Friday 16 March 2012

रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन आपल्‍या दारी

वर्धा,दि.16-नोकरीस इच्छुक उमेदवारांना रोजगार व स्‍वयंरोजगार विभागाच्‍या रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामध्‍ये नांव नोंदणी, नूतनीकरण, शैक्षणिक पात्रता वाढ, नोंदणीचे स्‍थलांतर व संपर्कात बदल या सर्व सेवा मोफत उपलब्‍ध आहेत. या सेवा राज्‍यातील विविध जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामधून दिल्‍या जातात. यासाठी उमेदवारांना केद्राच्‍या ठिकाणी जाऊन नोंदणी करणे अथवा फिरते पथकासमोर तालुक्‍याच्‍या ठिकाणी प्रत्‍यक्ष उपस्थित राहून सेवा घ्‍यावी लागते. यामध्‍ये उमेदवारांचा आर्थिक खर्च होऊन वेळ वाया होतो.
        ऊमेदवारांनी स्‍वतः वेबसाईटवरुन ऑनलाईन पध्‍दतीने नाव नोंदणी केल्‍यास तात्‍पुरता क्रमांक प्राप्‍त होणार आहे. कायमस्‍वरुपी नोंदणी पत्र क्ष-10 प्राप्‍त करण्‍यासाठी त्‍यास पुन्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे यावे लागत असल्‍याने आर्थिक भुर्दंड सोसोवा लागत असून वेळेचाही अपव्‍यय होतो.
         रोजगार सेवा कमी खर्चात, सहज व गांव-तालुका पातळीवर उपलब्‍ध होण्‍यासाठी आता रोजगार व स्‍वयंरोजगार विभागाच्‍या रेाजगार सेवांचे विकेंद्रीकरण करण्‍यात आले आहे. यापुढे उमेदवारांना नांव नोंदणी, नूतनीकरण, पात्रतावाढ व संपर्क बदल, नोंदणी कार्ड इत्‍यादी सेवांसाठी रोजगार (सेवायोजन) कार्यालयात जाण्‍याची आवश्‍यकता नाही. ह्या सर्व सेवा अधिकृत महा ई-सेवा केन्‍दे, शासकीय, आयटीआय, पॉलीटेक्निक, इंजिनियरींग कॉलेजेस इत्‍यादी मधून ऑनलाईन पध्‍दतीने सशुल्‍क उपलब्‍ध करण्‍यात आलेल्‍या आहेत. तसेच नियोक्‍ते किंवा उद्योजक यांची नोंदणी, तिमाही विवरणपत्रा ई आर-1 व व्‍दैवार्शिक वि‍वरणपत्र ईआर-2 ऑनलाईन पध्‍दतीने पाठवणी करण्‍याच्‍या सुविधा सशुल्‍क उपलब्‍ध करण्‍यात आलेल्‍या आहेत. तथापि, सर्व रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामधून या सेवा विनामूल्‍य उपलब्‍ध आहेत.
            या योजनेअंतर्गत रोजगार व स्‍वयंरोजगार विभागाच्‍या सेवांची गांव व तालुका पातळीवर उपलब्‍धता होणार आहे. सेवा घेण्‍यासाठी रोजगार कार्यालयामध्‍ये प्रत्‍यक्ष जाण्‍याची गरज नाही. वेळ, प्रवास व आर्थिक खर्चात बचत होणार आहे. फक्‍त मूळ कागदपत्रे पडताळून नोंदणी करता येईल. सत्‍यप्रत देण्‍याची आवश्‍यकता नाही. कोणत्‍याही सेवा सुविधा केंद्रातून रोजगारविषयक सेवा घेण्‍याची सोय आहे. सेवा सुविधा केंद्रातून नवीन नांव नोंदणीनंतर शासकीय कामकाजाच्‍या पाचव्‍या दिवशी नोंदणी कार्ड मिळण्‍याची सोय करण्‍यात आली आहे.
   सशुल्‍क सेवा सुविधांचे दर उमेदवारांसाठी नवीन नांव नोंदणीचे 20 रुपये, नोंदणी अद्यवतीकरणाचे 15 रुपये, नोंदणीचे नुतनीकरणाचे 10 रुपये आणि दुय्यम नोंदणी कार्ड देणे साठी 10 रुपये आहे. नियोक्‍ते किंवा उद्योजकांसाठी नवीन आस्‍थापना नोंदणी 20 रुपये, तिमाही विवरणपत्र इ.आर.1 सादर करणे 20 रुपये आणि व्दिवार्षिक विवरणपत्र इ.आर.2 सादर करणे 50 रुपये आहे.
         नवीन नांव नोंदणी करण्‍यासाठी आवश्‍यक कागदपत्रे यामध्‍ये शैक्षणिक पात्रतेसाठी पात्रतेची सर्व प्रमाणपत्रे, जन्‍म तारखेसाठी शाळा सोडल्‍याचा दाखला किंवा एस.एस.सी. बोर्ड प्रमाणत्र किंवा जन्‍म दाखला आणि अपंगत्वासाठी शल्‍य चिकित्‍सकाचे प्रमाणपत्र. मागासवर्गीय उमेदवारांसाठी जातीचा दाखला किंवा जात वैधता प्रमाणपत्र. अपंगांसाठी जिल्‍हा वैद्यकीय मंडळ किंवा वैद्यकीय महाविद्यालय मंडळाचे प्रमाणपत्र. माजी सैनिकांसाठी माजी सैनिक असल्‍याची कागदपत्रे. खेळाडूसाठी शासन मान्‍यता प्राप्‍त खेळांचे राज्‍य किंवा राष्‍ट्रीय किंवा आंतर राष्‍ट्रीय पातळीवर प्रथम किंवा व्दितीय किंवा तृतीय स्‍थान प्राप्‍त किंवा सुवर्ण किंवा रौप्‍य किंवा कास्‍य पदक प्राप्‍त प्रमाणपत्र. प्रकल्‍पग्रस्‍त किंवा भूकंपग्रसतासाठी सक्षम अधिका-याचे प्रमाणपत्र. स्‍वातंत्र्य सैनिकावर अवलंबित असल्‍याचे जिल्‍हाधिकारी यांचे प्रमाणपत्र. अंशकालीनसाठी तीन वर्षे अंशकालीन काम केल्‍याचे तहसिलदारांचे प्रमाणपत्र.
     उमेदवार व नियोक्‍ते किंवा उद्योजकांनी रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामार्फत देण्‍यात येणा-या रोजगार विषयक सेवांचे विकेंद्रीकरण करण्‍यात आलेले असून, ह्या सेवा सर्व महा-ई-सेवा केंद्रे, औद्योगीक प्रशिक्षण संस्‍था, तंत्रशिक्षण महाविद्यालय यांच्‍यामार्फत सशुल्‍क उपलब्‍ध आहेत.
            नोंदणीसाठी आवश्‍यक असलेली मूळ प्रमाणपत्रे पडताळणीसाठी दाखवावीत. परंतु कोणतेही मूळ प्रमाणपत्र अथवा छायांकित प्रती सेवा केंद्रात देऊ नयेत. ज्‍या उमेदवारांना नोंदणी कार्डाचे फक्‍त नुतनीकरण अथवा संपर्कात बदल करावयाचा असेल त्‍यांनी फक्‍त यापूर्वीचे नोंदणी कार्ड द्यावे किंवा नोंदणी क्रमांक, नांदणी दिनांक, जन्‍म दिनांक व नवीन पत्ता या बाबी नमूद करुन अर्ज सादर करावा.
            या अंतर्गत कोणत्‍याही सेवांसाठी दिलेल्‍या शुल्‍काची स्‍वाक्षरीत (अधिकृत) पावती घ्‍यावी. नांव नोंदणी नंतर पाचव्‍या दिवशी कायम नोंदणी कार्ड, नोंदणी केलेल्‍या केंद्रातून अधिकचे शुल्‍क न देता उपलब्‍ध होईल. तसेच कायम नोंदणी क्रमांक नोंदणी केलेल्‍या भ्रमणध्‍वनीवर एमएसएसव्‍दारे कळविण्‍यात येईल. सेवा विषयी काही तक्रार असल्‍यास संबंधित जिल्‍ह्याचे सहाय्यक संचालक, जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र यांच्‍याकडे संपूर्ण तपशीलासह लेखी करावी लागेल. रोजगार सेवा सर्व रोजगार व सवयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामधून तसेच http://ese.mah.nic.in या रोजगार वाहिनी वेबसाईटव्‍दारे विनामूल्‍य उपलब्‍ध आहेत.
    रोजगार विषयक सेवांचा विकेंद्रीकरणाची योजना कार्यान्वित झाली असल्‍यामुळे या योजनेचा लाभ उमेदवार आणि नियोक्‍ता किंवा उद्योजक यांनी घ्‍यावा,असे आवाहन सहाय्यक संचालक, जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, वर्धा यांनी केले आहे.                                                               

रविवारी शाळा शिष्यवृत्ती परीक्षा

वर्धा,दि.16 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत रविवार, दिनांक 18 मार्च रोजी पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे. पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा 172 व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा 129 केंद्रावर घेण्यात येत आहे.
    पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेकरीता 36 हजार 817 परीक्षार्थी बसले असून त्यात 15 हजार 397 मागास व 21 हजार 420 बिगर मागास परीक्षार्थी आहेत. तर माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेला 30 हजार 482 विद्यार्थी बसत असून त्यात 12 हजार 829 मागास परीक्षार्थी आहेत.
    या परीक्षेकरीता भाषा व इंग्रजीचा पेपर सकाळी 11 ते 12 पर्यंत असून 50 वस्तुनिष्ठ प्रश्नाकरीता 100 गुण निर्धारित करण्यात आले आहेत. दुपारी 1 ते 2 या वेळेत गणित व सामाजिक शास्त्र या विषयाचा पेपर असून 50 वस्तुनिष्ठ प्रश्नाकरीता 100 गुण निर्धारित आहेत. तसेच बुद्धिमत्ता चाचणी व सामान्य विज्ञान या विषयाकरीता 100 गुण निर्धारित असून यावर 50 वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाणार आहेत.
  ऑप्टीकल मार्क रिडर पद्धतीने पेपर तपासले जाणार असल्यामुळे प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका राहील. उत्तरपत्रिकांवर पर्यायासाठी वर्तुळे छापण्यात आली असून उत्तरे नोंदविण्यासाठी काळ्या किंवा निळ्या बॉलपेनानेच उत्तराचे वर्तुळ रंगवावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर एक तास अगोदर उपस्थित राहावे, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, नागपूर यांनी कळविले आहे.
                                                

Thursday 15 March 2012

1 एप्रिल पासून फिरते नोंदणी पथक बंद

वर्धा, दि. 15- रोजगार व स्‍वयंरोजगार विभागाच्‍या रोजगार विषयक सेवांचे विकेंद्रीकरण या योजने अंतर्गत रोजगार वाहिनी वेब पोर्टलव्‍दारे उमेदवार व उद्योजक यांना दिल्‍या जाणा-या सेवा अधिक तत्‍पर, पारदर्शक व एकात्मिक संगणकीय पध्‍दतीने व अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून सहजतेने मोठ्या प्रमाणावर शहरी, ग्रामीण स्‍तरापर्यंत पोहोचवून पात्र कौशल्‍यधारक व गरजू उमेदवारांचा डाटाबेस तयार करुन उद्योजकांना मागणीप्रमाणे चांगले मनुष्‍यबळ उपलब्‍ध करणे, आणि नोंदणी पदावरील उमेदवारांना रोजगाराच्‍या संधी उपलबध करुन देण्‍याच्‍या अनुषंगाने रोजगार व स्‍वयंरोजगार विभागाच्‍या रोजगार विषयक सेवांचे विकेंद्रीकरण करण्‍यास शासनाने मान्‍यता दिली आहे.
      दि. 3 जानेवारी 2012 पासून संपूर्ण राज्‍यात महा-ई-सेवा केंद्रे, शासन मान्‍यता प्राप्‍त औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, तंत्रनिकेतने, अभियांत्रिकी महाविद्यालये मार्फत उमेदवारांना नांव नोंदणी, नुतनीकरण, नोंदणीचे अद्यावतीकरण व दुय्यम नोंदणीचे पत्र (क्ष-10) देणे तसेच नियोक्‍ते किंवा उद्योजकांना नवीन आस्‍थापना नोंदणी, ई.आर.1 व ई.आर.2 विवरणपत्रे सादर करणे इत्‍यादी सेवा उमेदवार किंवा उद्योजकांच्‍या शक्‍य तेवढ्या जवळ अंतरावर उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या आहेत. ही बाब विचारात घेऊन तालुका स्‍तरावरील फिरते ग्रामीण नांव नोंदणी पथक दिनांक 1 एप्रिल 2012 पासून यापुढे बंद करण्‍यता येत आहे. असे सहाय्यक संचालक, जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, वर्धा कळवितात.                               

महा लोकअदालतमध्ये 1048 प्रकरणे निकाली

वर्धा,दि.15- जिल्‍हा न्‍यायालय परिसरात नुकताच (4 मार्च 2012) झालेल्या महालोक अदालतमध्ये जिल्‍ह्यातील सर्व न्‍यायालयामधून 3678 प्रकरणे ठेवण्‍यात आलेली होती. यापैकी 1048 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्‍यात आली. यामध्‍ये दिवाणी, फौजदारी मोटार अपघात, भू-संपादन व चेकबाऊंसची प्रकरणे निकाली काढण्‍यात आली .

केरोसीनचे वितरण

 वर्धा दि.15 - मार्च महिन्याकरीता तालुकानिहाय परवाना धारकांना केरोसिनचे आवंटन पुढील प्रमाणे आहे.
     जी.एम.राठी वर्धा यांना 180 किलो लिटर. आर्वीचे इब्राहीमखाँ मनवरखॉन यांना 156 किलो लिटर, वर्धा येथील रतनलाल केला 108 किलो लिटर, देवळी येथील वंदना सुनिल गावंडे यांना 60 किलो लिटर, समुद्रपूर येथील एस.आर.शेंडे यांना 108 किलो लिटर,वर्धा येथील कांतीलाल किशोरीलाल यांना 144 किलो लिटर, वर्धा येथील इब्राहीमजी आदमजी यांना 132 किलो लिटर, आर्वी येथील बी.एन.लाठीवाला यांना 120 किलो लिटर, हिंगणघाट येथील एफ.ए.रहेमतुल्ला यांना 120 किलो लिटर, पुलगाव येथील टि.के.ॲन्‍ड सन्स यांना 96 किलो लिटर केरोसिनचे वितरण केल्याचे पत्रकात नमूद आहे.

येत्या 24 मार्चला जिल्ह्यात महसूल विभागाचे महाशिबीर

वर्धा, दि.15-महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्‍याकरीता महत्‍वाकांक्षी योजना म्‍हणून सुवर्ण जयंती राजस्‍व अभियान राबविण्‍यात येत आहे. हे शिबीर 24 मार्च रोजी भरविण्यात येत आहे.
      जिल्‍ह्यात या योजनेची अमलबजावणी प्रभावीपणे करण्‍यात आलेली आहे. या अभियानाअंतर्गत आतापावेतो विविध प्रमाणपत्राचे वाटप करणे, प्रलंबित फेरफार, प्रलंबित महसूल प्रकरणे निकाली काढणे अशी कामे हाती घेण्‍यात आलेली आहेत.
    तालुकास्तरीय शिबीरात कार्यवाही करुन प्रकरणे निकाली काढल्‍या जाणार आहेत. जनतेला विविध दाखले शिबीरात उपलब्‍ध करुन देण्‍यात येतील.
          तहसिल कार्यालय, वर्धा, तहसील कार्यालय, सेलू, तहसिल कार्यालय, देवळी, तहसिल कार्यालय, आष्‍टी, तहसील कार्यालय, आर्वी, तहसील कार्यालय, हिंगणघाट, तहसिल कार्यालय समुद्रपूर या सर्व तालुक्‍यातील नागरिकांचे अर्ज स्विकारण्‍याची अंतिम शेवटची तारीख 19 मार्च 2012 पर्यंत असून स्‍थळ संबधित तहसिल कार्यालय आहे. प्रत्‍येक तालुक्‍याच्‍या ठिकाणी शिबीर दि. 24 मार्च 2012 रोजी होणार आहे.
      जिल्‍ह्यातील सर्व नागरिकांनी त्‍यांचया तहसिल कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेचा व शिबिराचा लाभ घ्‍यावा. असे आवाहन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.


000000

Monday 12 March 2012

माजी सैनिकांचा मेळावा


     वर्धा,दि.12- जिल्‍ह्यातील सर्व माजी सैनिकांना कळविण्‍यात येते की, कर्नल सुहास शं. जतकर (निवृत्‍त), संचालक, सैनिक कल्‍याण विभाग यांचे अध्‍यक्षतेखाली बुधवार दिनांक 14 मार्च 2012 रेाजी विकास भवन, वर्धा येथे सकाळी 11 वाजता माजी सैनिकांचा मेळावा आयेाजीत केला आहे. याप्रसंगी माजी सैनिकांनी मेळाव्‍यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी, वर्धा यांनी केले आहे.
                             0000000

कुपोषण निर्मुलनासाठी प्राथमिक आरोग्‍य स्‍तरावर ग्राम बाल उपचार केंद्र सुरु


      वर्धा,दि.12-राज्‍यात 14 नोव्‍हेंबर 2011 पासून ग्राम अभियान राबविल्‍या जात आहे. जिल्‍ह्यात या अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रमाव्‍दारे बालकांचे कुपोषण कमी करण्‍यात आले आहे. माहे नोव्‍हेंबर मध्‍ये 72 टक्‍के साधारण श्रेणीत असलेल्‍या मुलांमध्‍ये वाढ होवून  जानेवारी पर्यंत 83 टक्‍के मुले साधारण श्रेणीत आलेले आहेत.
     कुपोषण निर्मुलनासाठी शासनामार्फत ग्राम स्‍तरावर ग्राम बाल विकास केंद्र प्राथमिक आरोग्‍य स्‍तरावर बाल उपचार केंद्र सुरु करण्‍यात आले आहे. तसेच अभियानाचे माध्‍यमातून विविध नाविन्‍यपुर्ण विविध तालुक्‍यात राबविल्‍या जात आहे. होम व्‍हीसीडीसी, अंगणवाडीतून दोन वेळचा अधिकचा आहार, सोयाबीन दान योजना अशा उपक्रमातून बालकांचे कुपोषण दुर व्‍हावे हाच एकमेव उद्देश आहे.
      राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्‍त ग्राम अभियान व्‍दारा कुपोषण थांबविण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाय योजना दशपदी पुढील प्रमाणे आहे.
     बाळाला जन्‍मानंतर एक तासाच्‍या आत चिक दूध पाजावे. जन्‍मापासून           6 महिण्‍यापर्यंत बाळाला फक्‍त आईचेच दूध पाजावे,इतर काही नाही. 6 महिणे पूर्ण झाल्‍यावर आईच्‍या दुधासह पूरक आहार सुरु करणे. बाळाच्‍या आहारात सर्व मुख्‍य अन्‍नघटक आणि सूक्ष्‍म अन्‍नघटक, प्रमाणात उपलब्‍ध असावेत. बाळाला आहार कमीत कमी 6 वेळा द्यावा. रक्‍तक्षय प्रतिबंधासाठी बाळाला लोह औषधी किंवा स्प्रिंकल्‍स द्यावेत. बाळाच्‍या नवव्‍या महिण्‍यात जीवणसत्‍व अ ची पहिली मात्रा देवून पुढे दर 6 महिण्‍याला एक या प्रमाणे जीवनसत्‍व अ च्‍या 9 मात्रा द्याव्‍यात. दैनंदीन आहारात फक्‍त आयोडिन युक्‍त मिठाचा वापर करावा. बाळाला वेळीच विविध लसी द्याव्‍यात. मल मुत्राची योग्‍य विल्‍हेवाट लावणे, 24 महिणे वयापर्यंत बाळाला उकळून थंड केलेलेच पाणी द्यावे. 1 वर्षापासून पुढे दर 6 महिण्‍याचे जंतूनाशक औषधी देणे, साबन पाण्‍याने हात स्‍वच्‍छ धुणे.
      कुपोषण संपविण्‍यासाठी हा पहिला टप्‍पा आहे. मुलासाठी वरील दशपदी पाळल्‍याने ते मुल कमी वजनाचे किंवा कुपोषित होणार नाही.
      जिल्‍ह्यातील  प्रत्‍येक गावात कुपोषणमुक्‍ती करीता प्रयत्‍न सुरु आहेत. ज्‍या संस्‍था, व्‍यक्‍ती, इतर अन्‍य तसेच खाजगी, सार्वजनिक कंपनी या कार्यात दत्‍तक योजनेत सहभागी होऊ इच्छितात त्‍यांनी जिल्‍हा परिषद बालकल्‍याण विभाग अथवा जवळच्‍या अंगणवाडीशी संपर्क साधावा.असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा परिषद, वर्धा यांनी केले आहे.
                           000000

राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्‍त ग्राम अभियान अंतर्गत बाल पत्रिकेचे उदघाटन


बाल पत्रिकेचे उदघाटन करताना जिल्‍हाधिकारी जयश्री भोज  

     वर्धा,दि.12–राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्‍त ग्राम अभियान राज्‍यात 14 नोव्‍हेंबर 2011 पासून राबविल्‍या जात आहे. जिह्यातील सर्व बालकांचे कुपोषण कमी करुन त्‍यांना साधारण श्रेणीत आणण्‍यासाठी व या कार्यात लोकसहभाग मिळावा व त्‍याबद्दलची माहिती लोकांना व्‍हावी यासाठी जिल्‍हास्‍तरावर आरोग्‍य विभाग व एकात्मिक बालविकास विभागामार्फत बाल पत्रिकेचे उदघाटन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांचे हस्‍ते नुकतेच (29 फेब्रुवारी 2012) रोजी करण्‍यात आले. या पत्रिकेव्‍दारे 0 ते 6 वयापर्यंतच्‍या मुलांना आहार कोणता, कसा व किती वेळा द्यावा ही माहिती देण्‍यात आली आहे. वयानुसार बाळाचे आदर्श, वजनाची माहिती तसेच कुपोषण टाळण्‍यासाठी वापरण्‍यात येणा-या दशपदिबद्दल माहिती मिळणार आहे.
     प्रत्‍येक बालकांच्‍या वजनाची नोंद दर महिण्‍यात त्‍या पत्रकावर घेण्‍यात येणार असून, वजनाप्रमाणे बाळाच्‍या श्रेणीची माहिती प्रत्‍येक बालकांच्‍या पालकांना मिळणार आहे. या पत्रकाव्‍दारे कुपोषणाबाबतीची माहिती तसेच उपाययोजना व त्‍यावर करावयाची अंमलबजावणी लोकांपर्यंत पोहचवण्‍याचे काम होईल व त्‍यातुन लोकांचा सहभाग कुपोषण मुक्‍तीच्‍या कार्यात वाढेल अशी अपेक्षा आहे. असे आवाहन  जिल्‍हा परिषदेचे  महिला बालकल्‍याण विभागाचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी आणि जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांनी कळविले आहे.
                           0000000