Monday 19 September 2011

किड व रोग सर्वेक्षण पंधरवाडा मोहिम


       महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक            जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.19 सप्टेंबर 2011
--------------------------------------------------------------------------------
            
     वर्धा,दि.19-सोयाबिन, कपासी व उसाची पाहणी केली असता सोयाबिनवर उंट अळीचा प्रादुर्भाव, कपासीवर तुडतुडे व पांढ-या माशीचा प्रादुर्भाव आढळून आला असल्यामुळे कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक सुरेश नेमाडे, उपविभागीय अधिकारी संतोष डावरे, तालुका कृषि अधिकारी येवले व पाटील यांनी किड व रोग सर्वेक्षण पंधरवाडा मोहीम सुरु केली आहे.
     या अधिका-यांनी वरुड, बापापूर, येळाकेळी, गिरोली ढगे, सेलू या गावात जाऊन शेतीची पाहणी करुन शेतक-यांशी संवाद साधला.
     सोयाबिन पिकावर काही ठिकाणी उंटअळीचा प्रादुर्भाव आढळून आला तसेच ज्या उंटअळ्या नैसर्गिक वातावरणातील बुरशी जसे विव्हेरिया ,बसियाना व मेटॅ-हायझम बुरशीमुळे उंट अळी मस्करडाईन रोग होवून मेलेल्या आढळून आल्या. कपासीवर तुळतुळे व पांढ-या माशीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून आल्यास सदर किडीच्या व्यवस्थापनासाठी व्हर्टीसिलीयम 100 ग्रॅम /10 लि.किंवा बिव्हेरिया बॅसियाना 100 ग्रॅम / 10 जि. यांची फवारणी करण्या संदर्भात  शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ऊसावर लोकरी मावा, पावरीला किडीचा प्रादुर्भाव आढळला. या किडीच्या नियंत्रणासाठी सुध्दा व्हर्टीसिलीयम या जैविकबुरशी नाशकाची फवारणी करण्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. शेतक-यांना उपरोक्त बाबींची फवारणी करुन किड आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली येईल याची काळजी घ्यावी. असे शेतक-यांना मार्गदर्शन करताना सांगितले असल्याची माहिती उपविभागीय कृषि अधिकारी वर्धा यांनी दिली आहे.
                         00000

No comments:

Post a Comment