वर्धा
दि.5- राज्य परिवहन महामंडळाचे एस.टी.बसेसमध्ये विविध घटकासाठी आसन आरक्षण
सुविधा उपलब्ध करुण देण्यात आली आहे.
50 आसन क्षमता असलेल्या बसेसमध्ये
विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्यांना आसन क्रमांक 1 व 2 स्वातंत्र्य संग्राम
सैनिक आसन क्रमांक 3 व 4 अपंगव्यक्तीसाठी आसन क्रमांक 4 ते 7 जेष्ठ नागरीक आसन
क्रमांक 8 ते 10 महिलासाठी आसन क्रमांक 11 ते 16 अधिस्विकृतीधारक पत्रकारासाठी आसन क्रमांक 17 व 18 व कर्तव्यार्थ प्रवास
करणारे रा.प.विभागाचे कर्मचा-यासाठी आसन क्रमांक 19 ते 21 क्रमांकाचे आरक्षण ठेवण्यात
आले आहे.
44
आसनक्षमता असलेली परिवर्तन बसमध्ये विधानसभा,विधानपरिषद सदस्यासाठी आसन क्रमांक
1 व 2 स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनसाठी आसन क्रमांक 3 व 4 अपंगव्यक्तीसाठी आसन क्रमांक
5 ते 7 जेष्ठ नागरीकासाठी आसन क्रमांक 8 ते 10 महिलासाठी आसन क्रमांक 11
ते 16 अधिस्विकृतीधारक पत्रकारासाठी आसन क्रमांक 17 व 18 व कर्तव्यार्थ प्रवास
करणारे रा.प.विभागाचे कर्मचा-यासाठी आसन क्रमांक 19 ते 20 आसन राहणार आहे. 39 आसन क्षमता
असलेल्या निमआराम बसमध्ये विधानसभा, विधानपरिषद सदस्यासाठी आसन क्रमांक 1 व 2
,जेष्ठ नागरिकांसाठी 3 ते 5 ,महिलासाठी 6 ते 11 अधिस्विकृती पत्रकारांसाठी 12 ते
13 तसेच 31 आसन मिनीबसमध्ये विधानसभा विधानपरिषद सदस्यांसाठी आसन क्रमांक 1 व 2
स्वातंत्र्य सैनिकासाठी 3 ते 4 अपंग व्यक्तीसाठी 5 ते 7 जेष्ठ नागरिकासाठी 8
ते 10 महिलासाठी 11 ते 16 अधिस्विकृतीधारक पत्रकारांसाठी 17 व 18 रा.प.कर्मचा-यासाठी
आसन क्रमांक 19 व 20 आसन आरक्षण ठेवले आहे. असे विभाग नियंत्रक रा.प.वर्धा
कळवितात.
00000
No comments:
Post a Comment