Sunday 17 July 2016

                      जिल्‍ह्यातील पर्जन्‍यमान पिक पेरणी व पिक परिस्थिती
        वर्धा,दि.13- वर्धा जिल्‍ह्याची वार्षिक पावसाची सरासरी 1057 मि.मि. आहे. दिनांक 13 जुलै 2016 अखेर पावसाची 434.9 मि.मि. पावसाची नोंद झालेली आहे. 1 जून ते 13 जुलै 2016 या कालावधीत 434.3 मि. मि.पाऊस झाला असल्‍याने त्‍याची सरासरी 141.8 टक्‍्के आहे. पाऊस समाधानकारक  झाला असल्‍यामुळे पिकाच्‍या पेरणीस मोठया प्रमाणात सुरुवात झाली.वर्धा जिल्‍ह्याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्रफळ 425653 हेक्‍टर असून खरीप 2016-17  साठी 428700 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केलेले आहे. 13 जुलै 2016 अखेर 355916 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झालेली असून त्‍याची टक्केवारी सरासरी क्षेत्राच्‍या 84 टक्के तर नियोजनाची 83 टक्के येते. पेरणी झालेल्‍या क्षेत्रामध्‍ये प्रामुख्‍याने तूर पिकाची 57900 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली.त्‍याची  टक्केवारी 82 टक्के आहे. सोयाबीन पिकाचे 86448 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली .त्‍याची टक्केवारी 79 टक्के एवढी आहे. तर कापुस पिकाची लागवड 208426 हेक्‍टर क्षेत्रावर त्‍याची टक्केवारी नियोजनाच्‍या 88 टक्के, सरासरी क्षेत्राच्‍या 113 टक्के एवढी झाली असल्‍याचे असे जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले  आहे.
                                                               00000    




No comments:

Post a Comment