Saturday 19 May 2012


   1 लक्ष 45 हजार मेट्रीकटन जनावरांसाठी अतिरीक्‍त चारा उपलब्‍ध
     वर्धा, दि.19- जिल्‍ह्यात दुष्‍काळी परिस्थितीमधे जनावराच्‍या वैरणाची गरज भागविण्‍यासाठी प्रशासनाने आवश्‍यक ती उपाययोजना केलेली असून, जिल्‍ह्यात    1 कोटी 2 लक्ष58 हजार 159 मेट्रीकटन चारा उपलब्‍ध असून, 8 लक्ष 82 हजार 277 मेट्रीकटन जनावरासाठी चा-याची मागणी आहे. अतिरीक्‍त चारा 1 लक्ष 45 हजार 882 मेट्रीकटन चारा उपलब्‍ध असल्‍याची माहिती डॉ.एम.ए.फगणे यांनी दिली.
      वर्धा तालुक्‍यात  1 लक्ष 28 हजार 427 मेट्रीकटन चा-याची उपलब्‍धता असताना 1 लक्ष 16 हजार 143 मे.टन चा-याची मागणी आहे. देवळी  तालुक्‍यात 97 हजार 518 मे.टन चा-याची उपलब्‍धता असताना 88 हजार 695 मे.टन मागणी आहे. सेलू तालुक्‍यात 1 लक्ष 36 हजार 285 चा-याची उपलब्‍धता असताना 1 लक्ष 25 हजार 596  मे.टन चा-याची मागणी आहे. हिंगणघाट तालुक्‍यात 1 लक्ष 24 हजार 362 मे.टन चा-याची उपलबधता असताना 1 लक्ष 19 हजार 866 मे.टन चा-याची मागणी आहे. समुद्रपूर तालुक्‍यात 1 लक्ष 56 हजार 280 मे.टन चा-याची उपलब्‍धता असून, 1 लक्ष 18 हजार 661 मे.टन चा-याची मागणी आहे. आर्वी तालुक्‍यात  1 लक्ष 67 हजार 427 मे.टन चा-याची उपलब्‍धता असून, 1 लक्ष 27 हजार 531 मे.टन चा-याची मागणी आहे. आष्‍टी तालुकयात 1 लक्ष 7 हजार 451 मे.टन चारा उपलब्‍ध असून, 67 हजार 087 मे.टन चा-याची मागणी आहे. कारंजा तालुक्‍यात  1 लक्ष 10 हजार 409 मे.टन चारा उपलब्‍ध असून, 1 लक्ष 18 हजार 698 मे.टन चा-याची मागणी आहे. कारंजा तालुक्‍यात 8 हजार 289 मे.टन चा-याची अल्‍पशी तुट वगळता इतर तालुक्‍यात आवश्‍यकतेपेक्षा जास्‍त चारा उपलब्‍ध आहे.
     सद्या वन विभागाकडे गवती कुरण 62 मे.टन व चारा 4 हजार 902 मे.टन उपलब्‍ध  असून, चारा टंचाईची सदृष्य परिस्थिती नाही.
     जिल्‍ह्यामध्‍ये पशुधना अंतर्गत 2 लक्ष 94 हजार 289 मोठी जनावरे व 1 लक्ष 19 हजार 98 लहान जनावरे आहेत. मोठ्या जनावरांसाठी 2 हजार 60 व लहान जनावरांसाठी 357.2 मे.टन दैनिक चारा लागत असतो. वार्षिक चा-याची गरज 8 लाख 82 हजार 277 मे.टनाची गरज असते. असे अहवालात नमूद आहे.
                           0000

Friday 18 May 2012

टँकरव्‍दारे पाणी पुरवठ्यामुळे बोटोना वासियांना फार मोठा दिलासा


      वर्धा, दि.18-कारंजा तालुक्‍याच्‍या मुख्‍यालयापासून वीस किलोमिटरवर  दुर्गम ठिकाणी असलेले बोटोने हे गांव कायमस्‍वरुपी टंचाईग्रस्‍त गाव म्‍हणून शासन दरबारी नोंद आहे. या गावातील पाण्‍याचे स्‍त्रोत खोलवर गेल्‍यामुळे प्रखर उन्‍हात पाण्‍याची टंचाई निर्माण होत असते. पंचायत समितीच्‍या अंतर्गत असलेला एक टँकर तेरासे लोकसंख्‍या असलेल्‍या  बोटोना वासीयांची पाण्‍याची समस्‍या दूर करीत आहे.
     वर्धा जिल्‍ह्यात कारंजा हा तालुका टंचाईग्रस्‍त म्‍हणून ओळखला जात होता. अलीकडे मात्र शासनाच्‍या  विविध योजना प्रभावीपणे राबविण्‍यात येत असल्‍यामुळे कारंजा तालुक्‍यातील पाणी टंचाईची तिव्रता कमी झाली आहे. कारंजा तालुक्‍यात 31 गावामध्‍ये टंचाई निवारण्‍यासाठी 40 उपाययोजना राबविण्‍याचा प्रस्‍ताव आहे त्‍यामध्‍ये 20 खाजगी विहरीचे अधिग्रहन, 4 टँकर अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, 10 ठिकाणी पाणी पुरवठ्याची विशेष दुरुस्‍ती. एका ठिकाणी तात्‍पुरती पुरक योजना , पाच ठिकाणी विंधन विहीरी घेण्‍याचा  याचा समावेश आहे.
     टँकरने पाणी पुरवठा करणा-या गावामध्‍ये बोटोना या गावाचा समावेश आहे. बोटोना हे गाव कारंजा ते आष्‍टी या रस्‍त्‍यावर आहे. या गावातील ग्रामसेवक एम.जे.तिवारी यांनी गावातील भौगोलीक परिस्थितीची माहिती देताना सांगितले की या गावामध्‍ये पावसाच्‍या पाण्‍यावर  विहरी भरल्‍या जातात. त्‍या विहीरीवर  ग्रामपंचायतीची स्‍वतंत्र पाणी पुरवठा योजना आहे. परंतू विहीरीतील पाणी आगस्‍ट ते डिसेंबर महिन्‍यापर्यंत लोकांना नळाव्‍दारे  पाणीपुरवठा करण्‍यात येत असतो. पाण्‍याचे इतरत्र स्‍त्रोत  नसल्‍यामुळे बोटोना हे गाव कायमस्‍वरुपी पाणी टंचाईग्रस्‍त गांव  समजण्‍यात येते.
     शासनाच्‍या नारा 22 या योजनेमध्‍ये या गावाचा समावेश आहे. जोपर्यंत नारा 22 ही योजना पूर्णपणे कार्यान्वित होणार नाही तो पर्यंत येथील ग्रामस्‍थांचा पाण्‍याचा प्रश्‍न सुटणार नाही. नारा 22 योजने अंतर्गत दहा गावाची शिखर परिषद नुकतीच स्‍थापन करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे पाणीटंचाई निवारणासाठी त्‍या शिखर परिषदेची मदत होईल.
     सद्या बोटाना वासियासाठी पंचायत समितीचा एक पाणीपुरवठ्याचा टँकर दिवसभरामध्‍ये चार वेळा पाणी भरुन विहिरीमध्‍ये खाली करतो. या विहीरतून ग्रामस्‍थ पाण्‍याची गरज भागवितात.  ही प्रक्रीया जानेवारी पासून सुरु होऊन जुलैच्‍या शेवट पर्यंत अखंडपणे सुरु राहते. हा काळ पाण्‍याची पातळी खोलवर जाणारा असतो.अनेक ग्रामस्‍थ पाणी टंचाईवर मात करण्‍यासाठी खाजगी विहरीवरुन बैलबंडीव्‍दारे ड्रम भरुन आणून पाण्‍याची गरज भागवित असतात.
     पाणी हे जीवन आहे या युक्‍तीनुसार शासन या गावाच्‍या पाणी पुरवठ्यासाठी विविध उपाय योजना करुन गावक-यांना पाण्‍याचा पुरवठा करुन दिलासा देण्‍याचे कार्य करीत आहे. भविष्‍यात मात्र नारा-22 योजना कायमस्‍वरुपी येाजना कार्यान्वित झाल्‍यास बोटोना येथील  पाण्‍याची समस्‍या नेहमीसाठी  सुटून ग्रामस्‍थामध्‍ये  आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकेल.
                            00000

Thursday 17 May 2012

पाणी टंचाई निवारणार्थ अतिरीक्‍त पुरक कृती आराखडा 2 कोटी 41 लक्ष रुपयाचा


    वर्धा,दि.17- पाणी टंचाई निवारणार्थ यावर्षी उन्‍हाळ्यात करावयाच्‍या उपाय योजनांचा अतिरीक्‍त पुरक कृती आराखडा तयार करण्‍यात आला असून, पाणी टंचाईचे 159 गावातील 203 उपाय योजनेसाठी 2 कोटी 41 लक्ष 98 हजार रुपयाचा खर्च अपेक्षित असल्‍याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डि.एस.बोरकर यांनी दिली.
     पाणी टंचाई निवारणार्थ यापूर्वी माहे जानेवारी ते जून 2012 या कालावधीत 85 टंचाईग्रस्‍त गावांमध्‍ये शंभर उपाययोजनेवर 71 लक्ष 46 हजार रुपयाचा कृती आराखडा तयार करण्‍यात आला होता. आता पाणी टंचाई निवारणामध्‍ये अतिरीक्‍त पुरक कृती आराखडा तयार करण्‍यात आला असून, आता दोन्‍ही  मिळून एकत्रीतरित्‍या 244 टंचाईग्रस्‍त गावात एकूण 303 उपाय योजना राबविण्‍यात आल्‍यास  त्‍यासाठी 3 कोटी 13 लक्ष 44 हजार रुपये खर्च अपेक्षित असून, अतिरीक्‍त पूरक  कृती आराखडा प्रशासनाला सादर करण्‍यात आला आहे.         
जानेवारी ते जून 2012 सार्वजनिक विहीरीची संख्‍या  3 होती. आता अतीरिकत कृती आराखड्यामध्‍ये 8 वि‍हीरीची वाढ होऊन 11 झाली आहे. खाजगी विहीर अधिग्रहणाची संख्‍या पूर्वी 56 होती अतिरीक्‍त कृती आराखड्यामध्‍ये 39 ची वाढ होऊन एकूण 95 झालेली आहे. ट्रॅक्‍टर किंवा बैलगाडी व्‍दारे पाणी पुरवठा करणा-यांची संख्‍या यापूर्वी 10 होती. नवीन कृती आराखड्यामधे 8 ने वाढ होऊन 18 झाली आहे. नगरपालीका पाणी पुरवठा विशेष दुरुस्‍तीची कामे यापूर्वी 22 होती ती आता नवीन कृती आराखड्यानुसार 85 नी वाढ झाली असून 107 झाली आहे. तात्‍पुरत्‍या पुरक योजनेत नवीन कृती आराखड्यानुसार 3 कामाची वाढ झाली आहे. प्रगतीपथावरील एक नळ पाणी पुरवठा योजना तसेच यापूर्वी प्रस्‍तावित केलेल्‍या 7 विंधन विहीर व आता नव्‍याने कृती आराखड्यातील 57 एकत्रीत केल्‍यास 64 विंधन विहीरी घेण्‍यात येतील. विशेष विंधन विहीरीचे यापूर्वी दोन व आता कृषी आराखड्यामध्‍ये दोन विंधन विहीरीची एकत्रीत संख्‍या चार झाली आहे. पाणी टंचाईवर मात करण्‍यासाठी प्रशासन सज्‍ज झाले असूऩ ग्रामीण भागात तातडीने पाणी पुरवठ्यासाठी योग्‍य ती उपाययोजना करीत असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.
                              00000

मालमत्‍तावर हक्‍क सांगण्‍याची अधिसुचना जारी


  वर्धा,दि.17- पोलीस अधिक्षक, वर्धा यांचेमार्फत ठाणेदार, पोलीस स्‍टेशन,खरांगणा(मोरांगणा) यांनी दिलेल्‍या माहितीनुसार तथा मौजा खैरवाडा, ता.कारंजा, जि.वर्धा येथे सुरेश रामगीर गिरी, वय 55 वर्षे यांचे घराजवळ दिनांक 4 एप्रिल 2012 रोजी दुपारी 3 वाजताचे दरम्‍यान अभिलाश तुकारामजी सलामे  व इतर 4 मजूर, सर्व रा. खैरवाडा हे उकींडा किंवा उकीरडा मोठा व खोल करण्‍याकरीता खड्डयाचे खोदकाम करीत असताना जमीनीत एक मडके टिकासीला लागून फुटल्‍याचे व त्‍यामधून एकूण 375 पांढ-या धातुचे पुरातन नाणी निघाल्‍याचे व ती नाणी सदर मजूरांनी आपले घरी नेल्‍याबाबतची माहिती गिरी यांचेकडून पोलीस स्‍टेशन, खरांगणा(मो.) ला मिळाली होती.
पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्‍थळी जावून नितेश मंगलराव परतेकी रा.खैरवाडा या ईसमांकडून 375 पांढ-या धातुचे पुरातन नाणी जप्‍त करुन सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने पोलीस स्‍टेंशनला आणून जमा केल्‍याचे व सदर मालमत्‍तेची विल्‍हेवाट लावण्‍याबाबत आदेश देण्‍याचे जिल्‍हाधिकारी  कार्यालयास कळविले आहे.
    त्‍याअनुषंगाने सदर अधिसूचना जारी करण्‍यात येत असून, ज्‍या कोणास सदर मालमत्‍तेबाबत हक्‍क सांगावयाचा असेल किंवा आपले म्‍हणणे मांडावयाचे असेल त्‍यांनी कार्यालयीन दिवशी आपले मत लिखीत स्‍वरुपात दिनांक 7 सप्‍टेंबर 2012 चे दुपारी 5 वाजेपावेतो स्‍वतः किंवा आपले प्रतिनिधी मार्फत जिल्‍हाधिकारी, वर्धा यांचेकडे सादर करावे. असे जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी जयश्री भोज यांनी कळविले आहे.
                        00000

Wednesday 16 May 2012

डी.टी.एड. प्रवेशासाठी 17 मे 2012 पासून अर्ज विक्री व अर्ज स्विकृती


वर्धा,दि.16- सन 2012-13 या वर्षासाठी अध्‍यापक शिक्षण पदविका प्रथम वर्षाच्‍या  शासकीय कोट्यातील आवेदन पत्राची विक्री दि. 17 मे ते 30 मे 2012 या कालावधीत होणार आहे. तर दि. 17 मे ते 31 मे 2012 या कालावधीत आवेदनपत्राची स्विकृती होणार आहे. आवेदनपत्राची विक्री व स्विकृती जिल्‍हा शिक्षण व प्रशिक्षण संस्‍था, जिल्‍हा  सामान्‍य रुग्‍णालयामगे, वर्धा येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरु राहील. आवेदनपत्राची विक्री व स्विकृती सुटीच्‍या दिवशी सुध्‍दा सुरु राहील.
     इयत्‍ता 12 वी मध्‍ये किमान 50 टक्‍के गुणांसह उत्‍तीर्ण असलेले खुल्‍या प्रवर्गातील उमेदवार तसेच किमान 45 टक्‍के गुणांसह उत्‍तीर्ण असलेला मागासवर्गीय उमेदवार प्रवेशासाठी पात्र असतील. किमान कौशल्‍यावर आधारीत अभ्‍यासक्रम (एम.सी.व्‍ही.सी.) तील कृषी गटातील हार्टीकल्‍चर व क्रॉप सायन्‍स तसेच आरोगय व वैद्यकीय सेवा गटातील क्रेंच अॅन्‍ड प्रिस्‍कुल हे विषय घेऊन 12 वी उत्‍तीर्ण विद्यार्थी प्रवेशास पात्र असणार आहे. तसेच महाराष्‍ट्राचा अधिवासी असलेला सी.बी.एस.सी. किंवा अय.सी.एस.ई. किंवा नूशलन ओपन स्‍कुल बोर्डची परीक्षा उततीर्ण विद्यार्थी महाराष्‍ट्र राज्‍याचा अधिवासी असल्‍याचे त्‍या जिल्‍ह्याच्‍या जिल्‍हाधिकारी यांचे प्रमाणपत्र असणे आवश्‍यक असेल. आवेदनपत्राची माहिती पुस्तिकेसह किंमत खुल्‍या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. 200 असून, मागासवर्गीय उमेदवारांसाठी रु. 100 आहे. मागासवर्गीय उमेदवारांनी आवेदन पत्र विकत घेतांना जात प्रमाणपत्राची प्रत आवश्‍यक राहील. असे प्राचार्य, जिल्‍हा शिक्षण व प्रशिक्षण संस्‍था, वर्धा कळवितात.
                     00000

जिल्ह्यात केरोसीनचे वितरण


        
                                                 वर्धा दि.16 - जिवनावश्यक घटकात मोडत असलेल्या केरोसिचे वितरण जिल्हाधिकारी, वर्धा यांनी एका पत्रानुसार जाहीर केले आहे.
माहे मे  2012 करीता  तालुकानिहाय परवाना धारकांना केरोसिचे आवंट पुढील प्रमाणे आहे.
जी.एम.राठी वर्धा यांना 96 किलो लिटर. आर्वीचे इब्राहीमखाँ नवरखॉन यांना 84 किलो लिटर,  पुलगाव येथील मे. प्रद्युम्‍नकुमार अॅन्‍ड ब्रदर्स यांना 24 किलोलिटर ,वर्धा येथील रतलाल केला  72 किलो लिटर, देवळी येथील वंदना सुनिल गावंडे यांना 36 किलो लिटर, समुद्रपूर येथील एस.आर.शेंडे यांना 60 किलो लिटर, वर्धा येथील इब्राहीमजी आदमजी यांना 168 किलो लिटर, आर्वी येथील बी.ए.लाठीवाला यांना 72 किलो लिटर, हिंगणघाट येथील एफ.ए.रहेमतुल्ला यांना 72  किलो लिटर, पुलगाव येथील टि.के.ऍ़ड न्स यांना 60 किलो लिटर केरोसिचे वितरण केल्याचे पत्रकात मुद आहे.
                                   000000

स्थानिक प्राधिकार मतदार संघाच्या विधानसभेची निवडणूक 25 मे रोजी


वर्धा,दि 14 : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या विधानपरिषदेची निवडणूक दिनांक 25 मे 2012 रोजी होणार आहे. यासाठी मतदानाची वेळ सकाळी 8.00 ते सायंकाळी 4.00 पर्यंत राहणार आहे.
मतदानाचे वेळी मतदारानी निवडणूक आयोगाने दिलेले छायाचित्र मतदार ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. छायाचित्र मतदार ओळखपत्र उपलब्ध नसल्यास संबंधीत प्राधिकारी संस्थेच्या प्रमुखाने दिलेले छायाचित्र मतदार ओळखपत्र   ( Identy Card ) सोबत आणणे आवश्यक आहे. उपरोक्त दोन पैकी एकही पुरावा सोबत न आणल्यास संबंधीत मतदाराला मतदान करता येणार नाही याची मतदारांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी, वर्धा कळवितात
00000

कृषि केंद्रांच्या तपासणी करीता नऊ भरारी पथके शेतक-यांनी टोल फ्री क्रमांकाचा लाभ द्या - जिल्हाधिकारी


      वर्धा,दि 1४ : खरीप हंगाम 2012 करीता जिल्ह्यातील शेतक-यांना नियोजनाप्रमाणे लागणा-या बियाणे व खते संपूर्ण जिलह्यात परवानाधारक कृषि केंद्रामार्फत व नोडल एजन्सी मार्फत कृषि विभाग उपलब्ध करुन देत आहे. शेतक-यांचीअडवणूक व फसवणूक होऊ नये तसेच त्यांना दिलासा देण्यासाठी कृषि विभागात जिल्‍ह्यात कृषि केंद्राच्या तपासणीसाठी 9 भरारी पथके तयार करण्यांत आली असून शेतक-यांसाठी तक्रार निवारण केंद्राची स्थापना केली असल्याची माहिती जिलधिकारी जयश्री भोज यांनी दिली.
खरीप हंगामाकरीता 4 लक्ष 10 हजार हेक्टर पेरणी क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून त्यामध्ये कापूस 163000 हे, सोयाबिन 165000 हे, ज्वारी 5000 हे व इतर पिकांचा समावेश आहे. त्याकरिता कृषि खात्याकडे बी टी कापूस 7 लाख पॉकिटे, सोयाबिन 1.13 लाख क्विंटल व तूर 4.5 हजार क्विंटल व इतर पिकांच्या बियाण्याची मागणी नोंदविण्यात आलेली आहे.
खरीप हंगामाकरीता पेरणी नियोजनानुसार कृषी खात्याकडून 94300 मे टन रासायनिक खताचे मंजुर आवंटन प्राप्त झालेले आहे. त्यामध्ये डीएपी 29900 मे टन, संयुक्त खत 18840 मे टन, युरीया 26810 मे टन, एम ओ पी 8370 मे टन खताचा समावेश आहे. मंजुर झालेल्या आवंटनानुसार खात्याकडून महिना निहाय पुरवठा होणार आहे. सदर पुरवठा हा तालुका निहाय वितरीत करण्यात येईल. सध्या स्थितीत रब्बी हंगामाचा शिल्लक धरुन 40000 मे टन खत जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे. तसेच शेतक-यांना वेळेवर खत उपलब्ध होण्याकरीता 18000 मे टन रासायनिक खताचा साठा संरक्षित करण्यात येणार आहे. त्यापैकी सध्या 10215 मे टन साठा संरक्षित आहे.
जिल्ह्यात कृषि निविष्ठा गुणनियंत्रणाकरीता व कृषि केंद्र तपासणी करण्याकरीता एकूण 9 भरारी पथक स्थापन करण्यात आलेले आहे. जिल्हास्तरावरील कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद वर्धा व तालुका स्तरावर तालुका कृषि अधिकारी यांचे अध्यक्षतेखालील भरारी पथक स्थापन करण्यात आलेले आहे.
चालू हंगामामध्ये जिल्हा व तालुका स्तरावर कृषि निविष्ठा उपलब्धता व निविष्ठाच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेले  आहे. त्यामध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय दुरध्वनी क्रमांक 07152-232449, कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद 07152-242789 व पंचायत समिती वर्धा 07152-243232, देवळी 07158-254122, सेलू 07155-221240, आर्वी 07157-222048 आष्टी 07156-225657 कारंजा 07156-245831 हिंगणघाट 07153-244050 समुद्रपूर 07151-225434 तसेच शेतकरी बांधवाच्या अडीअडचणीची तात्काळ दखल घेण्याकरीता व त्याचे निराकरण होण्याकरीता टोल फ्री दुरध्वनी सुरु करण्यात आलेली आहे. त्याचा टोल फ्री 18002334000 व 07152-250099 क्रमांकावर शेतक-यांनी संपर्क करावा. या करीता कोणतेही शुल्क लागणार नाही.
सर्व कृषि केंद्रावर टोल फ्री क्रमांक लावण्यात येणार आहे. याची शेतक-यांनी नोंद घ्यावी. शेतक-यांना कृषि निविष्ठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत असल्याने कोणत्याही कृषि केंद्रातून जास्त दराने बियाणे अथवा रासायनिक खताची खरेदी करु नये. जास्त दराने विक्री करणा-या विक्रेत्यांची तक्रार वरील दिलेल्या कार्यालयामध्ये लेखी स्वरुपात नोंदवावी.
तसेच शेतक-यांना कोणत्याही प्रकारचे बि टी कापूस वाणामध्ये कोणताही फरक नसल्याने शेतक-यांनी विनाकारण अपप्रचाराला बळी पडून एखाद्या विशिष्ठ वाणाचे बियाणे खरेदी करु नये. असे आवाहन जि.प.कृषि विकास अधिकारी, आर.के. गायकवाड यांनी केले आहे.
00000