Monday 12 March 2012

कुपोषण निर्मुलनासाठी प्राथमिक आरोग्‍य स्‍तरावर ग्राम बाल उपचार केंद्र सुरु


      वर्धा,दि.12-राज्‍यात 14 नोव्‍हेंबर 2011 पासून ग्राम अभियान राबविल्‍या जात आहे. जिल्‍ह्यात या अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रमाव्‍दारे बालकांचे कुपोषण कमी करण्‍यात आले आहे. माहे नोव्‍हेंबर मध्‍ये 72 टक्‍के साधारण श्रेणीत असलेल्‍या मुलांमध्‍ये वाढ होवून  जानेवारी पर्यंत 83 टक्‍के मुले साधारण श्रेणीत आलेले आहेत.
     कुपोषण निर्मुलनासाठी शासनामार्फत ग्राम स्‍तरावर ग्राम बाल विकास केंद्र प्राथमिक आरोग्‍य स्‍तरावर बाल उपचार केंद्र सुरु करण्‍यात आले आहे. तसेच अभियानाचे माध्‍यमातून विविध नाविन्‍यपुर्ण विविध तालुक्‍यात राबविल्‍या जात आहे. होम व्‍हीसीडीसी, अंगणवाडीतून दोन वेळचा अधिकचा आहार, सोयाबीन दान योजना अशा उपक्रमातून बालकांचे कुपोषण दुर व्‍हावे हाच एकमेव उद्देश आहे.
      राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्‍त ग्राम अभियान व्‍दारा कुपोषण थांबविण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाय योजना दशपदी पुढील प्रमाणे आहे.
     बाळाला जन्‍मानंतर एक तासाच्‍या आत चिक दूध पाजावे. जन्‍मापासून           6 महिण्‍यापर्यंत बाळाला फक्‍त आईचेच दूध पाजावे,इतर काही नाही. 6 महिणे पूर्ण झाल्‍यावर आईच्‍या दुधासह पूरक आहार सुरु करणे. बाळाच्‍या आहारात सर्व मुख्‍य अन्‍नघटक आणि सूक्ष्‍म अन्‍नघटक, प्रमाणात उपलब्‍ध असावेत. बाळाला आहार कमीत कमी 6 वेळा द्यावा. रक्‍तक्षय प्रतिबंधासाठी बाळाला लोह औषधी किंवा स्प्रिंकल्‍स द्यावेत. बाळाच्‍या नवव्‍या महिण्‍यात जीवणसत्‍व अ ची पहिली मात्रा देवून पुढे दर 6 महिण्‍याला एक या प्रमाणे जीवनसत्‍व अ च्‍या 9 मात्रा द्याव्‍यात. दैनंदीन आहारात फक्‍त आयोडिन युक्‍त मिठाचा वापर करावा. बाळाला वेळीच विविध लसी द्याव्‍यात. मल मुत्राची योग्‍य विल्‍हेवाट लावणे, 24 महिणे वयापर्यंत बाळाला उकळून थंड केलेलेच पाणी द्यावे. 1 वर्षापासून पुढे दर 6 महिण्‍याचे जंतूनाशक औषधी देणे, साबन पाण्‍याने हात स्‍वच्‍छ धुणे.
      कुपोषण संपविण्‍यासाठी हा पहिला टप्‍पा आहे. मुलासाठी वरील दशपदी पाळल्‍याने ते मुल कमी वजनाचे किंवा कुपोषित होणार नाही.
      जिल्‍ह्यातील  प्रत्‍येक गावात कुपोषणमुक्‍ती करीता प्रयत्‍न सुरु आहेत. ज्‍या संस्‍था, व्‍यक्‍ती, इतर अन्‍य तसेच खाजगी, सार्वजनिक कंपनी या कार्यात दत्‍तक योजनेत सहभागी होऊ इच्छितात त्‍यांनी जिल्‍हा परिषद बालकल्‍याण विभाग अथवा जवळच्‍या अंगणवाडीशी संपर्क साधावा.असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा परिषद, वर्धा यांनी केले आहे.
                           000000

No comments:

Post a Comment