Saturday 2 January 2016

सातारामध्ये राज्यस्तरीय वक्तृत्त्व, प्रश्नमंजूषा स्पर्धा
            
           वर्धा, दि.2 -   महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रयत शिक्षण संस्‍थेच्‍या कर्मवीर विद्या प्रबोधिनीतर्फे दिनांक 21 ते 23 जानेवारी कालावधीत राज्‍यस्‍तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्‍तृत्त्व स्‍पर्धा आणि दिनांक 7 ते 9 जानेवारी दरम्यान राज्यस्‍तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्‍नमंजूषा स्‍पर्धांचे यशवंतराव चव्‍हाण इस्टिंट्यूट ऑफ सायन्‍स, सातारा येथे आयोजन केलेले आहे.
            या स्‍पर्धांची माहितीपत्रके रयत शिक्षण संस्‍थेच्‍या www.rayatshikshan.eduwww.erayat.org या संकेतस्थळावर उपलब्‍ध आहेत. माहितीपत्रकात स्‍पर्धेविषयीचे नियम अटी व तपशील देण्यात आलेला आहे. स्‍पर्धांच्‍या प्रवेशिका स्‍वीकारण्‍याची अंतिम तारीख वक्‍तृत्‍व स्‍पर्धेसाठी दिनांक 16 जानेवारी असून प्रश्‍नमंजुषा स्‍पर्धेसाठी दिनांक 5 जानेवारी आहे. स्‍पर्धेकांनी अधिक माहितीसाठी सातारा येथील कर्मवीर विद्या प्रबोधिनी (फोन नं. 02162-2310074) या वर संपर्क साधावा, असे संस्थांनी कळविले आहे.

                                                                  00000

Friday 1 January 2016

जवाहर नवोदय विद्यालयाची 9 जानेवारीला परीक्षा
Ø प्रवेश पत्र तालुकानिहाय वितरीत
      वर्धा,दि.01- जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा शनिवार, दिनांक 9 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्‍ह्यातील प्रत्‍येक तालुक्‍यात होणार आहे. सर्व तालुक्‍यात एकुण 22 परीक्षा केंद्र आहेत. प्रत्‍येक तालुक्‍यातील निवड चाचणी परीक्षेला बसलेल्‍या विद्यार्थ्‍यांचे प्रवेश पत्र प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, सेलू काटे, वर्धा यांच्‍याकडून गटशिक्षणाधिकारी,पंचायत समिती,शिक्षण विभाग येथे तालुक्‍यानिहाय पोहचविण्‍यात आले आहेत. तरी संबधित पालकांनी याची दखल घ्‍यावी. ज्‍या विद्यार्थ्‍याना प्रवेश पत्र मिळाले नसेल त्‍यांनी दिनांक 7 जानेवारीपर्यंत सेलू काटे येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्‍या प्राचार्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यालयातर्फे करण्‍यात आले आहे.
                                                                000000     
                                                                          
                            तूर,उडीदसाठी भारतीय खाद्य महामंडळ नोडल एजन्‍सी
         वर्धा,दि.01 - शेतक-यांकडून तूर, उडीद खरेदी करण्‍यासाठी भारतीय खाद्य महामंडळाला नोडल एजन्‍सी म्‍हणून समाविष्‍ट केले आहे. महामंडळ तूर,उडीद राज्‍य सरकारीची संस्‍था महाराष्‍ट्र स्‍टेट को-ऑपरेटीव्‍ह मार्केटिंग फेडरेशनद्वारा खरेदी करत आहे. खरेदी करण्‍यासाठी स्‍वच्‍छ उत्‍पादन मंडीत आणणे. भारतीय अन्‍न महामंडळ लिलावामध्‍ये सहभाग घेईल. जेणेकरुन शेतक-यांना त्‍यांच्‍या उत्‍पादनाला चांगला भाव मिळेल. शेतक-यांनी 7/12 उतारा, बँक खाते माहिती घेऊन यावे जणेकरुन पैसे  RTGS  द्वारा किंवा क्रॉस चेक द्वारा अदा करता येतील. खरेदीला मिळणा-या प्रतिसादावरुन आणखी मंडी निवडल्‍या जातील, असे महामंडळातर्फे कळविण्‍यात आले आहे.
                भारतीय अन्‍न महामंडाळाव्‍दारे खाली दिलेल्‍या दर्जाची तूर आणि उडीद खरेदी केली जाईल.
         उडीद -
अ.क्र.
                   अपवर्तक
       कमाल मर्यादा
1
बाह्य पदार्थ
दाण्‍यांच्‍या वजनाच्‍या 2.00टक्‍के
2
मिश्र पदार्थ
दाण्‍यांच्‍या वजनाच्‍या 3.00  टक्‍के
3
अन्‍नधाण्‍याचे दाणे
दाण्‍यांच्‍या वजनाच्‍या 1.00  टक्‍के
4
खराब,किंचित खराब
दाण्‍यांच्‍या वजनाच्‍या 3.00  टक्‍के़   
5
तुटलेले, विभागलेले, साल नसलेले
दाण्‍यांच्‍या वजनाच्‍या 3.00  टक्‍के़
6
पोखरलेली डाळ
दाण्‍यांच्‍या वजनाच्‍या 3.00  टक्‍के़
7
आर्द्रता
दाण्‍यांच्‍या वजनाच्‍या 12.0  टक्‍के़
8
अपरीपक्‍व आणि आकसलेले
दाण्‍यांच्‍या वजनाच्‍या 3.00  टक्‍के़
             

 
      तूर-

अ.क्र.
                        अपवर्तक
कमाल मर्यादा
1
बाह्य पदार्थ
दाण्‍यांच्‍या वजनाच्‍या 2.00टक्‍के
2
मिश्र पदार्थ
दाण्‍यांच्‍या वजनाच्‍या 3.00  टक्‍के
3
अन्‍नधाण्‍याचे दाणे
दाण्‍यांच्‍या वजनाच्‍या 1.00  टक्‍के
4
खराब,किंचित खराब
दाण्‍यांच्‍या वजनाच्‍या 3.00  टक्‍के़   
5
तुटलेले, विभागलेले, साल नसलेले
दाण्‍यांच्‍या वजनाच्‍या 3.00  टक्‍के़
6
पोखरलेली डाळ
दाण्‍यांच्‍या वजनाच्‍या 3.00  टक्‍के़
7
आर्द्रता
दाण्‍यांच्‍या वजनाच्‍या 12.0  टक्‍के़
8
अपरीपक्‍व आणि आकसलेले
दाण्‍यांच्‍या वजनाच्‍या 3.00  टक्‍के़
                                                            

                                                                                 00000
उत्‍कृष्‍ठ पत्रकारिता पुरस्‍कारासाठी
31 जानेवारी पर्यंत प्रवेशिका स्‍वीकारणार
·        स्‍वच्‍छताविषयक लिखानाला विशेष पुरस्‍कार
·        राज्‍य व विभागीय स्‍तरावर पुरस्‍कार
·        सोशल मीडिया साठीही पुरस्‍कार
          वर्धा, दिनांक 01 -  उत्‍कृष्‍ठ पत्रकारिता, उत्‍कृष्‍ठ लेखन, दूरचित्रवाणी वृत्‍तकथा, उत्‍कृष्‍ठ छायाचित्रकार सोशल मीडिया वरील लिखानासोबत प्रथमच स्‍वच्‍छ महाराष्‍ट्र जनजागृती अभियानाबाबत केलेल्‍या लिखाणासाठी राज्‍य शासनाचा उत्‍कृष्‍ठ पत्रकारिता पुरस्‍कार 2015 स्‍पर्धा जाहीर झाली आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू या भाषेतील लिखानासाठी पुरस्‍कार आहेत.
            उत्‍कृष्‍ठ पत्रकारिता पुरस्‍कारासाठी दिनांक 1 जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्‍या कालावधीत प्रसिध्‍द झालेल्‍या लेखनाच्‍या प्रवेशिका 31 जानेवारी 2016 पर्यंत मागविण्‍यात  येत आहे. या पुरस्‍कारासाठी जिल्‍हा माहिती कार्यालय, वर्धा येथे प्रवेशिका उपलब्‍ध आहेत. तसेच dgipr.maharashtra.gov.in, www.maharashtra.gov.in, www.mahanews.gov.in या संकेत स्‍थळावर अर्जाचे नमुने उपलब्‍ध आहेत. उत्‍कृष्‍ठ पत्रकारिता पुरस्‍कारासाठीच्‍या प्रवेशिका जिल्‍हा माहिती अधिकारी, वर्धा येथे स्‍वीकारण्‍यात येतील. या स्‍पर्धामध्‍ये पत्रकारांनी तसेच छायाचित्रकारांनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क विभागातर्फे करण्‍यात आले आहे.    
राज्‍यस्‍तर पुरस्‍कार
आचार्य बाळशास्‍त्री (मराठी) जांभेकर पुरस्‍कार 51 हजार रुपये, मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र, अनंत गोपाळ शेवडे पुरस्‍कार (इंग्रजी) 41 हजार रुपये, मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र, बाबूराव विष्‍णू पराडकर पुरस्‍कार (हिंदी) 41 हजार रुपये, मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र तसेच (उर्दू) मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्‍कार 41 हजार रुपये, मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र, शासकीय गट (मराठी) यशवंतराव चव्‍हाण पुरस्‍कार 41 हजार रुपये, मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र, उत्‍कृष्‍ट दूरचित्रवाणी वृत्‍तकथा पुरस्‍कार 41 हजार रुपये, मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र, तोलाराम कुकरेजा उत्‍कृष्‍ट वृत्‍तपत्र छायाचित्रकार पुरस्‍कार 41 हजार रुपये मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र, केकी मूस उत्‍कृष्‍ट छायाचित्रकार पुरस्‍कार शासकीय गट 41 हजार रुपये, मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र, सोशल मीडीया पुरस्‍कार 41 हजार रुपये, मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र, स्‍वच्‍छ महाराष्‍ट्र जनजागृती पुरस्‍कार 41 हजार रुपये, मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र  हे राज्‍यस्‍तरावरील पुरस्‍कार आहेत.
            पुरस्‍कारामध्‍ये विभागीय पुरस्‍कारामध्‍ये नागपूर विभागासाठी ग.त्र्यं माडखोलकर  पुरस्‍कार 41 हजार  व मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र तसेच अमरावती विभागासाठी लोकनायक बापूजी अणे पुरस्‍कार आहे.
            पुरस्‍कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्‍यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्‍या विकास विषयक कामाच्‍या प्रसिध्‍दीसाठी, जनतेमधील विकास विषयक जाणिव जागृतीसाठी त्‍यांनी केलेले प्रयत्‍न आणि पुरस्‍कार देण्‍यात येणा-या वर्षातील त्‍यांची कामगिरी याचाही विचार केला जाईल.
            पुरस्‍कारासाठी पाठवावयाच्‍या प्रवेशिकेसोबत मूळ लिखाणाचे कात्रण त्‍याच्‍या 2 प्रतीसह पाठवावे लागेल. लिखाणावर लेखकाचे नाव नसल्‍यास, ज्‍या नियतकालिकात हा लेख प्रसिध्‍द झाला असेल, त्‍या नियतकालिकाच्‍या संपादकांचा दाखला जोडलेल्‍या प्रवेशिकांचाच विचार केला जाईल.
सोशल मीडिया पुरस्‍कार
            संकेतस्‍थळे ब्‍लॉग व सोशल मीडियातील प्रसारित मराठी भाषेतील वृत्‍तपत्रकारिता त्‍या स्‍पर्धेत संकेतस्‍थळ विषयक मजकुरासाठी आहे, ब्‍लॉग व सोशल मीडिया वृत्‍तपत्रकारिताविषयक, पत्रकारिता ही स्‍पर्धेच्‍या संबधित प्रभावी वापर करणा-या पत्रकारितेच्‍या क्षेत्रातील व्‍यक्‍तींना सहभाग घेता येईल. स्‍वतंत्र ब्‍लॉगद्वारे लेखन केलेले असल्‍यास ब्‍लॉगला किमान एक वर्ष झालेले असावे. वर्षातील असावी त्‍याचप्रमाणेपत्रकारिताविषयक संकेतस्‍थळ हे अधिकृत असावे व त्‍यावर सोशल मीडियाचा वापर/ वृत्‍त, प्रवेशिका या विकास करताना केंद्र शासनाने विहित केलेल्‍या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा प्रवेशिका पाठविताना अर्जदाराने पत्रकारिताविषयक लेखन  सोशल मीडियाद्वारे करण्‍यात आलेले लेखन व ते कोणत्‍या तारखेस प्रसारित झाले त्‍यांच्‍या मुद्रित प्रती सादर करावयाच्‍या आहेत.
स्‍वच्‍छ महाराष्‍ट्र जनजागृती पुरस्‍कार
स्‍वच्‍छ भारत अभियान तसेच स्‍वच्‍छ महाराष्‍ट्र अभियानासंदर्भात लोकांमध्‍ये स्‍वच्‍छताविषयक जनजागृती करणा-या पत्रकारांसाठीही स्‍पर्धा जाहीर करण्‍यात येत आहे. यास्‍पर्धेत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील वृत्‍तपत्रांमध्‍ये लिखाण करणा-या पत्रकारांना तसेच ईलेक्‍ट्रॉनिक्‍स मिडीया मधील पत्रकारांना सहभागी होता येईल. स्‍वच्‍छ भारत अभियान, स्‍वच्‍छ महाराष्‍ट्र अभियान, महाराष्‍ट्र स्‍वच्‍छता अभियान (नागरी), संत गाडगेबाबा ग्रामस्‍वच्‍छता अभियान, हागणदारी मुक्‍त गाव योजना, घनकचरा व्‍यवस्‍थापन, सांडपाणी व्‍यवस्‍थापन, घनकच-या मधून बायोगॅसची तसेच विजेची निर्मिती, हात धुवा मोहीम इत्‍यादीबाबत लिखाण केलेले असावे. शासनस्‍तरावरुन राबविण्‍यात येत असलेल्‍या स्‍वच्‍छता विषयक विविध योजनांची प्रसिध्‍दी, स्‍वच्‍छता अभियानात लोकसहभाग वाढविण्‍यासाठी लिखाणाद्वारे करण्‍यात आलेले प्रयत्‍न, स्‍वच्‍छतेचे महत्‍व पटविण्‍यासाठी करण्‍यात आलेले जनजागृतीपर लेखन इत्‍यादींचा या पुरस्‍कार स्‍पर्धेत अंतर्भाव होईल.
00000


                                                               
शिष्‍यवृत्‍ती ऑनलाईन अर्जासाठी मुदतवाढ
         
वर्धा, दिनांक 01 -  भारत सरकार शिष्‍यवृत्‍ती योजने अंतर्गत सन 2015-16 या शैक्षणिक वर्षाचे शिष्‍यवृत्‍तीचे अर्ज भरण्‍याची मुदत शासनाने दिनांक 15 जानेवारी 2016 पर्यंत वाढविलेली आहे. तरी संबंधित विद्यार्थ्‍यांनी शिष्‍यवृत्‍तीचे अर्ज मुदतीत भरुन महाविद्यालयास सादर करावे, दिलेल्‍या मुदतीत विद्यार्थ्‍यांनी आपले आवेदनपत्र ऑनलाईन पध्‍दतीने सादर न केल्‍यास त्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी संबंधीत विद्यार्थ्‍यांची व महाविद्यालय प्रमुखाची राहील याची नोंद घ्‍यावी, समाज कल्‍याण विभागाचे सहाय्यक आयुक्‍त बाबासाहेब देशमुख यांनी आहे.
000000








वर्धा जिल्‍ह्यात कलम 37 (1) 3 जारी
      वर्धा,दि 1 - जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबधित राहावी यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी तथा जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांना प्रदान केलेल्‍या अधिकारान्‍वये मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37(1) 3 जारी केले आहे. या कलमाचा अंमल दिनांक 3 जानेवारी पर्यंत राहणार असून या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल,असेही आदेशात नमूद करण्‍यात आले आहे.

000000

Wednesday 30 December 2015

परिश्रमातूनच यशाचा मार्ग सापडतो
                   - सुधीर मुनगंटीवार
Ø स्‍पर्धा परीक्षेसाठी जिल्‍हा ग्रंथालयात सुसज्ज सुविधा
Ø वैशिष्‍ट्यपूर्ण योजनेतून 1 कोटी 70 लक्ष रुपयांचा प्रस्‍ताव मंजूर
Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे केले अभिनंदन 
Ø
     वर्धा दि. 29 –  स्‍पर्धा परीक्षांच्‍या माध्‍यमातून यशाचा मार्ग निवडताना मेहनत व परिश्रमाची
जोड दिली तरच आपण यशस्‍वी होऊ शकतो,  असा सल्‍ला राज्‍याचे अर्थ व नियोजन तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.
             वर्धा येथील जिल्‍हा शासकीय ग्रंथालयात स्‍पर्धा परीक्षा केंद्रासाठी जिल्‍हा नियोजन समितीच्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण योजनेमध्‍ये 1 कोटी 70 लक्ष रुपयांच्‍या निधी उपलब्‍ध करून दिल्‍याबद्दल बिरसा मुंडा फाऊंडेशन यांच्यातर्फे  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर व जिल्‍हाधिकारी आशुतोष सलील यांनी स्‍पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्‍यासाठी पुढाकार घेतल्‍याबद्दल त्‍यांचेही आभार फाऊंडेशनने व्‍यक्‍त केले.
            विश्रामगृहाच्‍या परिसरात आयोजित या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले की, लोकसंख्‍येच्‍या प्रमाणात विदर्भ व मराठवाड्यातील तरुणांना नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध होत नसल्‍याबद्दल मख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या अध्‍यक्षतेखाली समिती नियुक्‍त केली होती. या समितीच्‍या माध्‍यमातून विदर्भ मराठवाडयातील लोकसंख्‍येच्‍या प्रमाणात राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणा-या नोक-यांमध्‍ये या भागातील भरती होते किंवा काय या संदर्भात  सखोल अभ्‍यास केल्‍यानंतर या संदर्भातील शासन निर्णय  काढण्‍यात येणार असल्‍याची माहिती यावेळी त्‍यांनी दिली.
            विदर्भ व मराठवाड्यातील तरुणांनी प्रशासकीय सेवेत भरती, निवड होण्‍यासाठी स्‍पर्धा परीक्षेची तयारी करावी. शासनातर्फे आवश्‍यक त्या सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येतील. परंतु विद्यार्थ्‍यांनी परिश्रम व चिकाटीने यशाचा मार्ग मिळवावा, असे आवाहनही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.
              जिल्‍हा नियोजन समितीच्या निधीमधून 1 कोटी 70 लक्ष रुपयांची तरतूद शासकीय जिल्‍हा ग्रंथालयासाठी करण्‍यात आली आहे. यामध्‍ये सुसज्ज अशी अभ्यासिका,  स्‍पर्धा परीक्षेसाठी उपयुक्‍त अशी पुस्‍तके उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत. या कार्यक्रमास आमदार डॉ. भोयर व जिल्‍हाधिकारी आशुतोष सलील यांचा सत्‍कार फाऊंडेशनतर्फे करण्‍यात आला. यावेळी आमदार सुधीर कुणावार, जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती मिलिंद भेंडे
यांचीही उपस्थिती होती. 

                                                                               00000
महिला सरपंच असलेल्या प्रत्येक गावात
सुसज्ज ग्रामपंचायत भवन
सुधीर मुनगंटीवार
Ø जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकासकामांचा आढावा
Ø येत्या दोन वर्षात प्रत्येक गावात ग्रामपंचायत भवन
Ø 188 कोटी 45 लक्ष रुपयाच्या 16-17 चा प्रस्तावित आराखडा
Ø जिल्हा वार्षिक योजनेचा 67.65 टक्के खर्च
Ø विकासकामांसोबत खर्चाचा वेग वाढवा
        वर्धा, दिनांक 28 -  ग्रामीण जनतेला जलदगतीने सर्व सुविधा एकत्रित उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्तरावर अत्यावश्यक सुविधा असलेले आदर्श ग्रामपंचायत भवन येत्या दोन वर्षात बांधण्यात येणार असून जिल्ह्यातील महिला सरपंच असलेल्या गावांमध्ये प्राधान्याने ग्रामपंचायत भवन बांधण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे अर्थ नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केली.
        वर्धा जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली येथील विकास भवन येथे आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. वर्धा जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये येत्या दोन वर्षात ग्रामपंचायत भवन बांधून महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरावा, या दृष्टीने ग्रामपंचायत भवन बांधकामाचे नियोजन कराअशा सूचनाही पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.
            यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, अमर काळे,मितेश भांगडिया,जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यपालन अधिकारी  संजय मीणा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास कांबळे,जिल्हा नियोजन अधिकारी  प्रकाश डायरे,निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर तसेच जिल्हा नियोजन समितीचे सर्व सदस्य  उपसिथ्त होते.
             
                   जिल्हा वार्षिक योजनेच्या मार्च अखेर झालेल्या खर्चास तसेच नोव्हेंबर 2015 अखेर जिल्हयाला प्राप्त झालेल्या सर्वसाधारण योजना अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी क्षेत्रबाह्य उपाययोजनेवर 172 कोटी 81 लक्ष 97 हजार रूपये तरतूद प्राप्त झाली असून त्यापैकी 131 कोटी 79 लक्ष 46 हजार रूपये विकासकामांसाठी विविध यंत्रणांना निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यापैकी 79 कोटी 16 लक्ष रुपये खर्च झाला असून जिल्ह्याची एकूण खर्चाची 67.65 टक्के आहे.विभागप्रमुखांनी उपलब्ध करून दिलेला निधी 31 मार्चपूर्वी खर्च करणे आवश्यक असल्यामुळे कामांचा तसेच खर्चाचा वेग वाढवा अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्यात.
            जिल्हा वार्षिक योजनेसाठी सर्वसाधारण योजनांवर 2016-17 या पुढील वर्षासाठी  विविध यंत्रणांकडून 188 कोटी 45 लक्ष 90 हजार रुपयांची मागणी करण्यात आली असून मागील वर्षापेक्षा ही मागणी 100 कोटींनी जास्त आहे. वर्धा जिल्हा हा महात्मा गांधी यांचा जिल्हा असल्यामुळे हा जिल्हा आदर्श जिल्हा करण्याचा संकल्प असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासकामांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल, त्यांनी यावेळी सांगितले
            जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्मशान भूमी बांधण्यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्यापूर्वी जिल्हृयातील यापूर्वी झालेल्या बांधकामाचा अहवाल छायाचित्रे एक महिन्यात सादर करण्याच्या सूचना करताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, की वर्धा जिल्ह्याचे वैभव असलेल्या गवळाऊ या गायींचे संवर्धन करण्यासाठी तसेच दूर्मिळ होत असलेल्या प्रजातीच्या संवर्धनासाठी हेटीकुंडी येथील गाय संवर्धन प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी  यांनी एक महिन्यात प्रस्ताव तयार करावा. तसेच या गायींच्या चा-यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आदिवासी उपयोजनेतून 15 लक्ष रूपये तत्काळ मंजूर करण्यात येत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
पाणी पुरवठा योजनेवर श्वेत पत्रिका तयार करा
           जिल्ह्यातील पाणी पुरवठा करणा-या सर्व योजनांचे मुल्यमापन करण्याच्या दृष्टीने तसेच लोकसंख्येनुसार  पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने योजना व्यवहार्य आहे किंवा नाही तसेच प्रत्येक नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो किंवा नाही या संदर्भात जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांवर श्वेतपत्रिका तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिल्यात.
              लोकप्रतिनिधींनी ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांसदंर्भात तसेच काही भागात  दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आणून दिले असता,पिण्याच्या पाण्याचे प्रदूषणांसंदर्भात पाण्याचे नमूने घेऊन दूषित पाणी असलेल्या ठिकाणी माहिती फलक लावा, तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून पथदर्शी प्रकल्प तयार करा, अशी सूचना केली. तसेच चिंचोली ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करण्यासाठी -टेंडर काढूनही योजनेची सुरूवात झाली नाही, यासंदर्भात जिल्हाधिकारी  यांनी 15दिवसांत चौकशी करावी दोषी असणा-या अधिकारी   कर्मचा-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी  सांगितले.  
 जनतेला प्रशासनातर्फे मिळणा-या सुविधांसंदर्भात बोलताना पालकमंत्री म्हणाले की सर्व अधिकारी  यांनी सोमवारी मुख्यालयात राहणे अनिवार्य असून कोणत्याही बैठकीस उपस्थित राहू नये, तसेच लोअर वर्धा प्रकल्पातील पुनर्वसित गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्धा शहरासभोवताली 11 गावातील भूखंडधारकांना बांधकाम परवानगी संदर्भात तत्कालीन उपविभागीय महसूल अधिकारी  पी.शीवशंकर यांनी तयार केलेल्या अहवालावर तत्काळ चौकशीप्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणे, प्रदूषणाबाबत बैठक घेणे, वर्धा जिल्ह्यासाठी 500 कोटी रूपयाचा विकास आराखडा तयार करणे, शेडगाव-शेगाव या रस्त्यासाठी 80 कोटी रूपये निधी उपलब्ध करून देऊन उत्त्म दर्जेदार रस्त्यांचे बांधकाम, वर्धा जिल्ह्यासाठी 25 कोटी रूपयांचा निधी तसेच सुसज्ज नाट्यगृहाच्या बांधकामासाठी 20 कोटी रूपयाचा निधी उपलब्ध करून देतानाच सेवाग्राम विकास आराखडा आदीनिर्णय यावेळी घेण्यात आले.
               खासदार रामदास तडस यांनी देवळी पाणी पुरवठा योजनेस निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून आमदार समीर कुणावार यांनी गाभा  गैर गाभा क्षेत्रात 100 टक्के तसेच अजनसरा बॅरेज प्रकल्पासाठी निधीची उपलब्धता, आमदार डॉ. पंकज भोयर यांनी 11 गावातील परिसर विकास योजनेंतर्गत भूखंडधारकांना 21 दिवसांत बांधकामाची परवानगी देण्यात यावी, तसेच आमदार अमर काळे यांनी गवळाऊ गायींच्या संवर्धनासाठी हेटीकुंडी येथील फार्म तत्काळ सुरू करावा, इंदिरा आवास योजनेत निधी उपलब्ध करून द्यावा. स्पर्धा परीक्षेसाठी वर्धा,हिंगणघाट पुलगाव येथे अभ्यासिका लोअर वर्धा प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी आदी मागण्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी केल्यात.
             प्रारंभी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी स्वागत करून सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपाययोजना आदिवासी क्षेत्रबाह्य योजनेमध्ये झालेल्या विकासकामांसंदर्भात माहिती दिली. संचलन आभार प्रदर्शन जिल्हा नियोजन अधिकारी  प्रकाश डायरे यांनी केले