Monday 12 March 2012

राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्‍त ग्राम अभियान अंतर्गत बाल पत्रिकेचे उदघाटन


बाल पत्रिकेचे उदघाटन करताना जिल्‍हाधिकारी जयश्री भोज  

     वर्धा,दि.12–राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्‍त ग्राम अभियान राज्‍यात 14 नोव्‍हेंबर 2011 पासून राबविल्‍या जात आहे. जिह्यातील सर्व बालकांचे कुपोषण कमी करुन त्‍यांना साधारण श्रेणीत आणण्‍यासाठी व या कार्यात लोकसहभाग मिळावा व त्‍याबद्दलची माहिती लोकांना व्‍हावी यासाठी जिल्‍हास्‍तरावर आरोग्‍य विभाग व एकात्मिक बालविकास विभागामार्फत बाल पत्रिकेचे उदघाटन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांचे हस्‍ते नुकतेच (29 फेब्रुवारी 2012) रोजी करण्‍यात आले. या पत्रिकेव्‍दारे 0 ते 6 वयापर्यंतच्‍या मुलांना आहार कोणता, कसा व किती वेळा द्यावा ही माहिती देण्‍यात आली आहे. वयानुसार बाळाचे आदर्श, वजनाची माहिती तसेच कुपोषण टाळण्‍यासाठी वापरण्‍यात येणा-या दशपदिबद्दल माहिती मिळणार आहे.
     प्रत्‍येक बालकांच्‍या वजनाची नोंद दर महिण्‍यात त्‍या पत्रकावर घेण्‍यात येणार असून, वजनाप्रमाणे बाळाच्‍या श्रेणीची माहिती प्रत्‍येक बालकांच्‍या पालकांना मिळणार आहे. या पत्रकाव्‍दारे कुपोषणाबाबतीची माहिती तसेच उपाययोजना व त्‍यावर करावयाची अंमलबजावणी लोकांपर्यंत पोहचवण्‍याचे काम होईल व त्‍यातुन लोकांचा सहभाग कुपोषण मुक्‍तीच्‍या कार्यात वाढेल अशी अपेक्षा आहे. असे आवाहन  जिल्‍हा परिषदेचे  महिला बालकल्‍याण विभागाचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी आणि जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांनी कळविले आहे.
                           0000000

No comments:

Post a Comment