Friday 23 November 2012

राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांचे आज आगमन


         वर्धा, दिनांक 22- राज्‍याचे  पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता,पर्यटन, अन्‍न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि सार्वजनिक बांधकाम  राज्‍यमंत्री रणजित कांबळे  यांचे आज रात्री 9.30 वाजता नागपूर येथून वर्धा येथे  आगमन  व मुक्‍काम राहील.
        शनिवार दिनांक 24 नोव्‍हेंबर 2012 रोजी सकाळी 11 वाजता जिल्‍हा नियोजन समितीच्‍या  बैठकीस उपस्थित राहतील. त्‍यानंतर वर्धा येथे मुक्‍काम व राखीव. रविवार दिनांक 25 नोव्‍हेंबर 2012 रोजी वर्धा येथे राखीव.
                                                            000000

ग्रामपंचायत निवडणूक मतदानाचे दिवशी आठवडी बाजार बंद


    वर्धा,दिनांक 22-  जिल्‍हयात  104 ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणूका व 10 ग्रामपंचायतीच्‍या पोट निवडणूका दिनांक 26 नोव्‍हेंबर  2012 रोजी घेण्‍यात येणार आहे.
          ज्‍या ग्रामपंचयतीच्‍या  मतदार क्षेत्रात  दिनांक 26 नोव्‍हेंबर 2012 रोजी मतदान घेण्‍यात  घेण्‍यात येणार आहे. त्‍या ग्रामपंचायतीच्‍या मतदार क्षेत्रात मतदानाचे दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्‍यात येणार आहे. मतदानाशी दिवशी भरणारा आठवडी बाजार तो दिवस बदलून अन्‍य दिवशी भ्‍रविण्‍यास काहीच हरकत नाही.  असे जिल्‍हाधिकारी,वर्धा यांनी एका आदेशाव्‍दारे कळविले आहे.
                                                    00000 

आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाचे प्रशिक्षण 30 नोव्‍हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत


      वर्धा, दि. 23 -  जिल्‍ह्यात आपत्‍ती   व्‍यवस्‍थापन अंतर्गत पूर व्‍यवस्‍थापन, प्रथमोपचार, अग्निशमन व शोध सुटका विषयावर प्रात्‍यक्षिकांचे प्रशिक्षण दिनांक 30 नोव्‍हेंबर ते 2 डिसेंबर 2012 या कालावधीत विकास भवन येथे होणार आहे.
          या प्रशिक्षणात सहभागी होण्‍यासाठी जिल्‍हा परिषद सदस्‍य तीस त्‍यामध्‍ये महिला सदस्‍य संख्‍या दहा, गृह रक्षक दलातील 40 सदस्‍य त्‍यामध्‍ये महिला सदस्‍यांची संख्‍या दहा, नेहरु युवा केंद्राचे 10 सदस्‍य त्‍यामध्‍ये महिला सदस्‍याची संख्‍या पाच यांना आमंत्रित करण्‍यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी सकाळी 9 वाजता उपरोक्‍त स्‍थळी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी,  वर्धा यांनी केले आहे.
                                                 00000

Thursday 22 November 2012

ग्रंथ प्रदर्शनाच्‍या माध्‍यमातून वाचनाची चळवळ अधिक समृध्‍द होईल - संजय भागवत


     
              * महाराष्‍ट्राचा सांस्‍कृतिक  ठेवा उपलब्‍ध
         * 200दिवाळी अंक वाचकांच्‍या  भेटीला

       वर्धा, दि. 22 – युवकांमध्‍ये वाचनाची आवड कमी होत असतांना, युवकांनी ग्रंथ प्रदर्शनास भेट देवून,  ग्रंथप्रदर्शनाच्‍या माध्‍यमातून आवडते ग्रंथ वाचकापर्यंत पोहचविणे सहजसुलभ आहे. दिवाळी अंक ही वाचकांना मेजवाणी असून, प्रत्‍येकांनी वाचनाची आवड जोपासावी,असे आवाहन  अपर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी केले आहे.
      शासकीय जिल्‍हा ग्रंथालयात दिवाळी विशेषांकांचे व दूर्मिळ ग्रंथाच्‍या  प्रदर्शनीचे उदघाटन अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी  संजय भागवत यांच्‍या हस्‍ते थाटात पार पडले त्‍यावेळी ते बोलत होते.
          अध्‍यक्षस्‍थानी विभागीय ग्रंथालय संघाचे अध्‍यक्ष डॉ. गजानन कोटेवार तर प्रमुख अतिथी उपविभागीय पेालीस अधिकारी विक्रम साळी, जिल्‍हा नियेाजन अधिकारी प्रकाश डायरे उपस्थित होते.
          दिवाळी विशेषांकाचे सध्‍याचे स्‍वरुप खूप  बदलते असून, ज्ञानाच्‍या दृष्‍टीनेही ते खूप मोलाचे आहे. वाचकांनी याचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन यावेळी करण्‍यात आले.
              स्‍वप्‍नपूर्तीसाठी आता ग्रंथालयाच्‍या अभ्‍यासिकेत गर्दी !
        शासकीय ग्रंथालयामध्‍ये केवळ ललित साहित्‍य म्‍हणजे कथा, कादंबरी, कविता या लेखन प्रकाराचीच पुस्‍तके मिळत असल्‍याने नोकरीचे स्‍वप्‍न बघणारे युवक-युवती नाराजी व्‍यक्‍त करत होते. परंतु वर्धा येथील शासकीय जिल्‍हा  ग्रंथालयाने या ललित साहित्‍या सोबतच स्‍पर्धा परिक्षांचे संदर्भ ग्रंथ मोठ्या प्रमाणात खरेदी केली. एवढेच नव्‍हे तर स्‍वतंत्र अभ्‍यासीका तयार करुन ग्रंथालयाचा चेहरा- मोहरा बदलविला. तत्‍कालीन निवासी उपजिल्‍हाधिकारी  राजेश  खवले यांनी तर या ग्रंथालयाकडे विशेष लक्ष दिले होते. त्‍याचाच चांगला परिणाम सध्‍या दिसून येत आहे. ग्रंथपाल सुरज मडावी यांनी होतकरु विद्यार्थ्‍यांना विशेष मार्गदर्शन करीत असल्‍याने नोकरीच्‍या स्‍वप्‍नपूर्तीसाठी  आता मोठी गर्दी वाढल्‍याचे दिसून येते.
                                                                                                                       
        अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी मोबाईलचे उदाहरण देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ज्ञानासाठी  होत असताना  युवकांनी सतत वाचनाची आवड जोपासावी व आपले ज्ञान समृध्‍द करण्‍यासाठी  युवकांनी   ग्रंथांचा वापर करावा असेही ते म्‍हणाले.
            उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.साळी म्‍हणाले , मी कृषी विभागात नोकरी  करीत असताना वर्धा शासकीय ग्रंथालयाचा पुरेपुर उपयोग घेतला. साहित्‍य समाज संस्‍कृतीच्‍या समृध्‍दीसाठी  ग्रंथप्रेम युवापिढीसाठी प्रेरणादायी आहे. स्‍पर्धा परिक्षांमधून यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्‍यांनी ग्रंथालयाच्‍या अभ्‍यासिकेचा वापर करावा त्‍यातून आदर्श व्‍यक्तिमत्‍व साकार होऊ शकेल. असा विश्‍वास व्‍यक्‍त केला.
         शासकीय ग्रंथालय अद्ययावत करण्‍यासाठी आवश्‍यक निधी देण्‍यात येईल अशी माहिती नियोजन अधिकारी प्रकाश डायरे यांनी दिली.
          अध्‍यक्ष डॉ. कोटेवार यांनीही विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले.
          प्रारंभी ग्रंथपाल सुरज मडावी यांनी स्‍वागत करुन प्रास्‍ताविकास ग्रंथालयात असलेल्‍या  ग्रंथसंपदेची व ग्रंथालयातर्फे राबविण्‍यात  येत असलेल्‍या  उपक्रमांची  माहिती दिली.
            कार्यक्रमाचे संचालन विजय मुळे तर आभार मयूर काथवटे यांनी  मानले. यशस्‍वीतेसाठी श्रीमती मिश्रा,मख, खडतकर व अन्‍य कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. यावेळी वाचक व विद्यार्थी  बहुसंख्‍येने उपस्थित होते.
                                                                000000 

वर्धा जिल्‍ह्यात 37 कलम लागू


       
            वर्धा, दिनांक 22 – वर्धा जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी जिल्‍हादंडाधिकारी एन.नविन सोना यांना प्रदान केलेल्‍या अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) आणि 3  लागू करण्‍यात आले आहे.
            या कलमाचा अंमल  दिनांक 1 डिसेंबर 2012  च्‍या रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती  विरुध्‍द  कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल. असे आदेशात नमूद आहे.

                                                            00000

धान्‍याची आधारभुत किंमत जाहीर


  
            वर्धा, दिनांक 22 – शासनाच्‍या वतीने दि महाराष्‍ट्र राज्‍य सहकारी मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांच्‍या  मार्फत आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत वर्धा जिल्‍ह्यातील शासकीय गोदामवर तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघामार्फत धान्‍याची आधारभुत किंमत जाहीर करण्‍यात आली आहे. धान खरेदीसाठी  10 ऑक्‍टोंबर 2012 ते 30 सप्‍टेंबर 2013 व भरडधान्‍य खरेदीसाठी दि. 10 ऑक्‍टोंबर 2012 ते 31 मार्च 2013 या कालावधीसाठी  सुरु करण्‍यात आलेली आहे. धान्‍याची आधारभुत किंमत पुढीलप्रमाणे  आहे.
       ज्‍वारी एफ. ए.क्‍यु मालदांडी  आधारभुत किंमत प्रती क्विंटल 1520 रुपये , ज्‍वारी एफ.ए.क्‍यु हायब्रिड आधारभुत प्रति क्विंटल 1500 रुपये, बाजरी एफ.ए.क्‍यु. आधाभुत किंमत प्रती  क्विंटल 1175 रुपये, मका एफ.ए.क्‍यु  आधारभुत प्रती  क्विंटल  1175 रुपये , भात धान अ प्रत आधारभुत  किंमत प्रती क्व्रिंटल 1280 रुपये व  भात धान साधारण आधारभुत किंमत   प्रती क्विंटल 1250 रुपये  ठरविण्‍यात आला असल्‍याची माहिती जिल्‍हा मार्केटिंग अधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.
                                                            0000

संकटात सापडलेल्‍या महिलांच्‍या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक 1091


         वर्धा, दिनांक 22- महिलांवर होणा-या अत्‍याचारांना प्रतिबंध घालण्‍यासाठी तसेच अकस्‍मात सापडलेल्‍या  महिलांच्‍या मदतीसाठी वर्धा  जिल्‍हा  पोलीस दलातर्फे पोलीस नियंत्रण कक्ष वर्धा येथे टोल फ्री  हेल्‍प लाईन सेवा सुरु करण्‍यात आली.
            संकटात सापडलेल्‍या  महिलांनी व पिडीत महिलांनी मदतीकरीता 1091 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे पोलीस उपअधिक्षक वर्धा कळवितात.   
                                                                   000000

वर्धा जिल्‍ह्यात कलम 36 लागू



            वर्धा, दिनांक  22- जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था कायम राहण्‍यासाठी जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार  यांनी 1 डिसेंबर 2012 चे रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 पोटकलम अ ते फ  पर्यंतचा आदेश जारी केला आहे.
            या आदेशाचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरिफध्‍द मुंबई पोलीस अधिनियम सन 1951 कलम 134 अन्‍वये कार्यवाहीस पात्र राहील.
                                                            0000000

पालकमंत्री राजेंद्र मुळक यांचे शनिवारी आगमन जिल्‍हा नियोजन समितीची बैठक


         वर्धा, दिनांक 22- राज्‍याचे  वित्‍त व नियोजन  राज्‍यमंत्री  तथा  जिल्‍ह्याचे  पालकमंत्री  राजेंद्र मुळक यांचे शनिवार दिनांक 24 नोव्‍हेंबर रोजी  सकाळी   11  वाजता  नागपूर येथून  शासकीय मोटारीने आगमन होईल.
          जिल्‍हाधिकारी  कार्यालयाच्‍या सभागृहात  सकाळी  11 वाजता  जिल्‍हा  नियोजन  समितीच्‍या  बैठकीस  पालकमंत्री   राजेंद्र मुळक  उपस्थित  राहून , विविध योजनांचा आढावा घेतील.  दुपारी  1.30 ते 2 वाजेपर्यंतचा  वेळ  शासकीय विश्रामगृह येथे राखीव असून, दुपारी  2 वाजता  जिल्‍हाधिकारी   कार्यालयाच्‍या सभागृहात पाणी आरक्षण समितीच्‍या बैठकीस  उपस्थित राहतील.  व दुपारी 3 वाजता येथून   मोटारीने  नागपूरकडे प्रयाण करतील.
                                                            000000

ग्रामपंचायत निवडणूकीची आचार संहिता लागू



वर्धा दिनांक 22-  जिल्‍ह्यात  जानेवारी  ते मार्च पर्यंत  मुदत संपत असलेल्‍या तीन ग्रामपंचायत व सात ग्रामपंचायत पोट निवडणूकीसाठी  राज्‍य   निवडणूक  आयोगाने  निवडणूकीचा   कार्यक्रम  जाहीर केला असून, ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता  लागू झाली असल्‍याची  माहिती  जिल्‍हाधिकारी  एन.नविन सोना यांनी  आज दिली.  
            जिल्‍ह्यातील   तीन ग्रामपंचायती च्‍या सार्वत्रिक निवडणूका व सात पोटनिवडणूका  23 डिसेंबर रोजी  होणार आहेत.  त्‍यामुळे  याच ग्रामपंचायतींच्‍या  क्षेत्रात  तसेच संबधीत प्रभागाच्‍या  क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्‍यात आली आहे. आचारसंहिता   निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत  अस्तित्‍वात  राहील.  आचारसंहितेचा भंग होणार नाही याची  दक्षता  घ्‍यावी  असे आवाहनही  जिल्‍हाधिकारी  एन.नविन सोना यांनी केले आहे.
0000

शनिवारी जिल्‍हा नियोजन समितीची बैठक


        वर्धा, दिनांक 22 – वर्धा जिल्‍हा  नियोजन समितीची बैठक  शनिवार दिनांक 24 नोव्‍हेंबर रोजी सकाळी 11 वाजता  विकासभवन येथे  आयोजीत करण्‍यात आली आहे. नियोजन समितीची बैठक पालकमंत्री राजेंद्र  मुळक यांच्‍या   अध्‍यक्षतेखाली   होणार असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी   एन.नविन  सोना यांनी   आज दिली.
        जिल्‍हा नियोजन समितीच्‍या बैठकीत सर्व विभागांच्‍या अधिका-यांनी   उपस्थित राहून, सर्वसाधारण, अनुसूचित जाती  उपयोजना, आदिवासी उपयोजना  यासंबंधी   विभागाचे प्रसताव  तसेच ऑक्‍टोंबर  2012 अखेरपर्यंत  झालेल्‍या खर्चाची माहितीसह उपस्‍थीत  रहावे, अशा सुचना  जिल्‍हाधिकारी  एन.नविन सोना यांनी  दिली आहे.
                                                            0000000

26 नोव्‍हेंबर संविधान दिन संविधानाच्‍या प्रास्‍ताविकेचे वाचन


       वर्धा, दिनांक 22-----        26 नोव्‍हेंबर   हा दिवस संविधान दिन म्‍हणून पाळण्‍यात येतो. भारताच्‍या संविधानाबाबत जनजागृती व्‍हावी यादृष्‍टीने अनेक विविध  कार्यक्रमाचे आयोजन या दिवशी शाळा, महाविद्यालयामध्‍ये करावयाचे आहे. संविधान दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्‍यासाठी   भारतीय संविधानाच्‍या प्रास्‍ताविकेचे  होर्डिग शासकिय कार्यालयाच्‍या परिसरात दर्शनी  भागात लावायचे आहे.
  दिनांक 26 नोव्‍हेंबर 2012 ला भारतीय संविधानाबाबत समाजात जागृती  निर्माण व्‍हावी या उद्देशाने या विभागामार्फत समाजकार्य  महाविद्यालय व शासकिय वसतिगृहातील विद्यार्थी, विद्यार्थींनींसह उद्देशपत्रिकाकेचे वाचन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी  10 वाजता करण्‍यात येणार आहे. वर्धा जिल्‍ह्यातील  सर्व शाहा व माहविद्यालयामध्‍ये उद्देशपत्रिकेचे वाचन आपल्‍या  शाळा, महाविद्यालयामध्‍ये  करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्‍त, समाज कल्‍याण , वर्धा यांनी केले आहे.
                                                            000000           

Monday 19 November 2012

राष्‍ट्रीय प्रज्ञाशोध,शिष्‍वृत्‍ती परीक्षा आता 21 नोव्‍हेंबरला


       वर्धा दि.19- 2012-13 मधील वर्ग दहावीसाठी होणारी राष्‍ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) आठवीसाठी होणारी राष्‍ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्‍यवृत्‍ती  योजना परीक्षा (NMMS) या दोन्‍ही परीक्षांचे आयोजन आता बुधवारी 21 नोव्‍हेंबर 2012 रोजी जिल्‍ह्यातील 9 केन्‍द्रावर करण्‍यात आले आहे. यापूर्वी ही परीक्षा 18 नोव्‍हेंबरला होणार होती.
        आता ही परीक्षा यापूर्वी दिलेल्‍या  परीक्षा केन्‍द्रांवर व नियोजित वेळेत घेण्‍यात येणार आहे. याची  सर्व मुख्‍याध्‍यापक, शिक्षक, पालक व संबंधित विद्यार्थ्‍यांनी नोंद घेवून परीक्षेला उपस्थित राहावे असे आवाहन वर्धा जिल्‍हा परिषदेचे माध्‍यमिक शिक्षणाधिकारी लक्ष्‍मीनारायण सोनवणे यांनी केले आहे.
                                      0000000