Friday 1 January 2016

उत्‍कृष्‍ठ पत्रकारिता पुरस्‍कारासाठी
31 जानेवारी पर्यंत प्रवेशिका स्‍वीकारणार
·        स्‍वच्‍छताविषयक लिखानाला विशेष पुरस्‍कार
·        राज्‍य व विभागीय स्‍तरावर पुरस्‍कार
·        सोशल मीडिया साठीही पुरस्‍कार
          वर्धा, दिनांक 01 -  उत्‍कृष्‍ठ पत्रकारिता, उत्‍कृष्‍ठ लेखन, दूरचित्रवाणी वृत्‍तकथा, उत्‍कृष्‍ठ छायाचित्रकार सोशल मीडिया वरील लिखानासोबत प्रथमच स्‍वच्‍छ महाराष्‍ट्र जनजागृती अभियानाबाबत केलेल्‍या लिखाणासाठी राज्‍य शासनाचा उत्‍कृष्‍ठ पत्रकारिता पुरस्‍कार 2015 स्‍पर्धा जाहीर झाली आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू या भाषेतील लिखानासाठी पुरस्‍कार आहेत.
            उत्‍कृष्‍ठ पत्रकारिता पुरस्‍कारासाठी दिनांक 1 जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्‍या कालावधीत प्रसिध्‍द झालेल्‍या लेखनाच्‍या प्रवेशिका 31 जानेवारी 2016 पर्यंत मागविण्‍यात  येत आहे. या पुरस्‍कारासाठी जिल्‍हा माहिती कार्यालय, वर्धा येथे प्रवेशिका उपलब्‍ध आहेत. तसेच dgipr.maharashtra.gov.in, www.maharashtra.gov.in, www.mahanews.gov.in या संकेत स्‍थळावर अर्जाचे नमुने उपलब्‍ध आहेत. उत्‍कृष्‍ठ पत्रकारिता पुरस्‍कारासाठीच्‍या प्रवेशिका जिल्‍हा माहिती अधिकारी, वर्धा येथे स्‍वीकारण्‍यात येतील. या स्‍पर्धामध्‍ये पत्रकारांनी तसेच छायाचित्रकारांनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क विभागातर्फे करण्‍यात आले आहे.    
राज्‍यस्‍तर पुरस्‍कार
आचार्य बाळशास्‍त्री (मराठी) जांभेकर पुरस्‍कार 51 हजार रुपये, मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र, अनंत गोपाळ शेवडे पुरस्‍कार (इंग्रजी) 41 हजार रुपये, मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र, बाबूराव विष्‍णू पराडकर पुरस्‍कार (हिंदी) 41 हजार रुपये, मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र तसेच (उर्दू) मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्‍कार 41 हजार रुपये, मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र, शासकीय गट (मराठी) यशवंतराव चव्‍हाण पुरस्‍कार 41 हजार रुपये, मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र, उत्‍कृष्‍ट दूरचित्रवाणी वृत्‍तकथा पुरस्‍कार 41 हजार रुपये, मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र, तोलाराम कुकरेजा उत्‍कृष्‍ट वृत्‍तपत्र छायाचित्रकार पुरस्‍कार 41 हजार रुपये मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र, केकी मूस उत्‍कृष्‍ट छायाचित्रकार पुरस्‍कार शासकीय गट 41 हजार रुपये, मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र, सोशल मीडीया पुरस्‍कार 41 हजार रुपये, मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र, स्‍वच्‍छ महाराष्‍ट्र जनजागृती पुरस्‍कार 41 हजार रुपये, मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र  हे राज्‍यस्‍तरावरील पुरस्‍कार आहेत.
            पुरस्‍कारामध्‍ये विभागीय पुरस्‍कारामध्‍ये नागपूर विभागासाठी ग.त्र्यं माडखोलकर  पुरस्‍कार 41 हजार  व मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र तसेच अमरावती विभागासाठी लोकनायक बापूजी अणे पुरस्‍कार आहे.
            पुरस्‍कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्‍यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्‍या विकास विषयक कामाच्‍या प्रसिध्‍दीसाठी, जनतेमधील विकास विषयक जाणिव जागृतीसाठी त्‍यांनी केलेले प्रयत्‍न आणि पुरस्‍कार देण्‍यात येणा-या वर्षातील त्‍यांची कामगिरी याचाही विचार केला जाईल.
            पुरस्‍कारासाठी पाठवावयाच्‍या प्रवेशिकेसोबत मूळ लिखाणाचे कात्रण त्‍याच्‍या 2 प्रतीसह पाठवावे लागेल. लिखाणावर लेखकाचे नाव नसल्‍यास, ज्‍या नियतकालिकात हा लेख प्रसिध्‍द झाला असेल, त्‍या नियतकालिकाच्‍या संपादकांचा दाखला जोडलेल्‍या प्रवेशिकांचाच विचार केला जाईल.
सोशल मीडिया पुरस्‍कार
            संकेतस्‍थळे ब्‍लॉग व सोशल मीडियातील प्रसारित मराठी भाषेतील वृत्‍तपत्रकारिता त्‍या स्‍पर्धेत संकेतस्‍थळ विषयक मजकुरासाठी आहे, ब्‍लॉग व सोशल मीडिया वृत्‍तपत्रकारिताविषयक, पत्रकारिता ही स्‍पर्धेच्‍या संबधित प्रभावी वापर करणा-या पत्रकारितेच्‍या क्षेत्रातील व्‍यक्‍तींना सहभाग घेता येईल. स्‍वतंत्र ब्‍लॉगद्वारे लेखन केलेले असल्‍यास ब्‍लॉगला किमान एक वर्ष झालेले असावे. वर्षातील असावी त्‍याचप्रमाणेपत्रकारिताविषयक संकेतस्‍थळ हे अधिकृत असावे व त्‍यावर सोशल मीडियाचा वापर/ वृत्‍त, प्रवेशिका या विकास करताना केंद्र शासनाने विहित केलेल्‍या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा प्रवेशिका पाठविताना अर्जदाराने पत्रकारिताविषयक लेखन  सोशल मीडियाद्वारे करण्‍यात आलेले लेखन व ते कोणत्‍या तारखेस प्रसारित झाले त्‍यांच्‍या मुद्रित प्रती सादर करावयाच्‍या आहेत.
स्‍वच्‍छ महाराष्‍ट्र जनजागृती पुरस्‍कार
स्‍वच्‍छ भारत अभियान तसेच स्‍वच्‍छ महाराष्‍ट्र अभियानासंदर्भात लोकांमध्‍ये स्‍वच्‍छताविषयक जनजागृती करणा-या पत्रकारांसाठीही स्‍पर्धा जाहीर करण्‍यात येत आहे. यास्‍पर्धेत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील वृत्‍तपत्रांमध्‍ये लिखाण करणा-या पत्रकारांना तसेच ईलेक्‍ट्रॉनिक्‍स मिडीया मधील पत्रकारांना सहभागी होता येईल. स्‍वच्‍छ भारत अभियान, स्‍वच्‍छ महाराष्‍ट्र अभियान, महाराष्‍ट्र स्‍वच्‍छता अभियान (नागरी), संत गाडगेबाबा ग्रामस्‍वच्‍छता अभियान, हागणदारी मुक्‍त गाव योजना, घनकचरा व्‍यवस्‍थापन, सांडपाणी व्‍यवस्‍थापन, घनकच-या मधून बायोगॅसची तसेच विजेची निर्मिती, हात धुवा मोहीम इत्‍यादीबाबत लिखाण केलेले असावे. शासनस्‍तरावरुन राबविण्‍यात येत असलेल्‍या स्‍वच्‍छता विषयक विविध योजनांची प्रसिध्‍दी, स्‍वच्‍छता अभियानात लोकसहभाग वाढविण्‍यासाठी लिखाणाद्वारे करण्‍यात आलेले प्रयत्‍न, स्‍वच्‍छतेचे महत्‍व पटविण्‍यासाठी करण्‍यात आलेले जनजागृतीपर लेखन इत्‍यादींचा या पुरस्‍कार स्‍पर्धेत अंतर्भाव होईल.
00000


                                                               
शिष्‍यवृत्‍ती ऑनलाईन अर्जासाठी मुदतवाढ
         
वर्धा, दिनांक 01 -  भारत सरकार शिष्‍यवृत्‍ती योजने अंतर्गत सन 2015-16 या शैक्षणिक वर्षाचे शिष्‍यवृत्‍तीचे अर्ज भरण्‍याची मुदत शासनाने दिनांक 15 जानेवारी 2016 पर्यंत वाढविलेली आहे. तरी संबंधित विद्यार्थ्‍यांनी शिष्‍यवृत्‍तीचे अर्ज मुदतीत भरुन महाविद्यालयास सादर करावे, दिलेल्‍या मुदतीत विद्यार्थ्‍यांनी आपले आवेदनपत्र ऑनलाईन पध्‍दतीने सादर न केल्‍यास त्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी संबंधीत विद्यार्थ्‍यांची व महाविद्यालय प्रमुखाची राहील याची नोंद घ्‍यावी, समाज कल्‍याण विभागाचे सहाय्यक आयुक्‍त बाबासाहेब देशमुख यांनी आहे.
000000








No comments:

Post a Comment