Wednesday 21 September 2011

1 जानेवारी 2012 या दिनांकावर आधारीत विशेष पुनरीक्षणाचा कार्यक्रम



 महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक         जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि. 21 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
           
     वर्धा,दि.21-भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार वर्धा जिल्ह्यातील 44-आर्वी, 45 देवळी, 46-हिंगणघाट, 47-वर्धा, विधानसभा मतदार संघातील दिनांक 1 जानेवारी 2012 या दिनांकावर आधारीत मतदार याद्याचे विधानसभा मतदार संघानुसार विशेष पुनरिक्षणाचा कार्यक्रम पुढील प्रमाणे निश्चित केलेला आहे.
     पुनर्रचित विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्र मतदार याद्यांची प्रारुप प्रसिध्दी दि. 1 ऑक्टोंबर 2011 (शनिवार), दावे व हरकती स्विकारणे दि. 1 ऑक्टोंबर (शनिवार) ते दि. 1 नोव्हेंबर 2011 (मंगळवार), विशेष मोहीम दि. 9 ऑक्टोंबर 2011 (रविवार), दि. 16 ऑक्टोंबर 2011 (रविवार) व 23 ऑक्टोंबर 2011 (रविवार).दावे व हरकती निकालात काढणे दिनांक 1 डिसेंबर 2011 (रविवार) पुरवणी मतदार यादी तयार करणे व छायाचित्र मतदार याद्यांची छपाई  दि. 1 डिसेंबर 2011 (गुरुवार) पासून दि. 31 डिसेंबर 2011 (शनिवार) पर्यंत. छायाचित्र मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी दि. 5 जानेवारी 2012 (गुरुवार) रोजी होईल.
     भारताचे नागरीक जे दिनांक 1 जानेवारी 2012 रोजी आपल्या वयाची 18 वर्षे पूर्ण करतील व ते त्या मतदार संघातील कायमचे रहीवासी आहेत असे नागरीक आपली नावे मतदार यादीमध्ये नोंदवू शकतात.
     44-आर्वी मतदार संघासाठी मतदार नोंदणी अधिकारी उप विभागीय अधिकारी, आर्वी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तहसीलदार, आर्वी, तहसीलदार, आष्टी, तहसीलदार कारंजा हे राहतील.
     45- देवळी मतदार संघासाठी मतदार नोंदणी अधिकारी उप विभागीय अधिकारी, वर्धा, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तहसीलदार, देवळी राहतील.                       
        46-हिंगणघाट मतदार संघासाठी मतदार नोंदणी अधिकारी उप विभागीय अधिकारी हिंगणघाट, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी  तहसीलदार हिंगणघाट, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तहसीलदार समुद्रपूर हे राहतील.
47-वर्धा मतदार संघासाठी मतदार नोंदणी अधिकारी उप विभागीय अधिकारी, वर्धा व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तहसीलदार, वर्धा    तहसीलदार सेलू राहतील.
संबंधीत मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या पदनिर्देशित    अधिका-याकडे मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक 1 ऑक्टोंबर 2011 ते 1 नोव्हेंबर 2011 पर्यंत कार्यालयीन वेळेत आणि दिनांक 9 ऑक्टोंबर 2011,    16 ऑक्टोंबर 2011 व 23 ऑक्टोंबर 2011 या विशेष मोहीमेच्या तारखांना सर्व मतदान केंद्रावर दावे व हरकती दाखल करण्यासाठी व चुकीच्या नोंदीची दुरुस्ती करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज विनामुल्य उपलब्ध असतील.
मतदार याद्या जास्तीत जास्त अचूक व अद्यावत बनविण्याच्या दृष्टीने सक्रिय भाग घेवून या कामामध्ये निवडणूक यंत्रणेला सहकार्य द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
                    000000

No comments:

Post a Comment