Friday 16 March 2012

रविवारी शाळा शिष्यवृत्ती परीक्षा

वर्धा,दि.16 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत रविवार, दिनांक 18 मार्च रोजी पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे. पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा 172 व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा 129 केंद्रावर घेण्यात येत आहे.
    पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेकरीता 36 हजार 817 परीक्षार्थी बसले असून त्यात 15 हजार 397 मागास व 21 हजार 420 बिगर मागास परीक्षार्थी आहेत. तर माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेला 30 हजार 482 विद्यार्थी बसत असून त्यात 12 हजार 829 मागास परीक्षार्थी आहेत.
    या परीक्षेकरीता भाषा व इंग्रजीचा पेपर सकाळी 11 ते 12 पर्यंत असून 50 वस्तुनिष्ठ प्रश्नाकरीता 100 गुण निर्धारित करण्यात आले आहेत. दुपारी 1 ते 2 या वेळेत गणित व सामाजिक शास्त्र या विषयाचा पेपर असून 50 वस्तुनिष्ठ प्रश्नाकरीता 100 गुण निर्धारित आहेत. तसेच बुद्धिमत्ता चाचणी व सामान्य विज्ञान या विषयाकरीता 100 गुण निर्धारित असून यावर 50 वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाणार आहेत.
  ऑप्टीकल मार्क रिडर पद्धतीने पेपर तपासले जाणार असल्यामुळे प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका राहील. उत्तरपत्रिकांवर पर्यायासाठी वर्तुळे छापण्यात आली असून उत्तरे नोंदविण्यासाठी काळ्या किंवा निळ्या बॉलपेनानेच उत्तराचे वर्तुळ रंगवावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर एक तास अगोदर उपस्थित राहावे, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, नागपूर यांनी कळविले आहे.
                                                

No comments:

Post a Comment