व्‍यक्तींच्‍या कुटुंबियाना 5 लाख रुपये तर जखमींना 1 लाख रुपये तातडीची मदत देण्‍यात येईल, असे मुख्‍यमंतत्र्यांनी सां‍गितले. त्‍यानुसार कार्यवाही करण्‍याचे आदेश प्रशासनाला दिले असल्‍याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
            तात्‍काळ पंचनामे करून रक्‍कम तातडीने मृतांच्‍या कुटुंबियांना तसेच जखमींना देण्‍याचे निर्देशही यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिले.
०००००००००
प्र.प.क्र. 373
                                                                                
स्फोटामुळे क्षतिग्रस्त झालेल्या
आगरगावला पालकमंत्र्यांसह चार मंत्र्यांची भेट
       वर्धा, दि. ३१- पुलगाव येथील दारूगोळा भांडाराला भिषण आग लागून मोठा स्फोट झाला. त्यामुळे जिवीत व वित्तहानी झाली. या स्फोटामुळे आगरगावचेही नुकसान झाले.
वर्धा येथे जखमींची विचारपूस केल्यानंतर पुलगाव येथील स्फोटामुळे नुकसान झालेल्या आगरगाव या गावाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह आरोग्य मंत्री डॅा.दिपक सावंत, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री विनोद तावडे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी भेट देऊन पाहणी केली. ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.      
            पुलगाव येथील स्फोटामुळे लगतच्या पाच गावातील घरांची पडझड झाली आहे. स्फोटामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून पंधरा दिवसात भरपाई देण्याचे निर्देश पालकमंत्री श्री.मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्फोटातील आवाजामुळे अनेकांच्या कानाला त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे पाचही गावात विशेष शिबिर घेऊन तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ज्या व्यक्तींना कानाची दुखापत झाली असल्याचे आढळून येथील त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याच्या सुचनाही त्यांनी आरोग्य विभागास केल्या. यावेळी त्यांनी गावकऱ्यांकडून स्फोट व त्यानंतरची माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.   
००००००००००००



पुलगाव सीएडी कॅम्‍पमधील आग आटोक्‍यात
Ø  पाच गावातील नागरिकांना हलविले
Ø  जिल्हा प्रशासनाच्या तातडीच्या उपाययोजना
    वर्धा,दि.31-पुलगाव येथील मध्‍यवर्ती दारुगोळा भंडारमध्ये (सीएडी कॅम्‍पमध्‍ये) काल मध्‍यरात्री लागलेली आग आटोक्‍यात आली आहे. आगीमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने आजूबाजूच्‍या पाच गावातील नागरिकांना सुरक्षेच्‍यादृष्टीने अन्‍य ठिकाणी हलविण्‍यात आले आहे. स्‍फोट व त्‍यानंतर लागलेल्‍या आगीची माहिती कळाल्‍यानंतर जिल्‍हा प्रशासनाच्यावतीने तातडीच्‍या उपाययोजना करण्‍यात आल्‍याने ही आग आटोक्‍यात आली. जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल सकाळी पाच पासुन घटनास्थळावर उपस्थित होते.
            घटनेची देवळी तहसिलदारांकडून माहिती प्राप्त होताच आग आटोक्‍यात आणण्यासाठी जिल्ह्यासह नागपूर व यवतमाळचे अग्‍णीशामक वाहने तातडीने उपलब्‍ध करुन देण्‍यात आले. कॅम्‍पमधील सेना अधिका-यांनी केलेल्‍या मागणी प्रमाणे प्रशासनाच्‍यावतीने पुरेशा प्रमाणात रुग्‍णवाहिका व अग्‍नीशामक व्‍यवस्‍था उपलब्‍ध करुन देण्‍यात आली. जिल्‍हाधिकारी यांनी स्‍वतः जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्‍णालय, सावंगी मेघे व महात्‍मा गांधी वैद्यकिय महाविद्यालय, सेवाग्राम यांच्याशी संपर्क साधून पुरेशाप्रमाणात रुग्‍णवाहिका व प्राथमिक वैद्यकिय सेवा उपलब्‍ध करुन दिली.
स्फोट व त्यानंतर लागलेल्या आगीमुळे आजुबाजुच्या पाच गावातील नागरीकांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने मुरदगाव, आगरगाव, यसगाव, नागझरी व पिंपरी या पाच गावातील नागरीकांना सुरक्षेच्यादृष्टीने देवळी येथील नगर परिषद शाळा व डिगडोह येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हलविण्यात आले. नागरी वस्तीमध्ये सदर स्पोट व आगीमुळे कोणत्याही प्रकारची हाणी झाली नाही. सदर विस्थापिकांच्या कॅम्पलाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देऊन पाहणी केली.

००००००००
              शेतक-यांनी  सोयाबिन बियाण्‍याचा 
         पेरणीसाठी वापर करतांना काळजी घ्‍यावी.
Ø शेतक-यांनी बियाण्‍याची उगवन क्षमता तपासावी  
Ø जिल्‍हयामध्‍ये सोयाबिन बियाणे उपलब्‍ध होणार
    वर्धा,दि.27- खरीप हंगाम 2016 करीता जिल्‍ह्यातील शेतक-यांनी स्‍वतःकडे उपलब्‍ध असलेल्‍या सोयाबीन बियाण्‍याचा वापर पेरणी करीता  वापरण्‍यास काही हरकत नाही. त्‍यामुळे शेतक-यांचे सोयाबीनचे बियाणे खरेदी वरील खर्च कमी होईल .सोयाबीन मध्‍ये सर्वच वाण हे सरळ वाण आहे. त्‍यामुळे अशा वाणाचे बियाणे प्रत्‍येक वर्षी बदल करण्‍याची आवश्‍यकता नसते. एकदा प्रमाणित  बियाणे वापरल्‍यानतंर त्‍यांच्‍या उत्‍पादनातून  येणारे बियाणे दोन ते तीन वर्षापर्यंत वापरता येते. परंतु घरचे बियाण्‍याची  पेरणी पूर्व उगवण क्षमतेची चाचणी करुन घेणे फार आवश्‍यक आहे. त्‍यामुळे चांगल्‍या उगवण क्षमतेची खात्री पटू शकते व पेरणी करतांना बियाण्‍याचे प्रमाण किती ठेवावे यांचा अदांज सुद्धा काढू शकतो.
                                      उगवण क्षमता तपासण्‍याची सोपी पद्धत
 यासाठी शेतक-यांनी स्‍वतःकडे असलेले सोयाबीन बियाण्‍याची  चाळणी  करुन त्‍यामधील काडी कचरा, खडे, लहान व फुटलेले दाणे वेगळे करावे. बियाणे चाळणी नंतर स्‍वच्‍छ झालेले वर्तमान पत्राचा एक पुरेसा कागद घेवून त्‍याला चार घड्या पाडाव्‍यात ज्‍यामुळे कागदाची जाडी वाढेल नंतर तो कागद पाण्‍याने ओला करावा व त्‍यानंतर  प्रत्‍येकी 10 बिया दाणे घेवून त्‍या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्‍या टोकाच्‍या भागावर ठेवून त्‍याची गुंडाळी करावी. अशारीतीने 100 गुंडाळया   तयार कराव्‍यात व त्‍यासर्व एका पॉलीथीन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्‍यात. चार दिवसानंतर त्‍या हळुहळु उघडून पाहून त्‍यामध्‍ये अंकुरीत झालेल्‍या बिया मोजाव्‍यात जर अकुरीत झालेल्‍या बियाची संख्‍या 80 असेल तर उगवण क्षमता 80 टक्‍के समजावी.
        अशा पद्धतीने सोयाबीन बियाण्‍याचे उगवण अंदाज घेता येतो. सोयाबीन बियाणेची उगवण क्षमता चांगली म्‍हणजेच 70 टक्‍के असेल तर शिफारस केलेल्‍या मात्रेनुसार प्रति हेक्‍टर 75 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे.जर उगवणक्षमता कमी असेल तर त्‍यांच्‍या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे.म्‍हणजे उगवणक्षमता 65 टक्‍के असेल तर 81 किलो बियाणे उगवणक्षमता 60 टक्‍के असेल तर 87.5 किलो बियाणे उगवणक्षमता 55 टक्‍के असेल तर 95.5 किलो बियाणे आणि उगवणक्षमता 50  टक्‍के असेल तर 105 किलो बियाणे प्रति हेक्‍टर क्षेत्रासाठी वापरावे. सोयाबीन ची प्रत्‍येक्ष पेरणी करतांना पुढील प्रमाणे अतिरिक्‍त काळजी घेण्‍याची गरज असते. त्‍यासाठी 75 ते 100 मी मी पर्जन्‍यमान झाल्‍यावरच सोयाबीनची पेरणी करावी. बियाण्‍याची पेरणी 3 ते 4 से.मी. खोली पर्यंत करावी त्‍यापेक्षा जास्‍त खोलीवर पेरणी करु नये.
   सोयाबीन बियाणे हे अत्‍यंत नाजूक असते कारण त्‍याचे बाह्यआवरण अत्‍यंत पातळ असून बियाण्‍यातील बिजाकुर व मुलद्रव्‍य हे बाह्य आवरणाच्‍या लगत असल्‍यामुळे सोयाबीन बीयाणे हातळतांना जास्‍तीत जास्‍त  काळजी घेणे गरजेचे असते त्‍यासाठी बियाण्‍याची वाहतूक, साठवणुक करतांना त्‍याची कमीतकमी आदळ आपट व हातळणी होईल याची क्षमता दक्षता घ्‍यावी.
          पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्‍यास 3 ग्रॅम थायरस या  औषधाद्वारे बुरशीजन्‍य रोगांपासून संरक्षणासाठी बिज प्रक्रीया करावी.तसेच  रायझोबियम व पी.एस.बी. या जीवाणु संवर्धकाची प्रत्‍येकी 200 ते 250 ग्रॅम प्रती 10 ते 15 किलो बियाण्‍यास प्रत्‍यक्ष पेरणीचे 3 तास अगोदर बीज प्रक्रीया करुन असे  प्रक्रीया केलेले बियाणे सावलीत वाळावावे व नंतर त्‍याची पेरणी करावी.
               जिल्‍ह्यामध्‍ये सोयाबीन बियाणे उपलब्‍ध होणार
   जिल्‍ह्यामध्‍ये सोयाबीनचे 110000 हेक्‍टर क्षेत्र पेरणीचे नियोजन करण्‍यात आलेले आहे. त्‍या करीता 57750  क्विंटल बियाण्‍याची आवश्‍यकता आहे. त्‍या अनुषंगाने सार्वजनिक व खाजगी कंपनीचे 60000 क्विंटल सोयाबीन बियाणे कृषी केंद्रामार्फत उपलब्‍ध होणार आहे. शेतक-यांना पेरणीच्‍या वेळीस बियाणे उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल व शेत-यांना सोयाबीन बियाण्‍याची कमतरता भासणार नाही.

     नैसर्गिक अपत्‍ती मुळे शेतक-यांचे नुकसान होवू नये म्‍हणून चालु वर्षी सोयाबीन पेरणी करतांनी सोयाबीन पिकामध्‍ये शेतक-यांनी 6 ओळी नंतर ओळ तूर या प्रमाणे आंतरपिक घ्‍यावे. ज्‍यामुळे शेतक्‍-यांना अतिरिक्‍त उत्‍पन्‍न मिळेल व आपात कालीन परिस्‍थीतीत तूर आंतरपिक घेतल्‍यामुळे  फायदाही होईल पेरणीच्‍या अपेक्षीत नियोजनानुसार बि.टी कापूस बियाण्‍याचे वर्धा जिल्‍ह्याकरीता 10.08 लाख पाकीटाची आवश्‍यकता आहे. आता पर्यंत जिल्‍ह्यात 6.66 लाख बिटी कापूस बियाणे पॉकीटाचा पुरवठा झालेला आहे. व पेरणीच्‍या हंगामा पर्यंत मागणी प्रमाणे पुरवठा होणार आहे. व कपाशी बियाण्‍याच्‍या तुटवडा व टंचाई जाणवणार नाही असे आवाहन कृषी विकास अधिकारी, एस.एम खळीकर यांनी केलेले आहे. 
              सामान्‍य जनतेला योजनाचा प्रत्‍यक्ष लाभ दया
- रामदास तडस
Ø केद्र सरकारला दोनवर्ष पूर्तीनिमित्‍त विशेष कार्यक्रम
Ø तरोडा येथे वाढीव पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन
Ø  
Ø माझा देश बदलतो आहे प्रदर्शनीचे आयोजन
Ø महिला व ग्रामस्‍याचा सहभाग
वर्धा,दि.26-केद्रातील शासनाला दोन वर्ष पूर्ण झाले असून या काळात शेतकरी, महिला , युवक तसेच सामान्‍य जनतेच्‍या कल्‍याणाच्‍या विविध योजनांची प्रत्‍यक्ष अमलबजावणी सुरु झाली आहे. शासनाच्‍या विविध योजना जनेतपर्यंत प्रभावीपणे पोहचून जनतेला प्रत्‍यक्ष लाभ मिळवून दया असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले आहे.
            तरोडा येथे केंद्रशासनाच्‍या दोन वर्ष पूर्तीनिमित्‍त योजना आपल्‍या व्‍दारी या छायाचित्र प्रदर्शन तसेच विविध विभागाच्‍या योजनाची माहिती  थेट जनतेला मिळावी यासाठी आयोजित उपक्रमाचे उद्घघाटन खासदार रामदास तडस यांच्‍या हस्‍ते झाले त्‍या प्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
            क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्‍या वतीने आयोजित कार्यक्रमास आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्‍हा परिषदेचे प्रभारी मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्‍या महाराष्‍ट्र आणि गोवा राज्‍याच्‍या संचालिका प्रभावती आकाशी , जलंतंज्ञ माधव कोटस्‍थाने, तरोडा ग्राम पंचायतीच्‍या सरपंच सुनिता टिकले, उप सरपंच गणेश तिमांडे, जि.प. सदस्‍य किशोर चौधरी, मिलींद भेंडे, जिल्‍हा अधिक्षक ज्ञानेश्‍वर भारती, क्षे‍त्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनोने विविध विभाग प्रमुख  विवेक मालूर यांची विशेष उपस्थिती होती.
            केंद्र सरकारच्‍या दोनवर्ष पूर्तीच्‍या निमित्‍ताने आयोजित कार्यकमात  बोलतांना खासदार रामदास तडस पुढे म्‍हणाले की, गेल्‍या दोन वर्षाच्‍या काळात केंद्रातील सरकारने सर्व घटकांसाठी कल्‍याणकारी योजनांची सुरुवात केली असून शेतक-यासाठी सिंचन तसेच पीक विमा योजना तसेच कौशल्‍य विकास योजना ते मेक इन इंडिया या सारख्‍या अनेक योजनांचा समावेश आहे. ज्‍या योजना केंद्र सरकारने सुरु केल्‍या त्‍या लोकांपर्यत पोहचणे गरजेचे असून हया योजना सामान्‍य माणसांपर्यत पोहोचविण्‍याचे आवाहन खा. तडस यांनी उपस्थितांना केले.
            या वर्षात 17 लाख नौक-या देण्‍याचा केद्र सरकारचा संकल्‍प असल्‍याचे सांगून खासदार रामदास म्‍हणाले की, सरकारने सिंचन प्रकल्‍प पूर्ण करण्‍यावर भर दिला असून शेतक-यांच्‍या शेतापर्यंत पाणी पोहचविण्‍याचा प्रयत्‍न सरकार करणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.
            यावेळी बोलतांना आमदार डॉ. पंकज भोयर म्‍हणाले की, केंद्र सरकारने दोन वर्षाची वाटचाल  केली असून लोकांच्‍या आशा-आकांशा पूर्ण करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.
            यावेळी केद्र सरकारच्‍या कृषी विषयक योजनांची माहिती जिल्‍हा कृषी अधिक्षक ज्ञानेश्‍वर भारती  यांनी यावेळी दिली. तसेच आरोग्‍यांच्‍या विविध योजनाबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्‍पना सुनतकरी यांनी दिली. क्षेत्रीय प्रचार महासंचालनालयाच्‍या महाराष्‍ट्र आणि गोवा राज्‍याच्‍या संचालिका श्रीमती प्रभावती  आकाशी यांनी या कार्यक्रमाची भुमिका स्‍पष्‍ट करुन क्षेत्रीय प्रचार कार्यालय करीत असलेल्‍या कामांबाबत माहिती  दिली.
            यावेळी तरोडा येथील पंजाब नॅशनल बॅकेच्‍या शाखेच्‍या वतीने किसान कार्डच्‍या माध्‍यमातून 36 लाख रुपयाचे कर्जाचे तसेच किसान कार्डचे वाटप करण्‍यात आले. कृषी विभाग, एकात्मिक बाल विकास प्रकल्‍प , आरोग्‍य विभाग, राष्‍ट्रीय जीवनज्‍योती कार्यक्रम तसेच इतर विभागाच्‍या वतीने प्रदर्शनी लावण्‍यात आले होते. यावेळी लीड बँकेचे प्रमुख विजय जांगडा यांनी माहिती दिली.
            केद्र सरकारच्‍या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या अंतर्गत येणा-या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या जाहिरात आणि दृष्‍य प्रचार संचालनालयाच्‍या वतीने माझा देश बदलतो आहे. पुढे जातो आहे.या संकल्‍पनेवर आधारीत विशेष चित्रमय प्रदर्शन सुध्‍दा लावण्‍यात आली होती.
            दोन दिवसीय या विशेष कार्यक्रमाच्‍या निमित्‍ताने घेण्‍यात आलेल्‍या विविध स्‍पर्धेच्‍या विजेत्‍यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आले. यापूर्वी सकाळी तरोडा गावातून एक जनजागृती रॅली काढण्‍यात आली यात ग्रामस्थ मोठया संख्‍येने उपस्थित झाले होते.
                        वाढीव पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन 
       सांसद आदर्श ग्राम असलेल्‍या तरोडा या गावचा सर्वागिण विकास करतांना रस्‍ते, पाणी, वीज व स्‍थानिक मुलभूत समस्‍या सोडविण्‍याला प्राधान्‍य दिल्‍याचे खासदार रामदास तडस यांनी यावेळी सांगितले.
       तरोडा येथील पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍न कायमस्‍वरुपी सुटावा यासाठी 1 कोटी 74 लक्ष रुपये खर्चाच्‍या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन खासदार रामदास तडस यांच्‍या हस्‍ते झाले. तरोडा येथे बेरोजगार युवकांना कायमस्‍वरुपी रोजगार मिळावा यासाठी दूकानाचे संकुल बांधण्‍यात येणार आहे. सुमारे 20 लक्ष रुपये खर्चून बांधण्‍यात यावयाच्‍या  संकुलाचे भूमिपूजन यावेळी करण्‍यात आले.
युवकांना रोजगाराच्‍या संधी बरोबर कौशल्‍य विकास, शेतक-यांसाठी राष्‍ट्रीय पीक विमा योजना, शेतक-यासाठी सौर उर्जा कृषी पंप, महिला व युवकांसाठीच्‍या विविध योजना पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी सुरु केल्‍या आहेत. या योजनांचा लाभ घेण्‍याचे आवाहन यावेळी खासदार रामदास तडस यांनी केले.
                                         0000
      












            


आमगावात बसला पहिला सौर कृषी पंप
Ø जिल्‍हयात 11 सौर कृषी पंप व्‍दारे सिंचन सुरु
Ø जिल्‍हाधिका-यांची हमदापूर, देऊळगाव ला  भेट
Ø शाश्‍वत सिंचनासाठी सौर कृषी पंप उपयुक्‍त
Ø हेमंत मोहरील ठरले पहिले मानकरी
वर्धा,दि.25-शेतीला शाश्‍वत व निरंतर सिंचनाची सुविधा निर्माण करण्‍यासोबत शेतक-याना बारामाही पिक घेण्‍यासाठी उपयुक्‍त ठरणा-या सौर कृषी पंप योजने अंतर्गत जिल्‍हयात पहिला सौर कृषीपंप आमगावच्‍या हेमंत मोहरील या शेतक-याकडे यशस्‍वीपणे कार्यान्वित झाला आहे.
            शेतकरी आत्‍महत्‍या ग्रस्‍त असलेल्‍या जिल्‍हयासाठी शासनाने सौर कृषी पंप योजना राबविण्‍याचा निर्णय घेतला आहे. यामध्‍ये सौरकृषी पंपाच्‍या एकूण किमतीच्‍या केवळ पाच टक्‍के रक्‍कम भरल्‍यानंतर लाभार्थ्‍याच्‍या शेतात सौरकृषी पंप बसविण्‍यात येत आहे. या योजनेमुळे विद्युत जोडणी पासून वंचित राहणा-या व पाच एकरापर्यंत शेती असलेल्‍या सर्व शेतक-याना लाभ मिळत आहे. शेतक-यांनी सौर कृषी पंप योजनेत सहभागी होवून बारामाही पिके घेण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
            सौर कृषी पंप योजने अंतर्गत जिल्‍हयात 11 सौर कृषी पंप बसविण्‍यात आले असून येत्‍या आठवडयात 28 पंप बसविण्‍याचे नियोजन आहे. जिल्‍हयाला 920 सौर कृषी पंपाचे उदि्दष्‍ट आहे. 176 सौर कृषी पंपाना पहिल्‍या टप्‍प्‍यात मंजूर करण्‍यात आले आहे.
            शेतक-यांनी आता निसर्गावर अवलंबून न राहता आपल्‍या शेतात पारंपारिक पिका ऐवजी रोख भाजीपाला, फळाची शेती करुन आर्थिक विवंचनेतून बाहेर पडावे. विजेचे कनेक्‍शन मिळण्‍यास पात्र नसलेल्‍या शेतक-यांना या योजनेचा प्राधान्‍याने लाभ मिळत असून सौर कृषी पंपामुळे विजेच्‍या बिलापासून कायमस्‍वरुपी मुक्‍ती मिळत आहे. शेतक-यांनी सौरकृषी पंप योजनेचा लाभ घेऊन भाजीपाला व फळबागासारखे बारामाही पिके घेण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केलें आहे.
सेलू तालुक्‍यातील हमदापूर येथे सुधाकर मारोतराव डोणे, देवूळगावच्‍या भिमराव निंदे या शेतक-यांच्‍या शेतात बसविण्‍यात आलेल्‍या सौर कृषी पंपाला भेट देवून शेतक-यासोबत संवाद साधला.
            हमदापूरच्‍या सुधाकर डोणे यांचेकडे तीन एकर शेती असून शेतात विहिरीला पाणी असून केवळ विजेचे कनेक्‍शन नसल्‍यामुळे सिंचन करणे शक्‍य नव्‍हते सौर उर्जा कृषी पंपामुळे केवळ 16 हजार 200 रुपये भरुन 3 लक्ष 24 हजार रुपयाचा तीन एचपीचा पंप व सौर उर्जा पॅनल बसविण्यात आले. सौर कृषी पंपामुळे आता बारामाही पिके घेणे सुलभ होणार असून दरमहिन्‍याला विजेचे देयक भरावे लागणार नाही अशी प्रतिक्रिया त्‍यांनी यावेळी दिली.
जिल्‍हयात बसविलेल्‍या 11 सौर कृषी पंपाची यशस्‍वी चाचणी पूर्ण झाली आहे. सौर उर्जामुळे शाश्‍वत व निरंतर सिंचनाचा लाभ मिळणार असल्‍यामुळे पारंपारिक उर्जास्‍त्राताऐवजी अपारंपारिक नविन उर्जा स्‍त्रोताचा वापर शेतीसाठी किफायतशीर ठरणार आहे.
शेतक-यांनी सौर उर्जेचा वापर वाढविण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासनातर्फे संपूर्ण सहयोग राहणार असून सात बारावर कुंटूबातील व्‍यक्‍तीचेएकत्र असलेल्‍या नोंदी ऐवजी हिस्‍सेवाटणीनुसार सातबारा उपलब्‍ध करुन देण्‍यात येतील व जास्‍तीत जास्‍त शेतक-यांना या योजनेमध्‍ये समावेश करण्‍यात येईल. असे जिल्‍हाधिकारी श्री. नवाल यांनी सांगितले.
प्रारंभी विज वितरण कंपणीचे अधिक्षक अभियंता सुनिल देशपांडे यांनी सौर कृषी पंप योजने अंतर्गत शेतक-यांचा सहभाग वाढत असून प्रत्‍यक्ष सौर पंप सुरु झाल्‍यानंतर ईतर शेतक-यांना याची उपयुक्‍तता माहिती होत आहे. शेतक-यांनी या योजनेत सहभागी होण्‍यासाठी आपला पाच टक्‍के सहभाग दयावा असे आवाहन केले.
यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी श्रीमती स्मिता पाटील जैन इरिगेशनचे भागवत कुंभार , उपकार्यकारी अभियंता सुहास पडोळे, चंदन गावंडे, मिलिद माने उपस्थित होते.
जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी शेतक-यासोबत संवाद साधून कापूस, सोयाबिन या  पारंपारिक पिकाऐवजी भाजीपाला ,फळे ही रोख पिके घेवून आर्थिक स्‍वयंपूर्णतेकडे वाटचाल करावी. यासाठी सौर कृषी पंपासाराख्‍या खर्च न येणा-या साधणाचा वापर करावा असेही त्‍यांनी सांगितले.
शेतीला सौर उर्जेचा आधार
वर्धा जिल्‍हयात सौर उर्जा कृषीपंप योजनेमध्‍ये पाच टक्‍के सहभाग भरलेल्‍या 11 शेतक-यांना प्राधान्‍य क्रमानुसार सौर उर्जा पंप महावितरण मार्फत बसविण्‍यात आले आहे. यामध्‍ये सेलू ,हिंगणघाट आणि वर्धा तालुक्‍यातील शेतक-यांचा सहभाग  आहे.
सौर कृषी (डिसी) बसविलेल्‍या शेतक-यांमध्‍ये सेलू तालुक्‍यातील राजु बाळसराफ (हिवरा), मिलींद शेंडे (दिंदोडा), हेमंत मोहरील (आमगाव), सुधाकर डोणे (हमदापुर), गजानन कांबळे, (हमदापुर), भिमराव जिंदे (देऊळगाव), क्रिष्‍णा भोमले (हमदापूर), नारायन चाटे (देऊळगाव), निलेश वाटगूळे (धानोरा), अल्‍लाउदीन शेख (हमदापुर), संजय मनोहर घोरपडे (वणी) ता. हिंगणघाट चा समावेश आहे.





            


शेततळ्याची कामे तत्‍काळ सुरु
करण्याचे आवाहन
वर्धा, दिनांक २३ :  मागेल त्‍याला शेततळे योजनेंतर्गत कृषी विभागाकडे जिल्ह्यातील  2 हजार 75 ऑनलाईन अर्ज प्राप्‍त झाले असून लाभार्थी शेतक-यांना कार्यारंभ आदेश देण्‍यात आलेला आहे. तसेच प्रत्‍यक्ष कामास सुरवात सुद्धा झालेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्‍यांनी शेततळ्यांचे काम स्‍वतः मजुराव्‍दारे अथवा पर्यायी साधनाने (जेसीबी,पोकलॅन इ.) माध्‍यमातून पूर्ण करावे, असे आवाहन जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.ए. भारती यांनी केले आहे.
शेततळ्यांची कामे पूर्ण झाल्‍यावर कृषी विभागाच्या संबंधित कार्यालयास कळविल्‍यानंतर देय अनुदान शेतक-यांच्‍या बँक खात्‍यात तत्‍काळ थेट जमा करण्‍यात येणार आहे. सदर योजनेकरिता वर्धा जिल्‍हयास रु 590 लाख एवढा निधी उपलब्‍ध झालेला असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. सदर योजनेत ऑनलाईन अर्ज केलेल्‍या शेतक-यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा नजिकचे क्षेत्रीय कर्मचारी यांचेशी संपर्क साधून कामे सुरु करुन पावसाळा सुरु होण्‍याआधी कामे पूर्ण करावीत, असेही भारती यांनी सांगितले आहे.
                                                             00000

        आरटीई अंतर्गत 25 टक्‍के
      प्रवेश सोडत प्रक्रिया गुरुवारी
वर्धा, दिनांक २३ : आरटीई अंतर्गत 25 टक्‍के प्रवेशाकरिता ऑनलाईन सोडत दि.26 मे रोजी सकाळी 11 वाजता जिल्‍हा परिषद, वर्धा येथील सभागृहामध्‍ये काढण्‍यात येणार आहे. या सोडतीला जास्‍तीत जास्‍त पालकांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे. े रोजी सकाळी 11 वाजता जिल्‍हा पिल्‍हा रिता ारे
बालकांचा मोफत व सक्‍तीचा शिक्षणाचा अधिकार 2009 नुसार सन 2016-17 या शैक्षणिक वर्षामध्‍ये 25 टक्‍के प्रवेशाची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने राबविण्‍यात येत आहे. वर्धा जिल्‍ह्यामध्‍ये एकूण 120 शाळांमध्‍ये नर्सरीकरीता 487 व वर्ग पहिली करीता 172 असे एकूण 1 हजार 559 जागांकरीता ऑनलाईन प्रक्रियेव्‍दारे पालकांकडून 1 हजार 674 अर्ज प्राप्‍त झालेले आहे.  यामध्‍ये वर्धा तालुका 534, सेलू 114, देवळी 185, हिंगणघाट 394, समुद्रपूर 21, आर्वी 224, आष्‍टी 90 व कारंजा112 अर्जांचा समावेश असे शिक्षण विभागाव्‍दारे कळविण्‍यात आले आहे.
                                                00000

               मंडळस्‍तरावर शुक्रवारी पीक कर्ज मेळाव्‍याचे आयोजन  
वर्धा, दिनांक २० :  वर्धा तालुक्‍यातील शेतक-यांसाठी शुक्रवार, दि.27 मे रोजी सकाळी 11  तालुक्‍यातील मंडळस्‍तरावर  पीक कर्ज वाटप मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे. या मेळाव्‍यात जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन तहसीलदार राहुल सारंग यांनी केले आहे.
जिल्‍हाधिकारी यांचे निर्देशानुसार खरीप हंगाम 2016 -17 या वर्षाकरिता शेतक-यांना सुलभरित्‍या शेतीसाठी आवश्‍यक असणा-या पीक कर्ज शेतक-यांना वाटप करण्‍यासाठी पीक मेळावा आयोजित करण्‍यात आले आहेत. त्‍यामध्‍ये वर्धा तालुक्‍यातील महसूल मंडळांतर्गत वर्धाचे तहसील कार्यालय, वायफळ मंडळात वायफडचे यशवंत विद्यालय, तळेगाव मंडळात तळेगाव टालाटुले ग्रामपंचायत, सेवाग्राम मंडळांतर्गत  ग्रामपंचायत सेवाग्राम, सालोड हिरापूर मंडळांतर्गत सालोड (हि.) ग्रामपंचायत व आंजी मोठी मंडळांतर्गतआंजी येथील जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळेत  पीक कर्ज मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे. या  पीक कर्ज मेळाव्‍यात पीक कर्जाची उपलब्‍धता व मागील वर्षाच्‍या पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार असल्‍याचेही तहसीलदार राहुल सारंग यांनी सांगितले आहे.
                                                0000


आधुनिक सिंचन, पीक पद्धतीचा
                  अवलंब करून आर्थिक सक्षम व्हा
                   -समीर कुणावार
Ø शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेचा 600 शेतक-यांना लाभ
Ø  राष्ट्रीय गळीतधान्य, तेलताड अन्न सुरक्षा अभियान
          वर्धा, दिनांक 20 – शेतक-यांनी आधुनिक सिंचन, पीक पद्धतीचा अवलंब करून आर्थिक समृद्ध व्हावे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुजलाम, सुफलाम शेती करावी. शासनांच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे, याबाबत काही अडचणी येत असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन शेतक-यांना आमदार समीर कुणावार यांनी केले.
              हिंगणघाट येथील केजीएन सभागृहात राष्ट्रीय गळीतधान्य, तेलताड अन्नसुरक्षा अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. दीपप्रज्वलनाने त्यांच्याहस्ते प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
              यावेळी शिक्षण आरोग्य सभापती वसंतराव आंबटकर, हिंगणघाट पंचायत समितीचे सभापती संजयराव तपासे, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे, कृषी तज्ञ अभय भंडारी, नागपूरच्या पशु मत्स्य विज्ञान विद्यापिठाचे संचालक डॉ. नंदकिशोर झाडे, आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी उमाकांत वरडकर, संगीता अरजपुरे, प्राध्यापक डॉ. सारीपुत लांडगे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू, तालुका कृषी अधिकारी संजय साखरे यांची उपस्थिती होती.
             आमदार समीर कुणावार म्हणाले, शेतक-यांनी पिकांचे योग्य नियोजन करावे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा भरपूर उपयोग करून देशी पिकांचे संवर्धन आणि जल उत्पादकता वाढवून शाश्वत पिण्याचे स्त्रोत बळकट करावेत. शासनाच्या महत्त्वांकांक्षी अशा जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जलसिंचन करावे. मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याची सर्वांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगून पाणी बचतीचा संदेश दिला.
             ग्रामीण अर्थव्यवस्था आणि बदलणारे जग या विषयावर विस्तृत स्वरूपात अभय भंडारी यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी पीक, पिकांचे उत्पादन, उत्पादकता, बाजारपेठ याविषयावर मार्गदर्शन करून आधुनिकतेची कास धरून ग्रामीण संस्कृती  टिकविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावाराजस्थानपेक्षा आपल्या भागात पावसाचे प्रमाण अधिक असूनही आपणाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. टंचाईला हद्दपार करावयाचे असेल तर प्रत्येक वाहणा-या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून पाणी जमिनीत मुरविले पाहिजे, असे सांगून जलस्वावलंबनाचा प्रत्येकाने ध्यास घ्यावा त्यादृष्टीने कार्य करावे. पारंपरिक पीक पद्धती बदलून आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. जलस्वावलंबनासाठी, वृक्षसंवर्धनासाठी लोकसहभाग अधिक महत्त्वाचा असल्याचेही  ते म्हणाले.
          प्रशिक्षण कार्यक्रमात प्राध्यापक डॉ. सारीपुत लांडगे, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे यांनी मागेल त्याला शेततळे याबाबत उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले. तसेच भारतीय कृषी व्यवस्था चिंता चिंतन याविषयावरही अभय भंडारी यांनी विचार मांडले. तसेच संगीता अरजपुरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
          प्रारंभी मान्यवरांचे महात्मा गांधी यांचे पुस्तक आणि दुपट्टा देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी संजय साखरे यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र भुसारी यांनी केले.
                   प्रगतीशील शेतक-यांचा गौरव   
       तूर पिकांचे प्रति हेक्टर 35क्वि. विक्रमी उत्पादन घेणा-या वेणीचे हर्षद घोरपडे, दारोडाचे भोजराज तिमांडे, सुभाष धोटे, पवनीचे जीवन माथनकर, चिकमोहचे नंदश्री माळवे यांचा शेतक-यांचा मान्यवरांच्याहस्ते गौरव करण्यात आला. तसेच नभोवाणी शेतीशाळा प्रशस्तीपत्र हिंगोलीतील सदानंद मुळे, मारोतराव खडसकर, हंसराज बडोले, उमेश जांगळे, नीळकंठ काळे, राजकुमार गेडाम, प्राणहंस मेहर, उज्वला जांगळे, सुभाष वंजारी, संध्या साखरे, नामदेव मारगे, सविता पाटील, चंदूलाल राऊत, दीपक दुपारे,चंपालाल पटले, ठमाजी ठिकरे, सुरेश हत्तीमारे, सेवकराम बहेकार, भूषण शिवणकर, रामेश्वर बहेकार,विनोबा खंडाईत, प्रभावती खंडाईत, अनंत पाटील, राहुल मेश्राम यांना नभोवाणी शेतीशाळा प्रशस्तीपत्र आमदार समीर कुणावार इतर मान्यवरांच्याहस्ते वितरीत करण्यात आले.
***