Saturday 26 January 2013

सामान्‍य जनतेला गतीमान व पारदर्शक प्रशासन देण्‍याचा संकल्‍प - राजेंद्र मुळक



         * प्रजासत्‍ताक  दिनाचा वर्धापन दिन उत्‍साहात साजरा
         * गांधी  फॉर टुमारो  महत्‍वाकांक्षी  प्रकल्‍पाची  अंमलबजावनी 
         * आधार नोंदणीमधे देशात आघाडी
         * टंचाई परिस्‍थीतीचा सामना करण्‍यासाठी प्रशासन सज्‍ज

      वर्धा, दिनांक 26 – जिल्‍ह्याच्‍या  सर्वांगीन  विकासासाठी  वीज, पाणी , रस्‍ते, सिंचन, आरोग्‍य  आदी  पायाभुत  सुविधांच्‍या  विकासासोबतच विविध  योजनांचे  प्रभावी  अंमलबजावनी  करताना सामान्‍य  जनतेला  गतीमान  व पारदर्शक  प्रशासन देण्‍याचा संकल्‍प  असल्‍याचे  प्रतीपादन   राज्‍याचे   अर्थ व नियेाजन  राज्‍यमंत्री  तथा  जिल्‍ह्याचे  पालकमंत्री  राजेंद्र  मुळक  यांनी  केले आहे.
          प्रजासत्‍ताक  दिनाच्‍या  63 व्‍या  वर्धापन  दिनानीमीत्‍त  जिल्‍हा  स्‍टेडीयम  येथे  पालकमंत्री  राजेंद्र  मुळक  यांच्‍या  हस्‍ते  मुख्‍य  शासकीय  समारंभात  ध्‍वजारोहण झाले त्‍यानंतर  पथ संचलनाची मानवंदना  स्विकारल्‍यानंतर  जनतेला उद्देशून  केलेल्‍या  भाषणा प्रसंगी ते बोलत होते.
          प्रजासत्‍ताक  दिनानीमीत्‍त  सर्व नागरीकांचे  अभिनंदन करताना  पालकमंत्री  राजेंद्र  मुळक  म्‍हणाले  की, वर्धा  जिल्‍हा  हा  स्‍वातंत्र्यपूर्व  काळापासून  भारतीय  स्‍वातंत्रयासाठी   त्‍याग  व बलीदान करणारा  जिल्‍हा  म्‍हणून  संपूर्ण  भारतात   ओळखल्‍या  जातो.  महात्‍मा  गांधी  यांनी  सेवाग्राम  येथून  स्‍वातंत्रय  लढ्याची  सुरुवात  केली. या आश्रमाला  75 वर्षे  पूर्ण  झाल्‍या  निमीत्‍ताने   गांधीजींचे  सर्व समावेशक  विचार  जगात  पोहचविणारा   गांधी  फॉर  टुमारो  हा महत्‍वकांक्षी   प्रकल्‍प  राबविण्‍याचा  निर्णय  घेण्‍यात आला आहे.
              आधार नोंदणी  मध्‍ये   संपूर्ण  देशात  वर्धा  जिल्‍ह्याने  केलेल्‍या  कार्यामुळे  पथदर्शी   जिल्‍हा  म्‍हणून  केंद्र  शासनाने  डायरेक्‍ट  टु  कॅश  या महत्‍वाकांक्षी   उपक्रमासाठी  निवड केली आहे. रोजगार  हमी   योजनेच्‍या  अंमलबजावनी मध्‍येही   वर्धा जिल्‍हा  संपूर्ण  राज्‍यात  आघाडीवर  असून, पाणीटंचाईवर  मात  करण्‍यासाठी  राबविलेल्‍या  योजनांच्‍या  धर्तीवर  संपूर्ण  राज्‍यात  वर्धा  पॅटर्न  राबविण्‍याचा निर्णय  शासनाने  घेतला असल्‍याचे  सांगतांना  पालकमंत्री  राजेंद्र  मुळक  म्‍हणाले  की, विकासाच्‍या   सर्वच  क्षेत्रात  राज्‍यात  वर्धा  जिल्‍हा  आघाडीवर  असून, ग्रामीण भागात  मुलभूत  व पायाभुत  सुविधाही   बळकट  करण्‍यासाठी  विशेष  उपक्रम  राबविण्‍याचा  निर्णय  घेण्‍यात आला आहे. 
          शिक्षणाचा हक्‍क ,औद्योगिक  विकासाला चालना, मागासवर्गीयांच्‍या  कल्‍याणासाठी तसेच महिला व बालकांच्‍या   संरक्षणासाठी  महाराष्‍ट्र शासन  कटीबध्‍द  असून, सामान्‍य  जनतेला  शासनाच्‍या  विविध योजनांचा  लाभ  मिळवून  देण्‍यासाठी   माहिती तंत्रज्ञानाचा  प्रभावी  वापर  करण्‍याचा  संकल्‍प  असल्‍याचेही  पालकमंत्री  राजेंद्र  मुळक  यांनी  जनतेला  उद्देशून  केलेल्‍या  भाषणात  सांगितले.
          प्रारंभी  जिल्‍हाधिकारी  एन.नविन सोना, जिल्‍हा  पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, जिल्‍हा  होमगार्ड समादेशक मोहन  गुजरकर  ध्‍वजारोहन व पथ संचलना प्रसंगी  उपस्थित  होते.
          पालकमंत्री  राजेंद्र  मुळक  यांनी  संयुक्‍त  परेड संचलनाचे  निरीक्षण  केल्‍यानंतर   वर्धा  जिल्‍ह्याने  विविध  क्षेत्रात  केलेल्‍या   उल्‍लेखनीय   कार्याबद्दल   विविध  पारितोषकांचे  वितरण  केले. संत गाडगेबाबा  ग्राम स्‍वच्‍छता   अभियाना अंतर्गत  सेलू  तालुक्‍यातील   कोटंबा या गावच्‍या  सरपंच  सौ. रेणूकाताई  रविंद्र  कोटंबकर  यांना   पाच  लक्ष  रुपयाचा  धनादेश  व प्रशस्‍तीपत्र  पालकमंत्र्यांच्‍या   हस्‍ते   देण्‍यात आले. पेठ  या गावच्‍या  सरपंच  श्रीमती  सावित्री  मारोती  श्रीरामे  यांना  व्दितीय  तीन लक्ष रुपये  तर बरबडी  गावच्‍या  सरपंच  सौ. दुर्गा गोडे  यांना तृतीय  दोन लाखाचा धनादेश  देण्‍यात आला.
     साने गुरुजी  स्‍वचछ  प्राथमिक शाळेसाठी दहेगाव  व कोटंबा  येथील  स्‍वचछ आंगणवाडीचा  पुरस्‍कारही  यावेळी  देण्‍यात आला. आधार प्रकल्‍पाच्‍या  प्रभावी  अंमलबजावनीसाठी  जिल्‍हाधिकारी  एन.नविन  सोना , माहिती तंत्रज्ञान  विभागाचे सल्‍लागार  विठ्ठलदास प्रभू , लीड बँकेचे सी.एम.बी.मशानकर , निवासी  उपजिल्‍हाधिकारी  सुनिल  गाडे आदींना  प्रशस्‍ती पत्राने  सन्‍मानीत करण्‍यात आले. यावेळी  शाहू फुले व आंबेडकर  दलीत वस्‍ती  सुधारणा अभियाना अंतर्गत  तीन  ग्रामपंचायतींना  पुण्‍यश्‍लोक  अहिल्‍यादेवी  होळकर  पुरस्‍कार  तसेच  क्रीडा, निर्मल  भारत  अभियान  आदी  क्षेत्रात  केलेल्‍या  उल्‍लेखनीय  योगदानाबद्दल  सन्‍मानीत  करण्‍यात आले.
           प्रजासत्‍ताक   दिनाच्‍या  वर्धापन दिन  समारंभात     पथ संचलनामध्‍ये   उत्‍कृष्‍ट   ठरलेल्‍या    पुलगाव  येथील  मिलीटरी स्‍कुलला   प्रथम , न्‍यु गर्ल्‍स  हायस्‍कुल  व्दितीय तर बुलबुल ट्रॅप गार्डन  शाळेला  तृतीय  पुरस्‍कार  प्रदान करण्‍यात  आला.  चित्ररथामध्‍ये  सामान्‍य  रुग्‍णालयाच्‍या  जननी  सुरक्षा योजने अंतर्गत  आधार प्रकल्‍पाच्‍या  स्त्रि अत्‍याचार  विषयावरील   चित्ररथास  व्दितीय  तर वैयक्तिक  सौचालयाच्‍या चित्ररथास  तृतीय  पुरस्‍कार  देऊन  गौरविण्‍यात आले.
          प्रजासत्‍ताक  दिन   सोहळ्याचे संचलन  श्रीमती  ज्‍योती भगत , डॉ. अजय  येते व स्‍वाती  देशपांडे यांनी  केले. यावेळी  विद्यार्थ्‍यांनी   सामुहीक  कवायत  तसेच  विविध  सांस्‍कृतीक  कार्यक्रम  सादर केले.
          यावेळी  जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष  ज्ञानेश्‍वर  ढगे, खासदार  दत्‍ता  मेघे, नगराध्‍यक्ष  आकाश  शेंडे, बांधकाम सभापती  गोपालराव कालोरकर,  शेखर शेंडे, मुख्‍य  कार्यपालन  अधिकारी शेखर चन्‍ने, अतिरीक्‍त  जिल्‍हाधिकारी  संजय  भागवत, अप्‍पर   जिल्‍हा  पोलीस  अधिक्षक  श्री. गेडाम, जिल्‍ह्यातील  विविध  विभागाचे वरिष्‍ठ  अधिकारी, न्‍यायाधीश  तसेच  ज्‍येष्‍ठ  स्‍वातंत्र्य संग्राम  सेनानी, लोकप्रतीनिधी, जिल्‍ह्यातील  गणमान्‍य  नागरीक, पत्रकार   मोठ्या संख्‍येने  उपस्थित होते.
                                                0000000


Friday 25 January 2013

आजणसरा तिर्थक्षेत्राचा विकास करणार - राजेंद्र मुळक



                                    जिल्‍हा वार्षिक योजनेच्‍या 118 कोटी 20 लाख
                                     खर्चाचा प्रारुप आराखड्यास मंजुरी
          वर्धा दि.25- वर्धा जिल्‍ह्याच्‍या सर्वांगिण विकासाला दिशा देणारा जिल्‍हा नियोजन समितीच्‍या 118 कोटी 20 लाख रुपये खर्चाच्‍या 2013-14 या वर्षासाठीच्‍या  जिल्‍हा वार्षिक योजनेच्‍या प्रारुप आराखड्यास पालकमंत्री राजेंद्र मुळक यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या बैठकीत मान्‍यता देण्‍यात आली.
            जिल्‍ह्यातील रस्‍ते,वीज, पिण्‍याचे पाणी, सिंचन सुविधा, जलसंधारणासह शेतक-यांच्‍या व सामान्‍य जनतेसाठीच्‍या वैयक्तिक लाभांच्‍या योजनांना जिल्‍हा वार्षिक योजनेत प्राधान्‍य देण्‍यात आले असून ग्रामपंचायतीसह नगरपालिकांच्‍या विकासासाठी अतिरिक्‍त निधी जिल्‍हा वार्षिक योजनेत ठेवण्‍यात आला असल्‍याची माहिती पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिली.
            आजणसरा या तिर्थक्षेत्राच्‍या विकासासह रस्‍ता दुरुस्‍तीसाठी विशेष प्राधान्‍य देण्‍यात आले असून जिल्‍ह्यातील इतर 10 पर्यटनस्‍थळांच्‍या विकासासाठीही निधी उपलब्‍ध करुण देण्‍यात येणार असून बोर प्रकल्‍प क्षेत्रात ईकोटूरिझम केंद्र स्‍थापन करण्‍यासाठी नाविण्‍यपूर्ण योजने अंतर्गत 27 कोटी रुपयांचा निधीही उपलब्‍ध करुण देण्‍यात आल्‍याची माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
            विकास भवन येथे जिल्‍हा नियोजन समितीच्‍या आढावा बैठकीस राज्‍याचे पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता राज्‍यमंत्री रंणजीत कांबळे ,खासदार दत्‍ता मेघे, जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे, आमदार अशोकभाऊ शिंदे, दादारावजी केचे, जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना, मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने, विशेष निमंत्रित शेखर शेंडे,सुनिल राऊत, शेषकुमार येरलेकर आदि उपस्थित होते.
          जिल्‍हा वार्षिक योजना 2013-14 च्‍या वार्षिक प्रारुप आराखड्यासाठी शासनाने 75 कोटी 23 लाख रुपये खर्चाची मर्यादा दिली असून 42 कोटी 97 लाख रुपयांची अतिरिक्‍त मागणी करण्‍यात आली आहे. अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत 31 कोटी 59 लाख 65 हजार रुपये खर्चाचा तर आदिवासी क्षेत्र बाह्य योजनेअंतर्गत  38 कोटी 13 लाख रुपयाचा प्रारुप आराखडा मंजुर करण्‍यात आला.
          जिल्‍हा वार्षिक योजनेअंतर्गत डिसेंबर अखेरपर्यंत 63 कोटी 67 लाख 43 हजार रुपये प्राप्‍त झाले असून विविध यंत्रनांना 46 कोटी 50 लाख रुपयाचा निधी वितरीत करण्‍यात आला असून जिल्‍ह्यातील विकास कामावर 36 कोटी 33 लाख 83 हजार खर्च झाला आहे. अनुसूचित जाती उपाययोजना व आदिवासी उपाय योजनेअंतर्गतही सरासरी 79 टक्‍के खर्च झाला आहे. यावेळी पुर्नविनीयोजन प्रस्‍तावासही पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी मान्‍यता दिली.
            वर्धा येथे सुसज्‍ज नाट्य गृहाचे बांधकाम, चार आरोग्‍य केंद्रांची निर्मिती  व वर्धा शहरात नविन पोलीस स्‍टेशन बाबतही यावेळी चर्चा करण्‍यात आली.
            पोहणा येथील कृषी विभागाच्‍या 35 ऐकर शेतावरील शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम तसेच येथील अवजारीगृहाबाबत आमदार अशोक शिंदे यांच्‍या तक्रारीनुसार जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना यांनी चौकशी करुण अहवाल सादर करण्‍याच्‍या सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्‍या.
            जिल्‍हा परिषदेच्‍या तालुकास्‍तरावर व मोठ्या गावांमध्‍ये असलेल्‍या शाळांच्‍या क्रींडांगणावर विद्यार्थ्‍यासाठी क्रींडांगण विकास निधीमधून 7 लाख रुपयापर्यतचे अनुदान मिळविण्‍यासाठी प्रस्‍ताव सादर करण्‍याच्‍या सूचना पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता राज्‍यमंत्री रणजीत कांबळे यांनी दिल्‍यात जिल्‍ह्यात कोल्‍हापूरी बंधारे व साठवणूक बंधारे बांधतांना पाणीवापर संस्‍था स्‍थापन करुनच बंधा-यांच्‍या कामांना मंजुरी द्यावी तसेच जिल्‍ह्यातील बंधां-यांच्‍या सध्‍यास्थितीबाबत अहवाल सादर कराव्‍यात अशा सूचनाही यावेळी देण्‍यात आल्‍यात.
            आर्वी शहरात पावसाळ्यात पुरामुळे निर्माण झालेल्‍या परिस्थिती बाबत तात्‍काळ पूरनियंत्रणाचे कामे तात्‍काळ पूर्ण करावे अशा सूचनाही बैठकीत देण्‍यात आल्‍या.
            प्रारंभी जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना यांनी स्‍वागत करुण जिल्‍हा वार्षिक योजनेच्‍या प्रारुप आराखड्याची माहिती तसेच यावर्षी झालेल्‍या खर्चाचा आढावाही बैठकीत सादर केला.
जिल्‍हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे यांनी विभानिहाय खर्चाची माहिती बैठकीत सादर केली. यावेळी जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाशकुमार, अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत, आदिवासी विभागाचे प्रकल्‍प अधिकारी  गिरीश  सरोदे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
00000