Thursday 3 March 2016

            अनुसुचित जाती व नवबौध्‍द युवक युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण
8 मार्च पर्यंत अर्ज स्‍वीकारणार
       वर्धा,दि.3-सामाजिक न्‍याय विभागामार्फत अनुसुचित जाती व नवबौध्‍द युवक व युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र श्री.हनुमान प्रसारक मंडळ ,हनुमान व्‍यायाम नगर ,अमरावती येथे सुरु करण्‍यात आले आहे. पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण वर्ग 10 मार्च पासुन सुरु होत आहेत.
            प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्‍याचा असून ,प्रशिक्षण निवासी स्‍वरुपाचे आहे. संस्‍थेमध्‍ये प्रशिक्षणार्थ्‍यास स्‍वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. भरती प्रशिक्षणाकरिता 12 वी पास शैक्षणिक पात्रता व शारीरीक क्षमता उंची 165 से.मी. च्‍या पुढे छाती 79.84 सेंमी. वजन 50 किलो. वयोमर्यादा 18 ते25 वर्ष असणे आवश्‍यक आहे.
            प्रशिक्षण पूर्ण करण्‍याबाबतचे व प्रशिक्षण अर्धवट सोडल्‍यास त्‍याच्‍यावर खर्च करण्‍यात आलेले रक्‍कम  वसुल करण्‍यात येईल. अशा खर्चाचे हमीपत्र रु 100 च्‍या स्‍टॅम्‍प पेपरवर लिहून घेण्‍यात येईल.
अनुसचित जाती व नवबौध्‍द घटकातील पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाकरीता इच्‍छुक युवक युवतींनी आपले अर्ज सहाय्यक आयुक्‍त ,समाज कल्‍याण कार्यालय , डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन ,सेवाग्राम रेल्‍वे स्‍टेशन रोड येथे दि.8 मार्च पर्यंत सादर करावे असे सहाय्यक आयुक्‍त यांनी कळविले आहे.
                                                        0000

                                      जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी
                              मुळ अर्ज सादर करणे बंधनकारक
            वर्धा,दि.3-जाती प्रमाणपत्र पडताळणी अर्जासोबत सर्व मुळ कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. सेवा ,निवडणूक व शैक्षणिक प्रकरणाकरिता अर्ज सादर करणा-या ज्‍या अर्जदारांचे जातीचे प्रमाणपत्रासाठी अर्जदारांनी त्‍यांच्‍या जाती प्रमाणपत्र पडताळणी अर्जासोबत मुळ कागदपत्रे सादर करावेत असे आवाहन विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्‍त सुरेंद्र पवार यांनी केले आहे.
            अर्जदाराचा जाती प्रमाणपत्र पडताळणीचा प्रस्ताव समितीकडे सादर करतेवेळी अर्जदाराने सोबत आणलेले मुळ कागदपत्रे स्‍कॅन करण्‍यात येर्इल. व स्‍कॅन नंतर अर्जदारास मुळ कागदपत्रे परत करण्‍यात येईल. व अर्जदाराकडून छायाकिंत प्रतीचा स्‍वीकार करण्‍यात येईल.
            विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. 1 नागपूर, या समितीमार्फत वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्‍हयातून सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्‍या जातीच्‍या प्रमाणत्राची तपासणी केली जाते. अर्जदार अनुसुचित जातीचा दावा करित असल्‍यास दि.10 ऑगस्‍ट 1950 आणि विमुक्‍त जाती आणि भटक्‍या जमाती यांच्‍या करिता 21 नोव्‍हेंबर 1961 व इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग यांच्‍या करिता 13 ऑक्‍टोंबर 1967 पूर्वीचे पुरावे सादर करणे बंधनकारक  आहे. ब-याच अर्जदाराकडे दावा केलेल्‍या जातीची नोंद असलेले पुरावे नसतात. तेव्‍हा असे अर्जदार मुळ कागदपत्रावर खाडाखोड करुन त्‍या कागदपत्राच्‍या छायाकिंत प्रती समितीस सादर करतात. समितीमार्फत मुळ कागदपत्रे तपासणी केली असता मुळ कागदपत्रामध्‍ये जातीच्‍या नोंदी वेगळया असल्‍याचे निदर्शनास असल्‍याचेही श्री पवार यांनी सांगितले.

                                                                        00000

No comments:

Post a Comment