Wednesday 9 August 2017

श्रमामुळे मिळालेली प्रतिष्ठा‍ कायमस्वरुपी टिकवून ठेवावी
-शैलेश नवाल
 काकडदरा वासियांचे जिल्हा‍धिका-यांकडून अभिनंदन
वर्धा दि 9 (जिमाका) काकडदरा गावाने श्रमाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. श्रमामुळे मिळालेली प्रतिष्ठा आणि यश असेच कायमस्वरुपी टिकवून ठेवण्यासाठी विवेकपूर्ण कृती, सातत्य आणि एकजुटीने काम केले तर गावात समृध्दी येईल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
पाणी फाऊंडेशन तर्फे आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत राज्यात प्रथम पा‍रितोषिक मिळालेल्या काकडदरा गावाला आज जिल्हा धिकारी यांनी भेट देऊन गावक-यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यां नी गावक-यांना गावातील प्रत्येक व्यक्ती च्या विकासासाठी नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन केले.
गावातील प्रत्येक व्यक्ती ही समृध्द झाली पाहिजे आणि गावातील प्रत्येक व्य्क्तीचे दरडोई उत्परन्न् वाढविण्या साठी शेती पूरक व्यावसाय करण्या्चे नियोजन करावे. यासाठी दुग्धा व्यवसाय, शेळी पालन , मत्य्ध्द व्य वसाय , कुकुटपालन यापैकी प्रत्ये.क कुंटूबाने कोणतातरी एक व्यवसाय करण्या‍विषयी त्यां नी सांगितले. मिळालेल्या पारितोषिकाच्या रकमेतून गावात रस्ते, नाल्याची कामे करण्यापेक्षा प्रत्येक व्याक्ती आर्थिक दृष्टगया सक्षम होण्या साठी या रकमेचा उपयोग करण्यात यावा. कमी खर्चात घर आणि घराचे भोवताल स्वरच्छ कसे करता येईल, याचे नियोजन करावे. गावाची समृध्दी ही संस्कारांनी ओळखली गेली पाहिजे. त्याेसाठी प्रत्येकाने आपले संस्का.र जपले पाहिजे, असेही ते म्हणाले
गावात ग्रामसभेच्या खात्यातच पारितोषिकाची रक्क्म जमा होईल. हा निधी फीरता निधी म्हणुन जल- जंगल- जमीन आणि उपजिविका यासाठी वापरायचा आहे. त्याामुळे गावात अवजार बँक, विहिरींसाठी सोलर पंप, विस शेतकरी एकत्र येऊन 100 एकर शेती सामुहिक पध्दरतीने करणार असतील तर त्यांंना शासनाच्याक सर्व योजनाचा लाभ देण्याआत येइल. असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. आदिवासी उपयोजनामधून या गावाला जास्तीदत जासत योजनांचा लाभ देण्याीसाठी प्रयत्नं करण्याात येईल. कोणतीही गेाष्ट मोफत घेण्याची सवय लावून घेऊ नका असाही सल्ला जिल्हांधिकारी यांनी गावक-यांना दिला.
जिल्हाधिकारी यांनी गावक-यांनी केलेल्या कामाची पाहणी करुन गावक-यांचे कौतुक केले. यावेळी त्यां चे सोबत उप वनसंरक्षक दिंगाबर पगार, उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, तहसिलदार विजय पवार, पाणी फांऊडेशनचे मंदार देशपांडे व गावकरी मोठया संख्येभने उपस्थित होते.


Sunday 6 August 2017



एक महिन्यात शेतक-यांना अन्न सुरक्षा
योजनेत समाविष्ट करून घ्यावे
                                                              - किशोर तिवारी


                  वर्धा दि 6( जिमाका) जिल्ह्यातील शिल्लक  दीड लाख शेतक-यांना अन्न सुरक्षा योजनेत  समाविष्ट करून घेण्यासाठी  तातडीने 1 महिन्यात शिबीर आयोजित करावे. तसेच  ग्रामीण भागातील  80 टक्के  नागरिकांना  अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून द्यावा.  शेतक-यांना अन्नसुरक्षा व आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यास आत्महत्या कमी होतील असे मत स्व वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केले.
              जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अप्पर जिल्हाधिकारी  संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी  मंगेश जोशी तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
   सध्या ग्रामीण भागातील 59 टक्के जनता तर शहरी भागातील 44 टक्के नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे. अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक मध्यम भूधारक अशा सर्वच शेतक-यांचा समावेश योजनेत करावा. तसेच विधवा, परित्यक्त्या, श्रावण बाळ, अंत्योदय योजनेतील लाभार्थींचा या योजनेत प्रामुख्याने समावेश करून ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजनेचा लाभ द्यावा आशा सूचना श्री तिवारी यांनी पुरवठा अधिकारी यांना केल्यात.
          जिल्हा सामान्य रुग्णालयाची सेवा चांगली असून सेवाग्राम आणि सावंगी येथील रुग्णालयांमुळे वर्धेतील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळत आहे. ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तातडीने रिक्त  डॉक्टरांची पदे  मुलाखती घेऊन भरावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
          बँकानी शेतक-यांना 10 हजार रुपयांचे अग्रीम तसेच छत्रपती शिवाजी महाराज  शेतकरी सन्मान योजनेची व्यवस्थित माहिती द्यावी. शेतक-यांना बँकेत फेऱ्या माराव्या लागू नयेत याची खबरदारी घ्यावी.  सध्या पावसाच्या खंड काळात ज्या शेतक-यांकडे विहीर आंबे आणि त्यांनी वीज पंपासाठी वीज जोडणीसाठी अर्ज केला असेल त्याला तातडीने वीज जोडणी देण्याची प्रक्रिया करावी. तसेच ग्रामीण भागात लाईनमन स्वतः काम न करता दुसऱ्या  मुलांना कामावर ठेवतात.असे लाईनमन  आठळून आल्यास थेट अधीक्षक अभियंता यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी वीज वितरण विभागाला दिला.
          यावेळी जिल्हाधिकारी  यांनी विविध नाविन्यपूर्ण प्रयोगांची माहिती दिली. यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच शेतकरी बचत गट, महिला बचत यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा समावेश होता.