Sunday 20 March 2016

पाणी बचतीच्या संदेशासाठी वर्धेकरांची पदयात्रा
Ø खासदार रामदास तडस यांनी दाखविली झेंडी
Ø डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रा
Ø जलसंपदा विभागाचा उपक्रम, लायन्स क्लबचाही सहभाग
वर्धा, दिनांक 20 –  पाणी हेच जीवन, पाण्याचा वापर जपून करा, पाण्याची बचत कराजल है तो कल हैआदी घोषणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत जलजागृती सप्ताहानिमित्त काढण्यात आलेल्या पदयात्रेतून वर्धेकरांनी  संदेश देण्यात आला. या पदयात्रेला हिरवी झेंडी खासदार रामदास तडस यांनी दाखविली. यावेळी त्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. पदयात्रेचा समारोप आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत झाला. त्यांनीही विभागाच्या कार्याचे कौतूक करून जनतेने पाणी बचतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
             जलसंपदा विभागामार्फत वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला खासदार रामदास तडस यांनी अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पदयात्रेला झेंडी दाखविली. पदयात्रेत भजनी मंडळासह, जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.
             दिनांक 16 ते 22 मार्चपर्यंत साजरा करण्यात येत असलेल्या जलजागृती सप्ताहानिमित्त पदयात्रेतून पाणी बचतीचा संदेश लोकांपर्यंत पोहचावा. पाण्याची बचत व्हावी, या उद्देशाने आज, दिनांक 20 रोजी शहरातून पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आली. पदयात्रेत भजनी मंडळासह जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.                    
              डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून बजाज चौक, शिवाजी चौक मार्गे निघालेल्या पदयात्रेचा समारोप आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आला.  यावेळी त्यांनी मराठवाड्यासह राज्याला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी बचत ही काळाची गरज बनली असून प्रत्येक थेंब जपून वापरण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले
प्रारंभी खासदार रामदास तडस यांचा वृक्ष देऊन जलसंपदा विभागामार्फत वृक्ष सत्कार करण्यात आला. या पदयात्रा कार्यक्रमास जिल्हा पोलिस उपअधीक्षक आर.जी. किल्लेकर, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, सामाजिक कार्यकर्ते रमेश केला, लॉयन्स क्लबचे अभिषेक बेद,अनिल नरेडी, ओमकार गावंडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी, कार्यकारी अभियंता शंकर मंडवार, अमित मेश्राम, दत्तात्रय रब्बेवार, श्री.ढवळे, उपकार्यकारी अभियंता विजय नाखले, सुनील दोशी, श्री. देशमुख, सहायक अभियंता राजू बोडेकर, गणेश गोडे, लेखाधिकारी प्रदीप शेंदरे, इमरान राही, इरफान शेख, सुहास पाटील आदींची उपस्थिती होती. जलसंपदा विभागामार्फत मान्यवरांना वृक्ष भेट देऊन स्वागत करण्यात आले. आभार श्री. रब्बेवार यांनी मानले.    

                                                          000000
आपले सरकार वेब पोर्टलवर
जनतेच्‍या 43 तक्रारी
Ø तक्रार निवारण प्रणालीच्या जनतेकडून वापर
Ø शासन दरबारी आपले प्रश्‍न मांडण्‍यासाठी व्‍यासपीठ
Ø 22 तक्रारी संदर्भात कार्यवाही पूर्ण
Ø तक्रारीसंदर्भात आपले मत मोडण्‍याचा अधिकार   
          वर्धा, दि.17 -  आपले सरकार तक्रार निवारण प्रणालीद्वारे जनतेला आपल्‍या तक्रारी थेट शासनाकडे पाठविण्‍याचे व्‍यासपीठ उपलब्‍ध झाले आहे. या व्‍यासपीठाचा वापर वर्धा जिल्‍ह्यातील 43 नागरिकांनी केला आहे. प्रशासनातर्फे संगणकीकृत प्रणालीद्वारे प्राप्‍त झालेल्‍या तक्रारीची दखल घेवून सोडविण्‍याची प्रक्रिया सुरु आहे.
          आपले सरकार तक्रार निवारण प्रणालीची सुरुवात 26 जानेवारी रोजी सुरुवात झाली आहे. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी  जनतेला आपले गा-हाणी थेट प्रशासनाकडे मांडता यावे यासाठी आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली सुरु केली आहे. यामध्‍ये जनतेच्‍या थेट तक्रारी, माहितीचा अधिकार शासनाला सूचना, सेवा हक्‍क अधिनियम व ऑनलाईन पद्धतीचे व्‍यासपीठ उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहे. https://grievances.maharashtra.gov.in तसेच applesarkar.maharashtra.gov.in आपल्‍या सूचना तक्रारी थेट मांडण्‍याची सुविधा उपलब्‍ध झाली आहे.
          महसूल, जिल्‍हा परिषद व जिल्‍हा पोलिस अधीक्षक या कार्यालया संदर्भातील तक्रारी ऑनलाईन करण्‍याच्‍या सुविधेचा लाभ घेऊन एकूण 43 तक्रारी थेट दाखल केल्‍या आहेत. यामध्‍ये महसूल प्रशासना संदर्भातील 28 तक्रारी, जिल्‍हा परिषद 12 तर पोलिस विभागाशी संबंधित तक्रारी दाखल झाल्‍या आहेत.
          ऑनलाईन पद्धतीने दाखल झालेल्‍या तक्रारी संदर्भात जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल नियमित आढावा घेत आहेत. संबंधित विभागाकडे तक्रार वर्ग करुन तक्रारी संदर्भात कार्यवाहीची प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर तक्रार दाखल मोबाईलवर एसएमएसद्वारे तक्रारी संदर्भात माहिती देण्‍यात येते.
          महसूल विभागात प्राप्‍त झालेल्‍या 28 तक्रारीमध्‍ये भूसुधार, गृह, आस्‍थापना, नगर पालिका, निवडणुका, भूसंपादन, राज्‍य वीज वितरण कंपनी  महात्‍मा गांधी रोजगार हमी योजना तसेच उपसहनिबंधक याचे संदर्भातील तक्रारीचा समावेश आहे. प्राप्‍त झालेला तक्रारीपैकी 14 तक्रारी निकाली काढण्‍यात आल्‍या आहेत. 14 विभागाकडे वर्ककरुन कार्यवाही करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या आहेत.
          जिल्‍हा परिषदेकडे 12 तक्रारीपैकी 8 तक्रारीसंदर्भात निर्णय देण्‍यात आला आहे तर 4 संबंधित विभागाला निर्णयासाठी पाठविण्‍यात येणार आहेत. जिल्‍हा परिषदेमध्‍ये आरोग्‍य, पशुसंवर्धन, ग्रामपंचायत ग्रामीण, पाणी पुरवठा आदी विभागाशी संबंधित आहेत.
          प्रशासना संदर्भात जनतेच्‍या तक्रारी अथवा गा-हाणी असल्‍यास त्‍या सोडविण्‍यासाठी जनतेनी आपले सरकार तक्रार निवारण प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केली आहे.

0000000
जलजागृती सप्ताहानिमित्त आज उमरी मेघेत जलसाहित्य संमेलन
Ø  पाणी पुरवठा विभागामार्फत आयोजन
Ø  जलसाहित्य संमेलनासह विविध जनजागृतीपर कार्यक्रम
Ø  लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय कार्यशाळा
             वर्धा, दिनांक 18–   जागतिक जल दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा स्वच्छता विभागाच्यावतीने शनिवार, दिनांक 19 मार्च रोजी सकाळी 11 वाजता उमरी मेघे  येथे पाणी पुरवठ्याचे उद्भवाजवळ जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या आराखड्यातील निवडक 422 ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी,जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जलतज्ञ माधव कोटस्थाने यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय कार्यशाळा जलसाहित्य संमलनाचे उद्घाटन होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांनी सांगितले.
           दिनांक 16 ते 22 मार्च या कालावधीत पाण्याचे महत्त्व जनतेला पटवून देण्यासाठी तसेच पाण्याबाबत योग्य व्यवस्थापन, जलसाक्षर करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच जिल्ह्यातील 8 पंचायत समितीच्या सभागृहात तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत 58 ग्रामपंचायतीमध्ये सप्ताहकालावधीत 24 तास पाणीपुरवठा आणि मीटर बसविण्याबाबत ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. पाणी टंचाई आराखड्यातील 60 ग्रामपंचायतींनाही पाणी बचतीवर ग्रामसभेतून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच 422 ग्रामपंचायतीत जलदिंडी, निवडक ग्रामपंचायतीत पाऊस पाणी संकलन वॉल पेंटिंग, पाणी बचतीचे संदेश रंगविणे आदी उपक्रम हाती घेण्यात आल्याचेही श्री. पवार यांनी सांगितले आहे
                                                               0000



शेतक-यांच्या शेतमाल विक्रीसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ
-         रामदास तडस
Ø धान्य महोत्सवाचे थाटात उद्घाटन
Ø भंडा-याच्या केशर, चिन्नोर तांदूळ तर वर्धेच्या तूरडाळीला मागणी
Ø शेतकरी गटांचे 42 स्टॉलवर धान्यांची विक्री
Ø शेतकरी उत्पादक गटातर्फे फळ भाजीपाला उपलब्ध
Ø धान्य महोत्सव 20 मार्चपर्यंत
वर्धा, दिनांक 18 – शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा कायम राहावा, तसेच शेतक-यांना उत्पादित धान्य व्यापा-यामार्फत बाजारपेठेत आणता थेट ग्राहकांना शेतातील उत्पादित माल सहज सुलभपणे योग्य भावात मिळावा, यासाठी एमगिरी परिसरात शेतमाल विक्रीसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही खासदार रामदास तडस यांनी दिली.
एमगिरी परिसरात कृषी पणन विभाग तसेच आत्मामार्फत आयोजित धान्य महोत्सवाचे उद्घाटन खासदार रामदास तडस यांनी केले, यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एमगिरीचे संचालक प्रफुल्ल्काळे, आत्माचे प्रकल्प संचालक दीपक पटेल, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, कृषी तज्ञ डॉ. सुरेश नेमाडे, प्रदीप धवने यांची उपस्थिती होती.
धान्य महोत्सवाच्या माध्यमातून शेतक-यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहचता येते ग्राहकांनाही बाजारभावापेक्षा कमी दराने शेतात उत्पादित केलेला शेतमाल उपलब्ध होत असल्यामुळे शेतक-यांना योग्य बाजारपेठ भाव मिळत असल्याचे सांगताना एमगिरी परिसरात राज्यातील पहिली शेतक-यांसाठी स्वतंत्र बाजारपेठ बांधण्यासाठी आवश्यक असणारा निधी खासदार निधीतून अथवा जिल्हा नियोजन मंडळातून उपलब्ध करून देण्यात येईल, असेही खासदार रामदास तडस यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी शेतक-यांना उत्पादित केलेल्या मालाला योग्या बाजारभाव मिळत नाही, तसेच उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळाल्यामुळे धान्य बाजार ही संकल्पना जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात राबविण्याचा मानस असून शेतकरी ते ग्राहक कायम नाते निर्माण करून ग्राहकांना नियमित धान्य पुरवठा करण्यासाठी बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. एमगिरीचे संचालक प्रफुल्ल काळे यांनी बाराही महिने शेतक-यांना विक्रीची कायम व्यवस्था असावी, यादृष्टीने जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून शेतक-यांना या पुढे कुणालाही कमिशन देता, आपला माल विकता यावा यासाठी बाजारपेठ ही संकल्पना राबविण्याची सूचना यावेळी केली. प्रारंभी आत्म्याचे प्रकल्प संचालक दीपक पटेल यांनी धान्य महोत्सव आयोजनाची भूमिका सांगितली. या महोत्सवामध्ये पवनी भंडारा येथील केशर, चिन्नोर आदी तांदूळ तसेच शेतकरी बचत गटाने तयार केलेले तूरडाळ, गहू, चना, हळद, मिरची तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे विविध फळ भाजीपाला खाद्यपदार्थ हे या धान्य महोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. कार्यक्रमाचे संचालन विलास दवणे यांनी तर आभार पंकज सावरकर यांनी मानले. यावेळी तालुका कृषी अधिकारी बिपीन राठोड, जनार्दन झाडे तसेच शेतकरी उत्पादक कंपनी संघाचे प्रतिनिधी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

00000