Wednesday 1 June 2016

हिंगणघाट येथे उद्या शेतकरी प्रशिक्षण  
वर्धा, दिनांक 18 : राष्‍ट्रीय गळीतधान्‍य, तेलताड व अन्‍नसुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागाच्‍या वतीने हिंगणघाट येथील शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन दि.20 मे रोजी सकाळी 10 वाजता के.जी.एन.हॉल येथे करण्यात आले असल्याचे तालुका कृषी अधिकारी संजय साखरे यांनी सांगितले आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
प्रशिक्षणाचे उद्घाटन आमदार समीर कुणावार यांच्याहस्‍ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे असतील. कार्यक्रमास जिल्‍हा परिषदेचे उपाध्‍यक्ष विलास कांबळे, शिक्षण व आरोग्‍य सभापती वसंतराव आंबटकर, हिंगणघाट पंचायत समितीचे सभापती संजय तपासे , जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर भारती उपस्थित राहणार आहेत.
प्रशिक्षणाला उपविभागीय कृषी अधिकारी गोंविद मोरे, अभय भंडारी, अमरावतीच्‍या प्रादेशिक संशोधनाचे प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ. महंत खापरे, सेलसुरा येथील  कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्‍वयक डॉ. सुरेश नेमाडे, नागपूरच्‍या महाराष्‍ट्र पशु व मत्‍स विज्ञान विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. सारीपुत लांडगे मार्गदर्शन करणार आहेत.
.                                               0000


No comments:

Post a Comment