Monday 8 August 2016

 शेतक-यांचे जीवनमान उंचावल्‍यास
केलेल्‍या कामाचे समाधान मिळेल
                                    -जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
Ø भाजीपाला उत्‍पादक शेतकरी कार्यशाळा               
      वर्धा,दि 6 प्रत्‍येक शेतक-याला महिन्‍याला 10 ते 15 हजार रुपये महिना उत्‍पन्‍न मिळावे यासाठी शेतक-यांनी शेती सोबत जोडधंदा सुरु करावा. शेतक-यांचे जिवनमान उंचावण्‍यासाठी त्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानासोबतच शेतीमध्‍ये येणा-या बियाणे, खते, किड व्‍यवस्‍थापन आणि विपणनाच्‍या समस्‍या आपण सोडवु शकलो तर, केलेल्‍या कामाचे मोठे समाधान मिळेल, असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
            विकास भवन येथे जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी आणि कृषि तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन यंत्रणा यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने भाजीपाला उत्‍पादक शेतक-यांची जिल्‍हास्‍तरीय कार्यशाळा घेण्‍यात आली. यावेळी मार्गदर्शन करतांना श्री. नवाल बोलत होते. या कार्यशाळेला जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्‍वर भारती , पंजाबराव कृषि विद्यापिठाचे भाजीपाला तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन विभागाचे विभागप्रमुख डॉ. एस.एस.घावडे, रोग व्‍यवस्‍थापन तज्ञ डॉ. एकता बागडे, किड व्‍यवस्‍थापन तज्ञ विनोद सोनारकर, बी.वाय. अॅग्रो इन्‍फ्रा कंपनीचे संचालक हसन शाफीक , प्रगतीशील शेतकरी संदीप पनपालिया आत्‍माच्‍या शितल मानकर उपस्थित होत्‍या.
            पुढे बोलतांना जिल्‍हाधिकारी म्‍हणाले शेतक-यांनी एकटयाने भाजीपाला लागवड करण्‍यापेक्षा गटाने केल्‍यास त्‍याचा जास्‍त फायदा होईल. शेतक-यांनी मागेल त्‍याला शेततळे योजनेचा लाभ घेऊन संरक्षित सिंचनाची व्‍यवस्‍था करावी. ज्‍यामुळे रब्‍बी व भाजीपाला पिक घेणे शक्‍य होईल. जिल्‍हा प्रशासन व कृषि विभाग सर्व समस्‍या सोडविण्‍यासाठी शेतक-यांना निश्चितीच सहकार्य करेल, असेही ते म्‍हणाले.
            यावेळी बी.वाय.अॅग्रो ईन्‍फ्रा लिमिटेड कंपनीचे संचालक हसन शाफीक यांनी सिंदी विहिर येथे सुरु केलेल्‍या कंपनी विषयी तसेच तिथे उपलब्‍ध सोई सुविधांविषयी माहिती दिली. कंपनीतर्फे भाजीपाल्‍यावर  प्रक्रिया करुन सौदी अरेबिया, दुबई, युरोप, रशिया येथे निर्यात करण्‍यात येते. शेतक-यांकडून 30 ते 40 टन रोज विकत घेण्‍यात येतो.  भाजीपाला उत्‍पादक शेतक-यांनी त्‍याच्‍याकडे उपलब्‍ध असलेल्‍या शितगृहाचा लाभ घ्‍यावा. तसेच शेतक-यांकडून भाजीपाला खरेदी करण्‍यासही त्‍यांनी सहमती दर्शवली
            यासोबतच संदीप पनपालिया यांनी सेंद्रीय शेती, अविनाश कहाते यांनी शेतकरी बचत गटामार्फत होत असलेले भाजीपाला उत्‍पादन, आणि अमित गाडबैल यांनी शेतक-यांमार्फत स्‍थापन केलेल्‍या वर्तमान अॅग्रो प्रोडयुसर कंपनीची वाटचाल याबाबत माहिती दिली.
            यावेळी बोलतांना जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्‍वर भारती म्‍हणाले, भाजीपाला उत्‍पादक शेतक-यांना क्रेट  खरेदीसाठी अनुदान देण्‍यात येते. शेतक-यांनी याचा लाभ घ्‍यावा तसेच भाजीपाल्‍यामध्‍ये किटकनाशकाचा अंश तपासणीसाठी तालुका कृषी अधिका-याकडे नमुने विनामुल्‍य तपासणी करुन देण्‍यात येते. यावेळी त्‍यांनी काही प्रगतीशील शेतक-यांचे उदाहरण देवून त्‍याप्रमाणे शेतक-यांनी विविध प्रयोग करण्‍याचे आवाहन केले. शेतक-यांना उत्‍पादक कंपनी स्‍थापन करण्‍यसाठी आत्‍मा मदत करेल असेही त्‍यांनी सांगितले.

            या कार्यशाळेला सर्व तालुका कृषी अधिकारी , व प्रगतीशील शेतकरी , भाजीपाला उत्‍पादक शेतकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते. 
वाहनांमुळे वनविभागाला चागले दिवस
 -खासदार रामदास तडस
·       वर्धा,आष्‍टी व खरागंणासाठी गस्‍त वाहन
·       वाहनांमुळे शिकार व तस्‍करीच्‍या प्रमाणात होईल घट
वर्धा,दि.6- वन विभागाकडून शासनाना खुप अपेक्षा असतात पण साधनांअभावी हा विभाग अपेक्षा पूर्ण करु शकत नाही.   म्‍हणूनच राज्‍य  शासनाने वन विभागाला गस्‍त  वाहन उपलब्‍ध करुन दिले आहे. या वाहनामुळे वनविभागाला  चागले दिवस आले असून  यापूढे अधिक जबाबदारीने वन व वन्‍य प्राण्‍याचे संरक्षण करावे लागेल असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
वन विभागाला प्राप्‍त झालेल्‍या पेट्रोलींग गाड्याचे हस्‍तांतरण खासदार रामदास तडस यांच्‍या हस्‍ते वनविभागाच्‍या कार्यालयात करण्‍यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपवन संरक्षक दिंगबर पगार, जिल्‍हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, पिपल फॉर अॅनिमल संस्‍थेचे आषिश गोसावी
उपस्थित होते.
पुढे बोलतांना खासदार तडस म्‍हणाले एकाच दिवशी दोन कोटी पेक्षा जास्‍त झाडे लावून महाराष्‍ट्राने देशात इतिहास रचला आहे. या निमित्‍ताने वृक्षारोपनाबाबत नागरिकामध्‍ये मोठया प्रमाणात जनजागृती झाली. त्‍यामुळे हे अभियान लोकांचे झाले, हे याचे सर्वात मोठे यश आहे. देशाच्‍या लोकसभेत अनेक चांगले निर्णय होतात. देशाचे नागरिक म्‍हणून सर्व योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्‍यात आपण सहभाग द्यावा,असे आवाहन त्‍यांनी यावेळी उपस्थित कर्मचा-यांना केले.
खासदार तडस यांच्‍या हस्‍ते  वर्धा, आष्‍टी, खरागंणा येथील वनपरिक्षेत्र अधिका-यांना गाडीची चावी  देण्‍यात आली. आजपासून तीन गाड्या वन विभागाच्‍या ताफ्यात दाखल झाल्‍या आहेत. याबा‍त माहिती देताना उपवन संराक्षक दिंगबर पगार म्‍हणाले, वित्‍त मंत्री तथा पालकमात्री सुधीर  मुनगंटीवार यांनी वर्धा जिल्‍हयासाठी  आठ पेट्रोलींग व्‍हॅन उपलब्‍ध करून दिल्‍यात. वन संपत्‍तीचे संरक्षण करण्‍यासाठी या  गाड्याचा खुप फायदा होईल. मनुष्‍य–प्राणी संघर्षाच्‍या वेळी तात्‍काळ घटनास्‍थळी पोहचून वन्‍य प्राण्‍याला  गाडीत आणता येते. प्राण्‍याने एखादया मनुष्‍यावर हल्‍ला केल्‍यास जखमी इसमास तातडीने रुग्‍णालयात नेण्‍यासाठी गाडीचा उपयोग होऊ शेकतो वन संरक्षणासाठी या गाडया अतिशय महत्‍वाची भूमिका बजावणार असून यामुळे वन  शिकार व तस्‍करीच्‍या प्रकरणात निश्चितच घट होईल अशी आशा त्‍यांनी  व्‍यक्‍त केली.
या कार्यक्रमाला वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी  मोठया प्रमाणात उपस्थितीत होते.
0000