Friday 23 September 2011

वसंत साठे यांना श्रद्धांजली


माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे

शोकसंदेश
वसंत साठे हे काँग्रेसमधील निष्ठावंत आणि वडीलधारे व्यक्तीमत्व होते. स्पष्ट व परखड मत मांडण्याचा त्यांचा स्वभाव होता. इंदिराजींचे ते विदर्भातील अतिशय विश्वासू सहकारी म्हणून वसंत साठे परिचित होते.वर्धा जिल्ह्याच्या विकासात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने मार्गदर्शक तथा ज्येष्ठ नेता गमावला आहे
राजेंद्र मुळक
पालकमंत्री
वर्धा

केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख रविवारी आर्वीच्या दौ-यावर


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक      जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.23 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
    वर्धा,दि.23- केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख रविवार दि.25 सप्टेंबर रोजी वर्धा जिल्हयाच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम असा असेल.
     सकाळी 11 वाजता आर्वी येथे आगमन. 11 वाजता पाणी पुरवठा योजना व इतर विकासकामांचा कोनशीला समारंभ. 12 वाजता राजीव गांधी स्टेडिअम आर्वी येथे नागरी सभा. दुपारी 2 वाजता मोटारीने नागपूरकडे ते रवाना होतील.
                         000000000

ज्येष्ठ नागरीकासाठी मोफत रोगनिदान व उपचार शिबीराचे आयोजन


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक      जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.23 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
     वर्धा, दि.23- केंद्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये वर्धा जिल्ह्याची राष्ट्रीय वयस्क सुश्रूषा कार्यक्रम राबविण्यासाठी विशेष बाब म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानुसार      1 ऑक्टोंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. याबाबत वर्ष 2011 साठी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुश्रृषा अशी मध्यवर्ती संकल्पना आहे.
     वृध्द व्यक्तींसाठी विशेष मोफत रोगनिदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले असून, शिबीराचे स्थळ, दिनांक, रुग्ण नोंदणी वेळ आणि रुग्ण तपासणी वेळ खालील प्रमाणे आहे.
     उपजिल्हा रुग्णालय, आर्वी, येथे दि. 29 सप्टेंबर 2011 रोजी उपजिल्हा रुग्णालय,हिंगणघाट येथे दि. 30 सप्टेंबर 2011 रोजी, आणि कस्तूरबा बी.एड.कॉलेज,(ग्रामपंचायत जवळ),बोरगांव (मेघे) त.जि.वर्धा येथे अनुक्रमे रुग्ण नोंदणी वेळ सकाळी 9 ते 10 पर्यंत आणि रुग्ण तपासणी वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.
या शिबीरामध्ये वृध्द व्यक्तींना होणा-या कॅन्सर, उच्च रक्तदाब, हृदयरोग, लकवा, वातरोग, कंपवात, स्मृतीभ्रंष, अल्झेमर आजार, मानसिक रोग, नेत्ररोग, हर्निया, हायड्रोसील, लघवीचा त्रास,मधूमेह  या आजाराबद्दल तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी सोबत रक्त लघवी विषयी प्रयोगशाळा तपासणी मोफत करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य संपन्न जिवनशैली, राष्ट्रीय वयस्क सुश्रृषा कार्यक्रम व वृध्दांना होणा-या विविध आजारांच्या प्रतिबंधनाबद्दल तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत सामान्य रुग्णालय, वर्धा येथील बाह्यरुग्ण विभागामध्ये सकाळी 9 ते दुपारी 12.30 या वेळे दरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयक तपासणीसाठी व राष्ट्रीय कॅन्सर (कर्करोग),डायबीटिज (मधूमेह),कार्डीओ व्हॉस्कुलर डिसीझेस(हृदयरोग),स्ट्रोक (लकवा),प्रतिबंधन व उपचार कार्यक्रमांतर्गत (एन.पी.सी.डी.सी.एस.) विशेष तपासणी कक्ष सुरु करण्यात आलेले आहेत.
     जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी सदर उपचार शिबीराचा व आरोग्य सेवा सुविधांचा योग्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड.राठोड यांनी केलेले आहे.
                          000000



पिकावरील किड व रोग सर्वेक्षण पंधरवाडा मोहिम


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.23 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
      वर्धा, दि.23- सोयाबिन पिक संरक्षण पंधरवाडा अंतर्गत मौजे तळणी भागवत येथे नुकतीच शेतक-यांसाठी सर्वेक्षण पंधरवाडा मोहीम राबविण्यात आली. त्यामधे सोयाबिन व कपाशी पिकावर येणा-या किडी, मित्रकिडी व त्यांची ओळख, किडीचा जीवनक्रम आणि नियंत्रणाचे उपाय या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.
     पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे जमिनीमध्ये दिलेले खत पाण्याव्दारे निघून जाते. ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकावर मागवा,तुडतुडे व पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीच्या नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस 40 इ.सी., 30 मिली 10 लिटर किंवा फिप्रोनिल 5 टक्के 20 मिली 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. तसेच पांढ-या माशीसाठी स्टीकी ट्रॅप्स लावण्यात यावे. कपाशीवर लाल्या येवू नये त्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट 1 टक्के डिएपी 2 टक्के सोबत बुरशी नाशकाची फवारणी करावी. असे या मोहीमेत उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी सांगितले.
     यावेळी सभेला तालुका कृषि अधिकारी एस.डब्लु.निघोट, मंडळ कृषि अधिकारी जी.पी.कडू, कृषि सहाय्यक व शेतकरी बांधव उपस्थित होते.
                             00000

कोरडवाहू शाश्‍वत शेती विकास कार्यक्रम संपन्न


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.23 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
          
वर्धा,दि.23- कोरडवाहू शाश्‍वत शेती विकास कार्यक्रमांतर्गत  या वर्षासाठी नुकतीच मौजे तळणी येथील शेतक-यांची प्रशिक्षण सभा घेण्यात आली. या कार्यक्रमातंर्गत शेतीमधुन शेतक-यांना कायमस्वरुपी आर्थिक स्त्रोत निर्माण व्हावा व त्या दृष्टीने शेती आधारीत पिक पध्दती कृषि , फलोत्पादन, कृषि भाजीपाला वर्गीय  पिके, कृषी दुग्ध व्यवसाय, भाजीपाला, कृषी शेळी पालन, कृषी कुक्कुट पालन, शेळी पालन इत्यादी प्रकारच्या शेती पध्दती पैकी शेतक-यांचे एक पिक हातचे गेले तरी दुस-या व्यवसायातुन त्यांना उत्पन्न होईल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळणार नाही असे सांगितले.
 यावेळी  शेतक-यांचे गट स्थापन करणे, गटांना प्रशिक्षण देणे, त्यांना शेतीपूरक अवजारे पुरविणे, नविन तंत्रज्ञान आत्मसात करणे,शेती विषयक माहिती दिली. अभ्यास दौरे आयोजित करणे या बाबीचा समावेश आहे. त्याकरीता तळणी (भागवत) या गावाची निवड करण्यात आली आहे.
या प्रशिक्षणाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे, तालुका कृषि अधिकारी एस.डब्लु निंघोट, मंडळ कृषि अधिकारी कडू व कृषि सहाय्यक तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.
                        00000

नळ ग्राहकांना सुचना


                   महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक   जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दिनांक 23/9/2011
----------------------------------------------------------------------------                                                       
वर्धा, दि. 23- पिपरी (मेघे) व 10 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ता. वर्धा, जि. वर्धा योजनेअंतर्गत असलेल्या सर्व नळ जोडणी धारक ग्राहकांनी पाण्याचे देयके प्रलंबीत असल्यास तातडीने भरण्याची कार्यवाही करावी. प्राधिकरणाच्या सुचनेनुसार चालू देयक मुदतीत न भरल्यास नळ जोडणी ताबडतोब खंडीत करण्यात येईल.
     महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातर्फे वसुली पथक स्थापन करण्यात आलेले असून, प्रत्येक ग्राहकांच्या घरोघरी भेट देणार आहेत व ज्या ग्राहकांचे पाण्याचे देयक थकीत असल्याचे देयकावरुन निदर्शनास आल्यास त्यांची नळ जोडणी पुर्व सुचना न देता खंडीत करण्यात येईल. त्यामुळे पाण्याचे देयक वेळेवर भरुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास सहकार्य करावे. तसेच ग्राहकांच्या सुलभतेसाठी दि. 28 सप्टेंबर 2011 पासुन जलशुध्दीकरण केन्द्र हनुमानगड टेकडी, पिपरी (मेघे) आर्वी रोड येथे देयके स्विकारण्यात येतील. असे कार्यकारी अभियंता ,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बांधकाम विभाग, वर्धा यांनी कळविले आहे.
                              00000


आय.टी.आय.पास उमेदवारांना सुचना


         
                 महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.23/9/2011
----------------------------------------------------------  

        वर्धा, दि.23- इलेक्ट्रीशियन, फिटर, टर्नर, सी ओ ई (सी एन सी), सि ओ ई (अँड वेल्डींग), वेल्डर, मेकॅ. मोटार व्हेईकल, रेफ्रीजरेशन अँड ए.सी. या व्यवसायामध्ये आय.टी.आय. उत्‍तीर्ण उमेदवारांना सुचित करण्यात येते की सत्र ऑगष्ट 2011 मध्ये शिकाऊ उमेदवार भरती करीता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वर्धा येथे दि. 30 सप्टेंबर 2011 रोजी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील विविध आस्थापना सदर भरती मेळाव्यात शिकाऊ उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
     संबधित उमेदवारांनी भरती मेळाव्याकरीता दिनांक 30 सप्टेंबर 2011 रोजी सकाळी 10.30 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हनुमान टेकडी, वर्धा येथे स्व:खर्चाने हजर राहावे. असे अंशकालीन प्राचार्य, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वर्धा यांनी कळविले आहे.
                            00000

Thursday 22 September 2011

वर्धा जिल्हयातील पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती शुक्रवार दि.23/9/2011



क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  र्षी  आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
967.75 मि.मी.
2.31 मि.मी.
3
शासनाचे मदत कार्य
सुरू आहे
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान (सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा - 947.75(निरंक)मि.मी.
2)सेलू - 995(निरंक) मि.मी.
3)देवळी -994.02(14.02) मि.मी.
4)हिंगणघाट-857.3(निरंक) मि.मी.
5)आर्वी -1085.3(निरंक) मि.मी.
6)आष्टी -783.8(निरंक) मि.मी.
7)समुद्रपूर -1165.6(18.5) मि.मी
8)कारंजा-920.10 (निरंक) मि.मी.

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार योजनेसाठी प्रस्ताव आमंत्रित


  महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि. 22 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
          
वर्धा,दि.22-राज्यातील सामाजिक वनीकरणाच्या वन्नेत्तर क्षेत्रातील वृक्षारोपण व संवर्धन या मध्ये उत्कृष्ठ काम करणा-या व्यक्ती व संस्था यांना सन्मानित करण्यासाठी देण्यात येणा-या महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार योजनेचे नाव यापुढे सुधारीत करण्यात आले असून, आता या योजनेचे नाव छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार योजना असे करण्यात आले आहे. या योजने अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणा-या व्यक्ती व संस्था यांना सन्मानित करण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्ती  किंवा संस्थाकडून विहीत नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
     या योजने नुसार पुरस्कार राज्य स्तर आणि महसूल विभाग स्तर अशा दोन स्तरावर दिले जाणार आहेत. दोन्ही स्तरावर व्यक्ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, ग्राम/विभाग/जिल्हा इत्यादी संवर्गामध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. महसूल विभाग स्तरावर आणि राज्य स्तरावर देण्यात येणा-या संवर्ग निहाय पुरस्काराचा तपशिल खालील प्रमाणे आहे.
     महसूल विभाग स्तर (वृत्त) संवर्ग निहाय पुरस्कारामधे व्यक्ती,ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, तसेच ग्राम/विभाग/जिल्हा साठी प्रत्येकी प्रथम पुरस्कार 25,000 रुपये, आणि व्दितीय प्रत्येकी पुरस्कार रु. 15,000 चे देण्यात येणार आहे.
     राज्यसतरावर संवर्ग निहाय पुरस्कारामधे व्यक्ती, ग्रामपंचायत ,शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था तसेच ग्राम/विभाग/जिल्हा साठी प्रत्येकी प्रथम पुरस्कार 50,000 रु. चे, प्रत्येकी व्दितीय पुरस्कार 40,000 रु.आणि प्रत्येकी तृतीय पुरस्कार रु.30,000 चे देण्यात येणार आहेत.                                
पुरस्कारासाठी प्राप्त होणा-या प्रस्तावामधून महसुल विभाग स्तरावरुन प्राप्त झालेल्या प्रथम व व्दितीय क्रमांकाच्या विजेत्यामधून राज्यस्तरीय विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. राज्यस्तरावर निवड झालेले व्यक्ती अथवा संस्था यांना महसूल विभाग स्तरावरील देय ठरणारी पुरस्काराची रक्कम राज्य स्तरावरील प्रदान करण्यात येणा-या पुरस्कार रकमेमधून वजा करुन उर्वरित रक्कम प्रदान करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत पुरस्कार प्राप्त व्यक्ती/ संस्था यांना देण्यात येणारी पुरस्काराची रक्कम ही राज्यस्तरावरील पुरस्काराच्या रकमेपेक्षा अधिक असणार नाही.
     यासाठी जिल्ह्यातील इच्छुक व्यक्ती,ग्रामपंचायत,शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था यांनी त्यांचे प्रस्ताव उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग, वर्धा यांचकडे सादर करावे. प्राप्त होणा-या प्रस्तावाची छाणणी करुन पुढील कार्यवाहीसाठी मुख्य वनसंरक्षक व उपमहासंचालक सामाजिक वनीकरण वृत्त, नागपूर यांचेकडे पाठविण्यात येतील.
     प्रस्तावाची छाननी करुन निवड करण्यात आलेल्या विजेत्या पुरस्काराची रक्कम राष्ट्रीय बचत पत्रे, स्मृती चिन्ह व प्रशस्ती पत्र स्वरुपात पुरस्कार वितरण समारंभासाठी आयोजित करण्यात येणा-या कार्यक्रमामध्ये करण्यात येईल.
     इच्छुक व्यक्ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था यांनी जास्तीत जास्त संख्येत त्यांचेकडील प्रस्ताव उपसंचालक सामाजिक वनीकरण विभाग, वर्धा यांचेकडे 15 दिवसाच्या आत सादर करावे. अधिक माहितीसाठी उपसंचालक सामजिक वनीकरण विभाग, वर्धा किंवा संबंधीत तालुक्यातील लागवड अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. असे उपसंचालक सामाजिक वनीकरण विभाग, वर्धा यांनी कळविले आहे.
                            000000



Wednesday 21 September 2011

वर्धा जिल्हयातील पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती,गुरुवार दि.22/9/2011



क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  र्षी  आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
963.68 मि.मी.
1.77 मि.मी.
3
शासनाचे मदत कार्य
सुरू आहे
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान (सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा - 947.75(निरंक)मि.मी.
2)सेलू - 995(निरंक) मि.मी.
3)देवळी -994.02(14.02) मि.मी.
4)हिंगणघाट-857.3(निरंक) मि.मी.
5)आर्वी -1085(निरंक) मि.मी.
6)आष्टी -783.8(निरंक) मि.मी.
7)समुद्रपूर -1147.1(निरंक) मि.मी
8)कारंजा-920.10 (निरंक) मि.मी.