Sunday 17 July 2016

अंपग व्‍यक्‍तींना सन 2016 च्‍या
 राष्‍ट्रीय पुरस्‍कारासाठी अर्ज आमंत्रित

             वर्धा,दि.15- केंद्र शासनाच्‍या विकलांगजन शक्‍तीकरण विभागाने सन 2016 वर्षासाठी  अपंग व्‍यक्‍तीना राष्‍ट्रीय पुरस्‍कार  देणेबाबत अर्ज मागविले आहेत. व या अर्जामधुनच महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या सामाजिक न्‍याय विभागा मार्फत दिल्‍या जाणा-या अपंग कल्याण राज्‍य पुरस्‍कारासाठी निवड करतांना विचार करण्‍यात येईल तेव्‍हा सदर अर्ज भरुण परिपूर्ण प्रस्‍ताव विहीत नमुन्‍यात इंग्रजी व हिंदी मधील  संक्षीप्‍त माहितीसह  तीन प्रतित जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी, जिल्‍हा परिषद वर्धा या कार्यालयाकडे 20 ऑगस्‍ट 2016 पूर्वी सादर करावा.   
          त्‍यानुसार सदर राष्‍ट्रीय पुरस्‍कारासाठी उत्‍कृष्‍ट कर्मचारी- स्‍वयंउद्योजक अपंग व्‍यक्‍ती, उत्‍कृष्‍ट नियुक्‍त अधिकारी आणि सेवायोजन अधिकारी, संस्‍था, प्रतीथ यश व्‍यक्‍ती, अपंग व्‍यक्‍तींचे जीवनमान सुधारण्‍याच्‍या उद्देशाने केलेले उत्‍कृष्‍ट संशोधन, उत्‍पादन, निर्मिती, अपंग व्‍यक्‍तीच्‍या सक्षमीकरणासाठी अडथळाविरहित वातावरण  निर्मिती करणारे कार्यालय, संस्‍था, अपंग व्‍यक्‍तींना पुनवर्सन सेवा पुरविणारा उत्‍कृष्‍ट जिल्‍हा, राष्‍ट्रीय अपंग वित्‍त व विकास  महामडळाचे कार्य करणारे राज्‍य संस्‍था, उत्‍कृष्‍ट कार्य करणा-या प्रौढ अपंग व्‍यक्‍ती,उत्‍कृष्‍ट कार्य करणारे अपंग बालक, उत्‍कृष्‍ट ब्रेल छापखाना, उत्‍कृष्‍ट सहजसाध्‍य संकेतस्‍थळ, अपंग व्‍यक्‍तीच्‍या सक्षमीकरणासाठी प्रोत्‍सा‍हित करणारे उत्‍कृष्‍ट राज्‍य, क्रीडा क्षेत्रात उत्‍कृष्‍ट कार्य करणारी अपंग व्‍यक्‍ती.यांचेकडून अर्ज मागविण्‍यात येत आहे.
         अर्जाचा नमुना कार्यालयात व आधिक माहिती साठी सामाजिक न्‍याय विभागाच्‍या www.DISABILITYAFFAIRS.GOV.IN या वेबसाईटवर उपलब्‍ध आहे असे जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी ,वर्धा यांनी कळविले आहेत.

0000
  प.क्र.483                             

                           वर्धा येथे रोजगार मेळाव्‍याचे आयोजन

            वर्धा,दि.15- भारतीय सुरक्षा परिषद, नवी दिल्‍ली यांच्‍या अंतर्गत दिनांक 19 व 20 जुलै 2016 रोजीला बच्‍छराज धर्मशाळा,शास्‍त्रीचौक,रेल्‍वे स्‍टेशन जवळ वर्धा येथे सकाळी 10.30 वाजता रोजगार मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आलेले आहे.
          सदर रोजगार मेळाव्‍यात भारतीय सुरक्षा परिषद, नवी दिल्‍ली यांचे कडून सुरक्षा रक्षक, सुपरवायझरच्‍या  जागांची भरती करावयाची आहे.
         याकरिता शैक्षणिक पात्रता दहावी पास, नापास ,12 वी पास ,पदवीधर, वय 18 ते 35 वर्ष, शारिरीक पात्रता- उंची 167.5 सेमी, छाती- 80-85 सेंमी. वजन 50 किलो, मासिक वेतन-8000 ते 12000 रुपये अधिक ओवर टाईम अधिक भत्‍ता. आवश्‍यक कागदपत्रे -शैक्षणिक प्रमाणपत्रांच्‍या  अटेस्‍टेड झेरॉक्‍स कॉपी व पासपोर्ट साईजचे 2 फोटो .
        तसेच एसबीआय लाईफ इन्‍श्‍युरन्‍स कं. वर्धा यांचे कडूनसुध्‍दा  विमा एजंट म्‍हणून जागा भरावयाच्‍या आहे.
       आर्या कन्‍स्‍टलन्‍सी, वर्धा यांचे कडून मुंबई येथे एअरपोर्टवर अटेडन्‍टस म्‍हणून कंत्राटी पध्‍दतीने जागा भरावयाच्‍या आहेत.
      इच्‍छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 19 व 20 जुलै 2016 रोजीच्‍या सकाळी 10.30 वाजता बच्‍छराज धर्मशाळा  शास्‍त्रीचौक रेल्‍वे स्‍टेशन जवळ वर्धा येथे उपस्थित राहावे, असे सहाय्यक संचालक, जिल्‍हा कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता  मार्गदर्शन केंद्र,वर्धा यांनी कळविले आहे.
                                                       0000000    ्रमाणपत्रांच्‍या खिकण र च्‍या ज ्‍या सुरक्षा रक्षक, सुपरवायझार    

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा
शेतक-यांनी लाभ घ्‍यावा
                                    जिल्‍हाधिकारी- शैलेश नवाल
·       शेतक-यांनी 31 जुलै पर्यंत अर्ज सादर करावे.

          वर्धा,दि.14- शासनाच्‍या प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत खरीप हंगाम 2016-17 मध्‍ये राज्‍य शासनाच्‍या वतीने  खरीप व रब्‍बी मोसमातील पिकांसाठी पीक विमा योजना राबविण्‍यात येत असून पीक विमा योजनेची मुदत  31 जुलै,2016  पर्यंत राहील. 1 ऑगस्‍ट,2016 नंतर मंजुर केलेल्‍या  पीक कर्जाला प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू राहणार नाही.
        शेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्‍या लाभाकरिता 31 जुलै पर्यंत अर्ज सादर करावे. कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकरी  त्‍यांचा अर्ज अपूर्ण असल्‍यास  विमा कंपनी त्‍यांचा अर्ज स्विकारणार नाही. त्‍याकरिता शेतक-यांनी  आपला विमा अर्ज भरण्‍याकरिता कृषी विभागाची मदत घ्‍यावी. बिगर कर्जदार शेतक-यांनी अर्जासोबत सातबारा व पटवा-याचे पेरणी प्रमाणपत्र जोडणे आवश्‍यक आहे.
 शासनाने  निर्धारित केलेल्‍या रकमेवरच विमा प्रिमीयम कर्ज  शेतक-यांच्‍या खात्‍यावर वळती केल्‍या जातील. शेतक-यांच्‍या पिकाच्‍या कर्जाची रक्‍कम यात ग्राह्य धरली जाणार नाही. शेतक-यांनी पी‍क विमा हप्‍ता भरण्‍यापूर्वीच्‍या पीकांचे नुकसान  ग्राह्य धरण्‍यात येणार नाही. पीक विमा दावा निपटान मध्‍ये सॅटेलाईट, आधुनिक तंत्रज्ञानाच्‍या मदतीने होत असल्‍यामुळे ज्‍या पीकाची लागवड शेतीमध्‍ये करणार आहेत तेच पीक कर्ज घेतांना शेतक-यांनी अर्जामध्‍ये नमूद करावे.
ज्‍या शेतक-यांनी पीक कर्ज दोन किंवा अधिक बँकेकडून घेतले असल्‍यास त्‍यांचे पीक विमा एकाच बँकेचे ग्राह्य मानले जाईल.तरी जिल्‍ह्यातील सर्व शेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल व  अग्रणी जिल्‍हा प्रबंधक विजय जांगडा यांनी केले आहे.



जिल्‍ह्यात खरीप ज्‍वारी, सोयाबीन, तूर, व कापूस या पिकांकरीता  तसेच खरीप भुईमुग पिकांकरीता. शेतक-यांनी जिल्‍ह्यातील  अधिसूचित तालुका अधिसुचित पिक व अधिसूचित मंडळे याच यादी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयास उपलब्‍ध आहे.
सन 2016-17 साठी  खरीप ज्‍वारी, 24 हजार, भुईमुग 30 हजार , सोयाबीन 36 हजार , तीळ 22 हजार मुग 18 हजार  , मका 25 हजार, उडिद 18 हजार ,  तूर 28 हजार  , कापुस 36 हजार प्रती  हेक्‍टर असे आहेत.
ाठविल्‍या भरलेला विम

पीक कर्ज पुनर्गठणची मुदत 31 जुलै पर्यंतच

सर्व पीक कर्ज धारक शेतकरी  ज्‍यांनी 2915-16 या आर्थीक वर्षात पीक कर्ज घेतले असेल व ज्‍यांनी यावर्षी परतफेड करुन नविन पीक कर्ज घेतले नसेल,  अशा सर्व शेतक-यांनी  आपले पीक कर्ज खरीप हंगाम 2015 पुनर्गठण करण्‍याकरिता सर्व  आवश्‍यक कागद पत्र घेऊन तात्‍काळ बँकेशी संपर्क साधावा व पीक कर्ज  पुनर्गठण करुन घ्‍यावे,  असे आवाहनही जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
                                                     00000




महाराष्‍ट्र समृध्‍दी महामार्ग नियोजित नागपूर-मुंबई
शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग लॅण्‍ड पुलिंग योजना
Ø ग्रामीण भागातील आर्थिक विकासाचा दर उंचावणार
                                 जिल्‍हाधिकारी –शैलेश नवाल

वर्धा,दि.14-  नागपूर  ही राज्‍याची उपराजधानी असून, देशाचे मध्‍यवर्ती ठिकाण आहे. नागपूर, अमरावती औरंगाबाद, नाशिक या महानगरामध्‍ये व लगतच्‍या परिसरात सुध्‍दा मोठया प्रमाणावर औद्योगिक व वाणिज्‍यक आस्‍थापना कार्यरत आहेत. राज्‍यातील औद्योगिक व वाणिज्‍यक गुंतवणुक मुंबई महानगरासह राज्‍यामध्‍ये समतोल स्‍वरुपात होण्‍याच्‍या दृष्‍टीने, कृषी व कृषीपूरक उद्योगास चालना देण्‍याचे दृष्‍टीने, ग्रामीण भागातील आर्थिक विकासाचा दर उंचविण्‍यासाठी भूपृष्‍ठ वाहतुकीच्‍या मार्गाच्‍या दर्जामध्‍ये लक्षणीय वाढ होण्‍यासाठी  ही एक महत्‍त्‍वाची योजना आहे. नियोजित नागपूर ,मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग हा नागपूर, अमरावती,औरंगाबाद, नाशिक व कोकण या 5 महसूल विभागातून जात  आहे. त्‍यामध्‍ये नागपूर वर्धा अमरावती, वाशिम, बुलढाना, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक व ठाणे हे 10 जिल्‍हे व 27 तालुक्‍यातील जवळपास 350 गावांचा समावेश आहे.
            नियोजित नागपूर मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग वर्धा  हा वर्धा  जिल्‍ह्यातील सेलू वर्धा  व आर्वी तालुक्‍यातील काही गावामधून जात आहे. यासाठी संपादित होणा-या जमिनीचा लॅड पुलिंग योजनेंतर्गत भूधारंकासाठी भागीदारी देय व अनुज्ञेय लाभ भुधारकास मिळणार आहे. नियोजित द्रुतगती मार्ग व त्‍यावरील  नवनगरांच्‍या आखणीमध्‍ये अंतर्भुत जमिन विना संघर्ष व सत्‍वर प्राप्‍त होण्‍यासाठी नवी मुंबई ,आंतराष्‍ट्रीय विमानतळ व आध्रप्रदेशाच्‍या अमरावती या नूतन राजधानी क्षेत्राच्‍या लॅड पुलिंग योजनेअंतर्गत देय व अनुज्ञेय लाभ विचारात घेऊन नियोजित नव नगरामध्‍ये भूधारकांना संपादित जमिनीच्‍या  मोबदल्‍यात जिरायत जमिनी करिता 25 टक्के व बागायत  जमिनी करिता 30 टक्के या प्रमाणात बिनशेती विकसित जमिन भूखंड देण्‍यात येईल त्‍यामुळे  भुधारकांना या बिनशसेती विकसित जमीन भुखंडावर त्‍या नव नगरांच्‍या विकास आराखड्यानुसार अनुज्ञेय चटाई क्षेत्र निर्देशांकासह रहिवास वाणिज्‍यक वापर करता येईल.
            भुधारकास जो विकसित बिनशेती भुखंड दिला जाईल अशा भुखंडास दहा वर्षानंतर त्‍याचे योग्‍य बाजारमुल्‍य भुधारकास प्राप्‍त होत नसेंल  तर त्‍या भुखंडासाठी आत्‍ताचा भूमी संपादक अधिनियम 2013 प्रमाणे परिगणित भूधारकास  मोबदला जो देय होईल त्‍यावर प्रतिवर्ष 9 टक्के दराने सरळ व्‍याज दहा वर्षासाठी परिगणित करुन त्‍या रक्‍्कमेस असा भूखंड शासन/म.रा. रस्‍ते विकास महामंडळ, महाराष्‍ट्र शासनाने प्रधिकृत केलेले प्राधिकरण  पुणर्खरेदी करेल. नियोजन द्रुतगती मार्ग व त्‍यावरील नव नगरांच्‍या आखाणीमध्‍ये अंतभूर्त  जिल्‍हे, तालुक्‍यातील जमिनी प्रामुख्‍याने जिरायत ,वरकस हलक्‍या  व कोरडवाहून स्‍वरुपाच्‍या  आहे. तसेच काही जमिनी बगायती स्‍वरुपाच्‍या आहेत. त्‍यामुळे भूरधारकांना जमिनीचा ताबा शासनाकडे दिल्‍यानंतर वार्षिक अनुज्ञेय अनुदान प्रती वर्षी ( दरवर्षी 10 टक्के वाढ देऊन ) पुढील 10 वर्षा  करिता जिरायत जमिनीकरिता प्रति हेक्‍टर 50 हजार रुपये व बगायत जमिनीकरिता प्रती हेक्‍टरी एक लाख रुपये देण्‍यात येणार आहे.

लॅण्‍ड पुलिंग योजनेमुळे भूधारकांना पुढील फायदे होणार आहेत. जसेः मोबदला रक्कमे ऐवजी बिनशेती विकसिात भूखंडाच्‍या स्‍वरुपात अनुज्ञेय परतावा स्‍वीकारल्‍यास जमिनीच्‍या वाढत जाणा-या किमतीमुळे भुधारकास अधिक लाभ होईल. विकसित भूखंडावर स्‍वतः किवा विकासाच्‍या सहयोगाने बांधलेल्‍या इमारतीमधील सदनिका व दुकाने खुल्‍या बाजारात संबंधित भूधारकाने विकल्‍यास त्‍यास अधिक लाभ होईल. तसेच सदर सदनिका दुकाने भाडे तत्‍वावर दिल्‍यास त्‍यांना  निरंतर उत्‍पन्‍नाचे साधन निर्माण होईल. अशा  वितरित केलेल्‍या भूखंडावर वाणिज्‍यक बांधकाम अनुज्ञेय करण्‍यात येईल. त्‍यामुळे त्‍याचा वापर करुन भूधारकास स्‍वयंरोजगाराचे साधन निर्माण करता येईल. जमिनीचा मोबदला रोख रक्कमे ऐवजी भूखंडाच्‍या स्‍वरुपात दिल्‍यास भूधारकास मूल्‍यवर्धीत लाभ मिळु शकेल तसेच एक रक्कमी रोख मोबदला मिळल्‍यानंतर त्‍यामधून शाश्‍वत उपजिविकेचे साधन निर्माण होण्‍याची शक्‍यता कमी असते, ही बाब लक्षात घेता भागिदारी तत्‍वाव्‍दारे या प्रकल्‍पात भूधारकांना सहभागी  केल्‍यास त्‍यांना दिर्धकाळ  आर्थिक लाभ मिळु शकेल. भूधारकांना विकास प्रक्रियेमध्‍ये सहभागी होता येईल. कौशल्‍य विकास रोजगार निमिर्ती  आर्थिक विकास व अनुषंगिम संधी अविकसित भागामध्‍ये निर्माण  होतील. त्‍यामुळे शाश्‍वत उपजिविकेचे साधन निर्माण होईल.असे जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी कळविले आहेत. 
                      जिल्‍ह्यातील पर्जन्‍यमान पिक पेरणी व पिक परिस्थिती
        वर्धा,दि.13- वर्धा जिल्‍ह्याची वार्षिक पावसाची सरासरी 1057 मि.मि. आहे. दिनांक 13 जुलै 2016 अखेर पावसाची 434.9 मि.मि. पावसाची नोंद झालेली आहे. 1 जून ते 13 जुलै 2016 या कालावधीत 434.3 मि. मि.पाऊस झाला असल्‍याने त्‍याची सरासरी 141.8 टक्‍्के आहे. पाऊस समाधानकारक  झाला असल्‍यामुळे पिकाच्‍या पेरणीस मोठया प्रमाणात सुरुवात झाली.वर्धा जिल्‍ह्याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्रफळ 425653 हेक्‍टर असून खरीप 2016-17  साठी 428700 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केलेले आहे. 13 जुलै 2016 अखेर 355916 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झालेली असून त्‍याची टक्केवारी सरासरी क्षेत्राच्‍या 84 टक्के तर नियोजनाची 83 टक्के येते. पेरणी झालेल्‍या क्षेत्रामध्‍ये प्रामुख्‍याने तूर पिकाची 57900 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली.त्‍याची  टक्केवारी 82 टक्के आहे. सोयाबीन पिकाचे 86448 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली .त्‍याची टक्केवारी 79 टक्के एवढी आहे. तर कापुस पिकाची लागवड 208426 हेक्‍टर क्षेत्रावर त्‍याची टक्केवारी नियोजनाच्‍या 88 टक्के, सरासरी क्षेत्राच्‍या 113 टक्के एवढी झाली असल्‍याचे असे जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले  आहे.
                                                               00000