Thursday 3 March 2016

माहिती विभागाच्‍या वर्षपूर्ती चित्ररथास हिरवी झेंडी
Ø  पाच दिवस वर्धा जिल्‍हयात
Ø  लोकोपयोगी योजनांची चित्ररथाद्वारे माहिती
            वर्धा, दिनांक 3शासनाच्‍या विविध कल्‍याणकारी योजनांची माहिती चित्ररथाद्वारे जनतेपर्यंत पोहचविण्‍साठी विशेष तयार करण्‍यात आलेल्‍या चित्ररथाला आज अपर जिल्‍हाधिकारी दिपक नलावडे यांच्‍या हस्‍ते हिरवी झेंडी दाखवून करण्‍यात आले.
            जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या परिसरातून वर्षपूर्ती चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात झाली.  यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी वैभव नवाडकर, नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, कृ‍षी उपसंचालक जी. आर. कापसे आदी अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या एक वर्षपूर्ती  निमित्त  राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती असलेला चित्ररथ हा  वर्धा जिल्‍ह्यात पाच दिवस वर्धा, देवळी, सेलू, आष्‍टी, आर्वी, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्‍यातील विविध गावांमध्‍ये जावून जनतेस विविध योजनांची माहिती देणार आहे.  राज्य शासनाच्या अटल सौर कृषी पंप योजना, सिंचनाला कृषी पंपाची जोड, शेतकऱ्यांना सावकारी कर्ज माफीचा दिलासा, लोकसेवा हमी कायदा, जलयुक्त शिवार योजना, सार्वजनिक वितरण व्यवस्थेत येणारी पारदर्शकता संकल्प जलसत्ताक होण्याचा लोकाभिमुख गतिमान पारदर्शक महाराजस्व अभियान, लोककल्याणासाठी, दुष्काळग्रस्तांसाठी 10 हजार 512 कोटींचे विशेष पॅकेज अशा अनेक योजनांची माहिती या चित्ररथद्वारे देण्यात येणार आहे.
मागेल त्‍याला शेततळे योजने अंतर्गत जिल्‍ह्यात शेतक-याचा महत्‍वाकांक्षी कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे. शेतक-यांनी आपल्‍या शेतात शेततळे बांधण्‍यासाठी ऑन लाईन अर्ज करावा अथवा तालुका कृषी अधिका-यांशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्‍यावा.
प्रारंभी जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी स्‍वागत करुन चित्ररथामार्फत वर्षपूर्ती निमित्‍त योजनांच्‍या प्रसिध्‍दी मोहिमेची माहिती दिली.
वर्षपूर्ती चित्ररथ माहिती व जनसंपर्क विभागाच्‍या संचालक कार्यालयातर्फे तयार करण्‍यात आला आहे. हा चित्ररथ विभागातील सर्व जिल्‍ह्यात माहिती देणार आहे. जनतेनी चित्ररथाच्‍या माध्‍यमातून योजनांचा लाभ घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले आहे.

00000
            अनुसुचित जाती व नवबौध्‍द युवक युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण
8 मार्च पर्यंत अर्ज स्‍वीकारणार
       वर्धा,दि.3-सामाजिक न्‍याय विभागामार्फत अनुसुचित जाती व नवबौध्‍द युवक व युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र श्री.हनुमान प्रसारक मंडळ ,हनुमान व्‍यायाम नगर ,अमरावती येथे सुरु करण्‍यात आले आहे. पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण वर्ग 10 मार्च पासुन सुरु होत आहेत.
            प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्‍याचा असून ,प्रशिक्षण निवासी स्‍वरुपाचे आहे. संस्‍थेमध्‍ये प्रशिक्षणार्थ्‍यास स्‍वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. भरती प्रशिक्षणाकरिता 12 वी पास शैक्षणिक पात्रता व शारीरीक क्षमता उंची 165 से.मी. च्‍या पुढे छाती 79.84 सेंमी. वजन 50 किलो. वयोमर्यादा 18 ते25 वर्ष असणे आवश्‍यक आहे.
            प्रशिक्षण पूर्ण करण्‍याबाबतचे व प्रशिक्षण अर्धवट सोडल्‍यास त्‍याच्‍यावर खर्च करण्‍यात आलेले रक्‍कम  वसुल करण्‍यात येईल. अशा खर्चाचे हमीपत्र रु 100 च्‍या स्‍टॅम्‍प पेपरवर लिहून घेण्‍यात येईल.
अनुसचित जाती व नवबौध्‍द घटकातील पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाकरीता इच्‍छुक युवक युवतींनी आपले अर्ज सहाय्यक आयुक्‍त ,समाज कल्‍याण कार्यालय , डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन ,सेवाग्राम रेल्‍वे स्‍टेशन रोड येथे दि.8 मार्च पर्यंत सादर करावे असे सहाय्यक आयुक्‍त यांनी कळविले आहे.
                                                        0000

                                      जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी
                              मुळ अर्ज सादर करणे बंधनकारक
            वर्धा,दि.3-जाती प्रमाणपत्र पडताळणी अर्जासोबत सर्व मुळ कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. सेवा ,निवडणूक व शैक्षणिक प्रकरणाकरिता अर्ज सादर करणा-या ज्‍या अर्जदारांचे जातीचे प्रमाणपत्रासाठी अर्जदारांनी त्‍यांच्‍या जाती प्रमाणपत्र पडताळणी अर्जासोबत मुळ कागदपत्रे सादर करावेत असे आवाहन विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्‍त सुरेंद्र पवार यांनी केले आहे.
            अर्जदाराचा जाती प्रमाणपत्र पडताळणीचा प्रस्ताव समितीकडे सादर करतेवेळी अर्जदाराने सोबत आणलेले मुळ कागदपत्रे स्‍कॅन करण्‍यात येर्इल. व स्‍कॅन नंतर अर्जदारास मुळ कागदपत्रे परत करण्‍यात येईल. व अर्जदाराकडून छायाकिंत प्रतीचा स्‍वीकार करण्‍यात येईल.
            विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. 1 नागपूर, या समितीमार्फत वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्‍हयातून सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्‍या जातीच्‍या प्रमाणत्राची तपासणी केली जाते. अर्जदार अनुसुचित जातीचा दावा करित असल्‍यास दि.10 ऑगस्‍ट 1950 आणि विमुक्‍त जाती आणि भटक्‍या जमाती यांच्‍या करिता 21 नोव्‍हेंबर 1961 व इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग यांच्‍या करिता 13 ऑक्‍टोंबर 1967 पूर्वीचे पुरावे सादर करणे बंधनकारक  आहे. ब-याच अर्जदाराकडे दावा केलेल्‍या जातीची नोंद असलेले पुरावे नसतात. तेव्‍हा असे अर्जदार मुळ कागदपत्रावर खाडाखोड करुन त्‍या कागदपत्राच्‍या छायाकिंत प्रती समितीस सादर करतात. समितीमार्फत मुळ कागदपत्रे तपासणी केली असता मुळ कागदपत्रामध्‍ये जातीच्‍या नोंदी वेगळया असल्‍याचे निदर्शनास असल्‍याचेही श्री पवार यांनी सांगितले.

                                                                        00000

  (जागतिक वन्‍य दिन विशेष)    
                       वन्‍य जीवांची वैभवशाली परंपरा
               खवल्‍या मांजरासह विविध दुर्मिळ प्राण्‍यांचा अधिवास
मध्‍य भारतातील विविध प्रकारच्‍या वन्‍यजीवांचे अधिवास असलेल्‍या बोर व्‍याघ प्रकल्‍पासोबतच सभोवतालच्‍या बफरझोन मध्‍ये तसेच जिल्‍ह्यातील इतर भागातील वनक्षेत्रात वन्‍यजीवांचा अधिवास मोठया प्रमाणात आहे. खवल्‍या मांजरासह दुर्मिळ होत असलेल्‍या वन्‍यजीवांचे संरक्षण, तसेच वन्‍यप्राण्‍यासाठी सुरक्षित अधिवासामुळे वन्‍यप्राण्‍यांच्‍या संख्‍येत वाढ झाली आहे.
            बोर अभयारण्‍याच्‍या बाहेर मोठ्या प्रमाणात वन्‍यजीव आहेत. त्‍यामुळे वन्‍यजीव अभ्‍यासक, निसर्गप्रेमी व पर्यटकही जिल्‍ह्यातील विविध भागात भेट देत आहेत. मानद वाईल्‍ड लाईफ वार्डन कौशल मिश्रा यांनी ‘वाईल्‍ड पिलग्रिमस ऑफ वर्धा’ अंतर्गत संपूर्ण जिल्‍ह्याचा अभ्‍यास करुन शोध प्रबंध तयार केलाआहे.  जिल्‍ह्यातील जैव विविधता, वन्‍यजीव या संदर्भात मागील तीस वर्षाच्‍या अभ्‍यासातून जिल्‍ह्याचे वन व वन्‍यजीव वैभवाची माहिती त्‍यांनी संकलीत केली आहे. बोर व्‍याघ्र प्रकल्‍पामध्‍ये वाघासह  विविध वन्‍यजीव मोठ्या प्रमाणात अधिवास आहे. परंतू सभोवताल असलेल्‍या सुमारे शंभर पेक्षा जास्‍त किलोमिटरच्‍या परिसरात असलेल्‍या वन्‍यजीव संदर्भात माहिती देतांना कौशल मिश्रा म्‍हणाले की, ब्राम्‍हणवाडा, रीठ, डगा, खैरवाडा, मदना जावठी, शिवणगांव, खेरवाडा चांदनी या परिसरात वाघ व बिबट यांची संख्‍या सुध्‍दा लक्षणीय आहे. या भागात हमखास वाघ किंवा बिबट यांचे दर्शन होते. बफर झोन मध्‍ये वन्‍यप्राण्‍याची संख्‍या वाढत असतांना जिल्‍ह्याच्‍या ईतर वन क्षेत्रातही वन्‍यजीव संवर्धनाचे काम समाधानकारक आहे.
            तडस, रानकुत्रे या प्राण्‍याचे अस्तित्‍व याच परिसरात असले तरी ठिपक्‍या मांजर सालई पेट माळेगाव सावदा आदी भागाद दृष्‍टीस पडतात. या परिसरात उसाची शेती वाढत असल्‍यामुळे येथे त्‍यांना अधिवास मिळाल आहे. अस्‍वलाच्‍या वास्‍तव्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने रिधोरा तामसवाडा भागात अधिवास असून हा भाग अस्‍वलखोरी म्‍हणून सुध्‍दा ओळखला जातो. अस्‍वलीचे वास्‍तव्‍य सोनेगाव रीठ सुसुद येथे सुध्‍दा असल्‍याची नोंद आहे.
            जिल्‍ह्यात वन्‍यजीवामध्‍ये सर्वाधिक अस्तित्‍व व अधिवास असलेल्‍या प्राण्‍यामध्‍ये निलगाय, सांबर, हरित, रानडुक्‍कर, वानर चितळ यांचा समावेश आहे. समुद्रपूर, गिरड, आर्वी, कारंजा, सेलू, हिंगणघाट आ‍दी परिसरात वन्‍यजीवाचे वास्‍तव्‍य आहे. रोहना, कावडघरा, जांभूळधरा आदी माळराणावर काळा हरिन चे वास्‍तव्‍य असले तरी या प्रजातीचे संवर्धन आवश्‍यक आहे. आष्‍टी पार्डीच्‍या जंगलात रानगायीचे अस्तित्‍व आहे.
                                   ‘खवल्‍या  मांजर’ दुर्मिळ
चुनखडी व टेकडी असलेल्‍या भागात वास्‍तव्‍य करणा-या खवल्‍या  मांजर’ दुर्मिळ होत आहे. जिल्‍ह्याचे वैभव असलेले खवल्‍या मांजराचे संवर्धन करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. दहेगाव गोंडी, सुसुम याच परिसरात केळव अधिवास असलेल्‍या या वन्‍यजीवाची सुरक्षा आवश्‍यक असत्‍याने दुर्मिळ प्राणी म्‍हणून सर्व वन्‍यजीव प्रेमीनी यासाठी प्रयत्‍न करण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे कौशल मिश्रा यांनी सांगितले.
      खवल्‍या  मांजर हा पूर्णपणे रात्रीचर प्राणी असलयामुळे सहजासहजी या प्राण्‍याला पाहाणे शक्‍य होत नाही. या प्राण्‍या बद्दल अधिक अभ्‍यास केल्‍यानंतर त्‍यांचा अधिवास कसा सुरक्षित राहील. याकडे विशेष लक्ष देतांना घोरपड पकडणा-या शिका-याकडून या प्राण्‍यांचे संरक्षण आवश्‍यक आहे.
-         अनिल गडेकर

00000