Saturday 5 January 2013

रोजगार हमी योजनेतील मजुरांची रक्‍कम यापुढे मजुरांच्‍या बँक खात्‍यात जमा - आयुक्‍त


                   वर्धा दि.5 – केंद्र पुरस्‍कृत महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्‍यातील चार जिल्‍हे प्रायोगिक तत्‍वावर घेण्‍यात आली असून त्‍यामध्‍ये पुणे,नंदुरबार,अमरावती व वर्धा या जिल्‍ह्याचा समावेश आहे.या योजनेअंतर्गत  अमरावती व वर्धा जिल्‍ह्यातील तालुका निहाय दोन गावांची निवड करण्‍यात आली आहे. या गावातील काम करणा-या मजुरांची रक्‍कम थेट त्‍यांच्‍या बँक खात्‍यामध्‍ये येत्‍या 26 जानेवारी पासून जमा करण्‍यात येणार असल्‍याची माहिती महात्‍मा गांधी रोजगार हमी योजनेचे आयुक्‍त एस.संकरनारायण यांनी दिली.
ईलेक्‍ट्रानिक निधी व्‍यवस्‍थापन पध्‍दतीवर आज विकास भवन येथे तहसीलदार,गटविकास अधिकारी,सहाय्यक लेखाधिकारी यांची कार्यशाळा संपन्‍न झाली त्‍याप्रसंगी त्‍यांनी माहिती दिली. यावेळी उपसचिव आर.विमला,रोहयोचे उपजिल्‍हाधिकारी सानियार, उपजिल्‍हाधिकारी जे.बी.संगितराव व अमरावतीचे उपजिल्‍हाधिकारी (रोहयो) बावणे आदि मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
महाम्‍मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत ग्रामीण भागात मागेल त्‍या हाताला काम देण्‍याचा संकल्‍प केंद्र शासनाने यापूर्वीच जाहीर केला असल्‍याचे सांगून संकरनारायण म्‍हणाले की, आता अमरावती व वर्धा जिल्‍ह्याने आधार कार्ड व बॅक खाते उघडण्‍यासाठी नेत्रदिपक अशी कामगिरी केलेली आहे.त्‍यामुळे विदर्भातील अमरावती व वर्धा जिल्‍ह्याची निवड करण्‍यात आली आहे. ईलेक्‍ट्रानिक निधी व्‍यवस्‍थापन पध्‍दतीनुसार रोहयो अंतर्गत काम करणा-या मजुरांची मजुरी थेट त्‍यांच्‍या खात्‍यामध्‍ये जमा केली जाणार आहे. कामाचे मुल्‍यमापण केल्‍यानंतर त्‍या-त्‍या तालुक्‍याचे तहसीलदार व संवर्गविकास अधिका-या मार्फत मजुरीची रक्‍कम बँकेत जमा करण्‍यात येणार आहे.
मजुरांची मजुरी देण्‍यासाठी होणारा विलंब या पध्‍दतीने संपुष्‍टात येणार आहे. यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्‍यात येणार असून ग्रामसेवकांकडून गावातील मजुराचे नांव  कोणत्‍या बँकेत त्‍यांचे खाते आहे.तसेच त्‍यांचे खाते क्रमांक अचूक आहेत किंवा कसे याबाबत ग्रामसेवक खात्री करतील.
         वर्धा जिल्‍ह्यातील तालुकानिहाय माहितीनुसार तहसीलदार व संवर्गविकास अधिकारी यांनी  निवड केलेल्‍या गावामध्‍ये कंसाबाहेरील गावे ही संवर्गविकास अधिकारी यांनी तर तहसिलदार यांनी निवड केलेली गावे ही कंसामध्‍ये दर्शविली आहे.
         वर्धा तालुका येसंबा (आंजी मोठी) सेलू तालुका खापरी (केळझर) देवळी तालुका कोल्‍हापूर (नाचणगाव) आर्वी तालुका पिंपळखुटा(नांदोरा) आष्‍टी तालुका मोही
 (लहानआर्वी) कारंजा तालुका बोरी (जसापूर) हिंगणघाट तालुका कातगांव (कळाजता) समुद्रपूर तालुका दसोडा (दहेगांव) आदि आहेत.
            अमरावती जिल्‍ह्यातील तालुका निहाय निवड केलेली गावे तहसिलदारांनी निवडलेली गावे कंसाबाहेर व संवर्गविकास अधिकारी यांनी निवडलेली गावे कंसामध्‍ये आहे. अमरावती तालुका सिराड (आंजणगाव बारी) भातकुटी तालुका खार तळेगांव (वायगांव) नादगाव खंडेश्‍वर तालुका माहुली (खुमगांव) वरुड तालुका सातनुर (चांदस) मोर्शी  तालुका पिंपळखुटा (भिबी) तिवसा तालुका शिवणगाव (सार्सि) अचलपूर तालुका उपालखेडा (रामपूर बद्रुक) चांदूर बाजार तालुका सिरसगाव (निमखेडा) चांदूर रेल्‍वे तालुका सिरोडी (येरड बाजार) अंजणगाव तालुका सातेगांव (पांढरी) धारणी तालुका झिलपी (विजूधावडी ) चिखलदरा तालुका गांगरखेडा (सेमाडोह) दर्यापूर तालुका टिलोरी (डोंगरगांव) धामणगाव तालुका अशोकनगर (जुना धामणगाव) यांची निवड केलेली आहे.या गावामध्‍ये लोक प्रतिनिधी किंवा शासकीय अधिकारी यांच्‍या हस्‍ते या योजनेचा शुभारंभ 26 जानेवारी रोजी करण्‍यात यावा अशा सूचनासुध्‍दा त्‍यांना देण्‍यात आल्‍या आहे. ई मस्‍टर  च्‍या नोंदी अद्यावत करण्‍याचे सूचना देवून संगणकाचा डाटा सुध्‍दा अद्यावत करण्‍यात यावा जी कामे अपूर्ण राहिलेली आहेत त्‍याला प्राधान्‍याने पूर्ण करुण संगणक प्रणालीत आवश्‍यक ते बदल करण्‍यात यावे. अपूर्ण कामे पूर्ण करतांना त्‍यावरील झालेला खर्च संगणकातून कमी होणार नाही याची दक्षता घेवून संबंधित संगणक चालकाला सूचना द्यावी अशा सूचना यावेळी करण्‍यात आल्‍या.        
यावेळी बोलतांना उपसचिव आर.विमला यांनी महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय रोजगार हमी योजनेतील अडी-अडचणीचे निराकरण करुण संगणकावर माहिती कशा पध्‍दतीने भरावी याचे प्रात्‍यक्षिक करुण सांगितले. प्रायोगिक तत्‍वावर विदर्भातील अमरावती व वर्धा ही दोन जिल्‍हे असल्‍यामुळे ही कार्यपध्‍दती यशस्‍वी ठरल्‍यानंतर क्रमा-क्रमाने संपूर्ण महाराष्‍ट्रात राबविल्‍या जाईल या प्रणालीमुळे कर्मचा-यांचे श्रम व कागदाची बचत होईल तसेच निधीच्‍या गैरवापराला आळा बसेल. पुरुष व महिला मजुरासाठी बँकेत वेग-वेगळे खाते उघडावयाचे आहे. त्‍यांची खाती भारतीय डाकघरामध्‍ये आहे त्‍यांनासुध्‍दा मजुरीची रक्‍कम त्‍यांच्‍या खात्‍यावर थेट जमा होईल.यासाठी संगणकावर कार्यप्रणाली समजावून सांगितली.
जिल्‍हास्‍तरावर एक खाते व त्‍यानंतर तालुकास्‍तरावरील अधिका-याचे नावे प्रत्‍येकी एक खाते राहणार असून या खात्‍यामधूनच संबंधित मजुरांच्‍या खात्‍यामध्‍ये इलेक्‍ट्रानिक निधी व्‍यवस्‍थापन प्रणालीव्‍दारे रक्‍कम जमा होईल.
         महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय रोजगार हमी योजनेमध्‍ये निधीची कमतरता नाही मात्र कार्यान्वित यंत्रणेने त्‍यांचे वार्षिक उद्दिष्‍ट ठरवून त्‍यानुसार आगामी काळात निधीची मागणी करावी. अवास्‍तव मागणी केल्‍यास त्‍यांची कारणे त्‍यांना द्यावी लागतील असेही त्‍या म्‍हणाल्‍या.
या कार्यक्रमाला अमरावती व वर्धा जिल्‍ह्यातील तहसीलदार व संवर्गविकास अधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक उपजिल्‍हाधिकारी जे.बी.संगितराव यांनी तर संचलन व आभार अजय धमाधिकारी यांनी केले.
000000

मिटकॉन तर्फे उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन



वर्धा दि.5- वर्धा जिल्‍ह्यातील बेरोजगार युवक व युवती करीता विज्ञान व तंत्रज्ञान विभाग,भारत सरकार,नवी दिल्‍ली यांनी पुरस्‍कृत केलेला प्रशिक्षण उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन वर्धा येथे दिनांक 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी,2013 पर्यंत केलेले आहे. सदर प्रशिक्षणामध्‍ये विविध कार्यक्रमात मुख्‍यतेकरुण शिकविले जातील उद्योजकतेचा परिचय, उद्योजकतेची प्रक्रीया, व्‍यवसाय संकल्‍पना, संधीचा शोध आणि विल्‍शेषण, उद्योजकीय व्‍यक्‍तीमत्‍व विकास(दोन दिवसीय निवासी) बाजार पेठेविषयी पाहणी व माहितीचे संकलन, संभाषण कौशल्‍य, नविन व्‍यवसाय करण्‍यासाठी विविध योजनांची माहिती प्रकल्‍प अहवाल तयार करणे, पॅकेजिंग व गुणवत्‍तेचे नियंत्रण, विपणन आणि विक्रीपत्रात सेवा तसेच विविध क्षेत्रातील उद्योजक तसेच संभाव्‍य उद्योजकांना माहिती, प्रेरणा व मार्गदर्शन देवून स्‍वतःचा व्‍यवसाय सुरु करण्‍यासाठी प्रोत्‍साहित करणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्‍ट आहे.  
            सदर प्रशिखणामध्‍ये ज्‍यांना निर्मितीचा उद्योग क्षेत्रामध्‍ये व्‍यवसाय करण्‍याची तीव्र इच्‍छा आहे. त्‍याचबरोबर असे विद्यमान उद्योजक की ज्‍यांची आपल्‍या क्षेत्रामध्‍ये उद्योजकता विकास कार्यक्रमाव्‍दारे विस्‍तार आणि आधुनिकता आणण्‍याची र्इच्‍छा आहे. याशिवाय विज्ञाण आणि तंत्रज्ञान पदविधर तसेच पदविधारक सध्‍या नोकरीत असलेले व स्‍वतःचा व्‍यवसाय सुरु करु इच्छिणारे विज्ञान शाखेतील युवक व युवती करीता स्‍वतःचा उद्योग सुरु करु इच्छित,व्‍यक्‍तींनी प्रशिक्षणाचा लाभ ध्‍यावा प्रशिक्षणासाठी वयाची किमान पात्रता 18 ते 50 वर्ष वयोगटातील बेरोजगार व युवक-युवती फक्‍त 30 प्रशि‍क्षणार्थींना प्रवेश देण्‍यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क मिटकॉन जिल्‍हा कार्यालय, नासरे सभागृहाच्‍या समोर, आर्वी नाक्‍याजवळ, इंदिरा नगर वर्धा किंवा जिल्‍हा प्रशिक्षण समन्‍वयक 9552701150 यांना संपर्क करुण प्रशिखणासाठी नाव नोंदणी करावी.
000

अल्‍पमुदतीच्‍या अभ्‍यासक्रमातील प्रवेश



वर्धा दि.5- वर्धा नगर परिषद अंतर्गत येणा-या दारिद्र रेषेखालील वर्ग 5 वा व वर्ग 8 वा उत्‍तीर्ण असणा-या विद्यार्थ्‍यांसाठी सुवर्ण जयंती रोजगार योजने अंतर्गत शासकीय तंत्र माध्‍यमिक शाळा केंद्र,गणेश टॉकीज जवळ,हॉस्पिटल रोड,वर्धा येथे अल्‍प मुदतीचे अभ्‍यासक्रमामध्‍ये प्रवेश देणे सुरु आहे.त्‍यामध्‍ये काम्‍प्‍युटर सेक्‍टर,ऑटोमोबाईल सेक्‍टर, ईलेक्‍ट्रीकल सेक्‍टर,मशीन सेक्‍टर या अभ्‍यासक्रमाचा समावेश आहे. हे अभ्‍यासक्रम मान्‍यता प्राप्‍त असून या अभ्‍यासक्रमाच्‍या रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध आहेत.अंतिम प्रवेश घेण्‍याची तारीख 15 जानेवारी,2013 आहे.
अधिक माहितीसाठी संस्‍थेचे समन्‍वयक आर.एन.गिरीपुंजे पूर्णवेळ शिक्षक यांचेशी संपर्क साधावा असे मुख्‍याध्‍यापक शासकीय तंत्र माध्‍यमिक शाळा केंद्र तथा कनिष्‍ठ महाविद्यालय,वर्धा कळवितात.
00000

एस.टी.बसेसमध्‍ये आसनाचे आरक्षण


                                  
वर्धा दि.5- राज्‍य परिवहन महामंडळाचे एस.टी.बसेसमध्‍ये विविध घटकासाठी आसन आरक्षण सुविधा उपलब्‍ध करुण देण्‍यात आली आहे.
            50 आसन क्षमता असलेल्‍या बसेसमध्‍ये विधानसभा व विधान परिषदेच्‍या सदस्‍यांना आसन क्रमांक 1 व 2 स्‍वातंत्र्य संग्राम सैनिक आसन क्रमांक 3 व 4 अपंगव्‍यक्‍तीसाठी आसन क्रमांक 4 ते 7 जेष्ठ  नागरीक  आसन क्रमांक 8 ते 10 महिलासाठी आसन क्रमांक 11 ते 16 अधिस्विकृतीधारक  पत्रकारासाठी  आसन क्रमांक 17 व 18 व कर्तव्‍यार्थ प्रवास करणारे रा.प.विभागाचे कर्मचा-यासाठी आसन क्रमांक 19 ते 21 क्रमांकाचे आरक्षण ठेवण्‍यात आले आहे.
44 आसनक्षमता असलेली परिवर्तन बसमध्‍ये विधानसभा,विधानपरिषद सदस्‍यासाठी आसन क्रमांक 1 व 2 स्‍वातंत्र्य संग्राम सैनिकांनसाठी  आसन क्रमांक 3 व 4 अपंगव्‍यक्‍तीसाठी आसन क्रमांक 5 ते 7 जेष्ठ  नागरीकासाठी  आसन क्रमांक 8 ते 10 महिलासाठी आसन क्रमांक 11 ते 16 अधिस्विकृतीधारक  पत्रकारासाठी  आसन क्रमांक 17 व 18 व कर्तव्‍यार्थ प्रवास करणारे रा.प.विभागाचे कर्मचा-यासाठी आसन क्रमांक 19 ते 20 आसन राहणार आहे. 39 आसन क्षमता असलेल्‍या निमआराम बसमध्‍ये विधानसभा, विधानपरिषद सदस्‍यासाठी आसन क्रमांक 1 व 2 ,जेष्‍ठ नागरिकांसाठी 3 ते 5 ,महिलासाठी 6 ते 11 अधिस्विकृती पत्रकारांसाठी 12 ते 13 तसेच 31 आसन मिनीबसमध्‍ये विधानसभा विधानपरिषद सदस्‍यांसाठी आसन क्रमांक 1 व 2 स्‍वातंत्र्य सैनिकासाठी 3 ते 4 अपंग व्‍यक्‍तीसाठी 5 ते 7 जेष्‍ठ नागरिकासाठी 8 ते 10 महिलासाठी 11 ते 16 अधिस्विकृतीधारक पत्रकारांसाठी 17 व 18 रा.प.कर्मचा-यासाठी आसन क्रमांक 19 व 20 आसन आरक्षण ठेवले आहे. असे विभाग नियंत्रक रा.प.वर्धा कळवितात.
00000

Thursday 3 January 2013

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण व द‍लीत मित्र पुरस्‍कारासाठी अर्ज आमंत्रित


               
            वर्धा, दि.3- सामाजिक न्‍याय विभागामार्फत अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती, शारिरिकदृष्‍ट्या मनोदुर्बल, अपंग, कृष्‍ठरोगी  इत्‍यादीच्‍या कल्‍याणासाठी कार्य करणा-या व्‍यक्‍ती व सामाजिक, शिक्षण,आरोग्‍य, शेती, वने, पर्यावरण, सहकार, उद्योग,संस्‍कृती साहीत्‍य, अन्‍याय व अंधश्रध्‍दा निर्मुलन क्षेत्रात कार्य करणा-या सामाजिक संस्‍था यांना प्रत्‍येक  वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्‍कार देण्‍यात येतो. व्‍यक्‍तीसाठी रुपये 15 हजार रोख व सन्‍मानपत्र आणि संस्‍थेकरीता रुपये      25 हजार रोख व सन्‍मापत्र असे पुरस्‍काराचे स्‍वरुप आहे.
     2012-13 या वर्षाच्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्‍कारासाठी दिनांक 25 जानेवारी 2013 पर्यंत इच्‍छुक व्‍यक्‍ती व संस्‍थाकडून प्रस्‍ताव  मागविण्‍यात येत आहेत. अर्जदार  व्‍यक्‍तीचे वय पुरुषासाठी किमान 50 वर्षे व स्त्रियासाठी किमान 40 वर्षे इतके असावे. अर्जदार व्‍यक्‍तीचे सामाजिक क्षेत्रात किमान 15 वषे्र व सामाजिक संस्‍थेचे  किमान 10 वर्षे कार्य असणे आवश्‍यक आहे. अर्जदार व्‍यक्‍ती खासदार, आमदार, जिल्‍हा परिषद सदस्‍य अथवा कोणतीही पदाधिकारी नसावी. तसेच अर्जदार संस्‍था राजकारणापासून अलिप्‍त असावी.
         पुरस्‍कारासाठी अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी  सहारय्यक आयुक्‍त, समाज कलयाण सामाजिक न्‍याय भवन  वर्धा या कार्यालयास कामकाजाच्‍या  दिवशी कार्यालयीन वेळेत प्रत्‍यक्ष संपर्क साधावा. प्रस्‍ताव 3 प्रतीत सादर करावा. प्रस्‍ताव स्विकारण्‍याची अंतिम मुदत 25 जानेवारी 2013 आहे. या तारखेनंतर आलेले प्रस्‍ताव स्विकारले जाणार नाहीत. असे सहाय्यक आयुक्‍त, समाज कल्‍याण, वर्धा  कळवितात.
                                               00000

एकात्मिक पाणलोट व्‍यवस्‍थापन कार्यक्रम अंतर्गत जिल्‍ह्यातील 12 प्रकल्‍पांना मंजूरी


          
           वर्धा, दि.3 – एकात्‍मक पाणलोट  व्‍यवस्‍थापन कार्यक्रम 2012-13 अंतर्गत जिल्‍ह्यातील 12 प्रकल्‍पांना मंजुरी मिळाली आहे. सदर मंजूर प्रकल्‍पाचे सविस्‍तर प्रकल्‍प अ‍हवाल तयार करण्‍याकरीता मंजुरीप्राप्‍त यादीतील स्‍वयंसेवी संस्‍थांनी दिनांक 10 जानेवारी 2013 पर्यंत प्रस्‍ताव जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, वर्धा यांचेकडे सादर करावे.
          याबाबतची माहिती व अटी व शर्ती जिल्‍हा पाणलोट विकास कक्ष तथा माहिती केंद्र जिल्‍हा  अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, रेल्‍वे स्‍टेशन, वर्धा येथे उपलब्‍ध  आहे.
                                                00000

रस्‍ता सुरक्षा अभियान अंतर्गत शालेय विद्यार्थ्‍यांसाठी विविध स्‍पर्धा


          वर्धा, दि.3 – शहर वाहतुक शाखा वर्धा येथे दिनांक 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2013 पर्यंत रसता सुरक्षा अभियान राबविण्‍यात येणार आहे. या रस्‍ता सुरक्षा अभियाना दरम्‍यान दि. 5 जानेवारी 2013 रोजी रस्‍त्‍यावरील अपघाताची कारणे जबाबदारी व उपाय या विषयावर निबंध स्‍पर्धा, दि. 7 जानेवारी 2013 रोजी दारु पिऊन वाहन चालविल्‍याने अपघात कसे होतात या विषयावर चित्रकला स्‍पर्धा, तसेच दि. 9 जानेवारी 2013 रोजी  वाहतूक या विषयावर प्रश्‍नमंजूषा स्‍पर्धा  आयोजित आहे.
         वाहतुक या विषयावर प्रश्‍नमंजुषा स्‍पर्धा, दिनांक 11 जानेवारी 2013 रेाजी शालेय जीवनात सुरक्षित वाहनाचा उपयोग काळाची गरज  आहे  किंवा नाही या  विषयावर वक्‍तृत्‍व स्‍पर्धा अशा विविध स्‍पर्धा घेण्‍यात येणार असून, स्‍पर्धकाला योग्‍य बक्षिस दिले जाणार आहे.
        शाळेतील मुख्‍याध्‍यापकांनी वक्‍तृत्‍व स्‍पर्धेकरीता एक मुलगा, एक मुलगी व इतर 3 स्‍पर्धांकरीता प्रत्‍येकी 10 विद्यार्थ्‍यांना प्रवेश दिल्‍या जाईल. असे पोलीस निरीक्षक शहर वाहतुक शाखा वर्धा कळवितात.

                                                  00000

महिलांनी स्‍वतामध्‍ये आत्‍मविश्‍वास निर्माण करावा


                                                                                           जि. प. अध्‍यक्ष
            राजमाता जिजाऊ व ज्ञानज्‍योती सावीत्रीबाई यांच्‍या जयंती
          निमित्‍ताने जाणीव व जागृती अभीयानाला आजपासुन प्रारंभ
           
वर्धा, दि.3- समाजात महिलांकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोन नकारात्‍मक असुन  नीतीमुल्‍याचाही –हास होत आहे. महिलांना अबला न समजता सबला समजण्‍यासाठी शासन महिलांच्‍या संरक्ष्‍णासाठी अनेक कायदे केले ते अमलातही आणले आहे. समाजातील पुरुष प्रधान संस्‍कृतीचा पगडा आजही महिलांवर दिसून येत असून ही परिस्थिती बदलण्‍या करीता महिलांनी स्‍वतामध्‍ये आत्‍मविश्‍वास निर्माण करावा असे  आवाहन जि. प. अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे यांनी केले.
          राजमाता जिजाऊ व ज्ञानज्‍योती सावित्रीबाई फुले यांच्‍या जंयंती निमित्‍ताने आयोजित जाणीव व जागृती अभियानाचे उदृघाटन येथील विकास भवन येथे आज संपन्‍न झाले त्‍या प्रसंगी ते बोलत होते.
          मंचावर जि. प. मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने, पोलीस अधिक्षक अविनाशकुमार, जि. प. महिला व बाल कल्‍याण सभापती निर्मलाताई बिजवे, जिल्‍हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा कुलसुंगे, प्रकल्‍प अधिकारी माहूर्ले, प्रा. शेख हाशम, माधुरी काळे, व श्‍याम भेंडे आदी मान्‍यवर उपस्थित होते.
          महिलांच्‍या प्रगतीसाठी राज्‍यशासन अर्थसंकल्‍पात भरीव तरतूद केली असून जिल्‍हा परिषदही त्‍यांच्‍या शेष फंडातून वेगळी तरतूद करीत असल्‍याची माहिती देवूर जि. प. अध्‍यक्ष ढगे म्‍हणाले की, दिल्‍ली सारखी अप्रिय घटना घडू नये यासाठी महिलांनी स्‍वतामध्‍ये  आत्‍मविश्‍वास व आत्‍मबळ निर्माण करावा. पुरुषाप्रमाणे महिलांना समसमान अधिकार प्राप्‍त असल्‍याने महिलांनी स्‍वताला कमी समजु नये.
          या अभियानामध्‍ये महिलांनी आपल्‍या आरोग्‍याचे  प्रश्‍न निरक्षरता , जुन्‍या चालीरितींना झुगारुन स्‍वावलंबी बनण्‍यासाठी कसोशिने  प्रयत्‍न करावे. ज्ञानज्‍योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांचे कार्य सतत डोळयापूढे ठेवून त्‍याच्‍या आचार व विचाराचे अनूकरण करावे असेही ते म्‍हणाले.
          याप्रसंगी बोलतांना मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने म्‍हणाले की, महिलांच्‍या सर्वांगिन विकासासाठी गांव व शहर पातळीवर अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, व मदतनिस यांचा महत्‍वाचा वाटा आहे. महिलांच्‍या  आरोग्‍याचे प्रश्‍न असो की समाज विधायक कार्य असो  त्‍या  मोलाची मदत करीत असतात. महिलांच्‍या प्रगतीसाठी शासन प्रयत्‍नशिल असून त्‍यांच्‍यासाठी अनेक सकारात्‍मक कार्य सूरु आहे. महिलांना आत्‍मनिर्भर बनण्‍यासाठी शासन कायदे करीत असले तरी त्‍यांना त्‍यांच्‍या प्रश्‍नाविषयी चर्चा करुन त्‍याच्‍या मध्‍ये जाणीव व जागृती निर्माण करणे आवश्‍यक आहे. अत्‍यंत प्रतिकूल परिस्थ्तिीमध्‍ये ज्ञानज्‍योती सावीत्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया रचला. त्‍याच्‍या कार्यामुळे आज महिला पुरुषांच्‍या बरोबरीने प्रत्‍येक क्षेत्रामध्‍ये अग्रभागी आहे. राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराज यांना चांगले संस्‍कार दिल्‍यामुळे त्‍यांनी लोकपयोगी व लोकहिताचे कार्य केले. त्‍यांनी त्‍यांच्‍या राज्‍यामध्‍ये महिलांविषयी गौरवशाली परंपरा जोपासली हे अभियान महिलांच्‍या स्‍वावलंबनासाठी महत्‍वपुर्ण ठरणार असल्‍याचे त्‍यांनी सांगीतले.
          तत्‍पुर्वी या कार्यक्रमाचे  दिप प्रज्‍वलन करुन राजमाता जिजाऊ व ज्ञानज्‍योती सावित्रीबाई फुले याच्‍या जयंती निमित्‍य  जाणिव व जागृती अभियानाचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते संपन्‍न्‍ झाले यावेळी प्रा. शेख हाशम यांनी मुलांच्‍या कायद्याविषयी तसेच माधूरी काळे यांनी महीला विषयी शासनाने केलेले कायद्याबाबत  याविषयी माहिती सांगीतली.
          या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक मनिषा कुलसुंगे यांनी केले. संचलन नितीन गायकवाड व आभार प्रदर्शन मोहूर्ले यांनी मानले याप्रसंगी मोठया प्रमाणावर नागरीक उपस्थित होते.
000

Wednesday 2 January 2013

राजमाता जिजाऊ आणि क्रांती ज्‍योती सावित्रीबाई फुले यांच्‍या जयंती निमित्‍त जाणीव जागृती अभियान



वर्धा,दि.2- वर्धा जिल्‍हास्‍तरावर व तालुका स्‍तरावर दिनांक.3.1.2013 ते 12.1.2013 पर्यंत राजमाता जिजाऊ आणि क्रांती ज्‍योती सावित्रीबाई फुले जाणीव जागृती अभियान कार्यक्रम साजरा करण्‍यात येत आहे. क्रांती ज्‍योती सावित्रीबाई फुले यांच्‍या जयंतीनिमित्‍ताने दिनांक.3.1.2013 रोजी दुपारी 2.00 वाजता विकास भवन, वर्धा येथे सदर अभियानाचा शुभारंभ होणार असून जि.प.अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे याच्‍या  अध्‍यक्षतेखाली जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना, पोलीस अधिक्षक अविनाशकुमार , जि.प.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने यांच्‍या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्‍यात येणार आहे.
या कार्यक्रमामध्‍ये महिला व बाल‍कांविषयक कायदे तसेच योजनांवर माहिती देवून जाणीव जागृती करण्‍यात येईल असे जिल्‍हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा गुरसगे यांनी कळविले आहे.

अवघड शस्‍त्रक्रियेतून सरस्‍वतीला मिळाले नव‍जीवन वैद्यकीय क्षेत्रातील गुंतागुंतीची शस्‍त्रक्रिया


         वर्धा, दि.2 – जन्‍मापासून     फुप्फूसाच्‍या आजाराने ग्रस्‍त असलेल्‍या   गडचिरोली जिल्‍ह्यातील  अत्‍यंत दुर्गम ग्‍लास फोर्डपेठा (सिरोंचा) येथील दोन वर्षाच्‍या  कुमारी  सरस्‍वती  पोयाम कोनाम  या बालीकेवर  सेवाग्राम  कस्‍तुरबा रुग्‍णालयात यशस्‍वी  शस्‍त्रक्रिया करुन तीला नवजीवन मिळाले आहे.  
        कांझीमेंटल अॅडीनॉयल `सिस्‍टीक मॅलाफार्मेशन ऑफ लंक `Congemital Adevoid Cystce Malformation of leftlungg या दुर्धर आजारामुळे  ती जन्‍मापासूनच ग्रस्‍त  होती. अशा प्रकारचा आजार एक लक्ष रुग्‍णांमध्‍ये  अपवादाने  एखाद्यामध्‍ये  आढळतो.  दोन वर्षाच्‍या  लहान मुलीवर फुफ्फुसाची  अश्‍या  प्रकारची  यशस्‍वी शस्‍त्रक्रिया झालयाची   भारतीय वैद्यकीय क्षेत्रात अद्याप नोंद नाही.
        गडचिरोली जिल्‍ह्यातील सिरोंचा तालुक्‍याच्‍या  महाराष्‍ट्र आणि आंध्र प्रदेशच्‍या सीमेवरील  ग्‍लास फोर्ड पेठा  या  अल्‍पभुधारक  कुटूंबातील  पोचमकोनाम यांच्‍या  सरस्‍वती या मुलीला जन्‍मापासूनच ताप, सर्दी, खोकला  होता.  गावात तसेच  तालुकास्‍तरावर उपचार करुनही  सतत आजारी  असल्‍यामुळे  आंध्र प्रदेशातील मंचाल येथील  डॉक्‍टरांकडून  औषधोपचार करण्‍यात आले. शेवटी सेवाग्राम येथील  कस्‍तुरबा रुग्‍णालयात औषधोपचारासाठी  भरती केले असता या मुलीवर  अवघड शस्‍त्रक्रीया  आवश्‍यक असल्‍याचे  स्‍पष्‍ट झाले.   
         सेवाग्राम येथील  कस्‍तुरबा रुग्‍णालयातील  शल्‍यचिकित्‍सा  विभागाचे  प्रमुख डॉ. ए.पी. कांबळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली  डॉक्‍टरांच्‍या  चमुने तपासणी केली असता कंजनायटर सिस्‍टीक अॅडीनायल्‍ड मालफार्मेशन   हा फुफ्फुसानी श्‍वासनलीकेमधील रोग असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. एक्‍सरे, सीटीस्‍कॅन  आणि संपूर्ण  वैद्यकीय तपासणी नंतर  31  डिसेंबर रोजी  2 वर्षाच्‍या बालीकेवर  यशस्‍वी  शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. श्‍वासनलीका  फुफ्फुसातील पंच झालेला भाग बाहेर काढून टाकण्‍यात आला.  एक लाख लोकांमध्‍ये  एखाद्यालाच अशा प्रकारचा आजार होत असून, आपल्‍या  32 वर्षाच्‍या वैद्यकीय सेवेत प्रथमच  अशा प्रकारच्‍या   रुग्‍णांवर शस्‍त्रक्रिया  करण्‍यात आली असल्‍याची  माहिती यावेळी  डॉ. ए.टी. कांबळे यांनी दिली.
          दोन वर्षाच्‍या  काळात निकामी झालेले , फुफ्फुस   दुस-या भागावर विपरीत परिणाम करुन  पस  होत गेला. त्‍यामुळे श्‍वासनलीका आणि फुफ्फस यांचा विकास होत नव्‍हता. श्‍वसननलीका कमी विकसीत झाल्‍यामुळे  ते फुफ्फसाला जोडू शकली नाही. त्‍यामुळे हृदयावर कांप्रेशन तयार झाले.  निकामी झालेले , फुफ्फुस   काढून टाकण्‍यात आले. या मुलीवर  अत्‍यंत  गुंतागुंतीची शस्‍त्रक्रिया  यशस्‍वी  झालयानंतर   मुलीची प्रकृती  उत्‍तम  असून सेवाग्राम  येथील कस्‍तुरबा रुगणालयात अश्‍या प्रकारची पहीली शस्‍त्रक्रिया  यशस्‍वी  झाली आहे. शलयचिकित्‍सा  विभाग प्रमुख डॉ. ए.पी. कांबळे यांचेसह आनंद थवाईत, डॉ. कमलेश झारीया, डॉ. राबीन गुप्‍ता, डॉ. पुजा बत्रा आदींनी  ही अवघड शस्‍त्रक्रिया यशस्‍वी केली आहे.
     बाल शस्‍त्रक्रिया विभागातील  आयसीसीयु  मध्‍ये  कु.सरस्‍वती  सध्‍या  भरती  आहे.
     महात्‍मा गांधी इन्‍स्‍टीट्युट ऑ फ सायन्‍सेसच्‍या  कस्‍तुरबा रुग्‍णालयात  रुगणांवरील  उपचारासाठी  अत्‍यंत  आवश्‍यक असलेले मल्‍टीपॅरामीटर, पल्‍स अॅक्‍झीलेटर , ब्‍लडगेज अॅनालायझर, व्‍हेंटीलेटर इतयादी सुविधा असल्‍यामुळे  अशाप्रकारच्‍या गुंतागुंतीच्‍या शस्‍त्रक्रिया शक्‍य असल्‍याचे मतही शस्‍त्रक्रिया विभागाचे  प्रमुख डॉ. ए.टी. कांबळे यांनी यावेळी सांगितले.
                                                  00000

Monday 31 December 2012

जिल्‍ह्यात 37 (1) व 3 कलम लागू


  
     वर्धा , दि. 31 – वर्धा जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित रहावी यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी एन.नविन सांना यांना प्रदान केलेल्‍या अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम (3((1) व 3 कलम जारी केले आहे.
      या कलमाचा अंमल दि. 10 जानेवारी 2013 च्‍या रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल असे आदेशात नमूद आहे.
                                              0000000

महाविद्यालयातील शिष्‍यवृत्‍तीसाठी आधार कार्ड आवश्‍यक


                
    वर्धा, दिनांक 31 – महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांना  शिष्‍यवृततीसाठी  आधार  नोंदणी  तसेच  राष्‍ट्रीयकृत बँकेत  बचत खाते  आवश्‍यक असून, ज्‍या विद्यार्थ्‍यांकडे  आधार क्रमांक  तसेच बचत खाते नाहीत  अशा विद्यार्थ्‍यांच्‍या  खात्‍यात  शिष्‍यवृत्‍ती  जमा करण्‍यात येणार नाही.
      महाविद्यालयातील  शिष्‍यवृत्‍तीसाठी   विद्यार्थ्‍यांनी  आधार नोंदणी केलेली आहे व बँकेचे बचत खाते आहे अशा विद्यार्थ्‍यांची   यादी  समाजकल्‍याण  कार्यालयात उपलब्‍ध  आहे. शिष्‍यवृत्‍ती धारक विद्यार्थ्‍यांच्‍या   यादीमध्‍ये  बचत खाते क्रमांक  व आयएफएससी  कोड नंबर  तपासून  विद्यार्थ्‍यांचे  नाव  व बचत खाते   यांची  महाविद्यालयाचे प्राचार्यानी  तसेच मुख्‍याध्‍यापकांनी   तपासणी करणे  आवश्‍यक आहे. शिष्‍यवृत्‍ती  धारकांनी   महाविद्यालय प्रशासनाकडे  आपला  आधार क्रमांक  व  राष्‍ट्रीयकृत बँकेतील बचत खात्‍याचा क्रमांकाची प्रत्‍यक्ष तपासणी  करावी, असे समाज कल्‍याण विभागाचे सहाय्यक आयुक्‍त  जया राऊत यांनी सुचित केले आहे.
                                           00000000000

रस्‍ता सुरक्षा अभियानाचे आज उदघाटन


                         
           वर्धा, दिनांक 31 – रस्‍ता  सुरक्षा अभियानाचे उदघाटन जिल्‍हाधिकारी  एन.नविन सोना यांच्‍या  हस्‍ते  मंगळवार  दिनांक   1 जानेवारी  रोजी   सकाळी  10.30 वाजता वाहतूक  बजाजनगर चौकातील वाहतूक नियंत्रण शाखेच्‍या  प्रांगणात आयोजित करण्‍यात आले आहे.
         उपप्रादेशिक परिवहन विभाग वर्धा  वाहतूक नियंत्रण शाखा यांच्‍या संयुक्‍त  विद्यमाने 24 व्‍या  रस्‍ता   सुरक्षा अभियानाचे आयोजन  करण्‍यात आले आहे. या कार्यक्रमाच्‍या  अध्‍यक्षस्‍थानी   जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाशकुमार राहणार आहेत. रस्‍ता   सुरक्षा अभियाना अंतर्गत सुरक्षीत वाहतूक  तसेच  डि्ंक अॅन्‍ड ड्राइव्‍ह  मोहीम राबविण्‍यात येणार आहे. रस्‍ता  सुरक्षा अभियाना बद्दल वाहन चालकाबद्दल जागृती निर्माण करण्‍यासाठी 1 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असून, यामध्‍ये  वाहनचालकांची  नेत्र तपासणी , स्‍कुल बस चालकांना प्रशिक्षण, रहदारी नियमाविषयी  प्रबोधन, तसेच शालेय विद्यार्थ्‍यांसाठी   विविध  उपक्रम  राबविण्‍यात येणार आहेत.
          रस्‍ता   सुरक्षा अभियान  मोहीमेच्‍या  उदघाटन समारंभास तसेच विविध कार्यक्रमास उपस्थित राहण्‍याचे आवाहन  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्‍हाण व वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक शशीकांत भंडारे यांनी केले आहे.
                                            000000

पालकमंत्री राजेंद्र मुळक आज वर्धेत



              वर्धा दि. 31 वित्‍त व नियोजन व उर्जा राज्‍यमंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री राजेंद्र मुळक आज दिनांक 1 जानेवारी 2013 रोजी दुपारी 4.00 वाजता नागपूरहून वर्धा येथील विकास भवन येथे आगमण. दुपारी 4 ते सांय. 5.00 वाजता आधार योजने अंतर्गत विविध लाभार्थ्‍यांच्‍या बँक खात्‍यावर रक्‍कम जमा करण्‍याच्‍या कार्यक्रमांचा शुभारंभ  स्‍थळ विकासभवन वर्धा. सांयकाळी 5 वाजता वर्धा येथून नागपूर कडे प्रयाण करतील.
0000