Thursday 11 February 2016

नझूलच्या जमिनीचे भूईभाडे दर आता केवळ 0.04 टक्के 
- आशुतोष सलिल
Ø  नझूल जमीन सुधारीत धोरणाचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन    
             वर्धा, दि. 11  –      भाडेपट्ट्याने दिलेल्या नझूल जमिनीबाबत शासनाने नुकतेच सुधारीत धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार निवासी वापरासाठी असलेल्या नझूल जमिनीच्या भाडेपट्ट्यांच्या नुतनीकरणासाठी पाच वर्षाकरीता केवळ 0.04 टक्के भूईभाड्याचे दर तर  वाणिजिय्क प्रयोजनाकरीता 0.05 ते 0.10 टक्क्यांपर्यंत भूईभाडे दर, धर्मादाय, सार्वजनिक प्रयोजनासाठीच्या जमिनीकरीता 0.04 टक्के दर आकारण्यात येणार आहेत.   हे दर पूर्वीच्या दरापेक्षा कमी असल्यामुळे  ज्यांनी अद्याप भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण केलेले नाही; त्यांनी मालमत्तापत्रासह उपविभागीय अधिकारी कार्यालयात नूतनीकरणासाठी अर्ज करून या सुधारीत धोरणाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
            जिल्ह्यात एकूण 5 हजार 500 नझूल जमिनीचे भाडेपट्टी मालमत्तापत्र धारक आहेत. त्यांच्यासाठी सुधारीत धोरणानुसार पाच वर्षाकरीता 0.04 टक्के या अत्य अल्प दरानुसार भाडेपट्ट्याची आकारणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच्या पाच वर्षांकरीता नझूल अधिकारी, उपविभागीय अधिकारी  यांचेमार्फत कळविण्यात येईल. भविष्यामध्ये या जमिनी फ्री होल्ड देण्याचा शासनाचा विचार आहे. नझूल जमिनीच्या भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण केल्यास फ्री होल्डसाठी प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांनी अद्यापपर्यंत नझूल जमिनीच्या भाडेपट्टयांचे नूतनीकरण केलेले नाही. अशा नझूल जमीन भाडेपट्टेधारकांनी लवकरात लवकर त्यांचे  मालमत्ता पत्रकासह (प्रॉपर्टी कार्ड) संबंधित उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात अर्ज सादर करून नझूल जमिनीबाबतच्या सुधारीत धोरणाचा लाभ घ्यावा, असेही जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी सांगितले आहे.
0000


Wednesday 10 February 2016

रक्‍तक्षय रोखण्‍यासाठी जंतनाशक मोहीम बहुउपयोगी
-         डॉ. दुर्योधन चव्‍हाण
Ø  राष्‍ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचा आज शुभारंभ
     वर्धा,दि.10 –        राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेंतर्गत अॅल्‍बेंडाझोलच्या गोळयांसाठी  शासनाने 20 लक्ष रुपये खर्च केले आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण अशा या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी होऊन रक्तक्षय रोखण्यासाठी जंतनाशक मोहीम बहुउपयोगी असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी सांगितले.
        जगात 28 टक्‍के बालकांना कृमीदोष होण्‍याची शक्‍यता असते. बालकांमधे आढळणारा कृमी दोष हा मातीतून प्रसारित होणा-या जंतामुळे होतो. याचे प्रमुख कारण वैयक्तिक व परिसर स्‍वच्‍छतेचा अभाव कृमीदोषाचा संसर्ग दूषित मातीच्‍या संपर्कात आल्‍यामुळे सहजतेने होतो. दीर्घकालीन कृमीदोषामुळे रक्‍तक्षय,  कुपोषण याचा परिणाम बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटण्‍याकडे होतो.  हे टाळण्‍यासाठी अॅलबेंडाझोलची  एक गोळी पुरेशी आहे, असेही जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. चव्‍हाण यांनी सांगितले.
      जिल्‍ह्यात राष्‍ट्रीय जंतनाशाक दिन मोहिमेचा शुभारंभ वर्धा शहरातील न्‍यू इंग्लिश स्‍कूल येथे जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. पुरुषोत्तम मडावी  यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्‍हाण, अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. अजय डवले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन निमोदिया, प्राचार्य विजय व्‍यास, उपप्राचार्य प्रकाश नगराळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास आकरे, जिल्‍हा माध्‍यम अधिकारी दिलीप रहाटे, श्रीमती गुडजेवार यांच्‍या उपस्थितीत झाला. यावेळी डॉ. चव्हाण बोलत होते.
        राष्‍ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत वय 6 ते 19 वयोगटातील सर्व शासकीय, निमशासकीय  अनुदानित आश्रमशाळेतील शालेय विद्यार्थी तसेच शाळा बाह्य मुलांना शाळेतील नोडल शिक्षकांमार्फत शाळेत तसेच आशा स्वयंसेवक आरोग्‍य कर्मचा-यांमार्फत शाळा, शाळाबाह्य मुलांना अॅलबेंडाझोल गोळ्यांचा डोज आज देण्‍यात आला. नोव्‍हेंबरमध्ये ज्या अंगणवाडीतील मुलांना जीवनसत्‍त्‍व अ व जंतनाशक औषधीचा डोज देण्यात आलेला नाही अशा अंगणवाडीतील मुलांना अंगणवाडी सेविकांमार्फत जंतनाशक गोळ्यांची मात्रा देण्‍यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी.डी. मडावी यांनी केले. यावेळी न्‍यू इंग्लिश शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच कर्मचारी यांची उपस्थिती होती.
                                                                000000
     




Tuesday 9 February 2016

आरोग्‍य सेवा हीच खरी देशसेवा
-         अंकित गोयल
Ø  रक्‍तदान,अपंग तपासणी,आयुष निदान व उपचार, आरोग्‍य शिबिराचे उद्घाटन  
       वर्धा,दि.9-आरोग्‍य सेवा हीच खरी देशसेवा,समाजसेवा आहे. या सेवेच्‍या माध्‍यमातून समाजाचे कल्‍याण होते.समाजाच्‍या कल्‍याणासाठी प्रत्‍येकाने निःस्‍वार्थ भावनेने शेवटच्‍या घटकापर्यंत आरोग्‍य सेवा पोहचेल याबाबत पुढाकार घ्‍यावा,असे आवाहन जिल्‍हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले.
             जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयामध्‍ये महाआरोग्‍य अभियानांतर्गत आयोजित आयुष निदान व उपचार, राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत आरोग्‍य शिबिर, रक्‍तदान शिबिर आणि अपंग तपासणी शिबिराच्‍या उद्घाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयाचे जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. पुरुषोत्‍तम मडावी,अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. निवृत्‍ती राठोड, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.   दुर्योधन चव्‍हाण, अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. अजय डवले, अस्‍थीरोग तज्ञ डॉ. अनूपम हिवलेकर,आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्‍णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. घेवडे यांची उपस्थिती होती.
             जिल्‍हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल म्‍हणाले, आरोग्‍य सेवा आणि पोलिस सेवा एकमेकांना पूरक असे कार्य करत असतात. या सेवेच्‍या माध्‍यमातून समाजाचे कल्‍याण होते. आरोग्‍य सेवा ही देशसेवा आहे. या सेवेचे व्रत  ज्‍यांनी अंगीकारले आहे त्‍यांचे नेहमीच कौतूक वाटते.तसेच ते कौतुकास पात्रही असतात, आहेत. त्‍यांच्‍या या व्रतामुळे अनेक तळागाळातील व्‍यक्‍तींपासून सर्वांचेच कल्‍याण होते, आयुष्‍य वाचते. प्रत्‍येकाला जीवनदान देण्‍याचे कार्य आरोग्‍य सेवेच्‍या माध्‍यमातून होत असते,असेही ते म्‍हणाले.
           जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. पुरुषोत्‍तम मडावी यांनी 1 फेब्रुवारीपासून महाआरोग्‍य अभियान जिल्‍हाभरात राबविण्‍यात येत आहे. या अभियानाचाच एक भाग म्‍हणून आज रक्‍तदान तपासणी, अपंग तपासणी ,आयुष निदान व उपचार आणि राजीव गांधी योजनेंतर्गत आरोग्‍य शिबिराचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. महा आरोग्‍य शिबिराच्‍या माध्‍यमातून गावापासून शहरातील विविध आरोग्‍य केंद्र, रुग्‍णालयात विविध आरोग्‍य सेवांचा लाभ जनतेला देण्‍यात येत आहे. या शिबिरांचा प्रत्‍येक गरजू, लाभार्थी व्‍यक्‍तींनी लाभ घ्‍यावा,असे  आवाहनही त्‍यांनी  केले.
        जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्‍हाण यांनीही 13  मार्चपर्यंत चालणा-या महा आरोग्‍य अभियान शिबिराचा जनतेनी लाभ घेण्‍याचे आवाहन केले. तसेच पोलिस आणि आरोग्‍य विभाग परस्‍परांना पूरक कार्य करणारे   असे विभाग असून देशाच्‍या सेवेत ते मोलाची भूमिका पार पाडत असतात,असे सांगितले.
          आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्‍णालयाचे डॉ. घेवडे यांनीही जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयांतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ जनतेला देण्‍यात येतो. जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय सातत्‍याने रुग्‍णांच्‍या सेवेत उपलब्‍ध असून येथे कार्यरत सर्व वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांच्‍या कार्याचे कौतूक केले.
               आयुष विभागाच्‍या  डॉ. अश्विनी डोने यांनी राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियानांतर्गत आयुष विभागात पारंपरिक चिकित्‍सा पद्धतीबाबत माहिती दिली. यामध्‍ये  आयुर्वेद, होमिओपॅथी ,युनानी, योग व निसर्गोपचार पंचकर्म व बिलतदबीर या अंतर्गत रोगनिदान व  उपचार याबाबतीत  माहिती देऊन जनतेने  या चिकित्‍सक पद्धतीचा उपयोग रुग्‍णांनी करावा, असे सांगितले.
         राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत विविध रुग्‍णांना या योजनेचा लाभ देण्‍यात येतो. जिल्‍ह्यातील 4 रुग्‍णालयामध्‍ये या योजनाचा लाभ देण्‍यात येत असून ही योजना पेपरलेस व कॅशलेस असल्‍याने शेतकरीवर्गासह सामान्‍य जनतेसाठी अत्‍यंत  उपयोगी असून 971 आजारांवर या योजनेंतर्गत उपचार करुन रोगाचे निदान निःशुल्‍क करण्‍यात येत असल्‍याचे योजनेचे जिल्‍हा समन्‍वयक डॉ. मेश्राम यांनी सांगितले.
        प्रारंभी दीप प्रज्‍वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन श्रीमती मॅसन यांनी केले. आभार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन निमोदिया यांनी मानले. शिबिर उद्घाटनानंतर मान्‍यवरांनी आयुष निदान व उपचार  विभागाला भेट देऊन रुग्‍णांशी संवाद साधला. या कार्यक्रमास जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयाच्‍या पारिचारिका, वैद्यकीय अधिकारी, मेट्रन  श्रीमती पुनसे, डॉ. आकरे,  डॉ. रहाटे, जिल्‍हा परिषदेच्‍या आरोग्‍य विभागाचे सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
                                                        000000             
              
                  

                

Monday 8 February 2016

सार्वजनिक ग्रंथालयाच्या अर्थ साहाय्य
 योजनांसाठी संकेतस्थळावर माहिती उपलब्ध
Ø   प्रस्ताव 25 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन
वर्धा, दि.08– भारत सरकारच्या सांस्‍कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्‍ठान, कोलकाता अंतर्गत शासनमान्‍य सार्वजनिक ग्रंथालयांसाठी कार्यान्वित असलेल्‍या अर्थसाहाय्याच्‍या समान निधी व असमान निधी योजनांमधून ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्‍यामार्फत दरवर्षी अर्थसाहाय्य देण्‍यात येते.  या योजनांसाठीचे नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.gov.in या प्रतिष्‍ठानच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी समाननिधी, असमाननिधी  योजनेसाठी विहित पद्धतीत आवश्‍यक कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेमधील प्रस्‍ताव तीन प्रतीत जिल्‍हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दिनांक 25 फेब्रुवारीपर्यंत पोहचतील, अशा बेताने पाठवावेत,  असे आवाहन, ग्रंथालय संचालक किरण गं. धांडोरे  यांनी केले आहे.
   राज्‍य शासनाच्‍या 50 टक्‍के व प्रतिष्‍ठानच्‍या 50 टक्‍के अर्थसहाय्यामधून असणा-या समान निधी योजनेंतर्गत परिसंवाद, चर्चासत्रे व कार्यशाळा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन व ग्रंथप्रदर्शने व वाचनसंस्‍कृती रुजविण्‍यासाठीचे उपक्रमासाठी,  सार्वजनिक ग्रंथालयांना इमारत विस्‍तार, बांधणीसाठी, फिरते ग्रंथालयांसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. तर असमान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय सेवा देणा-या स्‍वयंसेवी संस्‍थांना ग्रंथ, साधन साम्रगी, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्‍तार यासाठी अर्थ साहाय्य , सार्वजनिक ग्रंथालयातील बाल, महिला, जेष्‍ठ नागरिक, नव साक्षर, स्‍वतंत्र स्‍पर्धा परीक्षा विभाग आदी साठी अर्थसहाय्य , प्रतिष्‍ठानच्‍या साहाय्याने बाल विभाग स्‍थापन करण्‍यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांना अर्थसाहाय्य,  महोत्‍सवी वर्ष जसे 50, 60, 75, 100, 125 आणि 150 वे वर्ष साजरे करण्‍यासाठी अर्थसाहाय्य, शारीरिकदृष्ट्या विकलांग व्‍यक्‍तीसाठी विभाग स्‍थापन करण्‍यासाठी ग्रंथालयांना अर्थसाहाय्य देण्यात येते.
याबाबत अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी कळविले आहे.
                                                         000000


रक्षा पेंशन अदालतीसाठीचा नमुना अर्ज
जिल्हा सैनिक कार्यालयात उपलब्ध
वर्धा,दि.06– सातारा येथे पीसीडीए (पेंशन) इलाहाबाद यांच्यामार्फत रक्षा पेंशन अदालत एप्रिल 2016 मध्ये आयोजित करण्‍यात आली आहे. त्याकरीता आवश्यक असलेला विहिती नमुन्यातील अर्ज जिल्‍हा सैनिक कल्याण कार्यालय, वर्धा येथे उपलब्‍ध आहे. तरी ज्‍यांना पेंशन संबंधित काही अडचणी असल्‍यास त्‍यांनी कार्यालयीन वेळेत जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी फ्ला.ले.धनंजय सदाफळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन माजी सैनिक, विधवा, अवलंबितांना करण्यात आले आहे.
माजी सैनिक, विधवा, अवलंबितांना निवृत्‍ती वेतनाबाबत काही समस्‍या असल्यास त्‍यांनी विहित नमुन्यातील अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रांसह आशिष सेन, पेंशन अदालत अधिकारी, कार्यालय रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (पेंशन) द्रौपदी घाट, इलाहाबाद यांचेकडे द्वी प्रतीत पाठविणे आवश्‍यक आहे, असेही कळविण्यात आले आहे.  
000000


ार्थ्‍यांना मौखिक आरोग्‍याचे महत्‍त्‍व व स्‍वच्‍छता याबाबत प्रात्‍याक्षिकाद्वारे माहिती दिली. विद्यार्थ्‍यांसोबत प्रश्‍न उत्‍तराचे सत्र घेऊन डॉ. संस्‍कृती एम्‍ब्‍डवार यांनी विद्यार्थ्‍यांच्‍या शंकाचे समाधान केले. या शिबिरात 36 विद्यार्थ्‍यांची दंततपासणी केली. गोंडमो‍हल्‍ला  येथील शिबिरात मोठ्या प्रमाणात महिला व मुलांनी सहभाग घेतला. त्‍यात 31 महिला व मुलांची तपासणी  करुन उपचार करण्‍यात आले. पाठपुराव्‍याची गरज असणा-या विद्यार्थी व महिला सामान्‍य रुग्‍णालयात मोफत उपचार देण्‍यात येतील, असेही शिबिरात सांगण्यात आले. योग्‍य आहार व वैयक्तिक स्‍वच्‍छतेबद्दल वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्रीमती भारती शहा यांनी  मार्गदर्शन केले.

        
                                                     00000                




प्रत्येकाने मौखिक आरोग्याची काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन
जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त जनजागरण शिबिर
        वर्धा, दि. 6 -     प्रत्येकाने मौखिक आरोग्याची काळजी घ्यावी. निरोगी शरिराचे प्रवेशद्वार मुख आहे. मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष न करता त्याची निगा राखण्यासाठी दिवसातून दोन वेळा ब्रश, उच्चप्रतीचे टुथपेस्ट वापरावेत. चॉकलेट, शर्करायुक्त बिस्कीटांमुळेही दात व हिरड्याचे रोग होण्याची शक्यता असते त्यामुळे मौखिक आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त करण्यात आले.
           जागतिक मौखिक आरोग्‍य दिनानिमित्‍त मौखिक आरोग्‍य जनजागरण शिबिर व तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. पुरुषोत्‍तम मडावी, अतिरिक्त  जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. निवृत्‍ती राठोड, दंत शल्‍य चिकित्‍सक डॉ. संस्‍कृती एम्‍ब्‍डवार, डॉ. निमिता बेलेकर व डॉ. कोडापे, दंत आरोग्‍यक अनिल तुपे, दंत तंत्रज्ज्ञ अभिषेक वानखडे, प्राचार्य आय.यू.खान, मुमताज खान यांची उपस्थिती होती.
           मौलाना आझाद हायस्‍कूल, ज्‍यूनिअर कॉलेज ऑफ सायन्‍स व भगवान बिरसा मुंडा समाज मंदिर, गोंड मोहल्‍ला येथे शिबिर आयोजित करण्‍यात आले होते. यावेळी दंत शल्‍यचिकित्‍सक डॉ. संस्‍कृती एम्‍बडवार यांनी किशोरवयीन  विद्यार्थ्‍यांना मौखिक आरोग्‍याचे महत्‍त्‍व व स्‍वच्‍छता याबाबत प्रात्‍याक्षिकाद्वारे माहिती दिली. विद्यार्थ्‍यांसोबत प्रश्‍न उत्‍तराचे सत्र घेऊन डॉ. संस्‍कृती एम्‍ब्‍डवार यांनी विद्यार्थ्‍यांच्‍या शंकाचे समाधान केले. या शिबिरात 36 विद्यार्थ्‍यांची दंततपासणी केली. गोंडमो‍हल्‍ला  येथील शिबिरात मोठ्या प्रमाणात महिला व मुलांनी सहभाग घेतला. त्‍यात 31 महिला व मुलांची तपासणी  करुन उपचार करण्‍यात आले. पाठपुराव्‍याची गरज असणा-या विद्यार्थी व महिला सामान्‍य रुग्‍णालयात मोफत उपचार देण्‍यात येतील, असेही शिबिरात सांगण्यात आले. योग्‍य आहार व वैयक्तिक स्‍वच्‍छतेबद्दल वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्रीमती भारती शहा यांनी  मार्गदर्शन केले.
        
                                                     00000                




‘पारदर्शक प्रशासनासाठी माहितीचा अधिकार महत्त्वाचा दुवा’
Ø ‘माहितीचा अधिकार’ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
          वर्धा, दि. 6 –  माहितीचा अधिकार हा पारदर्शक प्रशासनाचा अतिशय महत्त्वाचा दुवा असून या शस्त्राचा वापर सामाजिक परिवर्तन आणि समाजाच्या प्रगतीसाठी करण्यात यावे. उपेक्षित घटकांसाठी माहितीचा अधिकार शस्त्र असून उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी या शस्त्राचा वापर करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असा सूर माहिती अधिकार अधिनियम कार्यशाळेत निघाला.
               समाजिक न्‍याय व विशेष सहाय्यक विभागाची स्वायत्‍त संस्‍था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधक व प्रशिक्षण संस्‍था (बार्टी) पुणे यांच्‍या समतादूत पथदर्शी प्रकल्‍पाअंतर्गत वर्धा तालुक्यातील  समतादुतांनी सामाजिक न्याय भवनात समाजातील उपेक्षित घटकांकरिता माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्‍हणून  समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्‍त बाबासाहेब देशमुख होते.  कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून नीलेश गुल्‍हाने, पंकज वंजारे होते. यावेळी गटविकास अधिकारी यशंवत सपकाळे, विशेष अधिकारी दीपा हेरोळे, तालुका आरोग्य अधिकारी कल्पना सुनतकरी, नागपूर विभागाच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी डोंगरे, जिल्हा प्रकल्प अधिकारी  अनिता तेलंग यांची उपस्थिती होती.
            प्रमुख मार्गदर्शक निलेश गुल्‍हाणे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 याविषयी माहिती अधिकार, महत्त्व आणि समाजासाठी त्याचे महत्त्व यावर, तर पंकज वंजारे यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीसाठी सर्वांनी पुढे येऊन पारदर्शक प्रशासन निर्मितीसाठी माहिती अधिकाराचा वापर करण्याचे महत्त्व विषद केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्‍वलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया ठाकरे यांनी केले. अनिता तेलंग यांनी संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करून  उपस्थितांचे आभार मानले.           
               कार्यशाळा यशस्वीतेसाठी समतादूत अनिता दाढे , प्रिया ठाकरे, शितल मोरे, जरीन पठाण, स्‍वप्‍नील चवरे यांनी पुढाकार घेतला.
                                                            00000