Wednesday 7 March 2012

स्‍वर्ण जयंती ग्राम स्‍वरोजगार योजना अंतर्गत जिल्‍हा स्‍तरीय विक्री प्रदर्शन


       वर्धा,दि.7-जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणा, वर्धा व्‍दारा जिल्‍हा स्‍तरीय विक्री व प्रदर्शन `वर्धीनी` या नावाने दि. 10 ते 14 मार्च 2012 या कालावधीत न्‍यु इंग्लिश हायस्‍कुल मैदान,वर्धा येथे सायंकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत मोठ्या उत्‍साहाने साजरा करण्‍यात येत आहे.स्‍वर्ण जयंती ग्राम स्‍वरोजगार योजने अंतर्गत जिल्‍हा स्‍तरीय प्रदर्शनी व विक्री, नव्‍या  संकल्‍पना आणि नवे चैतन्‍य घेवून वर्धेच्‍या पुण्‍य व पावन भुमित साकार होत आहे.
      या प्रदर्शनीमध्‍ये वर्धिनी उत्‍पादने टेराकोटस दागिने, कापडी बॅग, डेकोरेटीव्‍ह कॅन्‍डल्‍स, बांबुच्‍या वस्‍तू, लाकडी खेळणे, गटांच्‍या विविध आकर्षक वसतू, विविध खाद्य पदार्थाचे स्‍टॉल्‍स तसेच सांस्‍कृतीक, मनोरंजनात्‍मक व प्रबोधनपर कार्यक्रमाची रेलचेल या प्रदर्शनीमध्‍ये  राहणार आहे. यामध्‍ये दि. 11 मार्च 2012 रोजी मिर्झा एक्‍सप्रेस यांचा विनोदी कार्यक्रम दि. 12 मार्च 2012 रेाजी शितल म्‍युझीकल आर्केस्‍ट्रा व दि. 13 मार्च 2012 रोजी रमेश ठाकरे यांचा व-हाडी झटका हे कार्यक्रम राहणार आहेत.
     वर्धा जिल्‍हा वासियांनी जिल्‍हा स्‍तरीय प्रदर्शनी व विक्री या कार्यक्रमाचा जास्‍तीत जास्‍त संख्‍येने लाभ घेवून, शासनाच्‍या स्‍वर्ण जयंती ग्राम स्‍वरोजगार योजने अंतर्गत  बचत गटातील सहभागी महिलांचा उत्‍साह वाढवावा. असे आवाहन प्रकल्‍प अधिकारी यांनी केले आहे.

रंगाभिनंदन

मेळ हा रंगांचा, खेळही हा रंगांचा

निसर्गाची रंगपंचमी समेळ रंगांचा


काळ्या रंगातील हिरवा हा बहर..

रंग हा लाल ही त्याचीच लहर...

रुपेरी रूपेरी नभातला तो चांद..

सजणीला सजणा करी तो याद..


गहिरा गर्द सा-याच या छटा..

गो-या चेह-यावर काळ्या गं बटा..


अबोल बोलतो सांगतो गुलाबी..

डोळ्यात बघता होतो हा शराबी...


पांढरी शांतता निळ्या या नभात..

तमाला गं सारते..तांबडी प्रभात...


भगवा, हिरवा ,लाल, पिवळा, निळा

जगाची पसारा सारा रंगांचा असे गोंधळ


सारं सारं विसरुन अंगांग रंगवावं..

रंगांचं हे सुख सा-या जगी वाटावं..

प्रशांत दैठणकर

आपणा सर्वांना होळी आणि रंगाच्या उत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा. नैसर्गिक रंगांचा वापर करा. डोळ्यांची निगा घ्या.  पाण्याचा अपव्यय टाळा खूप खूप रंग खेळा.... पु्न्हा रंगाभिनंदन

Tuesday 6 March 2012

धुलीवंदनामुळे शिबीर आता 12 मार्च रोजी


      वर्धा, दि. 6- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा हिंगणघाट येथील विश्राम गृहात दि. 9 मार्च 2012 रोजी शिबीर आयोजित करण्‍यात आलेला होता. परंतु धुलीवंदनाचा सण पाहता हे शिबीर रद्द करुन दिनांक 12 मार्च 2012 रोजी आयोजीत करण्‍यात आला आहे. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा कळवितात.
                           000000

    

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेमध्‍ये श्रम संस्‍कार शिबीर


       वर्धा, दि. 6- येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेत राष्‍ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष श्रम संस्‍कार शिबीराचे आयोजन करण्‍यात आले. यावेळी विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन केले. भारतीय संविधान व समताधिष्‍टीत समाज निर्मिती या विषयावर प्राध्‍यापक प्रमोद नारायणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्‍हणाले की भारतीय घटना परिपक्‍व आहे, परिपूर्ण व स्‍पष्‍ट आहे. ही घटना भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनविलेली आहे. यामध्‍ये कायदे विषयक नागरिकांचे अधिकार, कर्तव्‍य, शिक्षण, शासनप्रणाली, मतदनाचा अधिकार व इतरही महत्‍वाच्‍या बाबींचा स्‍पष्‍टपणे व सविस्‍तरपणे नमूद व विषद केलेल्‍या आहे.
     याप्रसंगी मार्गदर्शकांनी स्‍वयंसेवकांना संविधानावर प्रश्‍न विचारले असता अचूक उत्‍तर देणा-या रोशण बावणेर या स्‍वयंसेवकाला संविधानाची प्रत भेट देण्‍यात आली.
     याप्रसंगी  मार्गदर्शकांनी आवर्जून सांगितले की संविधानाची प्रत प्रत्‍येकाने जवळ  ठेवावी व  वाचावी कारण भारतीय संविधान पूर्णपणे समजावून घेणे सर्व भारतीय नागरिकांसाठी आवश्‍यक आहे.
     यावेळी कार्यक्रम अधिकारी आर.झोड.रंधई, गटनिदेशक ए.एस.मधुपवार, शिल्‍पनिदेशक व्‍ही.डी.भगत,ए.आर.पांडव, जी.एल.काळे, एच.पी.चव्‍हाण,ए.पी.मारतीवार,
पी.एच.बोबडे, एस.पी.पाचघरे, के.पी.गोवारकर व सर्व स्‍वयंसेवक उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे संचालन  पुनम वानरे तर आभार प्रदर्शन राहूल भोयर यांनी केले.
                              00000

शिधा पत्रिकेवर गॅसची नोंद आवश्‍यक


     वर्धा,दि.6- जिल्‍ह्यातील सर्व शिधापत्रिका धारकांचे सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थे अंतर्गत संपुर्ण यंत्रणाची संगणीकृत आज्ञावली तयार करण्‍याची कार्यवाही सुरु असून, सर्व गॅस एजिन्सिमध्‍ये गॅस स्‍टँपींगचे काम प्रगती पथावर आहे.
     आपल्‍या शिधापत्रिका संबंधित गॅस एजंन्सिमध्‍ये जावून शिधापत्रिकेवर एक किंवा दोन गॅस सिलेंडरची नोंद करुन घ्‍यावी. तसेच ज्‍यांचेकडे शिधापत्रिका नाही त्‍यांनी विहित नमुन्‍यातील बंधपत्र संबंधित गॅस एजन्सिमध्‍ये जमा करुन आपला दुरध्‍वनी क्रमांक या भ्रमणध्‍वनी क्रमांक नोंद करुन घ्‍यावा.
     ज्‍या  गॅस धारकांनी आपलेकडील गॅसची नोंद शिधापत्रिकेवर वा बंधपत्रावर घेतली नसेल अशा गॅस धारकांना त्‍यांचेकडील रिकामे झालेले सिलेंडर भरुन मिळणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्‍यावी. असे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
                           000000   

फिरते नांव नोंदणी पथकाचा कार्यक्रम


   वर्धा,दि.6-जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, वर्धा या कार्यालयाचे फिरते नांव नोंदणी पथक माहे मार्च 2012 मध्‍ये खालील नमुद ठिकाणी दिलेल्‍या  तारखांना भेटी देऊन नांव नोंदणीचे काम करतील.
     इच्‍छूक उमेदवारांनी  शैक्षणिक पात्रतेच्‍या मुळ प्रती, जातीचे मुळ प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्‍यक आहे. नोंदणी सकाळी 11 ते सायं. 5 वाजेपर्यंत हजर राहून करुन घ्‍यावी.    
     दि 7 मार्च 2012 पंचायत समिती, आष्‍टी, दि. 7 मार्च 2012 रेाजी पंचायत समिती, कारंजा, दि. 10 मार्च 2012 रोजी पंचायत समिती, आर्वी, दि. 12 मार्च 2012 रोजी पंचायत समिती, सेलू, दि. 15 मार्च 2012 रोजी पंचायत समिती, समुद्रपूर, दि. 16 मार्च 2012 रोजी पंचायत समिती, हिंगणघाट, दि. 18 मार्च 2012 रोजी नगर परिषद, पुलगांव, दि. 19 मार्च 2012 रोजी पंचायत समिती, देवळी येथे नोंदणी करण्‍यात येईल. असे जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, वर्धा यांनी कळविले आहे.
                             000000