पर्यटन

सेवाग्राम
महात्मा गांधीजी यांच्या वास्तव्याने पुनित झालेले सेवाग्राम वर्धेपासून अवघे सात किलोमिटर अंतरावर आहे. पूर्वीसेवाग्रामसाठी जाणे व येण्याची सुविधा नसल्यामुळे अनेकांना कष्ट सहन करावे लागत होते. परंतू आता मात्र वर्धेवरुन  जाण्या-येण्याच्या मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध असल्यामुळे परदेशातील व देशातील असंख्य पर्यटक व शैक्षणिक सहली या ठिकाणी भेटी देत असतात. महात्मा गांधीजींच्या या प्रेरणादायी स्थळातून त्यांचे स्मृती दर्शन होते.
सत्य व अहिंसेचे पुजारी असलेले मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1869 मध्ये गुजरात राज्यातील पोरबंदर या ठिकाणी झाला. ते बालपणापासून दृढनिश्चयी व सत्यवचनी होते. शालेय जीवनात सर्वसाधारण प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संपल्यानंतर बॅरीस्टर होण्यासाठी इंग्लडला गेले. गांधीजी बॅरिस्टर होऊन मायदेशी परतले.
इंग्रज प्रशासनाने भारतीयांवर जुलूम, जबरदस्ती व अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी महात्मा गांधीजींनी आंदोलने उभारली, बलाढ्य साम्राज्यांशी लढा देताना त्यांनी अहिंसात्मक पध्दतीने आपला लढा चालविला.
12 एप्रिल 1930 रोजी मिठाचा सत्याग्रहासाठी दांडी यात्रा काढली त्यांनी कायदा तोडल्याने 5 मे 1930 रोजी त्यांनायेरवडाच्या जेलमध्ये तुरुंगवास भोगावा लागला. 1933 मध्ये त्यांची सुटका झाली. त्यानंतर देशव्यापी यात्रा करुन आल्यानंतर गांधीजी जानेवारी 1935 च्या शेवट वर्धेतील मगनवाडी येथे वास्तव्य आले. त्यानंतर बापू 30 एप्रिल 1936 ला पहिल्यांदा सेवाग्रामला आले. पूर्वी सेवाग्रामचे नांव शेगांव असे होते. दांडी यात्रा प्रारंभ करण्यापूर्वी गांधीजीनी निर्धार केला होता की पूर्ण विजय प्राप्ती नंतर साबरमती आश्रमात परत येईल, दरम्यान वर्धेचे जमनलाल बजाज यांच्याविनंतीवरुन ते वर्धेला आले.
आदि निवास
भारत छोडो आंदोलनाची पहिली सभा 1942 मध्ये आदि निवासात झाली होती तसेच 1940 चे व्यक्तीगत सत्याग्रहाची प्राथमिक तयारी सुध्दा याच निवासस्थानातून झाली. आश्रमवासियांच्या परिश्रमाने व स्थानिक कारागीराच्या मदतीने आदि निवास बांधण्यात आले. या निवास्थानामध्ये बापू बा, प्यारेलालजी, संत तुकडोजी महाराज, खानअब्दुल गप्फार खॉ व इतर दूसरे आश्रमवासी व आमंत्रीत लोकसुध्दा राहत असे. याठिकाणी लेखण, पठण, कताई व इतरसर्व कामे केल्या जात होते. गांधीजीच्या इच्छेनुसार व त्यांच्या देहांतानंतर या ठिकाणाला आदि निवास संबोधण्यात येतआहे.
बापुकुटी
आदि निवासात लोकांची गर्दी वाढल्यामुळे गांधीजींच्या नियमित कार्यात अडथळा येऊ लागला हे लक्षात आल्यानंतर मीराबहन यांनी त्यांच्यासाठी दोन कुट्या तयार केल्या होत्या. आज त्याला बापूकुटी व बापू दप्तर या नावाने ओळखले जाते. या बापूकुटीत गांधीजीचे बसावयाचे आसन, त्या आसनावर कोरलेले `ऊॅ ` बाजूला कंदिल, पेटीत चष्मा व इतर साहित्याची जपणूक करुन त्याच्या आठवणी जपून ठेवण्यात आलेल्या आहेत. बाजूलाच त्यांच्या खडाऊ व लाठी हे साहित्य स्मृती म्हणून आहे बापू-कुटि ही माती, बांस तथा देशी कवेलू आदि साहित्याने बनलेली असून मीरा बहनने आपल्या सुंदर कलेतून `ऊॅ `, खजूर झाड, मोर तथा चरखा बनविला होता. हे कमश: ईश्वर,प्रकृति, जीवित प्राणी तथा मानव प्रवृत्तीचे प्रतिक म्हणून समजल्या जात होते. खजूरच्या पत्याने बनविण्यात आलेल्या चटईवर बसून गांधीजी आपले अविश्रांत काम करीत असत. बैठकीच्या उजव्या बाजूला काचेच्या आलमारीत ते चरखा,थुंकदानी, पाणी पिण्याची शिशी तसेच लाकडीच्या छोट्या पेटीमध्ये प्रथोपचाराचे साहित्य ठेवीत असत. चिनी मातीची तीन बंदरवाली मुर्तीसुध्दा यामध्ये ठेवण्यात येत असे. काचेच्या आलमारीमध्ये गांधीजी आपल्या खडाऊ आणि लांबअशी काठी ठेवीत असत. या बापूकुटीमध्ये राष्ट्रीय नेत्यासोबत राजनैतिक चर्चा सुध्दा ते करीत होते. या कुटीच्या दुस-या खोलीत गांधीजींचा सेप्टीक टँकवाला संडास, बाजूला लाकडी पेटी आहे. वृत्तपत्र वाचणे व त्यात सुधारणा करण्यासाठी या पेटीचा उपयोग केला जात होता. बाजूला मालिश टेबल व झोपण्यासाठी खाट ठेवलेली आहे, ते त्याचा नियमीतपणे उपयोग करायचे यावरुन त्यांची साधी राहणी, साधे विचार यावरुन त्याचे जिवनातील कलेचे मर्म समजून येतो.
गांधीजींचे कार्यालय
गांधीजीच्या कार्यालयामध्ये महादेवभाई, प्यारेलाल आणि सुश्री राजकुमारी अमृतकौर तथा अन्य सहयोगी कार्य करीत होते. या कार्यालयात टेलीफोन, सर्प पकडण्याचा पिंजरा आहे.
`बा ` कुटी
गांधीजीच्या सोबतीला कस्तुरबा गांधी राहत होत्या परंतू त्यांना असुविधांचा अनेक वेळा सामना करावा लागल्यामळे अखेरीस जमनालालजी बजाज यांनी `बा ` साठी वेगळी कुटी बनवली त्याला बा-कुटी संबोधण्यांत आले.आजही ही कुटी आश्रमांच्या परिसरांत आहे.
आखरी निवास
श्री. जमनालालजी बजाज यांनी स्वत:साठी आखरी निवास बांधले. या कुटीत शांतीदास तथा लार्ड लोधियन राहतहोते. प्रारंभी डॉ. सुशीला नैयर यांनी या गावातील लोकांचे उपचार केले त्यानंतर आखरी निवास कुटीमध्ये कस्तूरबांनी दवाखाना सुरु केला. तो आजही कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या नावाने प्रसिध्दीस आहे.
गांधीजी 1946 च्या ऑगष्ट महिन्यात खोकला व सर्दीने आजारी झाले डॉक्टरांच्या सल्याने त्यांना कुटीमध्येराहावे लागले त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली. 25 ऑगस्ट 1946 रोजी ते दिल्लीला गेले, तेथून ते नौआखाली यागावाला गेले परतीत ते दिल्लीला आले. 2 फरवरी 1948 रोजी सेवाग्रामला परत येणार होते. दुर्देवानी 30 जानेवारी 1948 रोजी त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर गांधीजी परत आले नाही म्हणून या कुटीला आखरी निवास म्हणून संबोधण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी बौध्द धर्म साधक धर्मानंद कोसंबी यांनी आमरण उपोषण करुन आपले प्राण त्यागले.
सेवाग्रामच्या परिसरात प्रार्थना स्थळ, रसोई घर, भोजन स्नान, महादेव कुटी, किशोर निवास, परचूटे कुटी, रुस्तम भवन, नई तालीम परिसर, गौशाला, शांती भवन आंतरराष्ट्रीय छात्रावास, डाकघर, यात्री निवास व गांधी चित्र प्रदर्शनी आदि सेवाग्रामच्या वैभवात व स्मृतीत भर घालणाऱ्या वास्तु ऊभ्या आहेत. सेवाग्रामचे पावित्र्य देशापुरते राहीलेलेनसून ते अंतराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचले आहे. सेवाग्राम ही विचारांची शक्तीस्थळ म्हणून गणल्या जात असते. यापरीसरांतील सत्य-अहिंसा व शांतीचा संदेश सर्व दूर पोहचलेला
गीताई मंदिर
गीता + आई = गीताई किंवा गीतामाता या विषयी आचार्य विनोबा भावे यांचे अथक चिंतन होते. सन 1915मध्ये त्यांची माता रुख्मीनीदेवी यांच्या इच्छेनूसार मुळ गीतेचे मराठीत रुपांतर करण्याचा त्यांनी निश्चय केला होता. 7ऑक्टोंबर 1930 मध्ये गीतेचे मराठीत रुपांतर करण्याचे काम सुरु केले. 1932 मध्ये मराठीतील गीता श्लोकाचे प्रकाशनझाले. त्या पुस्तकाचे प्रकाशक जमणालालजी होते. मातृस्मरणमध्ये केलेल्या या कृतीला विनोबाजींनी नाव दिले गिताई.
गिताई मंदीराचे भुमिपुजन
कमलनयन बजाज यांच्या कल्पनेतून साकारणा-या गिताई मंदिराचे भुमिपुजन जमनालालजी यांच्या 75व्या जन्मदिनी 4 नोव्हेंबर 1964 मध्ये स्वत: विनोबाजींच्या हस्ते संपन्न झाले. नविनतम आणि मौलीक कल्पनेच्या आधारावर या प्रकल्पाचे प्रारुप तयार करण्यात आले. याप्रसंगी विनायक पुरोहीत यांचे या प्रकल्पाला मोठ्याप्रमाणावर योगदान मिळाले. त्यांनी देश व विदेशातील विभिन्न स्मारकाचा अभ्यास करुन व अवलोकन करुन स्थापत्यकला विशेषज्ञांशी सल्ला मसलत करुन या प्रकल्पाला पूर्णरुप दिले.
शिला लेख
गीताई मंदीरात उभारण्यात आलेले शिलालेख हे देशातील चारही बाजूने येथे आणलेले आहेत त्यामध्ये देशाच्यापूर्वेकडील उत्तर प्रदेशातून चूनार, महाराष्ट्राच्या पश्चिम क्षेत्रातून कोल्हापूर, उत्तर मध्यप्रदेश व राजस्थानातून क्रमश:करोल व बुंदी दक्षिण भारताच्या आंध्रप्रदेश, कर्नाटक व तामिलनाडू या राज्यातून सुध्दा शिला लेख आणल्या गेले.त्यामुळे हे मंदिर संपूर्ण देशाच्या एकतेचे प्रतीक म्हणून सुध्दा समजल्या जाते.
या शिलालेखाची निवड विशेषज्ञांच्या सल्ल्यानुसार व प्रमाणित प्रयोगाच्या आधारावर करण्यात आली आहे.शिलालेखावर वारा, सुर्य व पाण्याचा परिणाम होणार नाही याचाही विचार करण्यात आला होता. शिलालेखाची ऊंची 9 फुट,चौडाई 2 फुट व जाडी 1 फुट असुन शिलालेख 2 फुट जमिनीच्या आंत आहे. प्रत्येक शिला लेखावर गिताईचा एक श्लोक लिहिण्यात आला आहे. पर्यटकांना 8 ते 10 फुटाच्या अंतरावरुन सुध्दा गिताईचे श्लोक वाचता येतात. शिलालेखाच्या परिघाला चरखा व गायीचा आकार देण्यात आला आहे. पुढील बाजूला चरख्याचा आकार हे गांधीजीच्या स्मृतीचे प्रतीक असून गायीचे चिन्ह जमनालालजीच्या स्मृतीचे प्रतीक मानल्या गेले आहे. या शिलालेख मंदिराला परंपरागत अशी छतअथवा फरशी नसून भिंतीसुध्दा नाहीत. दोन शिलालेखाचे अंतर 3 इंचांचे असून प्राकृतिक हवेचा संचार व भरपूर उजेडअसतो. याठिकाणी विनोबाजींची गिताई अमर झाली.
गीताई मंदिराचे मुख्य प्रवेशव्दार आकर्षक पध्दतीने बनविण्यात आले असून त्या समोरच स्वास्तिकच्या आकाराचा स्तंभ आहे. या स्तंभावर विनोबाजींनी आपल्या हस्ताक्षरात गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता, पडता रडता घेई उचलू कडेवर अश्या ओव्या लिहिल्या असून त्यांचाशी विनोबाजींचा भावनिक संबंध आहे.
हे मंदिर परंपरागत पूजेचे स्थान नसून ते ध्यान चिंतनाचे साधना आहे. मंदिराच्या परिघामधीलवातावरण शांत व सात्विक आहे. मंदिराच्या आंत एक छोटे तळे बनविण्यात आले आहे ते नेपाल त्रिशुल नाटीच्या एकाभागाची प्रतिकृती आहे.
गीताई मंदीर कमलनयन बजाज चॅरिटेबल ट्रस्ट दिल्ली यांच्या मार्फत बनविण्यात आला असून सर्वसेवासंघाकडून 35 एकर जमीन या कार्यासाठी विनामुल्य देण्यात आली. या मंदिराचे उद्घाटन 7 ऑक्टोंबर 1980 मध्ये स्व.विनोबाजींच्या हस्ते करण्यात आले.
या मंदिरातून गांधीजी, जमनलालजी आणि विनोबाजींच्या व्यक्तीमत्वाची व विचारांचे सतत स्मरण होत असते.या परिसरात विनोबा जिवन चित्रप्रदर्शनी, जमनालाल बजाज यांचे चित्र जीवनी प्रदर्शनी असून समोरच गांधी विचारअध्ययन केंद्र आहे. या स्थळाला अनेक देश व विदेशातील पर्यटक अभ्यागत व शैक्षणिक सहलीतील विद्यार्थी विनोबाजी भावे यांच्या विचारांची शिदोरी घेवून जात
पवनार
पवनार हे गाव वर्धा- नागपूर या महामार्गावर असून, ते वर्ध्यापासून सुमारे सहा कि.मी. अंतरावर आहे. येथील धाम नदीच्या काठावर स्व. विनोबा भावे यांचा आश्रम असून, यालाच परमधाम आश्रम म्हणतात. स्व. विनोबाजी भावे यांचा जन्म 10 सप्टेंबर 1885 साली रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावात झाला. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण बडोदा (गुजराथ) येथे झाले. नंतर हिंदु विद्यापीठात संस्कृत अध्ययन केले. तेथेच त्यांनी गांधीजींचे भाषण ऐकले व गुरु-शिष्यांचा पत्रव्यवहार सुरु झाला.
त्यांनी वयाच्या 55 ते 68 पर्यात भू दान पदयात्रा केली. तत्पुर्वी आंध्र प्रदेशातील रामचंद्र रेड्‌डी या जमीनदाराने 100 एकराचे भुमीदान केले. जगाच्या इतिहासात पहिला क्षण असा होता की रक्ताचा एकही थेब न सांडता हजारो एकराचे भूदान मिळाले. या पदयात्रेनंतर 1970 साली विश्रांतीसाठी वर्धा जवळील पवनार येथील परमधाम आश्रमात परतले. गोपुरी येथे विनोबाजी भावे बरेच दिवस वास्तव्याला होते. त्यावेळी स्व. जमनालालजी तेथे एक कुटी बांधून राहत असत. तेथे आता गीताई मंदिर बांधण्यात आले आहे. गीतेचे अठरा अध्याय विविध प्रकारच्या शिळा कोरुन त्याचे स्तंभ उभे केले आहे. या मंदिराला छत नाही, मंदीराच्या भिंतीचा आकार दुरुन चरखा व गाईचा आभास निर्माण करणारा दिसतो.
विनोबांची गिताई येथे अमर झाली आहे. या काळात गिताई, गिताप्रवचने असंख्य स्फुटविचार मागे ठेवून परावाणीने `रामहरी ` म्हणत 15 नोव्हेंबर 1982 मध्ये अनंतात विलीन झाले. धामनदीत आचार्य विनोबा भावे यांच्या पार्थिव शरीराला अग्नि देण्यात आला होता. यावेळी शासनातर्फे एक स्मारक बांधण्यात आले आहे. स्व. विनोबाजी भावे यांच्या पवनार आश्रमाला देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, देशातील नामवंत लोकांनी भेटी दिल्या असून, राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व मंत्रीमंडळातील सदस्य या ठिकाणाला भेटी दिल्या. तसेच या ठिकाणाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित झाल्याने अनेक देश विदेशातील पर्यटक व शैक्षणिक सहली या ठिकाणी येऊन प्रेरणा घेतात. पवनार आश्रम येथे कुसुमताई देशपांडे व गौतम बजाज यांचे कायम वास्तव्य आहे.
विश्व शांती स्तुप
महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या या कर्मभुमीत विश्वशांती स्तुपाची निर्मिती झाली. 4 ऑक्टोंबर 1933रोजी जमनालालजी बजाज यांच्या परिचयाचे जपानी बौध्द भिक्षू महास्यवीर निचिदात्सु फुजीई हे महात्मा गांधी यांना वर्धा येथे भेटण्यासाठी आले. श्री. फुजोई हे प्रतीदिन गांधीजीच्या सत्याग्रह आश्रमच्या आजूबाजूला ड्रम वाजवून
`` ना - म्यु - म्यो-हो-रे-गे-क्यो `` अशी प्रार्थना म्हणत होते. या प्रार्थनेचे कारण विषद करतांना भिक्षू म्हणाले कीभारताची स्वातंत्रता व विश्वशांतीसाठी ही प्रार्थना म्हटल्या जाते. ही प्रार्थना आज ही विश्वशांती स्तुपाच्या परिसरातअसलेल्या बौध्द मंदीरात पहाटे साडे पाच व सायंकाळी सहा वाजता म्हटल्या जाते.
गांधीजीच्या अहिंसा आंदोलनाची चर्चा त्या काळात सर्व विश्वामध्ये सुरु होती. अहिंसेच्या आंदोलनामध्ये विश्वास ठेवणारे लोक सर्व विश्वामध्ये होते. तथापि फुजीई गुरुजी हे व्यक्तीमत्व अहिंसा व विश्वशांतीसाठी परिचीत होते. फुजीईगुरुजींना विश्वास होता की गांधीजींच्या अहिंसात्मक आंदोलनाला निश्चितपणे यश मिळून देशाला स्वातंत्र्य मिळेल. पूढेहा त्यांचा विश्वास सार्थ ठरला व देशाला स्वातंत्र्य मिळेल. महात्मा गांधी आणि फुजीई गुरुजी या दोन महान व्यक्तींनाजोडणारा दूवा म्हणजे वर्धा नगरी हे ठिकाण इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिल्या गेला.
पुज्य फुजीई गुरुजींची अंतिम इच्छा होती की गांधी व विनोबांच्या कर्मभुमीत एक विश्वशांती स्तूपाची निर्मितीव्हावी. ज्या ठिकाणी हे विश्वशांती स्तुप आहे. त्याठिकाणाची पसंतीसुध्दा त्यांनी केली होती. परंतू त्यांच्या जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत विश्वशांती स्तुपाची निर्मिती होऊ शकली नाही, मात्र फुजीई गुरुजी मेमोरीयल ट्रस्टने दानाच्या स्वरुपात व सर्वसेवा संघ तथा कमलनयन बजाज चॅरीटेबल ट्रस्ट यांनी फुजीई गुरुजींच्या स्मृती व सन्मानार्थ वर्धा येथेविश्वाशांती स्तुपाची निर्मिती करण्यात आली.
विश्वशांती स्तुप 9 एकर जागेच्या विस्तीर्ण परिसरात आहे. विश्वशांती स्तुपाच्या घुमटाच्या आच्छादनावर सुवर्णाने बनविलेल्या भगवान गौतम बुध्दाच्या प्रतिकृतीच्या 4 दिशांनी उत्तम विविध मंदिरांच्या आकर्षक पध्दतीने ठेवलेल्या प्रतिकृती आहेत. तसेच याच परिसरात भगवान बुध्दाचे मंदीर सुध्दा आहे. या मंदिरात सुवर्णकृत अलंकारानेबुध्दाची मुर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. हे बौध्द मंदीर जापानी बौध्द मंदीरासारखे वाटते. मंदिरामध्ये निरव शांतता पसरलेली असते. पहाटे व सायंकाळी 6 वाजता या मंदिरात प्रार्थना म्हटल्या जाते. अनेक देश विदेशातील पर्यटक या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. विश्वशांती स्तुपाचे भुमिपुजन 1989 साली महात्मा गांधीजीच्या पुत्र वधू निर्मलाबेन गांधी यांचे हस्ते झाले तर 13 जानेवारी 1993 साली भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकरदयाल शर्मा यांच्या हस्ते झाले.
परमाणू युगात मानवजातीला विनाशातून वाचविण्यासाठी तसेच मानवजातीचे दु:ख दूर करण्यासाठी बुध्दधर्माचे आचार व विचार आजही प्रेरणादायी ठरले आहे. शांतीचे अग्रदूत म्हणून संबोधल्या गेलेल्या गौतम बुध्दाचे कार्य सर्व मानव जातीला प्रगतीपथावर नेणारे
बोरधरण
वर्धा जिल्ह्यांत एकमेव मोठे धरण म्हणजे बोरधरण प्रकल्प या नावाने प्रसिध्द आहे. वर्धा-नागपूर या महामार्गावर असलेल्या सेलू तालूक्यापासून अवघ्या 17 किलोमिटर अंतरावर असलेला या प्रकल्पाच्या कामाची सुरुवात 1957 साली झाली. बोर नदीवर बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाचे काम 1965 साली पूर्ण झाले.
बोरधरण हे चारही बाजूंनी टेकड्यांनी व्यापलेले आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र 376.32 कि.मी. असून पर्जन्यमानाची सरासरी 1450 मि.मी. आहे. संपूर्ण पाणी साठा 138.75 द.ल.घ.मी. असून उपयुक्त पाणी साठा 127.42 द.ल.घ.मी.आहे. पूर्ण संचय पातळी 330.40 मिटर आहे.
या बोरधरणाला गेली अनेक वर्षे पर्यटक भेटी देवून निसर्गाचा आनंद लूटत. परंतू त्या ठिकाणी पर्यटकांसाठीमुलभूत सोयी नसल्यामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजन पडायचे. पर्यटकाचे बोरधरणा विषयी असलेले आकर्षण व प्रेम यामुळे शासनाने बोरधरणाला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषीत केले.
बोरधरणाच्या टेकडीवरच्या माथ्यावर पाटबंधारे विभागाचे एक विश्रामगृह आहे. परंतू ते पर्यटकांना सुख सुविधा देऊ शकत नसल्यामुळे धरणा लगतच्या वरील भागावर पर्यटकांसाठी राहण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाकडून कक्ष बांधून देण्यात आले. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी एक मोठा हॉल सुध्दा बांधलेला आहे. ही सर्व बांधकामे शासनाच्या निधीतून करण्यात आली असून प्रशासनाने ही विश्रामगृहे कंत्राटी पध्दतीने चालविण्यासाठी दिलेला आहे.
बोरधरणाला आता जाण्यासाठी रिसॉर्ट विश्राम गृहापर्यंत डांबरीकरण रस्ते बनविले आहेत. पाण्यासाठी धरणाचेपाणी उपयोगात आणण्यात येत असते. तसेच आजूबाजूचा परिसर झाडे लावून सुशोभित करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या आनंदात भरच पडत आहे. रिसॉर्ट मध्ये बसून जेवतांना अथवा नास्ता करतांना तुडुंब भरलेल्या तलावाचे व मोठमोठ्या हिरव्यागार टेकड्यांच्या विलोभनीय दृष्याचा आनंद घेता येतो.
पर्यटकाच्या सोयीसाठी व लहान बालकांसाठी त्यांच्य मनोरंजनासाठी खेळण्याचे साहित्य उपलब्ध करुनदेण्यात आले असून पावसाळ्यामध्ये येथील परिसर अधिक विलोभनिय व सुंदर नटलेला दिसतो. पक्षांची कु-कु ववण्यप्राण्यांच्या आवाजाने आसमान दणाणून जातो. पर्यटकांना सुध्दा या आवाजाचा आनंद येथे लूटता येतो.शासनानेअलिकडेच बोर अभयारण्य म्हणून या परिसराला मान्यता दिली आहे. त्यामुळे या विस्तीर्ण परिसराच्या जंगलामध्येपर्यटकांच्या भटकंतीवर प्रतिबंध केला आहे. मात्र वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने सकाळ पासून सुर्यास्तापर्यत जंगलसफारी करता येते. या जंगलात रानडुकरे, ससे, कोल्हे, हरीण, मोर आदि वन्यप्राणी आढळतात.


बोर धरणांत पर्यटकासाठी बोटिंग करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असून त्या दिशेने वाटचाल सुरु आहे.
आजच्या गतीमान व्यवस्थेत मनुष्याचे अस्तित्व लयास येत असून, अश्या पर्यटन स्थळामुळे जिवनजगण्याची अभिलाषा निर्माण होत असते. नव्हे तर आयुष्याला दिशा सध्दा मिळत असते. मानव विकासाचे केंद्र बिंदू म्हणून पर्यटन विकासाकडे पाहिल्या जाते.